Breking News

तळोदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तळोदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

अटलजींचे तळोदयातील अविस्मरणीय चार तास


काँग्रेसचे तत्कालीन खा. सुरुपसिंग नाईक यांनी राजीनामा दिल्याने सन 1980 मध्ये नंदुरबार लोकसभची पोटनिवडणुक लागली होती. त्यावेळी सुरुपसिंग नाईक यांना विधानसभेवर पाठविण्यात आले होते. काँग्रेसतर्फे माजी खा.माणिकराव गावित हे उमेदवारी करीत होते. तर भाजपाच्या वतीने दिलवरसिंग दादा पाडवी यांच्या प्रचारसभा व आदिवासी मेळाव्यासाठी अटलजी धुळ्याहून चारचाकी वाहनाने नंदुरबार, शहादा, तळोदा या ठिकाणी आले होते. त्यांनी या ठिकाणी ऐतिहासिक सभा घेतल्या. त्यांच्यासोबत धुळ्याचे नेते लखनजी भतवालं, शिरपूरचे आ.प्रल्हाद पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर तळोदा शहरातील आनंद चौकात त्यांची दणदणीत सभा झाली. त्यावेळी व्यासपीठावर उमेदवार कै. दिलवरसिंग पाडवी, माजी भाजपा तालुकाध्यक्ष विश्वनाथ कलाल, त्यावेळेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष कै. गुलाल बुलाखी माळी, अनुपचंद जैन, कै.भाई बारगळ, कै.नारायण पाटील, वसंत मराठे, कै.दौलत पाटील, भगवान चौधरी, कै.ईश्वरलाल कुंभार, कै.त्रंबक शिंपी, कै.तुकाराम जगदाळे, प्रसन्न कुमार बारगळ, मोनिका बारगळ, मांगीलाल पवार, आदी मान्यवर उपस्थित होते. सभेपूर्वी अटलजींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कलाल यांनी अटलजींना त्यांच्या उंचीचा पुष्पहार टाकून सत्कार केला. त्यावेळी अटलजींनी  विश्वनाथजी मैं. भगवान नही! मैं इन्सान हु! मुझे इन्सान रहने दो! असे म्हणत सर्व मान्यवरांचे मने जिंकली. त्यानंतर
  अटलबिहारी वाजपेयी यांच्या धाराप्रवाह हिंदी भाषेतील भाषण ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी दुर्गम भागातुन आदिवासी बांधवांसह बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाषण करताना अटलजीनी कुपोषण, वनजमीनीच्या प्रश्नावर बोलताना आदिवासी बांधवांना वनजमिनी मिळाल्या पाहिजेत असे सांगितले. याकरिता संसदेत आवाज उठवंत राहिल आदिवासी बांधवांना न्याय देण्याची मागणी तत्कालीन पंत प्रधानाना वेळोवेळी केली होती. सभा आटोपून त्यांनी अनुपचंद जैन यांच्या घरी कार्यकर्त्यायासोबत भोजनाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे त्यांनी बाजरीचा भाकर व खुळा बनविण्यास सांगितले होते. असे अविस्मरणीय  चार तास त्यांनी तळोदयात घालवले..

 *आठवण* 
अटलजींनी तळोद्यात सभा होती त्यावेळी मी दहावीत होतो. प्रतापपूरला आर.एस.एस.ची शाखा चालवीत होतो. माझ्यासह प्रत्येक तरुणाला अटलजीचा भाषणाचे आकर्षण होते. सर्व मित्रांना घेऊन सायकलीवर तळोदा येथे भाषण ऐऐकण्यास गेलो होतो. सभेत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. सभा चांगलीच गाजली होती. सभा आटोपून त्याच्या ताफा विश्रामगृहाकडे वळला. अटलजीना काहीही झाले तरी भेटायचे असा दृढ निश्चय मनात ठेवून विश्रामगृहावर गेलो. शिरपूरचे आमदार प्रल्हाद तात्या पाटील यांना अटलजीना भेटण्यासाठी विनंती केली. त्यांनी माझी भेट घालून दिली. त्यांना पाहून त्याच्या पायावर डोके टेकले. व आशीर्वाद घेतला. प्रल्हाद तात्यांनी तरुणांनो संघाचे काम प्रखडपणे करत राहा असे सांगितले. *साहेब जुने ते सोने असते* असे उच्चारताच अटलजी ठा-ठा असे मनसोक्त हसले. लगेचच तात्या पाटीलानी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यानंतर विविध अधिवेशनात त्याचे भाषण ऐकण्याचा योग आला. मात्र तळोद्यातील भेट ही अविस्मरणीय अशी आहे.
     डॉ.शशिकांतजी वाणी 
भाजपा प्रदेश सदस्य महा.राज्य

 *आठवण*
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे श्रध्दास्थान
भारत रत्न माजी पंतप्रधान अटलजींचे दुःखद निधन
 मनाला चटका लावणारे आहे. 1980 च्या काळात लोकसभेच्या पोटनिवडणूकी दरम्यान त्यांनी तळोदा येथील आनंदचौकात सभा गाजवली होती. दरम्यान रेस्ट हाऊस येथे बैठकी दरम्यान त्यांनी माझी विचारपूस केली होती. त्यांच्या निधनानंतर एक लढवय्या नेतृत्व, सोज्वळ स्वभावाचा, हिंदुत्ववादी नेता हरपल्याचे दुःख आहे...
        भगवान चौधरी भाजपा 
जेष्ठ कार्यकर्ते जुने भाजपा पदाधिकारी 

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

बारगळ गढीच्या संवर्धनासाठी सव्वा कोटीचा निधी!

पर्यटन विभागांतर्गत होणार विकास : ऐतिहासिक वास्तूला प्राप्त होणार गतवैभव. खांदेशातील प्राचीन, ऐतिहासिक वास्तू असलेल्या तळोदा शहरातील बारगळ गढीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागाकडून सव्वाकोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील प्राचीत ऐतिकासिक वास्तूचे जतन होण्यास मदत मिळणार आहे. . तळोदा शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या बारगळ गढीच्या संवर्धनासाठी जहागीरदार अमरजित बारगळ यांनी पर्यटन विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. खांदेशातील निवडक दुर्मिळ वास्तूपैकी एक असणाऱ्या तळोद्यातील बारगढ गढीला नंदुरबार, धुळे, जळगाव यासह नाशिक, पुणे, मुंबई येथून अभ्यासक, इतिहास तज्ञ, पर्यटक भेट देवून माहिती जाणुन घेतात. मात्र, काळानुरुप या वास्तूची बरीच पडझड झाली असून यातील प्रवेशद्वार, बुरुज, सभा मंडप, प्रमुख इमारत, लाकडी कोरीव काम, विविध झरोके, प्राचीन खिडक्या आदी जीर्ण झालेली आहेत. त्यामुळे या वास्तूचे संवर्धनासाठी बारगळ कुटुंबातील सदस्यांकडून प्रयत्न सुरू होते, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावर ६ फेब्रुवारी रोजी शासन आदेश पारित करण्यात आला असून तळोद्यातील गढीचा विकासासाठी अंदाजित एक कोटी २४ लाख ९१ हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ४० टक्के रक्कम बांधकाम विभागाकडे वर्ग केली जाणार आहे. मात्र, याबाबत बांधकाम विभागाकडे कुठलाही पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यलयातून झाला नसल्याचे समजते. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी निधी मंजूर केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. .

तळोदा शहरातील ऐतिहासिक बारगड गढीचे संवर्धन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. ६ फेब्रुवारी रोजी याबाबत शासन आदेश पारित झाल्याचे कळाले आहे. मात्र, अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजुरी पत्र प्राप्त झालेले नाही.. - पी.जे.वळवी, . अभियंता सार्वजनिक बांधकाम. 

बारगळ गढी खांदेशातील प्राचीन वास्तू असून गढीची काळानुरुप बरीच पडझड झाली आहे. या वास्तूची डागडुजी, विविध कामे होवून तीला गतवैभव प्राप्त होणार आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी निधी मंजूर केला आहे. तर येथील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे यासाठी योगदान मिळाले आहे. . - अमरजीत बारगळ.







सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

तळोद्यात आज जिल्हा साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी, नटावद यांच्या संयुक्त विद्यमाने ८ वे नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज दि.११ रविवारी रोजी तळोदा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलन अध्यक्षपदी निंबाजीराव बागुल असतील. याप्रसंगी परिसंवाद, बालकट्टा, कवि संमेलन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. . तळोदा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आज (दि.११) सकाळी ८ वाजता ग्रंथ दिंडी काढण्यात येईल. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलिस अधिक्षक संजय पाटील, तळोदा प्रकल्पाधिकारी विनय गौडा, माध्यमिक शिक्षणाधिकारी राहूल चौधरी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, तळोदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.रामय्या उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष निंबाजीराव बागुल, स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावित हे असतील. यावेळी श्रीमती जयाबाई कृष्णराव गावित, प्रा.डॉ.पितांबर सरोदे, वाहरु सोनवणे, दिनानाथ मनोहर, रमाकांत पाटील, अविनाश पाटील (धुळे), संभू पाटील (जळगाव) उपस्थित राहणार आहे. मान्यवरांचे स्वागत निखीलभाई तुरखिया, सुदामभाई पटेल, सुनिल सुर्यवंशी, वासुदेव गांगुर्डे, कांतीलाल पाडवी, हिरामण पाडवी, भगतसिंग पटले, भिमसिंग पवार, गोसा पेंटर, प्रविण पाडवी, शिवलाल वळवी स्वागत करतील. दुपारी १ ते २.३० यादरम्यान दोन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुख्य सभामंडपात पहिला परिसंवाद साहित्य, संस्कृती व कलेच्या समाजजीवनावरील परिणाम तर दुसरा परिसंवाद मराठी भाषा भगिनींचे सांस्कृतिक सौहार्दात योगदान असे आहेत. २.३० ते ४ दरम्यान जीटीपी महाविद्यालयाचे प्राध्यापक माधव कदम सानेगुरुजींच्या कथेचे नाट्यरुपी सादरीकरण करतील. दुपारी १ ते ४ दरम्यान बालकट्यात मी वाचलेले पुस्तक कविकट्टाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचा समारोप सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजेदरम्यान होणार आहे. समारोपीय भाषण संमेलनाचे उद्घाटक डॉ.श्रीपाद जोशी हे करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विश्वास पाटील, डॉ.अलका कुळकर्णी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर ७ ते १० या वेळेस सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. संमेलनास साहित्य प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, अध्यक्ष प्रा.डॉ.पितांबर सरोदे, उपाध्यक्ष रमेश डी.चव्हाण, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंहळाचे कार्यवाह डॉ.इंद्रजित ओरके, कार्याध्यक्ष रमाकांत पाटील, सहसचिव विजय बागुल, दत्ता वाघ, भिमसिंग वळवी, विनायक माळी, डॉ.सुनंदा पाटील, आर्कि.निरज देशपाठहे, सौ.सुनंदा भावसार, प्रविण पाटील, संदिप चौदरी, संजयकुमार शर्मा, सौ.सुलभा महिरे, राजू पाटील, कैलास मराठे यांनी केले आहे. .

शनिवार, २९ जुलै, २०१७

डॉ.बाबासाहेबांच्या तळोदा भेटीस ३० जुलैला ८० वर्ष पूर्ण!

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळोदा भेटीला
दि.३० जुलै २०१७ रोजी ८० वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून डॉ.बाबसाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तळोदा येथील समाज परिवर्तनवादी संघर्ष समितीतर्फे रविवारी (दि.३०) विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.. तळोदा तालुक्यासह शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तळोदा शहराला अनेक महापुरुषांनी भेटी दिल्या आहेत. यात दि.३० जुलै १९३७ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तळोद्यास भेट दिली असल्याचे जाणकार मंडळी सांगतात. धुळे शहरात कोर्टाच्या कामकाजासाठी सन १९३७ मध्ये शहरातील प्रेमसिंग तवंग नावाच्या वकीलांकडे खटला चालविण्यासाठी डॉ.बाबासाहेबांना बोलविण्यात आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी दि.३१ जुलै १९३७ रोजी शहरातील मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या लळींग किल्ल्यावरील लांडोर बंगला येथे मुक्काम करीत शहराची माहिती घेतल्याची नोंद आहे. त्याचदरम्यान त्यांनी तळोदा शहरालाही भेट दिली असल्याचे जुने जाणकारांकडून सांगण्यात येते. दि.३० जुलै १९३७ रोजी होळीच्या सहाय्याने गुजरातकडून सज्जापुर हातोडा मागे बाबासाहेबांनी भेट दिली. जुलै महिन्यात पावसाच्या सरी कोसळत होत्या, पाऊसामुळे चिखलाचा अंदाजा न आल्याने त्यांचा पाय चिखलात गेल्याने त्याकाळी १४ रुपये किंमतीचे महागडे बुट चिखलात खराब झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात येते. तळोदा शहराचे जहागीरदार
स्व:रणछोड गुरुजी  
अमरजित बारगळ यांचे आजोबा  शंकरराव बारगड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत केले होते. शहरातील महात्मा गांधी छात्रालयात त्यांनी भेट दिली होती. तळोदा शहरातील बबन माळी पहेलवान, संभु चौधरी आदी पहेलवानांसह अनेक मल्ल व विद्यार्थी घडविणारे स्व.रणछोड माळी गुरुजी हे या छात्रालयाचे गृहपाल होते. यावेळी बाबासाहेबांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची विचारपूस करुन त्यांचा गरजा जाणून संवाद साधला होता. तसेच जातांना तेथील शेरे बुकात नोंद करुन गेले असल्याचे स्व.रणछोड गुरुजी यांनी जहागीरदार अमरजीत बारगळ यांना सांगितले आहे. सन.१९९७ मध्ये रणछोड गुरुजींचे निधन झाल्याने ऐतिहासिक सणाचा एकुलता एक वारसदार पडद्याआड गेले आहे. त्यानंतर तहसिलला भेट देऊन शासकीय कामकाज आटोपून डॉ.बाबासाहेबांनी धुळ्याकडे मार्गक्रमण करुन त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह लळींग किल्ल्यावर विश्वासू व लाडके सेवक पुनाजी लळींगकर यांची भेट घेतली. त्यांच्या घरी भोजन करुन डोंगरावरील लांडोर बंल्यावर कार्यकर्त्यांशी भेटीगाठी केल्याची नोंद आहे. तळोदा शहराच्या भेटीबाबत शासकीय नोंदीचा पाठपुरावा सुरू असला तरी अद्याप शासकीय दस्तऐवज हाती लागलेले नाहीत. जुने जाणकार मंडळींच्या तोंडून याबाबत माहिती मिळते. म्हणून सामाजिक परिवर्तनवादी संघर्ष समितीकडून तारीख व शासकीय माहिती इतिहास तज्ञ,
राजवाडे संशोधन मंडळ, जहागीरदार अमरजित बारगड यांच्याकडे माहिती काढली होती. याबाबत ठोस असे पुरावे हाती लागले नसले तरी तत्कालीन पोलीस ठाणे, नगरपालिका, महसुल विभागातील नोंदी यावरून दि.३० जुलै रोजी डॉ.आंबेडकरांनी भेट दिली असल्याचे कळते. याबाबत सतत मागील काळापासून तळोदा भेटीच ऐतिहासिक पुरावे व जुने दस्तवेज शोधून पुरावे गोळा करण्यासाठी परिवर्तन वादी संघर्ष समिती अध्यक्ष राजेंद्र बिरारे, उपाध्यक्ष नथ्थु साळवे, सचिव प्रदीप मोरे, सिद्धार्थ महिरे, प्रा.अशोक वाघ, शशिकांत सोनवणे हे प्रयत्न आहेत. दि.३० जुलै रोजी डॉ.बाबासाहेबांच्या तळोदा भेटीला ८० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी प्रेरणा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तळोदा येथील वामनराव बापू मंगल कार्यालयात सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक डॉ.संजय अपरांती हे मेळाव्यात मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे..



बुधवार, १२ जुलै, २०१७

तळोद्याच्या सरवारे दांम्पत्याने समाजापुढे एक नवा आदर्श

स्वत:साठी तर सर्व जगतात. मात्र, जे जिवंतपणी व मृत्यूनंतर देखील दुसर्‍यांसाठी जगतात ते खरच आदर्शवत ठरतात. जिवंतपणी समाजासाठी देह झिजवत असलेले पण मृत्यूनंतर देखील देहदान करून मानवतेसाठी सर्व काही अर्पण करणार्‍या तळोद्याच्या सरवारे दांम्पत्याने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तळोदा शहरातील वरिष्ठ महाविद्यालयाचे माजी हिंदी विभाग प्रमुख प्रा.पुरुषोत्तम शंकरसा सरवारे (कलाल, वय ८३) व त्यांच्या अर्धांगिनी सौ.लीलावती सरवारे (वय ७७) यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्र विभागाला त्यांचे देह सूपूर्द केले जाणार आहे.
 वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना चिकित्सा व संशोधनासाठी मानवी देहाची गरज असते. परंतु देहांच्या अभावापोटी ते योग्य शिक्षण घेऊ शकत नाही. या विद्यार्थ्यानी आपल्या देहाचा उपयोग करून मानवी शरीराची रचना अभ्यासून चिकित्सक बनावे व पुढे आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत रुग्णांवर योग्य उपचार करून रुग्णांचे जीवन वाचवावे, अशी प्रा.पुरुषोत्तम सरवारे यांची इच्छा असून यासाठी त्यांनी आपल्या मृत्युपत्रात सुद्धा आपल्या देहदानाचा संकल्प लिहून ठेवला आहे. पतीच्या देहदानाने प्रेरित होऊन त्यांच्या पत्नी सौ.लीलावती सरवारे यांनी देखील पतीप्रमाणो देहदानाची इच्छा आपल्या मुलांजवळ मांडली. मुलांनी संमती दिल्याने या उभयतांची देहदानाची संकल्पपूर्ती त्यांच्या मरणोत्तर त्यांचे मुले योगेश सरवारे, डॉ.हेमंत सरवारे, पंकज सरवारे, मुलगी सौ.श्यामला नारायण सोनवणो हे करणार आहेत.
                                       प्रा.सरवारे यांनी पुणो विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले असून तळोदा येथील कॉलेज ट्रस्टचे ते माजी कार्यकारिणी सदस्य होते. त्यांनी हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी तळोद्यात हिंदी सेवा संघाची स्थापना केली. सध्या ते जेष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष असून ते उत्कृष्ट हिंदी सूत्रसंचालक आहेत. सरवारे दाम्पत्याचा देहदानाच्या संकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.


मृत्यूनंतर सदगती मिळते या अंधश्रद्धेपायी शरीर जाळून नष्ट करण्याऐवजी चामड्यासह सर्व शरीराचा अधिकाधिक उपयोग मानवजातीला व्हावा, सर्व अवयवांच्या गरजू व योग्य लोकांना फायदा व्हावा, जास्तीत जास्त लोकांना देहदानाची प्रेरणा मिळावी, या हेतूने आम्ही देहदानाचा निर्णय घेतला आहे. कालबाह्य रूढी-परंपरा तसेच वेळ व पैसा वाचविण्यासाठी आमच्या मृत्यूनंतर उत्तरकार्य देखील पाच दिवसाचे व त्यात फक्त गोती कुटुंबच सहभागी होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. प्रा.पुरुषोत्तम शंकरसा सरवारे (कलाल)

मंगळवार, १५ मार्च, २०१६

स्व.विद्यादेवी बारगळ यांचे निधन

महिला सबलीकरण पर्यावरण बचावच्या खंद्या पुरस्कर्त्या सा. कार्यकर्त्या स्व.विद्यादेवी बारगळ यांचे निधन..
 तलोदा येथील संस्थानिक बारगळ जहागीरदारांच्या स्नुषा तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत अमरजितराजे शिवाजीराव बारगळ जहागिरदार यांच्या सुविद्य पत्नी तसेच तळोदयाच्या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीच्या जनक, अनेक आंदोलनांच्या पाठिराख्या असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर राज्य पुरस्कार प्राप्त, पुरोगामी समाजसेविका स्व विद्यादेवी अमरजीतराजे बारगळ यांचे वयाच्या 63 व्या वर्षी अल्पश्या आजाराने निधन झाले. त्यांच्या वर पुणे येथील मुक्ति धाम स्मशान भूमित आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जेष्ठ लेखक एकांकीकाकार मार्तंड जोशी लोकसंघर्षच्या नेत्या प्रतिभा शिंदे देवमोगरा विद्याप्रसारक मंडल चे सचिव प्रा. के. एल. जाधव पुणे येथील नगरसेविका आशा शेडगे धनगर समाजाचे नेते मुकुंद कचेकर वाळमुले, माजी नगरसेवक शेख अकबर शेख हिदायत, भारत मुक्ति मोर्चाचे डॉ देविदास शेंडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश माळी ई सह धनगर समाजाचे असंख्य कार्यकर्ते व् बारगळ परिवाराचे सदस्य उपस्थित होते. जळगांव येथील प्रतिष्ठित देशमुख घराण्याची कन्या असलेल्या विद्यादेवी 14 फेब्रु 1977 रोजी वैलेंटाइन डे च्या दिवशी तळोदा संस्थाच्या गादिचे जाहागिरदार श्रीमंन्त अमरजीतराजे बारगळ यांच्याशी प्रेम विवाह करून जहागिरदारांच्या सुन होवून ताळोद्यात आल्या. पुरोगामी व आधुनिक विचारसरणीच्या विद्यादेवी ताळोद्यात आल्या त्याकाळी महिलाशिक्षणा बद्दलची अनास्था, कमी वयात होणारे विवाह, बालकांचे कुपोषण ,अंधश्रदधा, यातून होणारे महिलांचे शोषण हे सर्व पाहून त्यांनी
महिला मुली व् बालाकांसाठी समाज कार्य करण्यास सुरुवात केली. सर्व प्रथम त्यांनी अशिक्षित महिला व् मुलीसाठी प्रौढ़ शिक्षण वर्ग स्वतच सुरु करून त्यांना शिक्षित करण्यास सुरुवात केली. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तळोद्यात पाहिले ब्यूटी पार्लर उघडून त्याचे प्रशिक्षण दिले। महिलांवर चार भिंतीआड होणारे अत्याचार दूर करून् त्यांचे मोडनारे संसार उभे करण्यासाठी त्यांनी त्या वेळच्या धुले व नंतर नंदुरबार जिल्हा महिला दक्षता समिती व् कायदे विषयक सल्लागार समिति वर अनेक वर्ष सदस्य म्हणून काम केले. 1985 ला युवक बिरादरी ची स्थापना करून संचालिका म्हणून सुदृढ़ बालक स्पर्धा द्वारे कुपोषणा वर तर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित त्याद्वारे तळोद्यातील अनेक कलाकार पुढे आणून खान्देश गौरवची ढाल जिंकुन तळोद्यात आणली युवक बिरादरीच्या माध्यमातून युवकांना समाजसेवा शिकवली..
या त्यांच्या सर्वच क्षेत्रातील कामाचा गौरव म्हणून नवनिर्मित नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सन 98- 99 चा अहिल्याबाई होळकर राज्यस्तरीय पुरस्कार देवून शासनाने त्यांचा सन्मान केला सरदार सरोवर बाधिताच्या पुनर्वसनासाठी सातपुड्यातील जंगल तोडून वसाहती बसविन्यासाठी त्या वेळी शासनाने निर्णय घेतला त्याला विरोध करून जंगल वाचविन्यासाठी त्यांनी वसुंधरा बचाव मोहिम सुरु केली. त्या सोबत मेधा पाटकरानी नर्मदा बचाओ आंदोलन उभे केले. त्यात प्रतिभा शिंदे सहभागी झाल्या त्यांनी सुध्दा नंतर लोकसंघर्ष मोर्चा द्वारे हा संघर्ष सुरूच ठेवला असून ह्या सर्व चळवळीच्या केंद्रबिंदु सुरुवात आश्रय ताळोद्याच्या बारगळ गढ़ी राहिली आहे. त्या नगरसेविका असताना स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात त्यांनी तळोद्यातील ऐतिहासिक गिल्डर चौक येथील ध्वज खांब व चौथ्यार्यावरील अतिक्रमन काढण्यासाठी 500 महिलांचा मशाल मोर्चा काढून आंदोलन केले. त्यात उच्च न्यायालयाने ही जागा खाली करण्याचे आदेश दिल्यावर सुध्दा आजतागायत तलोदा पालिकेने ह्या ऐतिहासिक चौकातील अतिक्रमण काढले नाही. याची खंत्त त्याना मरेपर्यंत होती. त्यांच्या या सर्व कार्यात त्यांना त्यांचे पती श्रीमंत अमरजीत राजे बारगळ तिन्ही मुली श्वेता बारगळ चौधरी, सोनिया संदाशिव व टीना बारगळ यांची त्यांना मोलाची साथ लाभाली. असे हे तळोद्यातील लाभलेले महिला रत्न आज नियतीने हिरावून घेतले आहे.

विद्यादेवी ह्या अंधश्रद्धेच्या विरोधात नेहमी महिलांमध्ये जनजागृती करून अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करीत या त्यांच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून त्यांच्या मृत्यु नंतर कोणतेही पारंपारिक धार्मिक विधि करू नयेत असा पुरोगामी धाडसी निर्णय त्यांचे पति व तिन्ही मुलींनी घेतला आहे. त्या ऐवजी तळोदयात फक्त एक सर्व धर्मीय प्रार्थना सभा आयोजित करून त्यांना खरी श्रध्द्दांजली अर्पण केली जाणार आहे... 

 Post by उल्हास मगरे

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६

सुंदर छायाचित्र

                                            काहि फोटोच सर्व काहि बोलुन जातात.. ...








सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

सातपुड्याच्या आवाज गुजतोय सातासमुद्रापार

सातपुड्याच्या आवाज गुजतोय सातासमुद्रापार जीवनात सर्वकाही करीत असताना एक छंद जरूर जोपासवा, या पु.ल. देशपांडे यांचे आवाहन उराशी बाळगुन तबलावादनाचा छंद जोपासणार्‍या तळोदा येथील समीर सूर्यवंशी याने सातासमुद्रापार आपल्या तबल्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अमेरिकेतील लॉस एंजिल्ससह विविध शहरांमध्ये पुणे येथील संतुरवादक डॉ.धनंजय वेठनकर यांच्यासोबत त्याची जुगलबंदी चांगलीच रंगली. आपल्यात असलेली कला ओळखून त्याचा छंद जोपासल्यास डोळे दीपवणारे यश प्राप्त होते हे सातपुड्याच्या पायथ्याशी असणार्‍या तळोदा गावातील समीर सूर्यवंशी याने सिद्ध करुन दाखवले. मुळचा तळोद्यातील समीर सूर्यवंशी याने नुकतेच अमिरिकेतील लॉस एंजिलिस, सॅनफ्रांसिस्को, सनदियोगो सारख्या विविध शहरात कार्यक्रम सादर करुन रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळविली. समीर सूर्यवंशी यांना इंडियन क्लासिकल आर्ट फाऊंन्डेशन (आय.सी.एम.ए) यांच्याकडून आमंत्रित करण्यात आले होते. ही संघटना दरवर्षी अमेरिकेत भारतातील संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या कलाकारांना
आमंत्रण देत असते. यंदा पुणे येथून तबलावादक समीर सूर्यवंशी व संतूरवादक डॉ.धनंजय वेठनकर यांच्या जुगलबंदीचे कार्यक्रम दि.२८ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत अमेरिकेतील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आले होते. यात सूर्यवंशी यांनी आपल्या कलेचे सादरीकरण करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. याबाबत समीर सूर्यवंशी यांची भेट घेतली असता ते म्हणाले, अमेरीकेत भारतीय संगीतबद्दल कमालीची आवड व आदर दिसून येतो. यावेळी काही स्थानिक कलाकार लोकांशी परिचय झाला. ही अमेरिका वारी माझे संगीत व तबला वादकास निश्‍चित समृद्ध करणारा ठरणार असल्याचे त्याने सांगितले. असा घडला समीर तळोदा येथील गो.हू.महाजन शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेणारा समीर हा शाळेत फावल्या वेळेत लाकडी बाक वाजवत असे. अगदी लहानपणापासून ज्या वस्तुमधून आवाज बाहेर निघेल अश्या ठिकाणी नेहमी त्याची बोट थिरकत असत. त्याचे आजोबा रणछोड गुरूजी यांच्या ते लक्षात आले व त्यास स्थानिक तबला वादक गुरु गुरव गुरूजींकडे तालीम सुरु केली.वयाच्या ८ व्या वर्षी गावात पहिला कायर्क्रम सादर केला. नंतर विविध छोट्या-मोठ्या
कार्यक्रमात तबला गुंजु लागला. येथील कनिष्ठ महविद्यालयात १२ वी शिक्षण झाल्यानंतर समीरने पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र तबला विषयात १९९२ साली बी.ए.(विशारद) करुन तबला विषयात पदवी घेतली. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची तबला अलंकार म्हणजेच एम.ए. ही पदवी त्यांनी संपादित केली. सध्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या संगीत ऍकॅडमीत संगीत विभागप्रमुख म्हणून तो कार्यरत आहे.उल्लेखनिय म्हणजे खान्देशात पहिला संगीत क्षेत्रातील कलाकार म्हणून त्यांची ओळख असून याअगोदर त्यांनी आपल्या तबल्याची साथ भजन सम्राट अनूप जलोटा, उस्ताद दिलशाब खान, पंडित आंतरराष्ट्रीय किर्तीचे मिलेसुर मेरा तुम्हारा फेम लुइस बैंक अश्या दिग्गज
कलाकारांसोबत तबलाची साथ दिली आहे.समीर सूर्यवंशी यांना अखिल भारतीय नाट्य परिषद, कला गौरव पुस्कार, स्वर सागर पुरस्कार, जानता राजा प्रतिष्ठान पुरस्कार, प्रभात फाऊंडेशन पुरस्कार, वसंतराव देशपांडे फाऊंडेशन पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. समीरपूणे तळोद्याचे नावही सातासमुद्रापार गेले आहे.......
















बुधवार, २ डिसेंबर, २०१५

एक आठवण बंडू ची !

एक आठवण बंडू ची !
 तळोदे शहरातील मुख्य बाजारपेठे तील स्मारक चौकात असणारी पानदुकान, " राजेश पान सेंटर " आजही , अनेक तळोदेकरांचा मनात घर करून आहे...ते फक्त बंडूमुळेच.. शाळकरी वयातच बंडू ने पानटपरी चालवणे सुरू केले .आणि थोड्या च कालावधीत , आपली मेहनत, जिद्द, चिकाटीने टपरी चा विस्तार केला..... हातमजूर ते ठेकेदार, काँट्रॅक्टर, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक लोकांची ती एक हक्काची पान टपरी होती . अनेकांना रात्री बंडूच्या हातून पान, घुटका खाल्ल्या शिवाय झोप लागत नसे. बंडू च्या टपरी वरील कलकत्ता मिठा पान खाने म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण होत... बंडू ची स्मरणशक्ती जबर होती ..गिर्हाइकाची पंसद माहित असे, नुसती सावली बघून मनासारखे पान, घुटका समोर मांडत असे . नंदुरबार ते सुरत पट्ट्यातील अनेक पान गादी वाले बंडू चे मित्र होते त्यांच्या कडून टपरीवर लागणाररी उच्च दर्जाची पाने मागवित असत. मधल्या काळात . बंडूने पान टपरी सांभाळतच आँडीयो कँसेट, अगरबत्ती विक्री चा जोडधंदा सुरू केला .सकाळी व सायंकाळी 7 च्या सुमारास सुगंधित अगरबत्ती लावून दुकाना चा परिसर पवित्र करुन मंद सुरात भक्तीगीते, भावगीते लावण्या चा बंडूस छंद होता... सिनेमा गीत, सुफी संताची कव्वाली, येणारे सण- उत्सव, ..होळी , नवरात्र, गणेशोत्सव यांची गीते आधी वाजवून वातावरण निर्माण करी. लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची ... ..".या रावजी बसा भावजी ..." ही लावणी ऐकावी तर बंडूकडेच ! रात्री आपल्या अनेक प्रेमात पडलेल्या मित्रांना' ' मुकेश के दर्द भरे गीत ' ऐकवीत असे. बंडू ला व्यायामाची आवड होती.. कसदार शरीर लाभलेला बंडू इतरांना व्यायामाचे महत्व पटवून देत असे..तसेच.शहरातील अनेक क्रिडा स्पर्धां ना बक्षिसे देत असे... अनेक लोकांना ,रस्त्यावर पायी चालत येणारा बंडू ओळखला जात नसे ; इतकी सवय लाकडाच्या कोनाड्यात पाय टाकून बसलेला बंडू पाहण्याची झाली होती ... आपल्या पाना ने लोकांची तोंडे लाल करणारा बंडू प्रत्यक्षात हळव्या मना चा होता , कधी ही कोणाला वाइट उद्देशून बोलत नसे..दोन दोन वर्षे उधारी थकवणारे, बुडवणारे किंवा पान खाऊन पहिली पिचकारी त्याचाच दुकाना समोर मारणारे याचांशी साधी हुज्जत ही घालत नसे....
तळोदेकरांचा बंडू ला अखेरचा प्रणाम.....
साभार- मूळ लेखक श्री.पदमेश माळी  

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

तळोदा शहराला रथोत्सवाची लाभलेली 120 वर्षाची परंपरा

तळोदा शहराला रथोत्सवाची लाभलेली 120 वर्षाची परंपरा.. तळोदा शहरात कोजागरी पौर्णिमेला पार पडणार्‍या संत खंडोजी महाराजांच्या रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. आज होणार्‍या रथोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह गुजरात राज्यातील भाविकांची गर्दी होते. १२0वर्षांची आध्यात्मिक परंपरा असलेल्या रथोत्सवामुळे तळोदा शहराची सांस्कृतिक ओळख आजही कायम आहे. गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यातील कुकरमुंडा येथे संत खंडोजी महाराजांचे समाधी मंदिर आहे. त्यांच्या प्रेरणेने दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला रथोत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम संस्थानतर्फे होतात. येथील विठ्ठल मंदिराचे संस्थापक संत विठ्ठलस्वामी महाराज यांनी संत खंडोजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रथ तयार केला. या रथाचे कोरीव काम व कलाकुसर म्हणजे गतकालीन लाकडी शिल्पकला आणि कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. १00 वर्षांपूर्वी तळोदा शहरात उत्कृष्ट गवंडी, मिस्तरी व लाकडी काम करणारे कुशल कारागीर होते. हा रथ तयार करण्यासाठी या कारागिरांसोबतच परराज्यातील शिल्पकार बोलावण्यात आले होते. त्यांच्या अथक परिश्रमातून लाकडी रथ तयार करण्यात आला आहे. रथ तयार करणारे संत विठ्ठलस्वामी महाराज हे मूळचे कर्नाटकचे तेथून ते पंढरपूरला आले, तेथे ते संत खंडोजी महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर तळोद्याला आले. विठ्ठल महाराज खंडोजी महाराजांना ते गुरू मानत असल्याने गुरुंच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला तळोदा शहरात रथोत्सव मिरवणुकीची संकल्पना त्यांनी सुरू केली. १२0 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आजही सुरू आहे. या रथाची दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला येणार्‍या संत खंडोजी महाराज पुण्यतिथीला तळोदा शहरातून मिरवणूक काढण्याची १२0 वर्षांची पंरपरा आहे. पूर्वी रथाच्या मिरवणुकीत लेझीम, तालीम, ढोल, ताशांच्या गजरात वाद्य व लेझीम पथक प्रमुख यांचे आकर्षण होते. स्मारक चौक, मेन रोडवर रथ मिरवणुकीत शहरातील विविध व्यायामशाळेतील मल्ल मल्लखांब, दांडपट्टा व इतर र्मदानी खेळांचे प्रात्यक्षिक करत. भाविकांचा या कसरतींना भरभरून प्रतिसादही मिळे. कालांतराने रथाच्या मिरवणुकीतील या कसरती बंद करण्यात आल्या. या रथोत्सवात तळोदा शहरातील आबालवृद्ध सहभागी होतात. या रथोत्सवाच्या परंपरेचे हे यंदा १२१ वे वर्ष आहे. यानिमित्त यंदा भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे. रथोत्सवाचे संयोजन रथोत्सव समितीतर्फे दरवर्षी केले जाते. या समितीत तळोदा शहरासह नंदुरबार जिल्ह्यातील सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हे धार्मिक कार्य पार पाडतात. शहरातील ओंकारदास वाणी यांनी त्यांचे घर रथ ठेवण्यासाठी दान म्हणून दिले होते. १00 वर्षांपूर्वी दिलेले हे घर कालांतराने जीर्ण झाल्यानंतर ह.भ.प. उद्धव महाराज व दात्यांच्या अर्थसाहाय्याने घराचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे.

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

तलोदा येथील अँड. अजयकुमार मगरे औरंगाबाद खंड पिठाच्या सहाय्यक सरकारी वकील व अभीयोक्ता पदी

तलोदा येथील अँड. अजयकुमार मगरे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठाच्या सहाय्यक सरकारी वकील व अभीयोक्ता पदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय मुख्य सरकारी वकील पदी अँड.गिरासे अमरजीतसिंग तसेच चार अतिरिक्त सरकारी वकील व 31 साहाय्यक सरकारी वकिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सदर नियुकत्या निधि व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत दि 8 ऑक्टोंबर रोजी 2 वर्षाकरिता जाहिर करण्यात आल्या आहेत. या नविन नियुक्तया नुसार तलोदा येथील रहवासी अँड. अजयकुमार मगरे ह्याची सरकारी वकील व अभियोक्ता पदी नीवड़ झाली आहे. मगरे यांना 17 वर्षाच्या वकीलीचा अनुभव असुन त्यांनी आतापर्यन्त वन अतिक्रमण जमीनी दावे नगरपालिका निवडणुकी संदर्भात व इतर महत्वाचे नौकरी विषयक खटले प्रकरणात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. 3 हजारापेक्षा अधिक खटले चालवल्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. अँड. मगरे यांनी त्यांची ही निवड वडील कै. गोवरलाल उखा मगरे ह्यांच्या स्मृतिस अर्पण केली आहे. अँड. अजय मगरे यांचे वडील कै. गोवरलाल मगरे हे अक्कलकुवा येथील कृषी उतपन्न बाजार समितिवर कार्यरथ होते. अजय मगरे यांच्या निवडीनंतर त्यांच्या सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शुक्रवार, १३ मार्च, २०१५

सावरकरांच्या तळोदा भेटीला ७५ वर्ष पुर्ण

सावरकरांच्या तळोदा भेटीला ७५ वर्ष पुर्ण
 एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. देशाच्या फाळणीला व काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची सुरक्षा वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला. स्वातंत्राच्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व झोकून देणारे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संपुर्ण भारतात भेटी देवून निधी गोळा करीत स्वातंत्रयसमर अधिक चेतविला. त्याच अभियानाअंतर्गत दि.१३ मार्च १९४० रोजी त्यांनी तळोदा शहराला भेट दिली. आज १३ मार्च २०१५ रोजी त्या भेटीला ७५ वर्ष पुर्ण होत आहेत. तळोदा तालुक्यासह शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.  तळोदयाला अनेक स्वातंत्रवीरानी
भेटी दिल्या आहेत. त्यात दि.१३ मार्च १९४० रोजी स्वातंत्रवीर वि.दा.सावरकरांचा तळोदा शहरातील इतिहास प्रसिद्ध् बारगळाच्या गढ़ीत दिलेल्या भेटीला आज ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. सावरकरांच्या तळोदा गढ़ीत भव्य सत्कार करण्यात आला होता. येथील सामाजिक कार्यकर्ते अमरजीत बारगळ यांचे आजोबा
जहागीरदार शंकरराव् बारगळ यांनी सावरकरांना मानपत्र देवून त्यांचा सत्कार केला होता. १३ मार्च १९४० रोजी दुपारी दोन वाजता बारगळाच्या गढ़ीत स्वातंत्रवीर सावरकर यांचे आगमन झाले. त्यांचा सत्कार करुण त्यांचा कार्याबद्दल त्यांना मानपत्र देण्यात आले. गावकऱ्यातर्फे त्यांना देशकार्यासाठी निधीही देण्यात आला. याप्रसंगी सावरकर यांनी देशभक्तीपर भाषणही केले. त्यांची देशप्रेमाने भरलेली अमृतवाणी ऐकण्यासाठी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्याचे धगधगते अग्निकुंड चेतविण्याचे, देशप्रेमाचे मंतरलेले ते दिवस होते. अनेकांनी त्यावेळी स्वातंत्रवीर सावरकरांचे दर्शन घेतले.

तळोदा स्वतंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या तलोद्यातील इतिहासाची साक्ष् देणारी बारगढ़ गढ़ीच्या भेटीला 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधुन तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने गढ़ीतच सावरकरांची प्रतिमा पूजनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले. या निमित्ताने मराठी पत्रकार संघाने आठवणींना उजाळा देत स्मृति जागवल्यात. तळोदा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात सर्वस्व झोकूनदेणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संपुर्ण भारत भेटीत तळोद्यात  दि.१३ मार्च १९४० रोजी भेट दिली होती. त्या भेटीला  १३ मार्च २०१५ रोजी 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त त्या स्मृतिला उजाळा देण्यासाठी बारगढ़ गढ़ीत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे सावरकर यांच्या तळोद्याचे जहांगीरदार शंकरराव बारगढ़ यांच्या हस्ते सत्कार केलेल्या दुर्मिळ प्रतिमेंचा पूजन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास अरुणराव वडाळकर, प्रा अशोक वाघ जहागीरदार यांचे वारस असलेले प्रसन्नकुमार बारगढ़, ऋषिकेश बारगढ़, तलोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कालीचरण सूर्यवंशी, उपाध्यक्ष फुंदीलाल माळी सचीव उल्हास मगरे, ईश्वर मराठे, सुधाकर मराठे, किरण पाटिल, चेतन इंगळे, महेंद्र लोहार आदीच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी अरुणराव वडाळकर यांनी मनोगतात सावरकर यांच्या कार्याचा स्मृती जागवल्यात...