Breking News

sudhaspari लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
sudhaspari लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६

भाग्य तुझ्या विना.....

मी वाट पाहीन तुझी.....
जीवनात आल्यावर मला खूप काही भेटले. वस्तूही आणि व्यक्तीही.
त्यातलीच एक तू.
 तू माझ्यासाठी विशेष आहेस,
कारण माझ्या मनाच्या प्रत्येक कोपर्‍यावर तुझच राज आहे.

तसं ही माझ्या जीवनात संग नव्हती.
 तू आलीस आणि मला संगही भेटली,
तेव्हाच मला जगण्याचा रंगही कळला.
एकमेकांशी बोलायचो, भेटायचो,
खेळायचो, भांडायचो
आणि पुन्हा एकत्र येऊन हसायचो.
खूप छान होतं सर्वच!

प्रत्येक आठवणी मी तुझ्याशी वाटल्या आणि तू सुद्धा.
मला तर आताही तुझ्याशिवाय काहीच सुचत नाही.

तू माझ्याशी बोललीस की खूप छान वाटयचं.
अगदी हृदयातून मी तुला मिठी मारली असंच व्हायचं.
 तू हसली की जणू गुलाबाच्या कळीवर
दवबिंदूचा चमकणारा थेंबच दिसायचा.

फक्त तू आणि फक्त तूच..
मला तर तुझ्याशिवाय आणखी काहीच सुचलं नाही,
सुचत नाही.अन सुचनार ही नाही.
 असं कसं ग तू माझ्या हृदयात घर केलंस की तुझी क्षणोक्षणी आठवण येते.
प्रत्येक पावलांच्या खुणा मलाच का खुणावतात!  सांग ना.?
 पण आता परिस्थिती वेगळीच झाली.
आयुष्यात पाहिलेले सर्वच स्वप्न आता भंग झाली आहेत. मला पुन्हा खीळखिळायचंय हसायचंय हासवायचंय तुझ्यात रमायचंय...
आठवणींच्या भार कमी करायचंय,
मनसोक्त खूप रडायचं आहे. पण तू नाहीस..
पण हे सगळं माझ्याशीच का? असा मी कोणता गुन्हा केला?
ज्याची मला एवढी भयानक कठीण शिक्षा दिलीस..
माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला खरोखर माफ कर.. मी नाही जगू शकणार तुझ्याविना..
तू माझा जीव की प्राण आहेस..!... ..
       
    
Wish u Happy velentine Day...

मंगळवार, २९ जुलै, २०१४

चिमना चिमणी

 चिमना चिमणी
एक होता चिमना आणि एक होती चिमणी चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार तरीही
एकमेकांचे जिवलग यार. वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे, एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे . चिमण्याच्या मनात एक खुलत होते गुपित, चिमणी बद्दलचे प्रेम तिच्या मनाच्या कुपीत रोज रोज करे देवाकडे प्रार्थना , तीच्याही मनात असू देत अशाच काहीशा भावना एक दिवस धीर करून त्याने सगळे सांगितले पण तिने त्याला अगदी सहज नाकारलं तिला म्हणे असे काहीच वाटत नव्हते, तिच्या डोळ्यात प्रेम आहे हे ही अगदी झूठ होते का “नाही” ह्याची बरीच कारणे सांगितली पण चिमण्याच्या मनाला ती अजिबात नाही भावलीचिमणा तिचा समोर खुप रडला , काय करावे कळेना,रडू त्याच्याने आवरेना. चिमण्याला एक उपाय सुचला , त्याने चीमणीशी अबोला धरला चिमणीला मात्र ह्याचा
 फरक पडला प्रेम नको पण मैत्री
चिमणीला मात्र ह्याचा फरक पडला प्रेम नको पण मैत्री हवी म्हणत चिमणी त्याचाकड़े आली.. चिमणा अगदीच खुशीत होता , नवीन स्वप्ने पाहत होता कदाचित तो थोडा जास्तच प्रक्टीकॅल होता चिमणीने सुद्धा आता हसत जगायचे ठरवले पण एकांतातले अश्रू तिला कधीच नाही आवरले . तिला त्याच्यावरचे प्रेम खुप उशिरा जाणवले. आता उशीर झाला होता चिमणीला पाहायला दुसरा एक चिमणा आला होता. चिमणाचे चिमणीवर अगदी खरे प्रेम होते पण कदाचित खरे प्रेम चिमणीच्या नशिबी नव्हते....










शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

सोमवार, ४ जून, २०१२

ते दिवस

ते दिवस असे होते की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
अणि मी फ़ोन केला नाही की मात्र
स्वतच फ़ोन करून गप्पा मारायचं
ते दिवस असे होते की
कोणीतरी माझ्यासाठी जुरायच
अणि मी नाही बोलले की रड रड रडायच
ते दिवस असे होते की
माजा आवाज़ ऐकन्यासाठी कोणीतरी दहादा फ़ोन करायच
में busy असेंन म्हणून फ़ोन करन टाळायच
ते दिवस असे होते की
कोणीतरी माझाय्शी भेटण्यासाठी आतुर असायच
में नाहीं येणार म्हटले की डोळ्यात पानी अनायच
आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
काम नसेंन तरी busy आहे ग म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं
आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन नात तोडायाच
का दुस-याचं जीवन भकास करायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
अणि आता मात्र नुसते भकास जिवन जगायच , भकास जिवन जगायच

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

चिमण्याने केलेले प्रेमही खोटे नाही


एका ठिकाणी चिमणी व चिमण्याचे एक जोडपे होते. चिमन्याचे नाव सुधास तरी चिमणीचे नाव परी होते. दोघांचे एक मेकांवरती जीवापार प्रेम होते. चिमणा हां चिमणी वरती जिव ओतायचा तर चिमणीही त्याच्यावर अतोनात प्रेम करत होती. कधी एक मेकांकडे पाहुन हसत होती तर कधी रडत होती. गतकाळ ते नेहमी आठवत होते. जीवन त्याच आनंदाने जगत होते. कधीतरी एखादे वादळ उठत होते. एकमेकाना त्यांचे भेटने काही काळ बंद होत होते. तरी संकटातुन मार्ग काढत त्यांचे एकमेकांचे भेटने सुरूच होते.
असे करता करता वर्षो उलटली. अचानक प्रेमात वादळ आले परी चिमणीचे लग्न ठरले. त्यामुळे ते जोडपे विभक्त झाले. उरलं आयुष्य जगण्यास राहुन गेले. तरीही धेर्याने ते संकटाना तोंड देत गेले. त्यातच पुन्हा विरहाचा पावसाळयाला सुरुवात झाली. ज्या झुडपांवर त्यानी घरटे बांधन्याची स्वप्न पाहिली होती. दुर्देवाने ते झुडपेच वाहुन गेले. पुन्हा भेटण्याची आस मनातच राहुन गेली. सुधास व परी आता विभक्त झाली. सुधास आजही तिची त्याच जोमाने वाट पाहत आहे. मात्र परी चिमणी आता दुस-याचे घर ठाटते आहे. काय मग ह्यालाच जीवन म्हणावे ? असा प्रश्न मनात घेवुन आस लावुन आजही तो तिची वाट पाहत आहे. तर परी त्याला कधी विसरु ह्याचा ध्यास धरत आहे.मात्र तीला त्याला विसरण येवढ सोप नाही कारण चिमण्याने केलेले प्रेमही खोटे नाही. चिमण्याने केलेले प्रेमही खोटे नाही.

असंच राहू दे ना आपलं नातं

                           असंच राहू दे ना आपलं नातं....
                     त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!

                        असंच राहू दे ना आपलं नातं
                   त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया;

                    आहोत ना एकमेकांसाठी खास
                        मग एकमेकांना घाव नको देऊया!

                   द्यायचंच असेल तर देऊ ओठांवर हसू,
                   कधी उदास असू, तर खुदकन हसता येईल

             हृदयामध्ये थोडी अशी जागा -
              जीवनाच्या वाटेवर दमलो कधी,                                                                                              
              तुझ्या सोबतीने    बसता येईल
                 पण ज्या छळतील आपल्याला
                अशा आठवणींचा गाव नको देऊया,

            असंच राहू दे ना आपलं नातं ,
          त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!

                 प्रेमात नेहमी दुःखच असते .
          मग कश्याला त्या दुखाच्या वाट्याला जाउया

                         प्रेम आहे न दोघात हे
                       आपल्या नजरेला कळू दे ना

                      असंच राहू दे ना आपलं नातं
                     त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!

जेव्हा काही चुकत असेल

जेव्हा काही चुकत असेल.....तेव्हा माझी आठवण कर......
तुला आठवेल बरोबर असलेल....
जेव्हा कधी संकटात असेल.........तेव्हा माझी आठवण कर........
तुझ्या मनात असेल तुला सावरायला.....
जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असेल.....तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल वार्याची झुळूक बनून तुझे अश्रू पुसायला..........
जेव्हा तू झोपली असशील .........तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल जवळ तुझ्या तुला निजवायला.........

जेव्हा तू एकट असशील तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल तुझ्या एकांतात तुझ्याशी गप्पा मारायला.........
जेव्हा तू मला आठवशील तेव्हा माझी आठवण कर.......
मी येईल एक आठवण बनून तुझ्या आठवणीत रमायला......
कारण प्रत्यक्षात तर मी येऊ शकत नाही.....
माझ तस अस्तिव हि नाही......
पण जेव्हाही तुला माझी गरज लागेल....
तेव्हा माझी आठवण कर........मी येईल....नक्की येईल....
तुझे अश्रू बनून......
तुझ्या वेदना घालवायला.......

सोमवार, २६ डिसेंबर, २०११

ही अखेरची तुझी आठवण

तू खुश तर आहेस ना???
कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झालीस
काही कळलेच नाही..
एक एक दिवस जात होता ..
अन एक एक आठवण
मनाच्या पटलावर तरंगून जात होती ..
कदाचित तुला मी वेडा वाटत असेन..
अन होय मी वेडाच आहे तुझ्याच साठी..
तुझ्या एका प्रेमळ कटाक्षासाठी..
तुझ्या प्रेमळ... मिठी साठी.. पण कदाचित ते शक्य नाहीये ... तुला ...
शेवटी मनाला घटत आवळून तुही बुद्धीनेच निर्णय
घेतलास ना..!! आपल ते प्रेम , आपल्या त्या आठवणी..
येवढ्या सहज तू विसरू शकशील..? कदाचित हो असेल तुझ उत्तर...
पण मनातल्या त्या एकांत कोपरयात माझी जागा कायम असेल
हेही मी जाणतो.. होईल तुलाही कधी तरी पश्चाताप होईल कि ऐकल असतं
जर तेव्हाच मनच तर..
पण वेळ गेल्यावर काय करणार..
त्यावेळी कोणाला सांगावस वाटल तरी तुला ते शक्य
नाही होणार..!! आयुष्याच्या एखाद्या वळणावर कदाचित आपली भेट
होईलही ..
पण त्यावेळीही मला हेच जाणून घेण महत्वाच असेल कि
कि
कि
तू खुश तर आहेस ना??? तू खुश तर आहेस ना???

शनिवार, १७ सप्टेंबर, २०११

आयुष्यात प्रेम केलं होतं

आयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं...
म्हणतात,प्रेम करणं सोप असतं ते व्यक्त करणं कठीण असतं,प्रेम पहाणं सोप असतं,ते समजून घेणं कठीण असतं..

आणि हेच समजून घ्यायचं होतं,

म्हणून,आयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं

असतो का प्रेमात खरच आनंद का नुसतच "I Love U" म्हणायच असतं?

विरहात तिच्या बुडून मरायच असतं की फक्त "I Miss U" म्हणायच असतं?

हेच बघायच होतं म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं

म्हणुनच तिच्याजवळ व्यक्त करणं ठरवल

आणि व्यक्तही केल होतं पण..............

.तिला "माझ तुझ्यावर प्रेम नाही" असं म्हणायला काहीच वाटल नव्हतं ,

असतात खरच अशी माणसं या जगात हे कधी मी पाहिलं नव्हतं...

झगडत होतो तिच्याकडून ते 'I Love You" हे तीन शब्द ऐकण्यासाठीकधी

तिच्या आठवणीतं मरत होतो,तर कधी मरुनच जगत होतो....

आणि कदाचित हेच माझ्या मनाला अनुभवयाच होतं .....

म्हणूनचआयुष्यात प्रेम केलं होतं ,कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं!!!!!!