Breking News

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

अन् ८० फुटावर लागले पाणी...

                    गणेश स्थापनेच्या दिवशी बोअरवेल करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्थापने नंतर म्हणजेच १ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्षात बोरवेल करण्यास सुरुवात केली, पाणी कोणत्या दिशेला लागेल याबाबत कुठल्याही तज्ञाशी चर्चा न करता अथवा कुणालाही न दाखवता पाणी या ठिकाणी हमखास लागेल, कारण चिंतेश्वर महादेव शेजारी आहे याशिवाय पश्चिमेला बाजूला सार्वजनिक व उत्तरेला खुशाल सागर यांचे असे साधारणत: २० फुटाच्या अंतरावर दोन बोअरवेल असल्याने पाणी लागेलच अशी श्रद्धा व आत्मविश्वासावर आम्ही बोरवेल करण्याचा निर्णय घेतला. घराचा लांबी रुंदी नुसार व घर बांधकाम सर्व सोय सुविधायुक्त यावे याशिवाय आपल्यामुळे अन्य कुणाला अडचण भासू नये म्हणून जागेच्या अनुषगाने बोअरवेल बैठक हॉल मध्ये म्हणजेच घराचा ईशान्य कोपऱ्यात येणार होती. तसेच आज दोन खोलीचे नियोजन असल्याने व भविष्यात काही बदल केल्यास एक खोलीचे बांधकाम केल्यास सदर बोअरवेल ओट्यावर यावे म्हणून मंदिरापासून ६ फूट व पश्चिममे कडील असलेले शेजारी राजेंद्र बोरसे (शिंपी) यांच्या घराला लागून साधारणत: १७ फूट येवढे बोअर करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता ठेकदार दिलीप शिंदे, इंजि. आयुष्य गांधी यांनी प्रत्यक्ष भेटून मोजमाप करून जागा निश्चित केली.
                 गुरूवार (१ सप्टेंबर २०२२) रोजी आई-वडिलांचा आशीर्वादाने त्यांच्याच हस्ते बोरवेलचे पूजन करून सुरुवात केली. दुपारी उशिरा काम सुरू झाल्यामुळे पहिल्या दिवशी केवळ चाळीस फूट खोल बोरवेल करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दिनांक २ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते एक वाजेच्या दरम्यान पुन्हा ४० फूट खोल बोरवेल करण्यात आली. ऐंशी फुटावर मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे संबंधित बोरवेलकर्त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने या दिवशी दिवसभरात साधारणता १५० फूट खोल बोरवेलचे पाईप आम्ही उतरवले. 
         उद्या दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी देखील पुन्हा वीस ते तीस किंवा चाळीस फूट पावतो खोल बोरवेल जाऊ देण्याचा आमचा इरादा होता मात्र अखेर १६० फुटा पावेतोच बोअर गेले, बोरवेल झाल्या नंतर सुपर टेक कंपनीचे सहा इंची पाईप पीयुष गांधी, गांधी ट्रेडर्स यांच्याकडून १९०० रू प्रमाणे ८.५ पाईप खरेदी केले. सोलेशन ५०० रू व भाडे ५०० असा एकूण खर्च आला. काळ्या रंगाचे पीव्हीसी पाईप व डुक् कंपनीचे १.५ ची मोटार व स्विच शहरातील अण्णा भोई यांच्याकडून २२००० रू घेतला. 
                  कष्टभंजन बोअरवेल बबलू महाजन (खान्देशी गल्ली) यांना ९० रू फूट प्रमाणे बोरवले करण्याचे काम दिले. सुरुवातीला ६०० रू खड्डे करण्यासाठी दिले. त्यानंतर दोन माणसे प्रकाश वळवी (बहुरूपा) व पिंटू वळवी (कढेल) येथील २ घे जणांनी  बोअरवेलचे खड्डे केले. शेवटी बोअरवेल धुण्यासाठी ३२०० रू लागले. बोअरवेल करताना लागणारे पाण्याचे टँकर अनिलभाऊ मोरे (भोई) यांनी उपलब्ध करून दिले. अश्विनभाऊ परदेशी यांनी अग्निशमन वाहन उपलब्ध करून दिली. ४ सप्टेंबर २०२२ रोजी बोअरवेलचे होल साधारणतः ४ तास मोटार सुरू ठेवून धुण्यात आले. अपेक्षेप्रमाणे पाणी लागल्याने सर्वांचा सेहऱ्यावर समाधान पहावयास मिळाले.   
               बोअरवेल कुठे करावी कशी करावी, किती खोल करावी, पाईप किती उतरवावे, बोअरवेल दरम्यान लागलेली रेतीत असलेले लहान सफेद दगडांवरून पाणी साठा मुबलक असतो, बोअर खड्डे अधिकाधिक स्वच्छ करावे ज्यामुळे जमिनीतील झरे मोकळे होतात व पाण्याची क्षमता वाढते, कुठल्या कंपनीचे पाईप टाकावे, मोटार टाकावी अश्या बारीक सारीक बाबी व अन्य बारकावे गल्लीतील शशिकांत माळी, सचिन माळी, धीरज माळी, राहुल सागर, विलास हिवरे, जगन्नाथ अग्निहोत्री, व्ही.बी.पाटील, गौरव वाणी, सुनील सुर्यवंशी (कालू भाऊ), अक्षय जोहरी मोठे बंधू योगेश मराठे आदीनी समजवले यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचे खूपच सहकार्य लाभले...           

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

वारसाने मिळालेल्या संधीला कर्तुत्वाने सिद्ध करणारे... तळोदा शहराचे उमदं नेतृत्व


वारसाने संधी मिळते.
कर्तृत्व सिद्ध करावे लागते 
या उक्ती प्रमाणे राजकीय वारस असला तरीही ते सिद्ध करणे टिकवून ठेवणे व वारसा पुढे नेणे हे महत्वाचे असते असेच काही सिद्ध करत वारसा पुढे नेणारे युवा नेतृत्व म्हणजे शहरातील राजकारणात अवस्थेत येत असून अनेक तरुण राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शहरात सर्वच राजकीय पक्षात तरुण असले तरी एक नवीन सुशिक्षित चेहरा तळोदा शहराचा जनतेसमोर येत असून कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याने ज्या व्यक्तीकडे भविष्यातील लोकप्रतिनिधी म्हणून जनता पाहत आहे असे जितेंद्र सूर्यवंशी.... असून तळोदा नगर पालिकेचे राजकारण असो अथवा सहकार क्षेत्र असो अथवा शैक्षणिक क्षेत्र असो सर्वच क्षेत्रात राजकीय वजन असणारे माळी कुटुंबातील एक तरुण नेतृत्व जितेंद्र सूर्यवंशी यांच्या रूपात पुढे येत आहे.
       माजी नगरअध्यक्ष भरत माळी यांच्या राजकीय छत्रछायेखाली राजकीय क्षेत्रात अतिशय कमी वयात उडी घेतली असून राजकीय वारसा असल्याने विविध राजकीय डावपेच लहान पणा पासून जितेंद्र सूर्यवंशी यांनी गिरवले. याच काळात राष्ट्रीय काँगेसचा माध्यमातून त्यांचा संपर्क युवा काँग्रेस संघटनसाठी काम करत असताना सत्यजित तांबे यांच्या जवळ आला. एक विचार जुळले त्यामुळे राष्ट्रीय काँगेसचे तांबे यांचा विश्वास असल्याने त्यांना युवक काँग्रेसची जिल्ह अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली मागील काळात झालेल्या राजकीय घडामोडी तसेच जिल्हा व शहरातील राजकीय वातावरण पाहता अत्यंत धाडसी निर्णय घेत त्यांनी भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेतला. दरम्यान हा निर्णय घेत असताना त्यांना अनेक स्वकीय यांनी निर्णय घाईत घेवू नका असे सांगितले. मात्र जितेंद्र माळी यांनी अतिशय विचाराअंती भाजप प्रवेश निश्चित केला. आपले कुटुंब जरी काँग्रेस संघटनेत सुरुवातीपासून काम करत असेल तरी विकास हा मुद्दा महत्वाचा असून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडवणीस तसेच डॉ विजय कुमार गावित तसेच विद्यमान आमदार राजेश पाडवी यांचा कामाचा झंझावात पाहून हा निर्णय घेतला आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शाखाली पुढील राजकीय वाटचाल ते आता चालणार आहेत. त्यांची तिसरी पिढी मागील राजकारणात पुढे येत असून त्यांचे बाबा स्व. बबनराव छगनराव माळी यांनी नगरअध्यक्षपद भूषविले होते. त्यांचा आजी विमलताई बबनराव माळी या देखील नगर अध्यक्ष व नगरसेविका होत्या. तर त्यांचे काका भरत माळी यांनी तळोदा नगर पालिकेवर तब्बल तीन दशके राज्य केले असून त्यांचे वडील लक्ष्मण बबनराव माळी हे समाजकार्य सोबतच शेक्षणिक संस्था सांभाळत आहेत. तर काका संजय माळी हे आज सभागृहातील सर्वात जेष्ठ नगरसेवक आहेत.

          याबाबत जितेंद्र सूर्यवंशी यांची भेट घेतली असता त्यांनी त्यांचा राजकीय वाटचालीबाबत सांगितले ....... मला राजकीय वारसा जरी असला तरी मी स्वतः ग्राऊंडवर जाऊन काम केल्याने शहरातील युवकांचा मोठा प्रतिसाद मला या काळात मिळाला. मला पहिली संधी मिळाली ती म्हणजे स्वीकृत नगरसेवक म्हणून. ही नियुक्ती पद्माकरजी वळवी साहेब. भरतभाई माळी यांनी दिली त्यामुळे शहरातील लोकांचा समस्या जाणून सोडविण्यासाठी प्रयत्न केलेत.

       मा.ना. के.सी पाडवी साहेब व सत्यजीतदादा तांबे यांनी जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्या माध्यमातून जिल्हाभरात हेल्पलाईन नंबर दिला. कोविड काळात लोकांची सेवा करू शकलो. जिल्ह्यात स्वतंत्र कॉविड तपासणीसाठी लॅब मंजुरीसाठी मागणी केली व तत्कालीन पालकमंत्री मा.ना.के सी.पाडवी साहेब यांनी मंजुरी दिली. त्याचा काळात सत्यजीतदादांच्या मार्गदर्शन खाली जिल्हाभरात गरजू लोकांना शिधा वाटप, गरजूंना दैनंदिन अन्नदान, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संधी -सोबत मिळाली हे कार्य करत असतानाच जिल्हा भरातून युवकांचा प्रतिसाद मिळाला.

        कृषी उत्पन्न बाजार संचालक म्हणून मा. आ. उदेसिंग समितीच्या प्रशासकीय नियुक्त संचालक म्हणून दादा यांचा नेतृत्वाखाली काम करायची संधी मिळाली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या तळोदा शहरातील नामांकित ह शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शाळेचा 3 चेहरा मोहरा बदलला, गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केलंत यात सर्व कर्मचारी सहकाऱ्यांचे मन जिंकुन त्यांचा सोबत काम करून त्यांच्यातला एक सहकारी म्हणून वावरत असतांना त्यांचा समस्या समजल्या त्या एक संघ होऊन सोडविण्यासाठी प्रयत्न केलेत.
सत्यजीत दादा यांचा एस.एम. गर बी.टी. हॉस्पिटलच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गरजु लोकांना पण वैद्यकीय मदत करून देता येत आहे. मा आ राजेश पाडवी यांचा वाढदिवसाच्या औचित्य साधुन महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले त्यात १०७७ रुग्ण तपासणी करून आवश्यक त्या शस्त्रक्रियासाठी घोटी येथील एस.एम. बी. टी. हॉस्पिटल येथे य रुग्णांना स्वखर्चाने पाठवले. अजूनही गरजू रुग्णांना जरी त्याठिकाणी सवलतीत योजनेतून  उपचारासाठी मदत होत असते. शहरात एक नावीन्य उपक्रम राबविला मला wifi zone स्मारक चौक परिसरात सेवा आजही कार्यरत आहे. जेव्हा इतर शहरात जात असतो गून त्यावेळेस त्या त्या ठिकाणी जे जे चांगले आहे ते ते माझ्या शहरातही असले पाहिजेल या भावनेतूनच प्रामाणिकपणे सर्वच समाजातील युवकांना सोबत घेऊन काम सुरू आहे....

       कोविड काळात लसीकरणचे विविध शिबिर राबविली. दरवर्षी गरीब व होतकरू विद्यार्थीसाठी शेक्षणीक साहित्य वाटप केले जाते. तसेच १७ जानेवारी सुधीर तांबे यांचा वाढदिवसानिमित्त  पुस्तक दिवस म्हणून साजरा करत पुस्तकांचे वाटप केले जाते.

*वारसाने संधी मिळते कर्तव्य हे सिद्ध करावे लागते.*

यावडीप्रमाणे मी माझा काम गेली पाच वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे अविरत करत आहे प्रसिद्धीच्या मागे कधीही लागलो नाही माझा उद्देश एकच ठेवला आपण केलेल्या कार्याचा लाभ हा सरळ लाभार्थ्याला कसा होईल. यासाठी प्रयत्न करत आलो. तसेच जो नवीन काहीतरी करण्यासाठी धडपडत असतो त्याला माझी पाठिंबा असतो. . 


*सर्व जाती धर्माला संधी देणारे कुटुंब*

       भरतभाई माळी यांनी मागील ३५ वर्षात त्यांचा राजकीय वाटचालीत. कोणत्याही एका समाजाचे नेतृत्व न करता सर्व जाती धर्माचे समाजाचे लोकांना सोबत घेत वाटचालच केली नाही तर अनेकांना राजकीय दृष्ट्या उभे केले व राजकीय संधी दिल्या तसेच मोठ मोठ्या पदावर सन्मान दिला. विविध समाजाचे लोकांना नगरसेवक यात नगर अध्यक्ष, उपनगरअध्यक्ष, नगरसेवक स्वीकृत नगरसेवक त्यात आदरणीय दीपाली वळवी पहिल्या आदिवासी महिला नगराध्यक्ष बसवत असताना भरतभाई यांचा त्यात सिंहाचा वाटा होता. तसेच कलाल समाजाचा आदरणीय ताराबाई बागूल कलाल समाजातील नगराध्यक्ष केल्या. रत्ना चौधरी चौधरी समाजातील नगराध्यक्षा केल्या. वाणी समाजातील अल्पसंख्याक व्यक्ती गौरव वाणी याना उपनगराध्यक्ष केलं. रुकसनाबी सैय्यद उपनगराध्यक्ष, नंदूगिर गोसावी यांना उपसभापती पं.स. सदस्य मार्केट कमिटी मार्केट कमिटी, विजय क्षत्रिय यांना स्वीकृत नगरसेवक पद दिले.  दत्तात्रय पाटील उपसभापती त्यांचा नेतृत्वखाली हितेंद्र क्षत्रिय तसेच संदीप परदेशी यांचा पत्नी अनिता परदेशी या नगरसेवक पदी निवडून आल्या असे अनेक लोकांना सर्व समाजातील घटकांना विविध क्षेत्रात संधी दिली.



*भरतभाईचे तळोदा शहरातील महत्त्वाचे निर्णय*

     तापी पाणी शुद्धीकरण प्रकल्प अंतिम टप्यात आणला. तसेच राज्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित व तत्कालीन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कुमुदिनी गावित यांचा माध्यमातून १२ कोटी रुपये इतका निधी जलशुध्दीकरण प्रकल्पसाठी सतत पाठपुरावा करून मंजूर करून आणला. त्यात पहिल्या टप्प्याचा निधी त्याच काळात प्राप्त झाला. तसेच पालिकेचे व्यापारी संकुलाचे निधी मंजूर व भूमिपूजन त्यांच्याच काळात झाले. नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे निर्माण हद्दवाढ प्रस्ताव तयार करून मंजुरी मिळवली. नवीन वसाहतीत खुल्या जागा संरक्षण भिंती, गार्डन निर्माण शहादा रोड दुभाजक शहरातील जुने चिखलमय रस्ते चे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यास सुरवात त्यांचा नेतृत्व खाली असणाऱ्या माजी नगर अध्यक्षा रत्ना सुभाष चौधरी यांचा काळात झाली. शासनाकडे पाठपुरावा करत मोठा निधी याच काळात आला. भरतभाईकडे त्यांचे पिताश्री बबनराव पहेलवान यांचा समर्थ वारसा आहे. ते राज्यातील नामांकीत कुस्तीपटू होते. १९६५ साली तळोद्याचे नगराध्यक्ष होते. मातोश्री विमलताई माळीही नगरसेविका होत्या. पत्नी सौ. योजनाताई माळी ह्या विद्यमान नगराध्यक्षा आहेत. तसेच त्यांचे मोठे बंधू आप्पासाहेब लक्ष्मण माळी हे शेक्षनीक व सामजिक क्षेत्रात सदैव सक्रिय असतात तर लहान काका संजय माळी हे आज सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून परिचित असून श्री गणेश सोशल ग्रुपचा माध्यमातून विविध उपक्रम राबवित असतात. आज या राजकीय दृष्ट्या संपन्न असणाऱ्या कुटुंबाचा राजकीय वारसा जितेंद्र सूर्यवंशी यांच्या खांद्यावर आला आहे. अनेक अडचणींवर मात करत आला त्याचा सोबत नाही आला त्याचा विचार न करता... राजकीय वाटचाल करत आहेत. कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी काय करावे लागते या बाळकडू त्यांना लहान पणी मिळाले असले तरी त्या काळातील राजकीय स्थिती व आजची राजकीय स्थिती या दोघांची सांगड घालून नवीन जे आवश्यक बदक ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबत कुटुंबाची अनुभवाची शिजोरी आहेच. येणाऱ्या काळात ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी सर्व समाज व जाती धर्मांना सोबत घेवून नवीन दृष्टीकोन घेत तळोदा शहराचा विकासासाठी पक्ष संधी देईल त्या पदावर राहून बदल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

बबनराव पेहलवान यांचा तळोदा शहरातील सांस्कृतिक वाटचालीत एक वेगळेच महत्व होते. पूर्वी या कुटुंबाचा लाकूड व्यवसाय होता त्या वेळी शहरातील मानाचा दादा गणपतीचा मंडपासाठी लागणारे लाकडी खांब पुरवण्यासाठी स्व. बबनराव पेहलवान यांची मोलाची साथ लाभली होती.तसेच शहरातील कालिका मात्रा उत्सव काळात पूर्वी त्यांचा स्मारक चौकमधील हॉटेल गणेश समोर उंच लाकडी मंडप हे आकर्षण होते. त्यांना व्यायामाची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी त्यांचे कुस्ती प्रेम पाहता इतर तरुण मुलांना देखील कुस्ती खेळण्यासाठी संधी मिळावी म्हणून व्यायामशाळा काढली व तरुणांना व्यायामाबाबत प्रेरित केले.

साभार सुनिल सुर्यवंशी तळोदा



शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

सत्काराने भारवल्या आशा, अंगणवाडी व आरोग्य सेविका लसीकरणासाठी राबणाऱ्या यंत्रणेच्या पत्रकार संघातर्फे सन्मान

तळोदा : तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात लसीकरणासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या आशा, अंगणवाडी व आरोग्य सेविका यांचा सत्कार करण्यात आला.या सत्काराने आशा,अंगणवाडी व आरोग्य सेविका भारावून गेल्या.ग्राऊंड लेव्हलवर काम करत असताना अनेक अडचणींना तोंड देत वर्षभर लसीकरण मोहिमेत त्यांनी दिलेल्या सक्रिय योगदानाची दखल घेत पत्रकार संघाने सन्मानित केल्याने अनेक आशा,अंगणवाडी व आरोग्य सेविकांच्या डोळे भरून आले.
          तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ व कै.कलावती फाउंडेशन सोमावल यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा तालुक्यात लसीकरणात अग्रस्थानी असणाऱ्या प्रथम पाच गाव व त्या गावात लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी राबणाऱ्या घटकांचा सन्मान सोहळा तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहरातील आदिवासी सांस्कृतिक भवनात आज पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजय परदेशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण,पचायत समिती सभापती यशवंत ठाकरे,सदस्य दाज्या पावरा,विजय राणा, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष आनंद भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस श्याम राजपूत,  नगरसेवक हितेंद्र क्षत्रीय, संदीप परदेशी,रा.का.शहर अध्यक्ष योगेश मराठे,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस शाम राजपूत, मोडचे सरपंच जयसिंग माळी, मोहन ठाकरे,नाथ्या पावरा, जेष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विशाल चौधरी,मुस्लिम समाज अध्यक्ष आरिफ नुरा,आदी उपस्थित होते.
        कार्यक्रमात गेल्या वर्षभर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात तळोदा तालुक्यात अग्रस्थानी असलेल्या पहिल्या पाच गावांना विशेष पुरस्कार देण्यात आले. त्याप्रमाणे या गावात दिवसरात्र लसीकरणासाठी मेहनत घेणाऱ्या आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका,आशासेविका,आशा गटप्रवर्तक यांचा देखील सन्मान सोहळा पत्रकार संघाच्या वतीने पार पडला.
      यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य विजयसिंग राणा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,ग्राउंड वर काम करणारे हे कर्मचारी नेहमीच दुर्लक्षित असून पत्रकार संघाने त्याची यथोचित दखल घेत कोरोणा लसीकरणासाठी राबणाऱ्या यंत्रणेच्या सन्मान सोहळा आयोजित केल्याबद्दल पत्रकार संघाचे विशेष कौतुक केले.
        आमदार उदेसिंग पाडवी यांनी देखिल कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी यंत्रणेने केलेले प्रयत्न कौतुकास्पद असून इतर गावांनीही सत्कार झालेल्या गावांकडून प्रेरणा घ्यावी व आपले गाव देखील लसीकरणात अग्रस्थानी हे यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवित असून पत्रकार संघाने आदर्श पायंडा निर्माण केला असल्याची भावना त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली. अध्यक्षीय मनोगतात  नगराध्यक्ष अजय परदेशी म्हणाले की,पत्रकार देखील सर्व यंत्रणेच्या सोबत शहर व तालुक्यात ग्राउंड लेव्हल वर काम करत होते. तत्कालीन उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा,तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे,तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण,तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण यांचा देखिल नामोल्लेख करत त्यांनी सर्व यंत्रणेचे विशेष कौतुक केले.
         कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन हंसराज महाले यांनी केले तर पत्रकार संघाचे सचिव उल्हास मगरे यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नारायण जाधव,सम्राट महाजन, कोषाध्यक्ष सुधाकर मराठे,भेट भामरे, ईश्वर मराठे, महेंद्र लोहार, नरेश चौधरी, सुशील सूर्यवंशी, किरण पाटील, दीपक मराठे, डॉ.नारायण जाधव, अक्षय जोहरी, महेंद्र सूर्यवंशी यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले
 
*यांचा झाला सन्मान*
१)  झिरी : डॉ.गौरव सोनवणे,अरुणा वसावे,लतिका  वळवी,विमल सुदाम वळवी ,विजय वळवी,अविनाश भरतसिंग वळवी, सरपंच मीनाबाई वळवी 
२)  धानोरा  : 
डॉ.सागर महाजन,संध्या साळवे,ज्योती साळवे,चंद्रकला पावरा,मोहन ठाकरे , सरपंच जंगलसिंग मोहन ठाकरे  
३)  तळवे :  डॉ.प्रियांका वळवी,आर.के.पाडवी,आक्काबाई नारायण केदार ,पुष्पा सीताराम पाटील, सरपंच बारीकराव
४) आष्टे (मोड): विमल रडत्या पाडवी,अंजना राजू माळी,रजनी अशोक शिंदे,बबिता सत्तेसिंग वळवी,सरपंच जयसिंग माळी.
५) रेवानगर :  डॉ.भरत पावरा,डॉ.महेंद्र ब्राम्हणे,फेंदा पावरा, सविता गावित,अनिता पावरा,संगीता पावरा,दाज्या पावरा 

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

परमेश्वर तुझे सर्व इच्छा पूर्ण करो ह्याच सदिच्छा... 
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

गुरुवार, १ जुलै, २०२१

कै.डॉ.राजेंद्र मराठे यांच्या स्मृती पित्यर्थ नागरिकांना सुरक्षा विमा -

लिंक वर जा
http://yatharthvarta.blogspot.com/2021/07/blog-post_8.html?m=1

तळोदा : तळोदा येथील कै.डॉ. राजेंद्र शंकरराव मराठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा विमा मोफत काढून देण्यात आला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या मोफत विमाचा लाभ घेतला. 

            स्वामी सरस्वती बहुउद्देशीय संस्था व भोई समाज नवयुवक मंडळ  यांच्या संयुक्त विद्यमनाने हा कार्यक्रम भोई गल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.

         कार्यक्रमाला बँक ऑफ बडोदा चे मॅनेजर विशाल जाधव यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की, विमा हा आपल्या पश्चात आपल्या परिवाराला आर्थिक पाठबळ देण्यासाठी उपयुक्त आहे, विमा असल्यास कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षा   कवच मिळते. असे सांगून त्यांनी विमाचे महत्व उपस्थिताना पटवून दिले.  

         संदीप पवार यांनी डिजिटल साक्षरता व सोशल सिक्युरिटी संदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमास महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित बांधवाणांचा मोफत विमा या प्रसंगी उतरविण्यात आला. यावेळी स्वामी सरस्वती बहुउद्देशीय संस्थेचे सचिव आनंद जगदीश मराठे यांनी स्व डॉ.राजेंद्र मराठे यांच्या किर्तीचा आढावा स्मरण करून दिला. यावेळी भूषण पवार बँक ऑफ  बडोदा तसेच सचिन तावडे भोई समाज उपाध्यक्ष गणेश शिंदे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष जगदीश वानखडे उपाध्यक्ष युवा प्रकाश वानखेडे सर चंद्रकांत साठे  भोई तालुका अध्यक्ष चंद्रकांत भोई सर निखिल साठे अण्णा भोई पिंटू भोई सुनील शिंदे आदी उपस्थित होते...


सोमवार, १४ जून, २०२१

अवैध वीज कनेक्शनांना वीज वितरण कंपनीकडून अभय तळोदा मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईची ग्राहकांची मागणी

तळोदा : शहरात मोठ्या अवैध वीज कनेक्शन कार्यरत आहे.विद्युत वितरण कंपनीच्या अभियंता व कर्मचाऱ्यांकडून अवैध वीज कनेक्शनना अभय दिले जात असून नियमित वीज बील भरणाऱ्या ग्राहकांकडून अवैध वीज कनेक्शनचे बील वसूल केले जात असल्याची शंका नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
            तळोदा शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत.शिवाय अनेक ठिकाणी गृह उद्योग औद्योगिक कामांचे सुद्धा  सुरू आहेत.यातील अनेक ठिकाणी अवैध वीज कनेक्शन जोडण्यात आले आहे.नागरिकांकडून याबाबत ओरड सुरू झाली की वीज वितरण कंपनीचे अभियंता व कर्मचाऱ्यांकडून दिखाव्यासाठी थातूर मातूर कारवाई करून दोन-चार अवैध वीज कनेक्शनधारकांवर कारवाई केली जाते.मात्र इतर अवैध कनेक्शनज मात्र अभय दिले जात असल्याचे चित्र आहे.संबंधित घरबांधकाम करणारे  ठेकेदार व वीज वितरण कंपनीचे उपअभियंता यांचे या प्रकारात साटेलोटे असल्याचा नागरिकांचे म्हणणे आहे.
            तळोदा शहरात मागील अनेक काळापासून जादाची वाढीव वीज बिल,बिना रीडिंग वीजबिल,रिंडिंगनुसार वीज बील येणे,अव्वाच्या सव्वा वीज बिले येणे अशाप्रकारे वीज बिलांबाबत मोठ्या प्रमाणात अनागोंदी वाढली आहे.ज्यादा येणाऱ्या वीज बिलांमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. अवैध वीज कनेक्शन धारकांचे वीजबिल देखील नियमित वीजबिल भरणार्‍या ग्राहकांकडून वसूल केले जात असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
         दरम्यान, शहरातील घरगुती वीज व ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिल येण्याच्या सत्र सुरूच असून वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना याबाबत हात वर केले आहेत आम्हाला याचे काही देणेघेणे नाही ज्याप्रमाणे रीडिंग असेल त्याप्रमाणे विज बिल येईल,अशा पद्धतीची उत्तरे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून अभियंत्यांकडून ग्राहकांना देण्यात येतात. त्यामुळे तुम्हीच ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. एका महिन्याची घरघुती वापराची बिले तब्बल आठ ते नऊ हजाराची बिल आकारली जात आहे.असे असताना ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सक्ती करण्यात येत आहे. तळोदा शहरात वाढीव वीज बीलासंदर्भात अनेक वर्षांपासून नागरिकांच्या तक्रारी असताना संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांच्या समस्यांचे कोणते प्रकारचे समाधान वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेले नाही.वीज बिलांच्या अनागोंदी बाबत ग्राहकांचे समाधान करण्यास वीजवितरण कंपनीने असमर्थ ठरले असल्याचे सांगितले जात आहे.वाढीव वीज बिलाचे सत्र सुरूच असल्याने वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात शहरात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे.या रोषाचे रूपांतर जनआंदोलनात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने दक्षता घेऊन नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
   

चौकट          
अभियंत्यांची तक्रारदारांसोबत मुजोरी
         वाढीव बिलासंदर्भात तक्रारी असणाऱ्या ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क करून अभियंत्याची याबाबत विचारणा केली असता अभियंत्याच्या मुजोरी पणाला ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी शहरातील ग्राहकांना यांचा पुन्हा एकदा अनुभव आला.शहरातील काही नागरिक वीज वितरण कंपनीचे उपअभियंता इमरान पिंजारी यांच्याकडे वाढीव बिलांबाबत तक्रार घेऊन होते. यावर ग्राहकांचे समाधान न करता इम्रान पिंजारी यांनी ग्राहकांना अरेरावीची उत्तरे दिली. तुम्हाला जेथे तक्रार करायचे असेल तेथे तुम्ही तक्रार करू शकतात याबाबत वाढीव वीज बिले कोणत्या प्रकारे कमी केली जाणार नाहीत अशा पद्धतीने या शब्दात त्यांनी ग्राहकांना उत्तरे दिली यामुळे वीज वितरण कंपनीच्या बाबत ग्राहकांमध्ये प्रचंड रोषाची भावना आहे तळोदा येथे कार्यरत असणाऱ्या अभियंत्यांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून ग्राहकांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली जात आहे यामुळे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देखील केली जाणार असल्याचे समजते.

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील सुर्यवंशी सचिवपदी उल्हास मगरे यांची सर्वानुमते निवड

तळोदा : तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदी सुनिल सुर्यवंशी, शहर उपाध्यक्षपदी सम्राट महाजन, ग्रामीण उपाध्यक्ष नारायण जाधव, सचिवपदी उल्हास मगरे तर कोषाध्यक्षपदी सुधाकर मराठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

           तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक माजी अध्यक्ष विकासदीप राणे यांच्या अध्यक्षतेखाली सोशल डिस्टन्सचे पालन करीत रविवारी वनविभागाचा विश्रामगृहात वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीस नूतन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक प्रा.ए.टी. वाघ, भरत भामरे, मंगेश पाटील, ईश्वर मराठे, किरण पाटील, विकासदीप राणे, महेंद्र लोहार, नरेश चौधरी, हंसराज महाले, दिपक मराठे,  सुशील सूर्यवंशी, राकेश गुरव, मानसिंग राजपूत, अक्षय जोहरी, राहुल शिवदे, आदी उपस्थित होते. 
     
            सुरुवातीला मावळत्या  पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. बैठकीत मागील हुशोब व इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. बैठकीत साधक बाधक चर्चा होऊन अध्यक्षपदी सुनिल सुर्यवंशी, शहर उपाध्यक्षपदी सम्राट महाजन, ग्रामीण उपाध्यक्ष नारायण जाधव, सचिवपदी उल्हास मगरे तर कोषाध्यक्षपदी सुधाकर मराठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
         
          संघाच्या पुढील कार्याचे नियोजन करून अधिक जोमाने काम करण्याचे ठरले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षीय गणेश आरास स्पर्धा, दिवाळी स्नेह मिलन, वार्तांकन स्पर्धा, गरजूना उबदार कपडे वाटप, इफ्तार पार्टी, महिला दिना निमित्त महिलाचा सम्मान, पत्रकार दिनी जेष्ठ पत्रकारांचा सन्मान, तसेच पेपर विक्रेत्याच्या सत्कार, विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार आदींसह समाजपयोगी कार्यात तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ अग्रेसर आहे. पत्रकार संघाची निवडीनंतर विविध क्षेत्रातुन त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
 
 

तळोदा तालुक्यातील पोलीस पाटील ही दिसणार गणवेशात : मासिक सभेत संघटनेचा निर्णय

तळोदा:- तळोदा येथे पोलीस पाटील संघाची मासिक सभा रविवारी तळोदा पोलीस ठाण्याचा आवारात पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडली. 

             तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक रविवारी प्रशासकीय इमारतीचा आवारात घेण्यात आली. या बैठकीत पो.नी सोनवणे यांनी सर्व पोलीस पाटील यांना लसीकरण मोहिमेत सहभाग घेऊन आपापल्या गावातील लसीकरण 100% कसे करता येईल या संदर्भात सूचना दिल्या. यासोबतच पोलीस पाटील यांनी एक नोंद वही ठेवून त्यात आपआपल्या गावातील गुन्हे किती व कोणत्या स्वरूपाचे अथवा कश्या प्रकारचे आहेत या संदर्भात नोंद ठेवण्याचे आवाहन केले. 
              पोलीस पाटील हा प्रशासनाच्या दुवा असून गावात वादविवाद होणार नाहीत यासंदर्भात लक्ष द्यावे किरकोळ वादविवाद झालेच तरी ते गावातच आपापसात मिटवावे पक्षपाती पणा करू नये, गावात शांतता टिकून राहील यासाठी सर्व पोलीस पाटीलानी यत्नशील राहून शांतता कशी निर्माण होईल याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
               भांडण-तंटेमुळे गावाच्या विकास खुंटतो, तंटामुक्त गावांला शासनाकडून विविध प्रकारच्या निधी मिळतो. त्या निधीचा साह्याने गावाच्या विकास करता येऊ शकतो. माळखुर्द येथील पोलीस पाटील आकाश वळवी यांनी आपली नोंदवही दप्तर अतिशय योग्य प्रकारे असल्यामुळे पंडित सोनवणे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
              पोलीस किंवा होमगार्ड यांनी परिधान केलेल्या गणवेशावरून सहज त्यांची ओळख पटते. पोलीस पाटील यांचे ड्रेस कोड नेमल्यास सहज पोलीस पाटील असल्याचे ओळखता येईल. अशी संकल्पना पो.नी पंडित सोनवणे यांनी मांडली. यांच्या या प्रस्तावाला पोलीस पाटील संघटनेने सकारात्मक प्रतिसाद देत पुढील बैठकीला एकाच ड्रेस कोडवर उपस्थित राहण्याचे आश्वासन संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बापू पाटील व तालुका अध्यक्ष अशोक पाडवी यांनी दिले. या बैठकीत तालुक्यातील पोलीस पाटील, पो अजय कोळी, मगन पाडवी, रवींद्र वळवी, गुलाबसिग पाडवी, दीपक ठाकरे, रवींद्र नाईक, हूरजी गावित, भरतसिग पावरा तसेच महिला वर्ग व इतर 50 ते 55 पोलीस पाटील उपस्थित होते.

शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या शेतशिवार रस्त्यांच्या कामासाठी 60 लाख मंजुर आ. राजेश पाडवी यांच्या आमदार निधीतून शहादा व तळोदा तालुक्यातील 20 गावांच्या सुटतील समस्या

तळोदा:  शहादा व तळोदा तालुक्यातील 20 गावांमधील शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या पाणंद ( शेतशिवार ) रस्त्यांच्या कामासाठी आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या निधीतून 60 लाख रुपयांच्या निधी मंजूर केला असून यातून 20 रस्ते घेण्यात आले आहेत. साहजिकच शेतकर्‍याच्या शेत रस्त्यांच्या प्रश्नी मार्गी लागणार आहे.आमदार निधीतून पाणंद रस्त्यांसाठी निधी खर्च करणारे जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असल्याचे म्हटले जात आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

           शहादा तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांनी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांशी त्यांच्या प्रश्नासाठी प्रत्यक्ष संवाद साधला तेव्हा अनेक गावांमधील शेतकर्‍यांनी शेत शिवराला जोडणार्‍या रस्त्यांच्या प्रश्न उपस्थित केला होता. रस्त्याअभावी शेतातील मालाची ने, आन करताना अत्यंत कसरत करावी लागत असते.शिवाय मशागतीस देखील अडचण येत असते.त्यामुळे हे रस्ते होणे गरजेचे असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.
           पाणंद योजना ही राज्याचा महसूल विभागाकडून राबवली जात असते.शिवाय तीस पुरेसा निधीही नसतो.साहजिकच स्थानिक महसूल प्रशासन मागणी आलेल्या कामांपैकी ठराविक कामांनाच प्राधान्य देत असते.त्यामुळे पुरेशा निधी अभावी ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची कामे प्रचंड असताना मार्गी लागलेले नसल्याची वस्तुस्थिती आहे. तथापि आ. राजेश पाडवी यांनी शेतकर्‍यांच्या हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या फंडातून निधी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले.यासाठी त्यांनी साधारण 60 लाखांच्या निधी मंजूर केला आहे.यातून 20 गावांमधील शेतकर्‍यांचे शेत शिवारातील 20 रस्ते घेतली आहेत. यातून 60 किमीचे रस्ते तयार होणार आहेत. प्रत्येक तीन किमीच्या रस्त्यासाठी तीन लाखांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे.
               सदर कामांचे नियोजन देखील करण्यात आले असून लवकरच कामे सुरू करण्यात येणार आहेत. शहादा तळोदा तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पाणंद रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे परंतू पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे युद्ग पातळीवर पूर्ण करावीत अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

या गावांना घेण्यात आली पानंडची कामे
    शहादा,-तळोदा तालुक्यातील ज्यावीस गावांना आमदार निधीतून पाणंद रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहे त्यात तळोदा तालुक्यात प्रकाशा,धानोरा,तळवे,मोड, दसवड, चिनोदा,रांजणी.तर शहादा तालुक्यात मंदाना, जावदा, असलोद,भोरतेक, वाघारदे,लोहारे, जाम, बहिरम्पुर, लक्कडकोट,मुबारकपूर,कुसुमवाडे ही गावे घेण्यात आली आहेत.यातील बहुतेक रस्ते थेट गावाना जोडणार आहेत.त्यामुळे भविष्यात ती मोठी रस्ते होवून डांबरीकरणाचे देखील होवू शकतील.शिवाय ते बारमाही जोडली जाणार आहेत.केवळ तीन किमी च्या रस्त्यामुळेच रखडली होती.आता पाणंद रस्त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

शनिवार, १२ जून, २०२१

मोटार सायकलने धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी : उपचारादरम्यान मृत्यू

तळोदा:- समोरून येणाऱ्या मोटर सायकल ने धडक दिल्याने  झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना मोड गावाजवळ दिं. 1जून रोजी घडली होती जखमी पैकी एकाचा उपचारा दरम्यान मयत झाला आहे या प्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून अज्ञात मोटरसायकल स्वर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हरदुली ता. निझर येथील प्रवीण मगन ठाकरे व त्याची पत्नी सुनीता प्रवीण ठाकरे हे मोटरसायकलाने सासरवाडीला जात असताना मोड गावाजवळ समोरून येणाऱ्या मोटरसायकल ने धडक दिल्याची घटना दिं. 1 जून रोजी घडली होती अपघातात दोघेजण  जखमी झाले होते प्रवीण हा उपचार घेत असतांना मरण पावला  म्हणून मयताच्या भाऊ चमाऱ्या मगन ठाकरे यांच्यातळोदा पोलिसात फिर्यादिवरून    एकाचा मरणास व महिलेच्या दुखापतीस व मोटरसायकल नुकसानिस कारणीभूत ठरला म्हणून दिं.10 जून रोजी अज्ञात मोटर सायकल स्वरा विरोधात गु.र.नं. 363/2021 भादवी कलम 304(A), 279,  337, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे