Breking News

गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

letter to mom

ºआई, असं का ग केलंस?

º(मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र..)

ºउरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ

ºपाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना.

ºत्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून

ºदिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणिº

ºत्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा

ºअनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी.

º( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंतीº

ºआहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....

ºहे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हेº

ºपत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा असावी.

ºआणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )

ºआई, असं का ग केलंस?

ºका ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?

ºमी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.

ºतुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता

ºझाला मला.

ºमाझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्तº

ºतुझ्याचमुळे ग.

ºआई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि

ºरडू नकोस.º

ºआता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.

ºतेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.

ºराजाभाईची छोटी बहिण येणार आहे.

ºतू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.

ºभाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात

ºअसूनही मी त्याला

ºहळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने

ºढकलत असे. मला लागायचं.

ºतरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीचº

ºअसते!

ºकधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखीº

ºठेव.º

ºते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली

ºआहे.

ºमुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ"

ºआहे,

ºजी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.

ºमाझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा,

ºतुला बघण्याचा!

ºएकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास

ºसोसल्यावर तुझा जन्म झाला.

ºमोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....

ºत्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या

ºआईला बघण्यासाठी मला अजूनº

ºसहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....

ºमग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेरº

ºपडलात.

ºरस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग

ºतू पप्पांना

ºगाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी कितीº

ºकाळजी वाटते,

ºहे पाहून मला किती बर वाटल होत.

ºदवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावरº

ºकाहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,

ºतेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापटº

ºफिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,

º"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."

ºथोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तोº

ºपप्पा नावाचा माणूस म्हणाला,........

º"सर, अबोर्शन करा...

ºडॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."

ºमी पोटामध्ये खिदळत होते.

ºदुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणेº

ºजाऊन सुखरूप घरी येऊ दे."

ºमला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्याº

ºमोठ्या आईला म्हणाले,

ºकी माझ्या आईला लवकर बर कर....

ºनंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....

ºआई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.

ºमी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.

ºआई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत

ºजायचं आहे.

ºराजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.º

ºआई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्याº

ºकानाशी म्हण....ºff01º

º'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....

º............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.....

ºसमाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे. 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे .....

लहान मुले

लहान मुले किती निरागस असतात
त्याचा एक अनुभव :

४ वर्षाचा मुलगा (जय).. एकदा सुट्टी मध्ये तो त्याच्या आजी आजोबांकडे राहायला गेला होता.. त्या दिवशी शिवजयंती होती.. ठीक ठिकाणी मंडप बांधून शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केले होते... महाराजांचे पोवाडे सुरु होते... चांगली वातावरण निर्मिती झाली असल्यामुळे माझ्या आई ने जय ला शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या.. (तेवढाच त्याच्या मस्तीखोर स्वभावाला control करण्याचा प्रयत्न ..:) जय ने सुद्धा मन लावून गोष्टी ऐकल्या. मग प्रश्न-उत्तर सेशन सुरु झाले..

जय : आजी शिवाजी महाराज खूप चांगले होते ना?
आजी : होय जय.. खूप चांगले होते.
जय : आज त्यांचा 'Happy Birthday' ना?
आजी : होय .
जय : आता ते कुठे आहेत?
आजी : स्वर्गात देव बाप्पा कडे गेले.
जय : ते देव बाप्पा कडे का गेले?
आजी : (थोडा अवघड प्रश्न.. पण आज काल ची मुले खूप हुशार असतात असा विचार करून..) अरे, खूप मोठे झाले ना कि माणूस मरण पावतो आणि मग देव बाप्पा त्याला स्वर्गात आपल्या कडे बोलावून घेतो.
जय : ( थोडा वेळ विचार करून) आजी तू पण खूप मोठी आहेस ना.. मग तू पण आता काही दिवसांनी मरशील... ?
आजी : (काय बोलावे हे न कळून ) ..............................
जय : मेल्यावर तू खूप खुश होशील नाही?
आजी : (प्रश्नार्थी चेहरा) खुश का बरे????
जय : अग, मेल्यावर तू पण स्वर्गात जशील ना आणि तिथ तुला शिवाजी महाराज भेटतील.. मग त्यांना भेटून तू खूप खुश होशील ना......

या उत्तरानंतर आजीला कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करता आली नाही हे सांगायला नको.

आपल्याला मराठीची किती माहिती आहे?

आपल्याला मराठीची किती माहिती आहे?

1) झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच "मी माझी झाशी देणार नाही " असे म्हटले आहे.

2) रशिया,ऑस्ट्रेलिया सह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.

3) हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात.

4) कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथलेविद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.

5) मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.

6) मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३०पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.

7) संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठीकिंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.

8) महाराष्ट्र तील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ् यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.

9) देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्रचा आहे.

10) सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्य शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटाआहे.

11)पूर्वी अफ़गाणिस्तन ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्यपसरले
होते.तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर होती. आज
मराठीचे स्थान दहावे आहे. मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर
ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल.

हि सर्व माहिती माहित असणे अपरिहार्य आहे असे मला वाटते .....जय महाराष्ट्र !!!

झाडे लावा

एका दिवसात सामान्यत: माणुस ३ सिलिंडर भरतील इतक्या प्राणवायूचे (Oxygen) श्वसन करतो.

एका Oxygen सिलिंडरची सरासरी किंमत रु. ७०० आहे.
म्हणजे एका दिवसाला एक माणूस रु. २१०० चा प्राणवायू वापरतो.
सबंध वर्षाचा हिशोब करता हि किंमत रु.७,६६,५०० इतकी येते.
सरासरी आयुष्य जर ६५ धरले तर हीच किंमत साधारणपणे रु. ५ कोटी इतकी येते.
हा प्राणवायू आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून जवळ जवळ फुकट मिळत असतो.
आणि आपण झाडांची कत्तल करीत सुटलो आहोत.

झाडे लावा!!! झाडे वाचवा!!! झाडे जगवा!!!













                                                                                                                                           



राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा
२६
जानेवारी व १५ ऑगस्ट या दिवशी आपण राष्ट्रीय ध्वज उभारतो. आपल्या सदऱ्यावर
लावतो; परंतु नंतर हेच राष्ट्रीय ध्वज दुसऱ्या दिवशी, रस्त्यावर, कचऱ्यात,
बसस्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, कुठेही चुरगळलेल्या अवस्थेत, फाटलेल्या
अवस्थेत पायदळी तुडविले जातात. याचा अर्थ आपण आपल्या देशाची शान पायदळी
तुडवितो. असे इतस्तत: विस्कटलेले राष्ट्रध्वज पाहिले की मनाला प्रचंड यातना
होतात.
याबाबत सरकारने, सामाजिक संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांनी, दक्ष
नागरिकांनी काही उपाय शोधले पाहिजेत. राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्याकरिता
पुढील काही उपाययोजना सुचवाव्याशा वाटतात.
सर्व शाळांमध्ये राष्ट्रध्वज
उभारून राष्ट्रीय सण सााजरे होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक
वर्गातून राष्ट्रध्वज गोळा करावेत व मुख्याध्यापकांकडे सुपूुर्द करावेत.
सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा जवळच्या शाळेत अथवा जवळच्या पोलीस
स्टेशनमध्ये राष्ट्रध्वज जमा करावेत. याकरिता शाळेने पोलीस स्टेशनने डबे
ठेवावेत. रेल्वे स्टेशन अगर बसस्टॉप वा इतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले
राष्ट्रध्वज नागरिकांनी कर्तव्यदक्ष भावनेने जवळच्या बस डेपोमध्ये अथवा
सरकारी कार्यालयात, पोलीस स्टेशनमध्ये जमा करावेत. स्थानिक समाजसेवक
संस्थांनी आपआपल्या विभागातील रस्त्यांवरील व कचऱ्यात पडलेले राष्ट्रध्वज
गोळा करण्याची व शासनाकडे जमा करण्याची जबाबदारी स्वीकारावी. शासनाने सर्व
जमा केलेले राष्ट्रध्वज योग्य रीतीने नष्ट करण्याकरिता तात्पुरत्या
स्वरूपात विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वज
नष्ट करताना आदरपूर्वक व सन्मानाने नष्ट करावेत. देशातील प्रत्येक राज्यात
याबाबत दक्षता घेऊन राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा.
कागदी लहान आकाराचे
राष्ट्रध्वज, प्लास्टिकचे काडीवाले राष्ट्रध्वज, धातूचे राष्ट्रध्वज असे
वेगवेगळे ध्वज जमा करावे. धातूचे राष्ट्रध्वज पुन्हा वापरता येणे शक्य
असते. ते जपून ठेवावेत. शासनाने अशा जमा केलेल्या विविध प्रकारच्या
राष्ट्रध्वजांची आदरपूर्वक व योग्य रीतीने विल्हेवाट लावावी.
वरील
उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत यात शासनाला सुधारणा करणेही शक्य आहे.
यातील किमान ५० टक्के उपाययोजना जरी अंमलात आणल्या तरी राष्ट्रध्वजाचा
होणारा अपमान टाळता येईल. त्याकरिता देशातील सर्व शाळांनी, समाजसेवी
संस्थांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी, कर्तव्यदक्ष नागरिकांनी ही गोष्ट मनावर
घेतली पाहिजे.









                                                                                                                                         

                                                                                                                               



राष्ट्रध्वज

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना
अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे
पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल
तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे
अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.
ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.


संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या
उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी
राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.
कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू
नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.



राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी
करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच
राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो
फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.
ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.
त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या
अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही
वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.



ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे
कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू
नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही
जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात
लावता येणार नाही.


केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या
ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक
कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी
ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात
असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज
जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय
व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.