Breking News

गुरुवार, २४ मे, २०१२

कुणीतरी असावे प्रेम करणारं

कुणीतरी असावे आपल्यावर प्रेम करणारं
आयुष्याच्या वाटेवर टेच लागली तर सावरणार
कुणीतरी असावे आपल्यावर जीव लावणार
आपल्या मनातील गोष्ट न सांगताच ओळखणार
मी हि अश्याच दिवसाची वाट पाहतेय
भेटेल का मला असे कोणी ?
ज्याला पाहता क्षणी हृदयाचा ठोका चुकवा
असेल का असा कोणी ?
सुख दुक्खाचे सारे क्षण सोबत घालवावेत
आयुष्याची स्वप्ने एकमेकांच्या डोळ्यात पहावीत
भेटेल का मला अस कोणी
ज्याला पाहता दूर होतील साऱ्या दुखः यातना
एकमेकांच्या सहवासात पूर्ण होतील साऱ्या मनोकामना

मलाही वाटत

                                                           मलाही वाटत


                                                    मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                                     आणि आपण दोघांनी प्रेम कराव.....

                                                       मलाही वाटते तुझ्या हातात हात घालून
                                                       तुझ्या खांद्यावर डोके ठेऊन शांत बसाव,,,

                                                   मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं
                                                  मलाही वाटते तुझ्या डोळ्यात डोळे घालून
                                                   सगळ्या जगाला विसरून जावं.......

                                                मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                     भेटायला तू आल्यावर आपण दोघांनी पावसात भिजावं
                                त्या चमकणाऱ्या वीजाच्या आवाजाने घाबरून तुझ्या जवळ यावं
                                                         मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                                       कधीतरी तू मला स्वताहून जवळ घ्यावं
                                                          तुजे माझ्यावर प्रेम वसावं
                                                        मलाही वाटत तुजे माझ्यावर मन याव ,
                                                     मी तुझ्या bike वर बसाव तू ब्रेंक दाबलास
                                                         कि तुझ्या मुद्दाम जवळ याव
                                                    मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                                    मलाही वाटते तुजे माजे लग्न व्हावं
                                                माझे नाव सगळ्यांनी तुझ्या नावासोबत घ्यावं
                                                       आणि आपलं छोटासा घर असावा
                                                    मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                                तू हि माझ्यावर माझ्या इतकेच प्रेम कराव
                                                     तू हि माझ्यावर माझ्या इतकेच प्रेम कराव

हा खेळ मनाचा

किती छान असतो न हा खेळ मनाचा,
स्वप्नांचा आधार घेऊन हवेत भरारी मारण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजा आहे म्हणत स्वप्नात हरवण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तुझ्या माझ्या अबोल प्रीतीचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
मी करत आलेल्या एकतर्फी प्रेमाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू जवळ नसलास कि तुला अनुभवायचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
सत्यात न उतरणाऱ्या स्वप्नाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजाच म्हणून मनाला समजावयाचा
खरच खूप छान असतो रे हा खेळ मनाचा,
सत्य माहित असूनही मनालाच फसवण्याचा.. मनालाच फसवण्याचा ........

तू समजुन का घेत नाही..

तू समजुन का घेत नाही..
कसं गं तुला काही समजत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !

इतक्या सहजासहजी जाऊ का विचारतेस,
भावना का माझ्या तुला जाणवत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला करमत नाही !

तू दुर असलीस की जगही खायला उठतं,
कशातच लक्ष माझं लागत नाही !
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही !

कधी कधी असं वाटतं, तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही !
माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,
पण मुद्दामच तू मला भेटत नाही !!

न भेटण्याने आता काही होणार नाही,
मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही !
आपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा,
त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !!

तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे,
हा काही आज उद्याचा खेळ नाही !
तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू,
असं स्वप्नातही शक्य होणार नाही !!

किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
 तू हे समजुन का घेत नाही !!

लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही,
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही,
पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो,
फक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलो,
खरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलो,
काय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाही,
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही,
आज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहे.
कधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहे.
यशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहे,
खरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाही,
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही,
दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.
माझी पावले तुझ्याच मागे जातच आहे
हृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहे,
काय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाही.
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही... ........

माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का?
माझ्या मनाच्या कोपऱ्यात नयनांच्या माझ्या पापण्यात थोडा वेळ विसावशील का ?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
तुझ्या एका नजरे साठी असतो सदा तुजपाठी मज भरकटलेल्या जीवन मार्गावर आणशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
एकच ध्येय माझ्या जगण्याचे तुला माझी झालेली बघण्याचे करण्या मज इच्छापूर्ती तू पुढे येशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
तुझ्यात असतो मी गंभीर करतेस मज तू अधीर शेवटचे मागणे ..
हाती हात देशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?


                                                                                                                       साभार - कवी: म.श.भारशंकर

मराठी लव्ह स्टोरीज . . .

प्रेयसी :- तुला कित्ती वेळा सांगितले रे सिगारेट ओढत नको जाऊस म्हणून ...........
तू ऐकत का नाहीस ?
प्रियकर :- अग ...... सोडण्याचा प्रयत्न करतोय,
पण सुटतच नाहीये ...त्यात आपल्या घरचे tension देत आहेत ....
लग्नाला नाही म्हणत आहेत .....!!
प्रेयसी :- हे tension मला पण आहे ............
पण म्हणून मी पिते का सिगारेट ?
प्रियकर :- अग मग कसे समजावयाचे ह्या घरच्यांना ......... !!!
प्रेयसी :- अरे म्हणून काय, सिगारेट, दारू, चीडचीडपणा ......
हि आपल्या समस्ये वरील औषधे आहेत का ?
प्रियकर :- हे बघ .... उगीच मला lecture देऊ नकोस ......
त्यापेक्षा घरच्यांना कसे समजावयाचे त्याचा विचार कर !!
प्रेयसी :- घरच्यांच्या आधी तुला समजावणे जास्त जरुरीचे आहे ..................
प्रियकर :- म्हणजे ?
प्रेयसी :- चल माझ्या बरोबर ..
प्रियकर :- कुठे ? (तिथेच शेजारी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात ती प्रेयसी त्याला घेऊन जाते ................
मंदिरात आल्यामुळे त्याला सिगारेट फेकून द्यावी लागते,
तो नाराजीने हाथ जोडून कपाळावर आठ्या आणून तिच्या बरोबर उभा राहतो) प्रेयसी हाथ जोडून त्याला ऐकू जाईल अशा आवाजात गणपती बाप्प्पा ला म्हणते :-
हे विघ्नहर्ता, ह्याची एक सिगारेट म्हणजे माझ्या आयुष्यातील एक दिवस ..........
ह्याप्रमाणे हा जेवढ्या सिगारेट पिल तेवढे माझ्या आयुष्यातील दिवस तू कमी कर ......... हि माझी तुझ्याकडे प्रार्थना, ...... कारण सिगारेट तो पितो पण धूर माझ्या हृदयातून निघतो हे ह्याला कदाचित कधी कळणारच नाही ......!! ♥♥

तुझा पासून खूप दूर गेले तर


मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
माझी आठवण काडशील ना...

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
एकांतात एकदा तरी माझासाठी रडशीला ना...

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
एकदा तरी मनापासून love you बोलशील ना...

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
तुझा जवळ असलेला माझा फोटो कधी तरी बगशील ना...

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
एका क्षणापुरता मी तुझा जवळ आहे असा विचार करशीला ना..

चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो

चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो



♥ एका तलावाच्या काठावर ...
♥ प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे बघ ...!
प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे बघ ...............
त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू,
किती छान बदके आहेत बघ,
प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण बघतो म्हणूनच
आत मधले प्रेम लवकर कळून येत नाही ...
वास्तविक मी तुझ्यावर, "
त्या पांढर्‍या शुभ्र सुंदर बदकांसारखे नव्हे तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो"
प्रेयसी :- ते कसे ?
प्रियकर:- "जे पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात ते तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे उडून जातात,... तेच जे कमळ त्या तलावात वाढते ते मात्र त्या तलावा बरोबरच मरते..."

प्रेम करतोस तुझ्यावर

प्रेम करतोस तुझ्यावर

 "प्रेयसी :- दादर स्थानकावर मुलीच्या चेहर्यावर असिड टाकण्याची बातमी वाचलीस का ?
किती भयानक ना ?
प्रियकर :- होना ...
खूप दुखदायक घटना,
म्हणून तू सांभाळून व हुशारीने रहात जा.
प्रेयसी :- हो रे, कित्ती प्रेम करतोस माझ्यावर ♥ ......
बर मला सांग,
असे असिड जर माझ्या चेहर्यावर कोणी टाकले
आणि जर मी त्यात मरण पावले
 तर आयुष्यभर काय करशील ?
प्रियकर :- मी आयुष्यभर तुरुंगात असेन.
प्रेयसी :- म्हणजे ???
प्रियकर :- तुला दुखावणार्या माणसाला मी जिवंत सोडेन का ?"

बुधवार, २३ मे, २०१२

जबाबदार माणूस जरुर व्हायच.................

जबाबदार माणूस जरुर व्हायच.................
मी घरी पोहचलो. साडे चार वाजले होते. हातपाय
धूवून मी एका हाँटेलमध्ये गेलो. वडापाव संपवून मी चहा घेतला. तेवढ्यात
तिथे एक ५०-५५ वर्षाची बाई आली.
डोक्यावर भल मोठ जळणाचं ओझ तिनं बाजूला
टाकल. कुठेतरी एखादा काळा केस, कपाळावरती मोठी कूंकुवाची छटा. घामामुळे
कूंकुवाचा लाल रंग भुवईपर्यत आलेला, धारदार नाक, तंबाखूची मसेरीनं
काळवंडलेले दात, सूरकुतलेले हात, तिन-चार जोड देऊन हातानेच शिवलेल नववारी
लुगड आणि चोळी असा काही तिचा वेश होता.......

नुस्तच कालावाण मिळल का गं बाई? माझ्याकडं भाकर हाय.
तिचा होकार मिळताच काळपट फडक्यातून त्या बाईन शिळी भाकर काढली. आणि दिलेल्या कालावणावर अधाशिपणान खाऊ लागली.
मी विचार करीयला लागलो. आपण पैसे द्यावे का? हिला कुणीच नसेल का? आणि असेल तर अशी वेळ का यावी तिच्यावर?
इतक्यात तिची भाकरी संपण्याच्या आत ती हाँटेलवाली मुलगी म्हणाली.
आजी, मिसळपाव घ्या. पैसे नाही घेणार! पोरी, आज खाईन पोटभरून पण उदया?
तुम्हाला मुलबाळ नाही का?

त्यावर त्या म्हणाल्या, तसं नाय काय, पोरगा मोठा, सायब हाय,
परदेशाला इंजनेर हाय पण त्याला येळच न्हाय!
कानाखाली कोणतरी जोराची चरकार मारावी आणि त्याचा आवाज मेंदूपर्यत घुमावा तसे हे शब्द माझ्या कानावर पडले. आणि विचारांच काहूर माजल.
माणूस
इतका बदलतो का? आपल संपूर्ण आयुष्य वाहून घेणा-या या माऊलीची त्याला
क्षणभरही आठवण येत नसेल का? आणि सगळच अनुत्तरीत होत. माझी चेहरा खाली घालूत
मी आता विचार करीत होतो. इतक्यात माझ्या पाठीवर तोच थरथरता हात फिरला. मी
वरती पाहील तर तिच बाई मला म्हणाली.
इतका विचार करु नकोस बाळा, तुझ्या आई-बापाला निट जप म्हणजे झाल...........


मगतर मेल्याहून मेल्यासारख झाल. मी आता फक्त रडायचाच बाकी होतो. कारण एका
क्षणात माझ पूर्ण अंतरंग त्या माऊलीन वाचलं. पण आम्हाला आमच्याच आई-वडीलांच
थोडस दु:खसुद्धा कधीच जाणता येत नाही.
जिवनाच्या सचोटीत एवढं शिक्षण घेऊनही आम्ही अगदीच अडाणी वाटतो यांच्यासमोर! कुठ शिक्षण घेतल असेल यांनी हे.

सेटलमेंट,
न्यूजाँब, इनक्रिमेंट, प्रमोशनच्या घोळात आम्ही ही आमची माणसं कुठ हरवुन
बसतो आम्हालाच कळत नाही. डोक जड झाल. मी उठलो आणि चालू लागलो.
शेजारच्या जिल्हापरिषेद्येच्या शाळेत मास्तर मूलांना विचारत होते. आपण काय शिकलो?
मी मनाशीच उत्तर दिलं, आयुष्यात इंजिनिअर नाही होता आल तरी चालेल पण चांगला, जबाबदार माणूस जरुर व्हायच.................

मंगळवार, २२ मे, २०१२

ऐक सुंदर प्रेम कथा

ऐक सुंदर प्रेम कथा

ऐके दिवशी देव पृथ्वीवरच्या प्रेम करणाऱ्या दोन जीवांसाठी ऐक खुर्ची पाठवतो .
ती खुर्ची खूप खास असते . कारण त्या खुर्चीवर बसून माणूस जर खर बोलला तर ...
त्या खुर्चीवरचा हिरवा दिवा पेटणार असतो
आणि जर त्या खुर्चीवर बसून माणूस जर खोट बोलला तर त्या खुर्चीवरचा लाल दिवा पेटणारअसतो
मुलगा त्या खुर्ची वर बसतो मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच लाल दिवा पेटतो )
मुलगा घाबरतो मुलगी : घाबरू नकोस .
देवाची काहीतरी चूक झाली असेल हि खुर्ची बनवताना आपण परत एकदा प्रयत्न करून बघू
मुलगा परत एकदा त्या खुर्ची वर जावून बसतो .
मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच हिरवा दिवा पेटतो ) काही कळल का तुम्हाला ?
जेव्हा तो मुलगा पहिल्यांदा त्याखुर्चीवर बसला तोपर्यंत तरी त्या मुलाच त्या मुलीवर खर प्रेम नव्हत .
पण जेव्हा त्याने त्या मुलीचा आपल्यावर असेलला विश्वास पाहिला आणि
तो तिच्यावर खर खुर प्रेम करू लागला यालाच म्हणतात प्रेम ............... ..
म्हणून लक्ष्यात ठेवा मित्रानो ऐक तर्फी प्रेम सुद्धा यशस्वी होऊ शकत
फक्त तुमचा तिच्यावर / त्याच्यावर असेलला विश्वास कुठेही कमी झाला नाही पाहिज...

तु आपलं म्हणालीस आणि ,


तु आपलं म्हणालीस आणि , जग माझं बदलल .
सगळं काही मीळlल ,
स्वप्नं सत्यात उतरल .
झुरत होतो तुझ्यासाठी ,
मरतहोतो तुझ्यासाठी ,
कळत होता वेडेपणा तरी ,
तसेच वागत होतो तुझ्यासाठी.
तु आपल म्हणालीस आणि , जग माझे बदललं .
सगळ काही मीळlल,
आयुष्य माझंपालटल .
क्षणो क्षणी , ओढ़ होती क्षणो क्षणी बैचैनी ,
मनामध्ये शिरली होती तुझीच ती धुंदी .
तु आपल म्हणालीस , आणि सुख मला मीळlल .
हवे होते जसे मला उत्तर तसेच मीळlल .
तु आपलं म्हणालीस आणि जग माझं बदललं .
सगळं काही मीळlल
मन आनंदाने भरलं .
किती स्वप्नं पहिली होती किती कल्पना रंगवल्या होत्या
तुझ्या विचlरने सखे रात्र रात्र जागवल्या होत्या
स्वप्नातून सत्यात तु आलीस आणि
मन माझं खरं ठरलं तु आपलं म्हणालीस आणि जग माझं बदललं .... !!!