Breking News

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

अटलजींचे तळोदयातील अविस्मरणीय चार तास


काँग्रेसचे तत्कालीन खा. सुरुपसिंग नाईक यांनी राजीनामा दिल्याने सन 1980 मध्ये नंदुरबार लोकसभची पोटनिवडणुक लागली होती. त्यावेळी सुरुपसिंग नाईक यांना विधानसभेवर पाठविण्यात आले होते. काँग्रेसतर्फे माजी खा.माणिकराव गावित हे उमेदवारी करीत होते. तर भाजपाच्या वतीने दिलवरसिंग दादा पाडवी यांच्या प्रचारसभा व आदिवासी मेळाव्यासाठी अटलजी धुळ्याहून चारचाकी वाहनाने नंदुरबार, शहादा, तळोदा या ठिकाणी आले होते. त्यांनी या ठिकाणी ऐतिहासिक सभा घेतल्या. त्यांच्यासोबत धुळ्याचे नेते लखनजी भतवालं, शिरपूरचे आ.प्रल्हाद पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर तळोदा शहरातील आनंद चौकात त्यांची दणदणीत सभा झाली. त्यावेळी व्यासपीठावर उमेदवार कै. दिलवरसिंग पाडवी, माजी भाजपा तालुकाध्यक्ष विश्वनाथ कलाल, त्यावेळेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष कै. गुलाल बुलाखी माळी, अनुपचंद जैन, कै.भाई बारगळ, कै.नारायण पाटील, वसंत मराठे, कै.दौलत पाटील, भगवान चौधरी, कै.ईश्वरलाल कुंभार, कै.त्रंबक शिंपी, कै.तुकाराम जगदाळे, प्रसन्न कुमार बारगळ, मोनिका बारगळ, मांगीलाल पवार, आदी मान्यवर उपस्थित होते. सभेपूर्वी अटलजींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कलाल यांनी अटलजींना त्यांच्या उंचीचा पुष्पहार टाकून सत्कार केला. त्यावेळी अटलजींनी  विश्वनाथजी मैं. भगवान नही! मैं इन्सान हु! मुझे इन्सान रहने दो! असे म्हणत सर्व मान्यवरांचे मने जिंकली. त्यानंतर
  अटलबिहारी वाजपेयी यांच्या धाराप्रवाह हिंदी भाषेतील भाषण ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी दुर्गम भागातुन आदिवासी बांधवांसह बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाषण करताना अटलजीनी कुपोषण, वनजमीनीच्या प्रश्नावर बोलताना आदिवासी बांधवांना वनजमिनी मिळाल्या पाहिजेत असे सांगितले. याकरिता संसदेत आवाज उठवंत राहिल आदिवासी बांधवांना न्याय देण्याची मागणी तत्कालीन पंत प्रधानाना वेळोवेळी केली होती. सभा आटोपून त्यांनी अनुपचंद जैन यांच्या घरी कार्यकर्त्यायासोबत भोजनाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे त्यांनी बाजरीचा भाकर व खुळा बनविण्यास सांगितले होते. असे अविस्मरणीय  चार तास त्यांनी तळोदयात घालवले..

 *आठवण* 
अटलजींनी तळोद्यात सभा होती त्यावेळी मी दहावीत होतो. प्रतापपूरला आर.एस.एस.ची शाखा चालवीत होतो. माझ्यासह प्रत्येक तरुणाला अटलजीचा भाषणाचे आकर्षण होते. सर्व मित्रांना घेऊन सायकलीवर तळोदा येथे भाषण ऐऐकण्यास गेलो होतो. सभेत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. सभा चांगलीच गाजली होती. सभा आटोपून त्याच्या ताफा विश्रामगृहाकडे वळला. अटलजीना काहीही झाले तरी भेटायचे असा दृढ निश्चय मनात ठेवून विश्रामगृहावर गेलो. शिरपूरचे आमदार प्रल्हाद तात्या पाटील यांना अटलजीना भेटण्यासाठी विनंती केली. त्यांनी माझी भेट घालून दिली. त्यांना पाहून त्याच्या पायावर डोके टेकले. व आशीर्वाद घेतला. प्रल्हाद तात्यांनी तरुणांनो संघाचे काम प्रखडपणे करत राहा असे सांगितले. *साहेब जुने ते सोने असते* असे उच्चारताच अटलजी ठा-ठा असे मनसोक्त हसले. लगेचच तात्या पाटीलानी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यानंतर विविध अधिवेशनात त्याचे भाषण ऐकण्याचा योग आला. मात्र तळोद्यातील भेट ही अविस्मरणीय अशी आहे.
     डॉ.शशिकांतजी वाणी 
भाजपा प्रदेश सदस्य महा.राज्य

 *आठवण*
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे श्रध्दास्थान
भारत रत्न माजी पंतप्रधान अटलजींचे दुःखद निधन
 मनाला चटका लावणारे आहे. 1980 च्या काळात लोकसभेच्या पोटनिवडणूकी दरम्यान त्यांनी तळोदा येथील आनंदचौकात सभा गाजवली होती. दरम्यान रेस्ट हाऊस येथे बैठकी दरम्यान त्यांनी माझी विचारपूस केली होती. त्यांच्या निधनानंतर एक लढवय्या नेतृत्व, सोज्वळ स्वभावाचा, हिंदुत्ववादी नेता हरपल्याचे दुःख आहे...
        भगवान चौधरी भाजपा 
जेष्ठ कार्यकर्ते जुने भाजपा पदाधिकारी 

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

बेटी बचावचा संदेश देत सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला मुलीचा वाढदिवस तळोद्याच्या नगरसेविका अनिता परदेशी यांच्या उपक्रमाचे कौतूक

वाढदिवस साजरा करायचे म्हटले म्हजले डिजिटल फलक, पाट्र्या देणे आदी आवाजवी खर्च केला जातो.
यात आपण आपला, आपल्या नेत्याचा किंवा नात्यातील मुलगा असो वा वडील तो किती धुमधडाक्यात साजरा केला याचे दर्शन घडविण्यावर भर दिला जातो. मात्र या सर्वाला अपवाद ठरत तळोदा पालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका अनिता परदेशी व त्यांचे पती संदीप परदेशी यांनी त्यांच्या चिमुकल्या मुलीचा वाढदिवस स्वच्छता कर्मचारी यांच्या सोबत साजरा करीत महिलांना साडी-चोळी व पुरुषांना बेटी बचाव बेटी पढाओ, स्वच्छ तळोदा-सुंदर तळोदा असा जनजागृती संदेश लिहलेले टी-शर्टचे वाटप करुन एक सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. परदेशी कुटुंबियांच्या या उपक्रमाचे संपूर्ण शहरातून कौतूक करण्यात येत आहे.. वाढदिवस म्हटला की आवाजाची खर्च आलाच, राजकीय पुढारी वाढदिवसाला लाखोची उधळण करताना दिसतात. मात्र, दिवसभर स्वत:चा आरोग्याची चिंता न करता, पोटाची खळगी भरण्यासाठी कचरा संकलन करणे, गटारीत उतरून मैला काढणे या सोबतच शहरात स्वछता कशी नांदेल यासाठी स्वछता कर्मचारी आपले जीवाचे रान करत कर्तव्य बजावतात. एवढे करूनही या कर्मचाऱ्यांची दखल घेतली जात नाही. स्वच्छतेच्या कामाकडे गलिच्छ कामे म्हणून पाहिले जाते. मात्र, तळोदा येथील काँग्रेसच्या नगरसेविका अनिता परदेशी व त्यांचे पती संदीप परदेशी यांनी मुलीच्या वाढदिवसाला सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले. परदेशी दाम्पत्याला दोन कन्या आहेत. वाढदिवसाला पैशांची उधळण करण्यापेक्षा स्वछता कर्मचारी व त्यांच्या मुलांसोबत लहान मुलगी चेतनाचा वाढदिवस साजरा केला. पालिका आवारात हरिशचंद्र जोशी यांनी विधिवत पद्धतीने शांती पठण केले. यावेळी ५० महिला व पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या टी-शर्टवर बेटी बचाव, बेटी पढावो... स्वच्छ तळोदा सुंदर तळोदा असे संदेश लिहले होते. तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी पालिका प्रतोद संजय माळी, गटनेते गौरव वाणी, नगरसेवक सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, जितेंद्र माळी, माजी नगरसेवक सतीवान पाडवी, काँग्रेसचे शहादा-तळोदा समन्वयक योगेश मराठे, संदीप परदेशी, भाऊदादा पाडवी आदी उपस्थित होते..


वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎂 यशस्वी भव....🎂
परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो!