Breking News

सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

प्रेम कथा.

नवजीवन सोसायटी मध्ये ४ थ्या माळ्यावर असलेल्या माझ्या घराच्या अगदी समोर तो राहायचा....
प्रणय नाव त्याच ...५ वर्षांनी मोठा होता
तो ज्या दिवसापासून राहायला आला
त्यादिवसापासूनच मला तो आवडायला लागला ......
Love @ First Sight म्हणतात अस काही.
आणि त्यात भर म्हणजे त्याच आकर्षक व्यक्तिमत्व
कोणाच्याही डोळ्यात भरेल अस होत.......
नवीन व्यक्तिन्शी बोलतानाही जुने मित्र असल्यासारखाच बोलायचं
त्यामुळे कुणीही त्याच्याशी पटकन मैत्री करायचे.....
त्यामुळेच प्रणय माझ्या मनात भरला पण त्याला सांगण्याची हिम्मत झाली नाही.
येता जाता त्याच्याकडे नुसती चोरट्या नजरेने बघत रहायची.
त्याच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही.
मग तोही माझ्याकडे बघायला लागला.दोघेही एकमेकांच्या प्रेमात अगदी नकळत पडलो.



नवरात्र मध्ये गरबा खेळायला गेले तेव्हा
तर तो फक्त माझ्याशीच खेळत होता
मला थोड विचित्र वाटल पण मनात वेदनेची एक सुखद लहर उमटत होती.
त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता.
हा गरबा कधी संपूच नये अस वाटत होत..........................................................




त्या दिवशी रात्री मैत्रिणीबरोबर घरी आले तोही आमच्या पाठोपाठ येत होता नवीन असल्यामुळे आम्ही कोणी त्याच्याशी जास्त बोलत नव्हतो.मैत्रीण दुसर्या विंग मध्ये रहायची त्यामुळे ती निघून गेली.
मी आमच्या विंग च्या खाली आले लिफ्ट च button प्रेस केल.
हळूच त्याची पावलं माझ्या मागे आल्याचा भास झाला.
हृदयाचे ठोके वाढले होते हत्तातल्या काठ्यांशी चाळा करत मी उभे होते लिफ्ट आली दार उघडल.
घाबरत हळूच पाय आत ठेवला.तोही आत आला.
येताना तो माझ्याकडेच बघतोय हे समोरच्या आरश्याने दाखवून दिल. त्याने 4 थ्या माळ्याच बटन प्रेस केल आणि पंखा चालू केला.
दरदरून घाम फुटलेल्या माझ्या चेहऱ्याला थंडावा वाटला.
लिफ्ट ने पहिला मजला क्रॉस केला
तेव्हा अचानक त्याने स्टॉप च बटन दाबल.मला काही कळलच नाही पंख्याच्या आवाजाशिवाय दुसरा कोणता आवाज माझ्या कानी पडत नव्हता माझ्या कपाळावर सूक्ष्म आठ्या पडल्या तो मात्र स्मित हास्य करत माझ्यासमोर आला.




माझ्यासमोर एका गुढग्यावर बसला
आणि खिशातली कैडबरी काढत म्हणाला Will u marry me...??
मला तर काहीसुचतच नव्हते इतक्या रात्री लिफ्ट मध्ये आम्ही दोघच आणि लिफ्ट थांबलेली.
पहिल्यांदा त्याच्याशी बोलले अरे कोणी बघेल ना?
परत त्याचा तोच प्रश्न Will u marry me ...???
मलाही ते खूप आवडल चटकन मी त्याच्या हातातली कैडबरी घेतली
तेव्हा त्याच्या हातांचा झालेला स्पर्श अंगावर शहरे उमटवून गेला
तो हसला आणि उभा राहिला लिफ्ट चालू केली ४ था माळा येईपर्यंत माझी नजर झुकलेली आणि त्याची नजर माझ्यावर स्थिरावली होती.
मी घरात आले आईने जेवायलातात वाढल पण माझी भूक तर त्याच्या प्रोपोसनेच शमली होती.
अगदी जग जिंकल्यासारख वाटत होत. जे हव ते मिळाल्याचा आनंद काय असतो आज त्याची प्रचीती आली.
त्या रात्री खूप उशिरापर्यंत झोपच नाही आली. इतक्या दिवसापासून चाललेल्या चोरट्या नजरेचा खेळ अस काही करू शकेल याची कल्पना नव्हती. पहाटे अचानक केव्हातरी डोळा लागला कळलच नाही. सकाळी उठले तेव्हा हम आपके है कौन मधल गान आठवलं.......
Chocolate lime juice
ice cream toffiya
कल जैसे अब मेरे शौक है कहा
गुडिया खिलौनी मेरी साहेलिया
अब मुझे लगती ही सारी पहेलिया
ये कौनसा मोड ही उम्र का..???


खूप उत्साहात सर्व काम आटपत होते.
आईच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही तिने विचारलं काय झाल आज एवढ्या उत्साहाने काम करतेस ?
मी म्हटलं काम कराव तरी बोलणार आणि काम नाही केल तरी बोलणार मग ती गप्प बसली माझ मलाच हसू आल. खरच बालपण केव्हा सरत आणि आपण तारुण्यात केव्हा पदार्पण करतो हे कळतंच नाही.
कालपर्यंत आई वडिलांची सोनू आता अचानक त्याची प्रेयसी झाली होती.
त्या दिवशी गरबा खेळायला जाताना खूप उत्साह होता.तोही आला होता पण आज त्याच्याशी खेळताना खूप भीती पण वाटत होती मैत्रिणीला कळेल,त्याचे मित्र चिडवतील असे अनेक विचार मनात येत होते.
एखाद्याशी मैत्री असली कि काही वाटत नाही पण तेच जर एखाद्याच्या प्रेमात पडलो तर इतरांसमोर त्याच्याशी बोलायला अवघडल्या सारख वाटत .पण त्याच खेळण इतक छान होत कि मी स्वताला थांबवू नाही शकले.परत रात्री लिफ्ट मध्ये दोघेजण.मला म्हणाला खूप छान खेळतेस .गरबा मी म्हणाले माझ्यापेक्षा तुझ खेळण मला खूप आवडल.एका मैत्रिणीला त्याच्याबद्दल सांगितले ती कवयित्री होती मग काय मैडमच सुरु झाल माझ्यावर कविता करायला.खूप छान कविता केल्या तिने. त्यानेहि मला एक चारोळी पाठविली होती ती खूप आवडली मला.....


                           तुझ्या मनातल्या रंगांना
                           बघून इंद्रधनुष्यही लाजेल
                           त्या लाजण्याची एक
                           अप्रतिम छटा क्षितिजावर साजेल....



नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मनसोक्त गरबा खेळले खेळले कसले त्याच्या प्रेमाच्या रंगात रंगलेच जणू .परत त्या दिवशी लिफ्ट मध्ये गेलो तेवढ्यात आवाज आला wait wait म्हणत जोशी काका धावतच आले. .त्याने लिफ्ट च्या दारात हात टाकला हुशश्श करत जोशी काका आत आले.मग कसल बोलायला मिळत कारण ते सातव्या मजल्यावर राहतात. आम्ही दोघेही मागे उभे होतो.२ रा मजला क्रॉस झाल्यावर त्याने मागून हळूच माझ्या हातात एक letter दिल मी चटकन ते घेतलं आणि पर्समध्ये ठेवलं.घरी आले आणि जेवल्यावर रात्री ते letter वाचायला घेतलं.....


Dear सोनू

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो
आणि मला तुझ्यापासुन काही लपवून ठेवायचं नाही
त्यामुळेच मी हे letter तुला देत आहे.
तुझ्या पूर्वी माझ्या आयुष्यात एक मुलगी आली होती
स्वाती नाव होत तीच मी तिच्यावर खूप प्रेम करायचो
अगदी जीवापाड पण एक दिवस अचानक मला कळलं कि ती माझ्यासोबत फक्त time pass करते. माझ्यासारखाच ती इतर दोन मुलांबरोबर फिरताना माझ्या मित्रांनी तिला पाहिलं होत.
मी तिला जाब विचारला तर रडायचं नाटक करून माझ्याशी असलेले संबंध तिने तोडून टाकले.
पण मी मात्र खूप hurt झालो.
त्यांनतर ठरवलं कि प्रेमा बिमात नाही पडायचं
पण मला तुझा स्वभाव खूप आवडला खर सांगतो
आपण कधी बोलायचो नाही पण तुझ वागण बोलन या सर्व गोष्टी मी न्ह्याहाळायचो.
तू माझ्याकडे चोरून बघायची हि गोष्ट पण माझ्या माझ्या लक्षातयायला वेळ लागला नाही.
सोसायटीतल्या मित्राने पण तुझ्याविषयी सांगितलं गरबा खेळताना पण नजर तुझ्यावरच खिळलेली असायची...................



पत्र वाचून झाल्यावर मला त्याच्या x-girl friend विषयी मनात द्वेष निर्माण झाला
पण ठरवलं त्याला या विषयी काही विचारून दुखवायचं नाही.
पण त्याचा स्पष्टवक्तेपणा माझ्या मनात त्याच्याविषयी
असलेल्या प्रेमात आणखी भर घालून गेला .
दिवस खूप चान चालले होते .
क्लासवरून येताना कधी कधी त्याला भेटायचे.
मग हॉटेलात जाऊन गप्पा व्हायच्या
मला बाहेर त्याच्यासोबत फिरायला खूप भीती वाटायची म्हणून नेहमी होटेलिंगच व्हायचं .
एकदा त्याच्याबरोबर बाइक वरून खारघरला small wondermadhe movie बघायला गेले होते .
वाटत होत बाइक वर त्याच्या मागे घटट मिठी मारून बसाव पण माझ्या पोलिसीमध्ये ते बसत नव्हत.
म्हणून मग फक्त खांद्यावरच हात ठेवला .
या दोन महिन्याच्या भेटीगाठीत त्याने एकदाही मला स्पर्श केला नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही
त्यामुळे मी स्वताला खूप नशीबवान समजायचे .
त्याच्याविषयी मनात आदर वाढत होता .
तो फक्त माझाच राहावा असे वाटत होते...



25 अप्रील् माझा बर्थ डे होता त्याने मला त्याच्याबरोबर मंदिरात चालण्याची विनंती केली
मंदिरात जाऊन अभिषेक करून आम्ही सर्विस रोडने चालत येत होतो .
बाइक सेर्वीसिंग ला असल्याने त्याने आणली नव्हती .सर्विस रोडला असलेल्या कठड्यावर बरेच कपल बसतात
तिथे आम्हीही बसलो त्याने पेस्ट्रिस आणली होती
चमचाने ती कापली आणि छोटासा बर्थ डे सेलेब्रेट केला
जो माझ्यासाठी आजपर्यंतचा सर्वात आनंदी बदाय होता .
बाजूला काही कपल्स बसले होते
त्यांचे अश्लील चाळे बघून दोघानाही ऑक्वर्ड फिल होत होत.
त्याने मला विचारलं तुझ वय काय ?मी काहीच बोलले नाही. मग तोच अंदाजाने म्हणाला १८ असेल नक्कीच मी फक्त मान हलवली .मग त्याने एक वेगळीच इच्छा प्रकट केली मला म्हणाला ,मला तुला १८ वेळा किस करायचं आहे as ur bday gift म्हणून .पहिले मी शॉक झाले पण मग त्याच हसन पाहून वाटल मजाक करत असेल .मी नाही म्हटलं .त्याने माझा हात हातात घेतला एक छानस छोटस बाहूल माझ्या हातात ठेवत म्हणाला हे तुझ गिफ्ट माझ्या प्रेमाची आठवण ,कधी माझी आठवण आली कि याच्याकडे बघत जा .मला ते गिफ्ट खूप आवडल नेमक त्याच दिवशी पपाना प्रमोशन मिळाली त्यामुळे तेही मंदिरात जाऊन येत होते संध्याकाळची वेळ होती अचानक पपांची बाइक समोर येऊन थांबली आईशपथ ...!!! एवढेच उद्गार माझ्या तोंडून बाहेर पडले पपांनी नजरेनेच मला मागे बसण्याची खून केली त्याचा चेहरा तर पांढराफटक पडला होता .मी गुपचूप जाऊन पपांच्या मागे बसली .त्या दिवशी पपांनी एवढ मारलं कि मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही माझ्या बर्थडे च सर्वात मोठ गिफ्ट मला मिळाल होत......................................


रात्री रडत असताना पप्पा बेडरूममध्ये आले सोबत मम्मी पण होती.
डोक्यावरून हात फिरवत म्हणाले सोनू मला माफ कर पण मी जे काही केल तुझ्या भल्यासाठी केल बाळा . आजकाल प्रेम म्हणजे बाजार होऊन बसलाय कोणीही उठल सुटल म्हणत माझ हिच्यावर किंवा याच्यावर प्रेम आहे पण ते प्रेम नसत असत तर फक्त आकर्षण तुम्ही मुल लहान आहात त्यामुळे तुम्हाला ते कळत नाही पण आम्ही यातून गेलो आहोत त्यामुळेच आम्हाला तुमची काळजी वाटते . मी नुसतीच हुंदके देत उशीत तोंड खुपसून ऐकत होते अचानक पप्पा रडायला लागले म्हणाले सोनू आमच दोघांचही खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि म्हणून आम्हाला वाटत कि तू काही वेड वाकड पाउल टाकू नये आजपर्यंत आम्ही तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली ती तुझ्यावरच्या प्रेमाखातरच पप्पांना पहिल्यन्दा रडताना बघून मी उठले आणि सरळ पपांच्या कुशीत गेले आम्ही तिघेही खूप रडलो .
पप्पानी डोक्यावर ओठ ठेवले आणि म्हणाले चल फ्रेश हो केक कापायचा ना ..?
त्या दिवशी कळल आईवडिलांच्या रागातही प्रेमच असत .
पप्पानी ड्रेस पीस आणल होत मग रात्री केक कापला आणि झोपायला गेले .
बाहेर गार वारा सुटला होता चंद्राचा प्रकाश खोलीभर विखुरला होता .
एका बाजूला तो होता आणि एका बाजूला आईवडील काही सुचत नव्हत काय कराव
ते.मग ठरवलं त्याला भेटायचं नाही ते पण २ दिवसातच त्याची खूप आठवण यायला लागली इतकी कि.. मी वेडी होऊन जाईल अस वाटायचं .






घरात कोणी नसताना त्याला कॉल केला .त्याला त्या दिवशी घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि म्हटलं कि मला विसरून जा मी माझ्या बंधनातून तुला मुक्त करते.आणि त्याच काहीही ऐकून न घेता मी फोन ठेवला .

त्यानंतर त्याने माझ्या मैत्रिणी कडून माझ्याशी कॉंटॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला एकदा लिफ्ट मध्ये लेटर देण्याचा प्रयत्न केला पण मी नाही घेतलं.एक दिवस अचानक कळलं कि तो कोलकाताला गेला मला खूप वाईट वाटल आपल माणूस खूप दूर गेल्यासारखं वाटू लागल.मी त्याला जितक दूर सारण्याचा प्रयत्न करत होते तितकाच तो माझ्या जवळ येत होता.एक वर्ष पूर्ण मी त्याने दिलेल्या बाहुल्याकडे बघून काढलं .



नुकतीच बारावीची एक्साम झाली होती
मी टेलिमार्केटिंग मध्ये जोब धरला
काही दिवसांनी त्याला कॉल केला
तब्बल एक वर्षाने मी त्याच्याशी बोलत होते
खूप वेळ बोलले त्याच्याशी त्याला खूप विनवण्या केल्या कि तू परत ये.
त्याला सॉरी वगेरे म्हणाले खूप रडले
त्याच्यासाठी कारण अजून मी त्याला एक क्षणही विसरले नव्हते .
तो कुठल्यातरी कोर्स साठी गेला होता कोर्स संपताच परत आला .
अचानक येऊन त्याने मला सर्प्राइज़ दिल.
त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी जीव आसुसला होता .
काही माणसांची किंमत ते जवळ असताना कधीच काळात नाही
पण दूर गेल्यानंतर कळत कि ते आपल्यासाठी काय आहेत ते.
किती महत्व आहे आपल्या आयुष्यात त्याचं ते तेव्हाच कळत .
त्याला भेटायला त्याच्या एका मित्राच्या रूमवर गेले .रड रड रडले ...........






त्याची माफी मागितली आणि नकळत त्याच्या कुशीत विसावले .
त्याने खूप समजावले तेव्हा कुठे मी शांत झाले .
माझ्या डोळ्यांतले अश्रू पुसत त्याने माझा चेहरा ओंजळीत धरला
आणि त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले.
माझी प्रतिकार करण्याची हिम्मतच झाली नाही.
वाटत होत हि मिठी कधी सुटूच नये.
घरी आले आरश्यात स्वताला न्याहाळल.
मला माझ्या नजरेला नजर भिडवण्याची लाज वाटत होती.
माझी मूल्य तत्व मीच संपवली होती,










त्यानंतर फोन वर बर्याचदा बोलायचो
भेटताना खूप सावधता बाळगायचो .
पण आता प्रणय खूप बदलला होता
त्याच्या बोलण्यात अश्लीलता खूप होती.
पण मी काही बोलायचे नाही काय करणार प्रेमात वेडी झाले होते ना त्याच्या .
नेहमी भेटल्यावर हातात हात घेण,
चालताना बोटांची गुंफण करण ,
ऑटोमध्ये बसल्यावर माझ्याकडे एकटक बघन हे चालू असायचं .या गोष्टीना मी कांतले होते मला ते पटायचं नाही एकदा मी त्याला स्पष्ट बोलले ; "किस करणे , स्पर्श करणे हेच प्रेम असत का? तस असेल तर मला नाही जमणार !!!." त्यालाही राग आला तोही निघून गेला



त्याच्या बर्थडे ला मी त्याला कॉल लावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने रिसीव नाही केला सहा तास सतत मी कॉल करत होते शेवटी त्याने उचलला मी त्याला विश केल आणि म्हटलं 'ट्विन्स' मध्ये भेटूया तो नाही म्हणाला ,मी खूप विनवण्या केल्या आणि शेवटी म्हटलं कि मी तुझी तिथे वाट बघते जरूर ये .मी त्याची तब्बल दीड तास वाट बघितली पण तो नाही आला .तो विसरला होता मला....कायमचा .त्या नंतर त्याला एक दोनदा कॉल केला होता त्याने माझ्याकडे सरळ सरळ शरीरसुखाची मागणी केली होती हे ऐकून तर मी अवाकच झाले .त्याची माझ्या मनात असलेली प्रतिमा एका क्षणात ढासळली .तोही नावाप्रमाणेच निघाला .त्यानंतर मी त्याला परत कधीच कॉल केला नाही.सोसायटीत दिसला तरी मान खाली घालून निघून जायचे .काही दिवसांनी मला एक वेगळीच बातमी कळली त्याच्याविषयी तो ज्या ठिकाणी वाशीला राहायचा तिथे माझ्या एका मैत्रिणीचे नातेवाईक राहायचे तिच्याकडून जी काही बातमी कळली तिने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली


तिथल्या एका मुलीवर त्याचे प्रेम होते २२ वर्षाची होती ती तिला याच्याकडून गर्भधारणा झाली होती.प्रकरण घर्त्ल्याना कळलं पण याच्या वडिलांचे आणि त्यंचे चांगले संबंध होते आणि समोरची मानस चांगली होती.याच्या वडिलांचा विचार करून त्यांनी ते प्रकरण संपवलं .याच्या वडिलांची समाजात चांगली ओळख होती.एकदम सज्जन गृहस्थ होते . म्हणून प्रकरण निपटल .त्यामुळे त्यांनी ती जागा सोडून इकडे शिफ्ट झाले होते .......
.......म्हणजे याने जे सांगितलं ते सर्व खोट होत.गरब्याच्या खेळाप्रमाणे माझ्या मनाशीही खेळला होता . बरोबर म्हटलं होत मी..... खूप छान खेळतोस गरबा तू...खरच...... खूप छान खेळतोस .त्या दिवशी अजिबात रडले नाही कारण खूप मोठ्या संकटातून वाचले होते याचा आनंद वाटत होता त्याच्यासोबत घालवलेल्या "त्या " क्षणांची किळस वाटू लागली होती.त्याच्याकडे तर आता बघायची पण इच्छा नव्हती . आता मी गरबा खेळण बंद केल आहे पण एक दिवस देवीला पाया पडायला गेले त्या दिवशी तो दिसला एका दुसर्या मुलीसोबत खेळताना ...काळजी वाटली मला ...त्याची नाही... तर त्या मुलीची .
मध्ये खूप आजारी पडले होते सतत ताप यायचा ....काविळच निदान झाल .खूप काही करून बघितलं पण फरक पडत नव्हता औषध ,गोळ्या, मांत्रिक, तांत्रीक काही फायदा नाही झाला . कारण मी आतून पोखरले होते औषधांना माझ शरीरच रेस्पॉन्स देत नव्हत .कावीळ पोटात झाली होती .दिवसेंदिवस प्रकृती खंगत चालली होती मम्मी -पापा खूप काळजी घ्यायचे .पण माझ मन अजूनही त्याच्या आठवणीत हुंदळत होत.....का अस केलस रे तू? का अस फसवलस ? किती मनापासून प्रेम केल मी तुझ्यावर आणि तू ......
एकाच इच्छा आहे शेवटची कि परत अस कुणाला फसूवू नकोस ..बस !!!!
खूप प्रेम केल रे तुझ्यावर आणि करत राहीन मरेपर्यंत ...


तो तिच्या शेजारी उभा होता .त्याला वेड्याला माहीतच नव्हत कि त्याच्याच आठवणीत ती गेली .
तिची आई गप्प झाली होती पप्पांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते .
प्रणयच्या वडिलांनी अम्बुलेंस मागवली होती तिच्यासाठी नव्हे ..!
तिच्या आईसाठी कारण सोनू गेली होती खूप दूर गेली होती
कायमची जिथून ती कधीच परत येणार नव्हती .
आणि त्याच शॉक ने तिची आई गप्प झाली होती.
तिच्या डाव्या हात प्रणयने दिलेला बाहुला होता तो त्याच्या नजरेतून सुटला नाही त्याला पाहताच तो ढासळला.

वेदना हि फुलांच्या काट्यानसारखी असते
एक नाजुकशी कळ मनात उमटते
प्रणयाच्या वेळी जशी प्रेयसी
हात सोडून निसटते.......





रविवार, २५ सप्टेंबर, २०११

होती एक तिच्यावर खुप मी प्रेम करायचो.

ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस !
स्वप्न परीचे पाहिले की तिला सांगायचो,
परीचा राजकुमार मीच अशा काही कल्पना करायचो,
स्वप्नात हि स्वप्ने रंगवत असाच काही वागायाचो,



ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस !
मनातल्या भावना तिच्या कडे व्यक्त करायचो,
उगवत्या सूर्या पासून ते मावलत्या सूर्या पर्यंत
फक्त तिच्या गोष्टी करायचो,
रात्रीच्या चंद्रा कडे पाहुन तिच्याच स्वप्नात डुबायचो,





ती नेहमी म्हणायची पण ऐक्नार्यातला मी कोण...?
स्वप्ने पहाता-पहाता इतका काही गुंतलो,
की पुन्हा वास्तव्यात येन स्वप्न होउन राहिले,........



मैत्री हि हरवली,
परी हि हरवली,
राहिला तर फक्त पचतावा....!
अस तुमच्या सोबत होउन देऊ नका



"होती एक
तिच्यावर खुप मी प्रेम करायचो
तिची आठवण आल्यावर कविता करत बसायचो...
" वेडा होतो अगदी वेडा"...........

प्रेम कथा..

अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....

काय करु? काहीच सुचतं नव्हतं...

उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....

गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....

थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....




थडग्यावरचे नाव वाचले...' कविता पाटील' '१९८६-२००७'...

म्हणजे माझ्याच वयाची असेल!

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?

आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?

मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...

तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....

मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'

तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'

मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'

मी चकीत झालो!

विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे......




प्रेम कथा..

                               एकदा एक मुलगा त्याच्या प्रेयसीला Challenge करतो कि,

                                  "एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय राहून दाखवायचे,
                                  मला फोन, मैल, मेसेज काहीही करायचे नाही ............................
                           जर तू अस करून दाखविलेस तर मी तुझ्याशी लगेच लग्न करेन ........
                     मुलगी म्हणाली, "खरे तर मला एक क्षण सुद्धा तुझ्या शिवाय राहायचे नाहीये ...........
                  पण तरीही आज तू मला challenge केले आहेस म्हणून मी एक पूर्ण दिवस काहीही contact न                      
                            करण्याचे   challenge स्वीकारत आहे !".



                                      एक पूर्ण दिवस काहीही contact न करता जातो.
                                दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी खूप उत्सुकतेने त्या मुलाला भेटायला  
                                    त्याच्या      घरी जाते .................. पण ...............
                              घरात पोचताच ती तिच्या प्रियकराची पांढर्या शुभ्र कापडात ठेवलेली व वरती हार
                              घातलेली  body  बघते ....


                         आणि तिला एकदम खूप मोठा धक्का बसतो .............
                        तिला हे अस कस झाले ??? , का झाले ????? .....काहीच कळत नव्हते..............
                        रडावे तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर राहातच येत नव्हते ......
                        कंठ दाटून आलेला ......
                        सर्व आठवणी डोळ्यासमोर एक क्षणात उभ्या राहिल्या ........


 
       तेव्हड्यात त्याच्या आईने त्याने तिच्यासाठी लिहिलेली चिठी तिच्याकडे दिली त्यात लिहिले होते ,



                     " कर्करोगाच्या आजरामुळे माझ्या कडे शेवटचा एकच दिवस राहिला होता
                       म्हणून मला तुला challange करावे लागले ................
                      आणि तू ते करून दाखविलेस, Baby...... , आता फक्त हेच तुला रोज करायचे आहे .......!!!"





Dont Cry Pari.....











बुधवार, २१ सप्टेंबर, २०११


अंजली:- "हो विशाल, तू चांगला मुलगा आहेस, ...........
पण मी राहुल ला सोडू नाही शकत.......

कारण राहुलच्या हृदयाला होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे...........

कारण आमचे प्रेम खरे आहे "

विशाल:- "माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल"
अंजली :- "राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत" So I am sorry Vishal........!!


(10 दिवसांनतर)


राहुल :- "अंजली एक आनंदाची बातमी,.......
मी heart transplant करून घेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......

तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले,

त्या पत्रात लिहिले होते की,




"अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत

नाही...... पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय

जगू सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका

छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम मिळत राहील"

I love you and now have a long love life ahead. फक्त तुझाच, स्वर्गवासी

(हृदयवासी) विशाल

love story


एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत ?
देव म्हणाला

बागेतून एक फुल घेवून ये.

ती मुलगी फूल आणायला गेली ,

तिला एक फूल आवडल ,

पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,

ती पुढे चालली गेली ,

पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,

जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,

तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,

तिला खूप पश्चाताप झाला ,

तिने देवाला येऊन सांगितलं ,

 तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम "

जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .

तेव्हा त्याची कदर नाही करत ,

पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय असत ..!!

love letter




 माझ्या मनातील प्रत्येक भाव तू ओळखला आहेस.
तुझ्यापासून काहीच लपून राहिलेलं नाही.
तुझ्याही मनात माझ्याबद्दल प्रेम, आस, कोमल भावना आहे.
माझ्याही मनात तेच आहे. तरीही आपण दूर आहोत. का? कशासाठी?
या भेकड समाजासाठी की या समाजाला घाबरणाऱ्या आपल्या आईवडिलांसाठी?
कुणी बनवला हा समाज? आपणच. मग याला का घाबरायचं?
तुझी आणि माझी जात वेगळी आहे, म्हणून आपण दूर-दूर राहायचं?
मला नाही पटत हे सगळं. खरं सांगू, हे सगळं मी तुच्छ मानतो.
या जगात सर्वश्रेष्ठ मैत्री आणि प्रेम या दोनच गोष्टी खऱ्या आहेत.
त्या नि:स्वाथीर् असतात आणि जर या गोष्टी नि:स्वाथीर् नसतील, तर त्या खऱ्याही नसतात.
तुझ्या प्रेमात पडल्यापासून मी बरंच काही शिकलो. प्रेम सगळं शिकवतं, असं म्हणतात ना,
ते खरं असल्याचं मी अनुभवलं. तुझ्या प्रेमाने मला कवी बनवलं.
स्वतंत्र विचारसरणीचं व्हायला लावलं. स्पर्शाशिवायही आधार देता येतो,
याची तुला उत्तम जाणीव आहे.
तुझा बोलका चेहरा सतत माझ्यासमोर असतो आणि तो पाहून माझी लेखणीही उत्तर देऊ लागते.
तुझं ते गोड हसणं पाहून कुणी फिदा नाही झालं, तरच नवल.
तुझा खेळकर स्वभाव कुणालाही आपलंसं करतो.
तुझ्या शुद्ध आणि नि:स्वाथीर् हसऱ्या-गोड स्वभावामुळेच मी तुझ्यात कधी गुंतत गेले, कळलंच नाही.
कदाचित आपलं प्रेम मोठ्यांच्या नजरेत चुकीची गोष्ट असेल.
पण प्रेम करताना मी त्यांची परवानगी घेतली नव्हती.
आताही मी घाबरत नाही. तुझा स्वभाव 'मोडेन पण वाकणार नाही,' असा आहे.
मग आपण चुकत नसलो, तर भीती कशाची?
प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचे गोड क्षण येतात.
ते लग्नाआधी आले, तर त्याला मान्यता मिळत नाही. का? ते मलाही माहीत नाही.
पण मला इतकं नक्कीच ठाऊक आहे,
की तू माझीच आहेस... फक्त माझीच! आयुष्यात प्रत्येकाने एकदा प्रेम केलंच पाहिजे, पण ते प्रेम खरं पाहिजे ...

love letter

तू माझ्या आयुष्यात आलीस , तेव्हापासून माझ्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं.
कळलंच नाही , की मी केव्हा प्रेमात पडला. प्रथम तुला होकार दिला ,
तेव्हाही मला वाटत नव्हतं , की मी प्रेमात पडला आहे.
या 14 फेब्रुवारीला आपल्या प्रेमाला तीन वर्षं पूर्ण झाली.
पण अजूनही आपण नवीन असल्यासारखं वाटतं.
या तीन वर्षांत बरंच काही घडून गेलं. थोडं रुसणं , थोडंसं हसणं...
तरी आपल्यातील नावीन्य काही कमी झालं नाही.
आपण एकमेकांमध्ये एवढं सामावून घेतलं आहे ,
की फक्त चेहऱ्याच्या हालचालीवरून आपल्याला काय बोलायचं आहे ,हे कळतं.
तू माझ्यासाठी काहीच केलं नाहीस , असं तुला का वाटतं ?
तू माझ्यासाठी भरपूर काही केलं आहेस.
आज मी जे काही आहे , त्याचं पूर्ण श्रेय तुलाच आहे.
आज आपण अशा वळणावर उभे आहोत , की पुढे काय होईल , याची कल्पना नाही.
आपला विश्वास , आपलं प्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहे.
आपल्यातील नि:स्वाथीर् , निरपेक्ष प्रेमामुळेच आपण एकत्र आहोत.
तू म्हणतेस ना , की आपलं प्रेम फार वेगळं आहे... ते खरंच वेगळं आहे.
आपण एकमेकांवरचे हक्क एकमेकांना पूर्णपणे दिले आहेत.
पण कोणत्याही अटी आणि वचनामध्ये आपण एकमेकांना बांधलं नाही.
प्रेमाला कधीही मोजमाप नसतं. फक्त भरपूर प्रेम करत राहायचं असतं.
कधीकधी वाटतं , की तू एवढं करतेस , तर मीच कमी नाही पडणार ना ?
कुठे कमी पडले किंवा काही चुकलं , तर मला नक्की सांग.
खरंच मला माझं प्रेम व्यक्त करता येत नाही. तुझ्यासारखं छान छान बोलता येत नाही.
तू म्हणतेस ना , काहीतरी लिहित जा. ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही ,
त्या लिहून व्यक्त करता येतात. म्हणून हे फक्त तुझ्यासाठी.
आत्तापर्यंत तू मला खूप काही दिलंस , मला समजून घेतलंस , खूप खूप प्रेम केलंस.
आता फक्त एकच मागणं आहे , ' हृदयाचा ठोका चुकला तरी , तू मात्र चुकू नकोस ,
प्रेमाचं नातं परी , साथ कधी सोडू नकोस... '

तुम इस मोड़ पे


तुम इस मोड़ पे मुझसे मिले की जहाँ आगे रास्ता नहीं था
हाथ बढाया था तुने मगर तब मेरा साथ ही नहीं था
तड़पता रहा मई पानी के बिना मगर वहां कोई नहीं था
तुमने सागर बहाया मगर मेरी साँसों में तब दम ही नहीं था
लौट रही थी मन की मौजे मन के समुंदर में जब साहिल ही नहीं था
अब साहिल इन्तजार करता है रात दिन जब दरया में पानी ही नहीं था
मेरी ख़राशे घाव बन गए तब दवा लगाने कोई नहीं था
तुम मरहम लेके आ गए जब घाव क्या मै ही नहीं था
अब न बहाओ आसुंओ को मै आज नहीं कल था
पर सुनना लोगों से कभी किस्सों में ...
तुम्हारा भी आशिक हुआ करता था

माझ प्रेम कधी कळणार नाही तुला,


माझ प्रेम कधी कळणार नाही तुला,
म्हनुनच कायमचा सोडून गेलास मला,

मी वेड्यासारखा प्रेम करत राहिला तुझ्यावर,
आणि तुही जिवापाड प्रेम केलस माझ्यावर,

पण का का कधी विचारल नाहीस मला,
marriage करतो का माझ्याशी ?

तुझ माझ प्रेम हे दोघांच्या मनात फुलत राहिल
दोघान्चाही एकमेकांवर प्रेम असुनही अपुर्णच राहिल,

आणि आता ते कायमच राहिल अपुर्णच
कारण तुझ्याशिवाय मी पण अपुर्णच........

एक प्रेम कथा...

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.
त्याचं जरा जास्तच.
तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं.
पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा.
पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही
त्याला करवत नसे.
तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं.
पण द्यायच काय...?  खिशात तर दिडक्या नाहीत..
शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझ...ेण्ट केली..
ती खुष होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती.
तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती..
तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी..
भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...
पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....
पण एक दिवस सगळा नुरच पालटला..  ती म्हणाली, "
तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी
असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..
काय सुखात ठेवणार तु मला..?
काय आहे तुझ्याकडे...- तर काहीच नाहि...मी परदेशी चालले आहे..
पुन्हा कधीच परत येणार नाही..
तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे..
माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली...
हा मॊडुन पडला....संपलाच जणु काही....
सर्व काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची
लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..
त्याने ठरवलं, '
तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..?
मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा.
इतका की आपल्यापुढे सारं जग
तिला थिटं दिसलं पाहिजे..'
या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..
झोकुन दिलं स्वतःला..!
कष्ट केले..राब राब राबला..
मित्रांनी मदत केली.चांगले लॊक भेट्ले..
त्याचे दिवस पालटले..
तो खुप श्रींमत झाला..
स्वतःची कंपनी उभारली..
पॆसा, नोकर, चाकर, गाड्या,
मानमरातब सगळं कमावलं.
विरहाच्या आगीतुन,
प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला..
उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..
पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती..
ती सोडुन गेल्याची..तिनं नाकारल्याची..
आपल्या गरीबीचा अपमान केल्याची..
तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती..
एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता..
बाहेर मुसळधार पाऊस पडत होता..
गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं
एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं..
भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं..
त्याने गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ' तिचेच' आई-वडील.!!
त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली..
त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत..
त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती..
त्यांनी आपली श्रींमती पहावी..
त्यानी आपली गाडी पहावी..
आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..
असं त्याला मनोमन वाटतं होत..
तिला धडा शिकवण्याच्या..
अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका
वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं.
ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या
खाद्यांने चालतच राहातात..
हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.
"..पाहतो आणि कोसळतोच.."
तिचाच फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...
आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला...धावतच गेला कबरीकडे...
तिच्या आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा....
ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही.
तिला ' कर्करोग' झाला होता..
तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होतए तिच्या हातात...
आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुन उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास होता..,
म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तू जगलासं................................

मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

तुझ्या देहाकडे बघून



तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण,

"ओढणी सांभाळ" सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला हसवणारे बरेच असतील पण,

तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !

लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण,

"जपून चाल" सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण,

तू रडताना,तुझा हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण,

तुझ्या नकळत तुझ्यावर प्रेम करणारा मी एकटाच असेन...

प्रेम आणि वेडेपणा...


प्रेम आणि वेडेपणा...
खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. जगाची उत्पती त्यावेळी झाली नव्हती आणि मानवाने या जगात आपले पाऊल रोवले नव्हते. त्यावेळी सगळे सद्गुण आणि दुर्गुण इकडेतिकडे फिरत होते. काय करावे हे नकळल्याने कंटाळले होते.
एक दिवस ते सगळे एकत्र जमून काय करावं याचा विचार करू लागले. त्यांना खूपच कंटाळा आला होता. इतक्यात 'कल्पकते'ला एक कल्पना सुचली. ती म्हणाली,"आपण सगळे लपंडाव खेळूया का?" सर्वाना ती कल्पना एकदम आवडली. लगेच वेडा असणारा 'वेडेपणा' ओरडला, "मी आकडे मोजतो". या वेडेपणाच्यामागे लागण्या एवढं कुणी वेडं नसल्याने सर्वांनी त्याच्या म्हणण्याला मान्यता दिली. 'वेडेपणा' एका झाडाला रेलून उभा राहिला आणि मोजू लागला.......एक, दोन, तीन..............
वेडेपणाने आकडे मोजायला सुरुवात करताच सर्व सद्गुण व दुर्गुण लपायला गेले. 'कोमलता' चंद्रकोरीच्या टोकांवर जाऊन बसली. 'देशद्रोह' कचऱ्याच्या ढिगात लपला. 'आपुलकी'नं स्वताला ढगांमध्ये गुंडाळल. 'खोटेपणा' म्हणाला कि 'मी दगडाखाली लपेन'. पण त्याचं सांगणं खोटंच होतं. प्रत्यक्ष तो एका तळ्याच्या तळाशी लपला.'वासना' पृथ्वीच्या मध्यभागी लपली. 'लोभ'एका पोत्यात शिरू लागला आणि शेवटी ते पोतं त्यानं फाडला. वेडेपणा आकडे मोजतच होता......७९, ८०, ८१, ८२......
बहुतेक सगळे सद्गुण, दुर्गुण वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. अजून 'प्रेम' मात्र कुठे लपावयाचा निर्णय न घेता आल्याने लपू शकलं नव्हतं. अर्थात आपल्यालायाचं आश्चर्य वाटायला नको. कारण आपल्याला माहित आहे कि, 'प्रेम' लपवता येतचं नाही. 'वेडेपणा' आकडे मोजत होताच...९५, ९६, ९७.... शेवटी शंभरावा आकडा उच्चारण्याची वेळ आली तेव्हा घाईघाईने 'प्रेमा'ने एका गुलाबच्या झाडत उडी मारून स्वताला लपवलं. वेडेपणा ओरडला."मी येतोय! मी येतोय!"
'वेडेपणा'न सर्वांना शोधायला सुरुवात करताच आधी लगेच त्याच्या पायाशीच त्याला 'आळशीपणा' सापडला. कारण स्वताला लपवण्याएवढा उत्साह आणि शक्ती त्याच्यात नव्हती. नंतर त्याला चंद्रकोरीवरची 'कोमलता' दिसली. तळ्याच्या तळातून त्याने 'खोटेपणा'ला शोधले. पृथ्वीच्या मध्यभागातून 'वासना' शोधून काढली. एका पाठोपाठ एक सगळे शोधले, पण त्याला एकाचा शोध लागेना. त्या एकाला शोधता येईना म्हणून 'वेडेपणा' निराश झाला. तेवढ्यात 'मत्सरा'ने, त्याला शोधता येत नाही या मत्सराने ग्रस्त होऊन त्या 'वेडेपणा'ला म्हटले, "अरे, तुला 'प्रेम' सापडत नाहीये. ते त्या गुलाबाच्या झुडुपामागे लपलंय". 'वेडेपणा'ने एक लाकडाचा धारदार ढलपा घेतला आणि गुलाबाच्या झुडुपात तो भोसकला. एकदा..... दोनदा.... अनेकदा. शेवटी एक हृदयद्रावक किंकाळी ऐकू आली तेव्हा तो थांबला. त्या किंकाळीनंतर आपल्या चेहऱ्यावर हाथ झाकीत 'प्रेम' बाहेर आलं. त्याच्या बोटांच्याफटीतून रक्त ओघळत होतं. प्रेमाला शोधण्याच्या अधिर्तेमुळे 'वेडेपणा'ने त्या लाकडी ढलप्यान प्रेमाच्या डोळ्यांवर वार केले होते. वेडेपणा आक्रोश करू लागला, "अरेरे! मी हे काय केलं? काय केलं मी? मी तुला आंधळा करून टाकलं. आता मी याची भरपाई कशी करू? तुझे डोळे आता पूर्वीसारखे कसे करू?
प्रेम म्हणाले, "तू काही माझे डोळे परत देऊ शकणार नाहीस. पण तुला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तू माझा मार्गदर्शक हो. मला रस्ता दाखव."
तेव्हापासूनप्रेम आंधळ झालं आणि वेडेपणात्याचा नेहमीचा सोबती झाला.

भेटण्यासाठी मज

भेटण्यासाठी मज आर्जवे करीशी काही करता आढेवेढे घेशी ,
जातो मी रागाने म्हणता हात धरून घट्ट पकडसी ..!!
अजब तुझी हि रीत प्रेमाची तहान लाऊन पाणी लपविण्याची ,
मनीचे सर्व गुपित ठेवण्याची अन " प्रेम आहे का तुझे ? "
मज विचारण्याची ..?
प्रेम करतो मी मनापासून तुज जपीन मी जीवापासून ,
वचन देता मी डोळे पाणावून बोलू न देसी ओठ चुंबून ..

वेड मन माझ वेड्यासारखा धावत.

वेड मन माझ वेड्यासारखा धावत...
वेडावून काहीतरी वेड्यासारखं बोलत....
म्हणायचं असत काही तरी...भलताच काही म्हणत.....
नाही व्हायचं काही...काहीतरीच होऊन बसत....
अस वेड मन माझ..वेड्या परी वागत....
कधी कळणार त्याला कस वागायचं...
कोण आहे परके अन कोणाला आपल मानायचं...
अस वेड मन माझ...वेड्यासारखा पाहत.....
जवळ आपल्या कोण...अन कसे त्यांचे स्वभाव...
कुणाच्या मनात काय ....काय त्यांच्या डोक्यात...
अस वेड मन माझ...पाखरासारख उडत...
दूर गगनात उच्च भरारी मारायला बघत...
लांब त्या आकाशाला भेदायचं बघतो....
अस वेड मन माझ...कधी समजणार....
कुणाची इच्छा नसताना....का त्याच्याशी बोलणार...
का त्याला हसवणार...का म्हणून त्याला आपल मानणार....
अस हे वेड मन माझ...माझ्याच सारखा वेडा आहे....
मी हि डोक्यान कमी...हे हि तेवढाच खर आहे....

सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

क्षण काही कटत नाही...


क्षण काही कटत नाही.......
वेळ काही निघत नाही........
आठवण तुझी येताना .........
अश्रू मात्र थांबत नाही........
दूर का जातेस तू.....
जवळ माझ्या रहात नाही.......
गेलीस तरी तू ....
आठवण मात्र माझी करत नाही......
किती त्रास देते ग तू.......
किती वाट बघायची तुझी......
वाट बघून थकतात डोळे.....
पण तू काही येत नाही......
होईल कधी असे....
मीच दूर जाईल जेव्हा.....
मग शोधशील मला तू.......
जेव्हा मी या दुनियेतच
रहाणार नाही.....

अजूनही आठवतंय मला

अजूनही आठवतंय मला
तुझं माझ्यासाठी व्याकुळ होणं
मी भेटताच मला असं
डोळे भरून पाहणं.
अजूनही आठवतंय मला
तुला पाहता पाहता माझे डोळे भरून येणे.
अन् मग न कळत तुझा हात
माझ्या डोळ्यांपर्यंत जाणे.
का बसेना तुला
माझ्या प्रेमावर विश्वास
तुझ्या प्रेमापाठी
नाही मजला कसलाही ध्यास.
न जानवले कधी मला
तुझ्या मनात काय ते?
या जन्मी नाही तर,
पुढच्या सर्व जन्मी तुझाच होऊन राहीन. .....

रविवार, १८ सप्टेंबर, २०११

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!
ती मुलगी होती की जादू , हेच नाही कधी कळले
नजरेतून सुटलेले तीर तिच्या , हृदय माझे चिरत गेले
एकांतातील तिचं बोलण , जेव्हा कानांमध्ये गुंजत
दिवस-रात्रीचा माझ्या चैनच हिरावून नेत
कधी तिचं हसण , कधी लटक रागावण
कधी लाजून तिचं माझ्या मिठीत सामावण
आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!
होत कधी असंही , जेव्हा आठवण तिची येते
नजरेतील भाव तिच्या , डोळ्यात माझ्या साठवून जाते
आठवणीने तिच्या , मनाला वेदना अशा होतात
शरीरातून जणू प्राणच माझे घेऊन जातात
आपल्याच धुंदीत चालण , अचानक घाबरून थांबण
कधी फुलांची माला बनून , गळ्यात माझ्या पडण
आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!
<">
कधीतरी मला तीच रडवेल , स्वप्नातही नव्हत वाटलेलं
दु:खावर माझ्या हसताना , आभाळ होत फाटलेल
हृदय जिला मी अर्पण केलं , दगडाचं तिचं काळीज असेल

देवदूत समजलो ज्याला , तोच माझा खुनी असेल
तिचं ते रुसण , मी तिला समजावण
निघुनी गेला तो जमाना , होऊनी एकाच क्षण

चेहरा

चेहरा

मानसाची ओळख सान्गतो चेहरा,
चेहर्याच्या शोधात ही असतो चेहरा,
चेहरा सान्गतो भाव मानसाचे,
हाव भावाची ओळख चेहरा ।

एक चेहरा, एक माणुस,
एक कहानी प्रत्येक चेहर्याची,
कधी चेहरा काही तरी सान्गतो,
कधी चेहरा वाचता ही येतो ।

चेहरा हसतो , रडतो ही चेहरा,
प्रत्येकाच्या भावना सान्गतो चेहरा,
चेहरा असतो व्यक्तीमत्वाचा नमुना,
प्रत्येक चेहर्यामागे अस्तित्वाच्या खुणा.....