Breking News

मंगळवार, २९ मार्च, २०१६

“होळी म्हणजेस आदिवासी आणि आदिवासी म्हणजेस होळी”

“ओली आवे बारा मोयना ओली या,
ओली आवे खोकलू वोलती ओली या…!”
 अशी होळीविषयी बोलीगीते सातपुड्यातल्या गावपाड्यात गायली जाऊ लागली आहेत. होळी म्हणताच आबाल-वृद्धापासुन ते पोरा-सोरापर्यत सर्व आपापल्या परिने होळीमातेची आराधना करण्यास सज्ज होतात. आदिवासींनी निसर्ग संस्कृतीची समरस होऊन साजरा केलेला होळी हा सण त्यांच्या सांस्कृतिक, पारंपारिक जीवनमुल्याची असलेली नाळ घट्ट करणारा अफलातून असाच सण आहे. होळी हा फक्त 1-2 दिवसाचा उत्सव नसून संबंध सातपुड्यात महिनाभर चालणारा महोत्सव आहे. यात आदिवासींचे निसर्ग संस्कृतीची असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपारिक वाद्ये अशा अनेक आदिवासीच्या
वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दुःखे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतो. आणि यातूनच अवघ्या विश्वाला साद घालणारी आदिवासी संस्कृती प्रत्ययास येते, सर्वाना एकञित करुन समुहजीवनाचे धडे देते. यावेळी “होळी म्हणजेस आदिवासी आणि आदिवासी म्हणजेस होळी” हे समीकरण बनते, आणि आदिम अस्तीत्व-प्रतीकांची जीवंत अनुभूती घेता येते…! (दांड) माघ अमावस्येला निघलेल्या नव्या को-या चंद्रदेवतेला (नोवू) नमन करुन होळी उत्सवाची सुरवात होते. येथूनच पथ्याची (पालनी) सुरवात होते. नेराय, गोवाण* आणि इतर गोष्टीसाठी पालनी होत असताना जो कोणी मोरखी, बावा तथा ढाणका डोकोअ होईल तो मांसाहार वर्ज्य करतो. स्ञियांना स्पर्श न करणे, खाट-खुर्चीवर न बसणे, स्वतंञ ( अलिप्त ) राहून कमी साधने वापरणे, चपला न घालणे अशी अनेक पथ्ये पाळली जातात. पालनीचा कालावधी पाच-सात-नऊ दिवसाप्रमाणे कमी अधिक असतो. यात पथ्ये पाळताना कचुराई केलो तर होळीचा कोप होतो म्हणतात. आणि या दिवसापासूनच मोरखी, बावे होण्यासाठी जी सामानाची जुळवा-जुळव करावी लागते. त्याची शोधाशोध, साफ-सफाई व जमवा- जमव सुरू होते. गावात होळीचा माहोल तयार होतो. साधारण सप्टेंबर महिन्यापासुन सातपुड्यातील आदिवासींची रोजगार शोधण्यासाठी स्थलांतर होण्यास सुरवात होते. पावसाच्या बेभरोसे शेतीवर आदिवासींच भागत नाही आणि स्थानिक
पातळीवर रोजगार नाही म्हणून आदिवासींची गाव-कुंटूबे ओस पडतात. म्हातारी-वृद्ध मंडळी व लहान पोरं-बाळं तेवढी घर, गाई-गुरांच्या देखभालीसाठी असतात. सातपुड्यातली गावं फेब्रुवारीपर्यत तरी अशीच भकास, उदास व सुनी-सुनी वाटतात. जशी वसंताची चैञपालवी नव्या सुरवातीची चाहूल घेऊन येते तशी होळी आदिवासीत नवचैतन्य घेऊन येते. उत्साह उधळायला, मनसोक्त नाचाया- गायला लावते. खरतर होळी आदिवासींच्या दु:खावर पांघरुण घालते. दुःख विसरुन आनंदाचा शोध घ्यायला लावते. नवनिर्मितीची प्रेरणा देते. दुःख-गरिबीतही आनंदाने नाचता येते. होळी अशीच सहजपणे सर्वाना सामावून घेते. नवीन उत्साह व उभारी देते. यावेळी सातपुड्यातल्या आश्रमशाळा, शाळा ओस पडतात.
वसतीगृहात राहून शिकणारी आदिवासी पोरं गावाकडे परतण्यास आतुर होतात. न चुकता सर्वाची पावले होळीवर थिरकण्यासाठी गावाकडे परतात. गावं कशी पुन्हा एकदा ढोलच्या तालावर एकञ येत नाचू लागतात. एकमेकांशी एकरुप होऊन होळीची तयारी केली जाते. होळी नाचली गायली जाते. नोवू दिसल्यानंतर आदिवासी गाव-पाड्यावर ढोल- ढोलगीच्या तालात युवक-युवतीचा नाच रंगतो. ही गावातील पोरं-पोरी, लहान मुलं याची होळी असते जी गावातील काही मुलं जंगलात जाऊन बांबू उखळून आणतात. आंब्या-जांभूळाची पाने असलेल्या फांदी बांबूला बांधून पेहराव, सजावट केली जाते. बरोबर बाअडी, सानक्ये, साणी* बांधून सोबत ‘ओली डोहू’ आणला जातो. गावाच्या मध्यभागी ‘ओली दोअ’ त्यात लाकडाच्या साहाय्याने होळी उभी करुन ठेवतात.
मग ‘ढोल’वर थाप पडते, फेर धरला जातो, तालाला-ताल मिळतो आणि सहज सुंदर नृत्य रंगते. मुलीं होळीची बोलीगीते गातात आणि युवक आनंद व्यक्त करताना आदिवासी सुरात लय पकडतात. हा ‘गोटूल’चाच एक प्रकार. युवक-युवतीवर वेळेचे निर्बंध नसते. आणि गावातील सर्व मंडळी अर्ध्या राञीपर्यत होळी मध्यभागी करुन नाच-नाचतात. यावेळी गायली जाणारी होळी विषयक गीते निसर्गाची आदिवासींच असलेलं नातं स्पष्ट करतात. हे पुरातन काळापासुन आजपर्यत न चुकता चालत आलेलं आहे. चालत राहिल. होळी निमित्त सर्व गावकरी एकञ येतात. सामानाची जुळवा-जुळव करताना आपसूकच अडी-अडचणीवर चर्चा होते. मुख्य होळीच्या वेळी होणा-या कार्यक्रमाची ही रंगीत तालीम असते. ढोल चढवणे, चामडी बदलणे, नाडू गोवणे अशी कामं करुन ढोल तयार होतो.
ढोलगी, खाट, मांदल, धा-या-तलवारी, हुप, मोरखी पिसे, टोपा, काहटे, डोवे, उंबराची माळ, दान-दागिने, इत्यादीची तयारी होते. काही वस्तू जंगलेत, काही गावात तर काही बाजारातून आणल्या जातात. होळी येईपर्यत मोहाची दारु गाळून तयार केली जाते. आजू-बाजूच्या गावपाड्यात होळीसाठी खोबर (निमंञण) धाडली जाते. मग गावकरी विशिष्ट दिवस ठरवतात व त्याप्रमाणे एक-एक करुन संबंध परिसरात ऐकमेकांत मिळून-मिसळून होळीचा आनंद घेतला जातो.प्रत्येकाची कामे स्वतंञ असली तरी सहकार्याशिवाय होळी होत नसते.  यामुळे गावक-
याची मने जुळतात. गावात एकोपा नांदतो. होळीच्या आवश्यक पुर्वतयारीनंतर खरा रंग येतो तो देवहोळी पेटविल्यानंतर. दाब (ता. अक्कलकुवा) येथे होणारी देवहोळी संपूर्ण सातपुड्यातल्या उत्सवाची नांदी असते. या होळीसाठी सातपुड्यातल्या सर्व भागातून डाया लोक उपस्थित राहून संबंध पहाडास होळी उत्सव शांततेत पार पाडण्याचा संदेश देतात. ह सातपुड्याच्या ह्या होळीचा ढोल-ताशांचा गजर पूर्ण पहाडात दूमदूमत राहतो. मग एक-एक करुन मोलगी-धडगाव परिसरातील गावहोळीचा ‘सीजन’ सुरु होतो. काही ठिकाणी गावहोळीपूर्वी भोग-या बाजार ( होळीच्या तयारीसाठी आवश्यक सामान खरेदी) भरतो.
हाच काही ठिकाणी ‘मेलादा’ म्हणूनही ओळखला जातो. गावहोळीच्या दिवशी सायंकाळी मोरखी, बावा यांची पारंपारिक वेशभूषा त्यांच्या ठरलेल्या बडव्याकडून सर्व सामान ( काहटे, मोरपिसे, दान-दागिने, ढोलगी, टोपा, माळा, तलवारी-धा-या इ.) पूजा करुन परिधान केले जाते. मोरखी, बावा शरीर राखानेही ढिबून घेतात. हातात धा-या तलवारी, डोक्यावर मोरपिसे-टोपा चढवून गळ्यात ढोलगी, कमरेला काहटे-डोवे असा वेशधारी आदिमांचा ताफा वाजत-गाजत, नाचत-गात बाहेर पडतो. राञभर जो तो आपापल्या धुंदीत होळीमातेची आराधना करतो. राञीची झिंग चढल्यावर सकाळ कशी होते तेही कळत नाही. सातपुड्यातली प्रत्येक गावहोळी विषेश असतेच. पण परिसरातील सर्व लोकांच्या मनात घर केलेली होळी म्हणजे काठी येथील राजवाडी होळी व मोलगीची प्रसिद्ध होळी.! येथे साजरी होणा-या होळीच वर्णन करणंच अशक्य. किमान 200-300 ढोल, मोरखी-बावा यांची 15-20 हजाराची तुफान गर्दी आणि साथीत बेधूंद होऊन नाचणारी लाखभर लोकं! यात नियोजित असा कोणताच भाग नसतो. आपापल्या परिने सर्व होळीला येत असतात. मिरवायला धा-या-तलवारी असतात,
असतात गावक-याचे तांडे (मेलू). स्ञियांची संख्याही तेवढीच जास्त, मग राञभर होणारी होळीगीते व आदिम नृत्य. राञीच्या अंधार-उजेळात येथे ना कधी स्ञियांची छेडखानी होते ना कोणतीही हाणामारी. सर्व कसे एकमेकंत मिळून- मिसळून जातात. समतापर्व गाणारी ही होळी राञभर स्ञि-पुरुष एकञ येऊन साजरी करतात. येथे ना दुजाभाव असतो, ना लहान-मोठेपणाचा दर्प. सर्वाना आनंद घेण्याची स्वतंञ मूभा! होळीत गायली जाणारी बोलीगीते आदिम मौखिक साहित्याचा ठेवा आहे. पण त्याचबरोबर ‘मामाच्या पोरी’ व इतर गोष्टीवर पुरुष मंडळीनी योजलेली गीते अफलातूनच! होळी ही म्हणून बघण्याची गोष्ट नाही. होळी फेर धरुन सहभागास प्रवृत्त करते, राञभरचा उत्साह देते.होळीची राञ कशी सरते हे होळीत सहभागी झालो की कळतच नाही. दांडला दंडवत करता-करता राञी तीनच्या सुमारास होळीला पेरविण्यास सुरवात होते. राञभर होळीत येणारा प्रत्येक मोरखी, बावा न चुकता ‘ओली दोअ’ मधील माती बाजूला सारतो. आणलेली लाकडे लावून होळी उभी करतो. प्रांतः सकाळी पाचच्या सुमारास होळी पेटवतात तो खरा उत्कटतेचा क्षण असतो. होळी पेटवल्यानंतर पूर्वेकडे खाली पडली तर वर्ष सुख-समाधानाने जाते म्हणतात पण दुस-या दिशेला पडली तर वर्षभरात विघ्नं येतात म्हणतात. पेटवलेल्या होळीच्या जळत्या आगीतून मोरखी-बावा राख उचलतात. ती माथ्यावर अभिमानाने वंदन करतात. मग होळीवरुन परतण्यास सुरवात होते. सकाळी पायवाटेला धपाधप पावले टाकीत परतणारी लोकं पाहताना, त्यांच्या चेह-यावरील समाधानाचं तेज न्याहाळताना
मन ‘आदिवासी’च होऊन जाते. होळी झाली की सुरवात होते ती मेलादा (भोंग-या ) पर्वाची. मेलादा हे आदिवासी युवक-युवतीच्या आकर्षणाचे असते. मेलादात ‘फाग मागण्याची व मेलादा पूजण्याची प्रथा खूप जुनी आहे. यात पारंपारिक वेशभूषा, वाद्ये तथा आदिवासीच्या ताकतीचे सुरेख प्रदर्शन केले जाते. नृत्याशिवाय तर मेलादा होऊच शकत नाही. मेलादा नृत्यात सहभागी होण्याची मजा काही औरच असते. मोलगी व जामली ( ता. अ.कुवा ) येथील प्रचंड गर्दीचे मेलादा बाजार डोळ्याची पारणे फेडतात. सर्वात शेवटचे मेलादा बाजार धनाजे व बुगवाडे ( ता. धडगाव ) येथे संपन्न होतात. यानंतर गावातील मोरखी मंडळीची गावाच्या प्रत्येक घरो-घरी फेरी निघते. कुंटूब-प्रमुख अत्यंत तन्मयतेने त्यांची सेवा करतो. अंगणात होळीचे नृत्य म्हणजे होळीमातेचे चरण घराला स्पर्श झाले असे समजले जाते. मग सर्व गावकरी मिळून गावाच्या नदी-नाल्यावर जाऊन पालनी सोडतात. होळी तशी काहीही असो, दरवर्षी उत्साहात साजरी होते. या वर्षीची होळीही अशीच खास असते. मी तर महिना भरापासून होळीची वाट पाहतच आहे. मिञमंडळी बरोबर आम्ही जाऊन नाचणार. गाणार. मज्जाच मजा. तसं होळीला जाताना कोणतीही खुण-गाठ बांधून जायचे नसते. पण तेथे जाऊन कोणीही खाली हात परतत नाही हा इतिहास आहे. होळी माणसाला माणुस बनवते, निसर्गाच्या सानिध्यात घेऊन. आदिवासीत्व शिकवते तेही प्रेम, सहकार्य, सेवा, पाहूणचार असं सर्वच देते, मायेच्या आशिर्वादासह.! आणि वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा व उत्साह देते. तोच होळीचा ठेवा असतो.

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

सातपुड्यातील होळीला विदेशी पर्यटकांची हजेरी

तळोदा तालुक्यात व सातपुड्याचा पर्वत रांगा व पायथ्यालगत असलेल्या गांव पाडयात आज होलीकाउत्सव साजरा करण्यात आला. ढोल बिरीच्या सुरात आणि घुंगरुचा नाद सातपुड्यातील गांवपाड्यांवर पारंपारिक गेर आणि बावा बुध्या पारंपारिक नृत्य पांच दिवस रंगणार असल्याने या उत्सवामुळे चैत्यनाचे वातावरण असते.
                              तळोदा तालुक्यासह सातपुड्यातील पर्वत रांगा व पायथ्यालगत असलेल्या गांव पाड़यांवर होलिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो विविध ठिकाणी भोंग-या बाजाराचे आयोजन करण्यात येते. बोरद येथे  मंगळवारी भोंग-या बाजारात विविध वस्तु खरेदी विक्री तुन सुमारे दहा लाखांचे उलाढाल झाली सातपुडा पर्वत रांगाव गांवागांवात गेर नृत्याची धूम असते ढोल, तुतड्या, ढोलकी, पिरवे अशा पारंपारिक वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधवांच्या उत्साह डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो......
*रोझवा पुनर्वसन या वसाहतीत होळी लोकमहोत्सव-                                                  तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन या वसाहतीत भारत सरकारच्या नंदुरबार येथील नेहरू युवा केंद्र व लोकसमन्वय प्रतिष्ठान तळोदा यांच्या विद्यमाने आदिवासी होळी लोकमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले.  दि 22 रोजी रात्रि आदिवासी होळी लोकमहोत्सवाचे उद्घाटन डफडी वाजून करण्यात आले मान्यवर आदिवासी विकास प्रकल्पधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अतुल निकम, लोकसंघर्ष मोर्चाचे नेत्या प्रतिभा शिंदे, तळोदा समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ए.टी. वाघ, पत्रकार रमाकांत पाटील अदि उपस्थित होते.
          * डोमखेडीची राजवाडी होळी शोभानगर(वडछील पुनर्वसन) वसाहत येथे -डोमखेड़ी,निमगव्हाण ही नर्मदा काठावरची गांव बुडीत क्षेत्रात गेल्याने पूनर्वसनासाठी आलेली प्रकल्पबाधित आपली संस्कृती सोबत घेऊन आली होळीमातेचा "होलीकोत्सव" त्याच परंपरेने साजरा करण्याची गती खंडीत होऊ न देता अधिक तड़फदार पणे, दिमाखदारपणे, शिस्तीने, सांस्कृतिक परंपरेचे  वहन करत जतन करत, ईडापीड़ा टळो, समाजात खुशहाली नांदो यास्तव रात्र भर खुर्ची, ढोल, गळ्यातले ढोल, बाबा बुध्या, गेर आदि विविधनृत्य प्रकाराने होळीमातेला अभिवादन करत , आराधना करत रात्र कधी निघुन जाते हे कळतच नाही. या वर्षी धड़गाव, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, खेतिया, पानसमेल परीसरातून शेकडो संघांनी उपस्थिति लावली होती. अनेक अधिकारी पदाधिकारी, नेते मंडळींनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. दिनांक 23 मार्च रोजी रात्रि 10 वाजे नंतर महोत्सवाला सुरवात झाली तर दिनांक 24 च्या पहाटे 5.30 वाजता समारोप झाला
        * जीवननगर(गोपाळपुर) पुनर्वसन वसाहतीत होळी-
तळोदा तालुक्यातील जीवननगर (गोपाळपुर) या पुनर्वसन क्र सहा वसाहतीत परंपरेनुसार होना-या होलीकोत्सवा निमित्त दि 23 मार्च रोजी रात्रभर ढोल वादन व गेर नृत्य स्पर्धा सह ढोल, बावा, बुदया गे-या विविध कार्यक्रम झाला.
     सातपुड्याच्या पर्वत रांगात वसलेल्या आदिवासी गांव आदिवासी समाजातील अनोखे गीत, रात्र भर चालणारा होळी नृत्य  या सर्व होलिका उत्सवात आदिवासी समाज रचना एवम् संस्कृतिचे दर्शन घडविनारा कार्यक्रम मुळ गांव डोमखेड़ी, निमगव्हाण, सुरुंग, सेलदा भरड,  या गांवातून स्थलांतरित झालेल्या दिडशे कुटुंब जीवननगर (गोपाळपुर) पुनर्वसन क्रमाक सहा या वसाहतीत जुन्या रितिरिवाजा प्रमाणे होलिका उत्सव साजरा करण्यात येत आहे. या वेळी पारंपरिक वेश भूषा परिधान करून , ढोल, बीरी, बासरी  मांदल , ढोलक वाद्याच्या गजरात आणि घुंगुरूंचा निदानात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे  दि 23 मार्च रोजी रात्रि 8 वाजता होलिकाउत्सव प्रारंभ दि 24 ला पहाटे सहा वाजता होळी पेटविन्यात आली रात्रभर बावा-बुदया व घेर नृत्य स्पर्धा पार पडली  दोन्ही नृत्य स्पर्धांना प्रत्येकी प्रथम क्रमांक 3333, द्वितीय क्रमांक 2222, तृतीय क्रमांक 1111 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुने म्हणून नर्मदा बचाव अंदोलनाच्या मेधाताई पाठकर , कार्यकर्त्या  लतिकाताई राजपूत, विजय वळवी अदि उपस्थित होते.



मंगळवार, १५ मार्च, २०१६

स्व.विद्यादेवी बारगळ यांचे निधन

महिला सबलीकरण पर्यावरण बचावच्या खंद्या पुरस्कर्त्या सा. कार्यकर्त्या स्व.विद्यादेवी बारगळ यांचे निधन..
 तलोदा येथील संस्थानिक बारगळ जहागीरदारांच्या स्नुषा तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत अमरजितराजे शिवाजीराव बारगळ जहागिरदार यांच्या सुविद्य पत्नी तसेच तळोदयाच्या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीच्या जनक, अनेक आंदोलनांच्या पाठिराख्या असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर राज्य पुरस्कार प्राप्त, पुरोगामी समाजसेविका स्व विद्यादेवी अमरजीतराजे बारगळ यांचे वयाच्या 63 व्या वर्षी अल्पश्या आजाराने निधन झाले. त्यांच्या वर पुणे येथील मुक्ति धाम स्मशान भूमित आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जेष्ठ लेखक एकांकीकाकार मार्तंड जोशी लोकसंघर्षच्या नेत्या प्रतिभा शिंदे देवमोगरा विद्याप्रसारक मंडल चे सचिव प्रा. के. एल. जाधव पुणे येथील नगरसेविका आशा शेडगे धनगर समाजाचे नेते मुकुंद कचेकर वाळमुले, माजी नगरसेवक शेख अकबर शेख हिदायत, भारत मुक्ति मोर्चाचे डॉ देविदास शेंडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश माळी ई सह धनगर समाजाचे असंख्य कार्यकर्ते व् बारगळ परिवाराचे सदस्य उपस्थित होते. जळगांव येथील प्रतिष्ठित देशमुख घराण्याची कन्या असलेल्या विद्यादेवी 14 फेब्रु 1977 रोजी वैलेंटाइन डे च्या दिवशी तळोदा संस्थाच्या गादिचे जाहागिरदार श्रीमंन्त अमरजीतराजे बारगळ यांच्याशी प्रेम विवाह करून जहागिरदारांच्या सुन होवून ताळोद्यात आल्या. पुरोगामी व आधुनिक विचारसरणीच्या विद्यादेवी ताळोद्यात आल्या त्याकाळी महिलाशिक्षणा बद्दलची अनास्था, कमी वयात होणारे विवाह, बालकांचे कुपोषण ,अंधश्रदधा, यातून होणारे महिलांचे शोषण हे सर्व पाहून त्यांनी
महिला मुली व् बालाकांसाठी समाज कार्य करण्यास सुरुवात केली. सर्व प्रथम त्यांनी अशिक्षित महिला व् मुलीसाठी प्रौढ़ शिक्षण वर्ग स्वतच सुरु करून त्यांना शिक्षित करण्यास सुरुवात केली. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तळोद्यात पाहिले ब्यूटी पार्लर उघडून त्याचे प्रशिक्षण दिले। महिलांवर चार भिंतीआड होणारे अत्याचार दूर करून् त्यांचे मोडनारे संसार उभे करण्यासाठी त्यांनी त्या वेळच्या धुले व नंतर नंदुरबार जिल्हा महिला दक्षता समिती व् कायदे विषयक सल्लागार समिति वर अनेक वर्ष सदस्य म्हणून काम केले. 1985 ला युवक बिरादरी ची स्थापना करून संचालिका म्हणून सुदृढ़ बालक स्पर्धा द्वारे कुपोषणा वर तर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित त्याद्वारे तळोद्यातील अनेक कलाकार पुढे आणून खान्देश गौरवची ढाल जिंकुन तळोद्यात आणली युवक बिरादरीच्या माध्यमातून युवकांना समाजसेवा शिकवली..
या त्यांच्या सर्वच क्षेत्रातील कामाचा गौरव म्हणून नवनिर्मित नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सन 98- 99 चा अहिल्याबाई होळकर राज्यस्तरीय पुरस्कार देवून शासनाने त्यांचा सन्मान केला सरदार सरोवर बाधिताच्या पुनर्वसनासाठी सातपुड्यातील जंगल तोडून वसाहती बसविन्यासाठी त्या वेळी शासनाने निर्णय घेतला त्याला विरोध करून जंगल वाचविन्यासाठी त्यांनी वसुंधरा बचाव मोहिम सुरु केली. त्या सोबत मेधा पाटकरानी नर्मदा बचाओ आंदोलन उभे केले. त्यात प्रतिभा शिंदे सहभागी झाल्या त्यांनी सुध्दा नंतर लोकसंघर्ष मोर्चा द्वारे हा संघर्ष सुरूच ठेवला असून ह्या सर्व चळवळीच्या केंद्रबिंदु सुरुवात आश्रय ताळोद्याच्या बारगळ गढ़ी राहिली आहे. त्या नगरसेविका असताना स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात त्यांनी तळोद्यातील ऐतिहासिक गिल्डर चौक येथील ध्वज खांब व चौथ्यार्यावरील अतिक्रमन काढण्यासाठी 500 महिलांचा मशाल मोर्चा काढून आंदोलन केले. त्यात उच्च न्यायालयाने ही जागा खाली करण्याचे आदेश दिल्यावर सुध्दा आजतागायत तलोदा पालिकेने ह्या ऐतिहासिक चौकातील अतिक्रमण काढले नाही. याची खंत्त त्याना मरेपर्यंत होती. त्यांच्या या सर्व कार्यात त्यांना त्यांचे पती श्रीमंत अमरजीत राजे बारगळ तिन्ही मुली श्वेता बारगळ चौधरी, सोनिया संदाशिव व टीना बारगळ यांची त्यांना मोलाची साथ लाभाली. असे हे तळोद्यातील लाभलेले महिला रत्न आज नियतीने हिरावून घेतले आहे.

विद्यादेवी ह्या अंधश्रद्धेच्या विरोधात नेहमी महिलांमध्ये जनजागृती करून अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करीत या त्यांच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून त्यांच्या मृत्यु नंतर कोणतेही पारंपारिक धार्मिक विधि करू नयेत असा पुरोगामी धाडसी निर्णय त्यांचे पति व तिन्ही मुलींनी घेतला आहे. त्या ऐवजी तळोदयात फक्त एक सर्व धर्मीय प्रार्थना सभा आयोजित करून त्यांना खरी श्रध्द्दांजली अर्पण केली जाणार आहे... 

 Post by उल्हास मगरे

शुक्रवार, ११ मार्च, २०१६

अहो आश्चर्यम.......मकाच्या एका ताट्याला चार कणसं!

कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ तर कधी गारपीट या निसर्गाकडून वारंवार होणाऱ्या अवकृपेने शेतकरी त्रस्त झाला आहे. मात्र याच निसर्गाची जेव्हा कृपा होते तेव्हा बळीराजा निश्चितच हरखून जातो. असेच एक उदाहरण तळोदा तालुक्यातील रांझणी येथे पाहायला मिळत आहे. निसर्गाची करणी नारळात पाणी असे आपण नेहमी म्हणतो. तर रांझणी शिवारात एका शेतकऱ्यांच्या शेतात मकईच्या एका तोट्याला चक्क चार कणसे लागल्याने ते पाहायला संपूर्ण परिसरातील शेतकरी यांच्यासह कृषी विभागातील अधिकाऱ्याची पावले शेताकडे वळू लागली आहेत. हा निसर्गाच्या चमत्कारच असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे.... तळोदा तालुक्यातील रांझणी येथील प्रगतशील शेतकरी तुंबा गोविंद मराठे यांनी रांझणी शिवारातील आपल्या चार एकर क्षेत्रात डिसेंबर महिन्यात मका लागवड केली आहे. जोमाने पीक वाढू लागला आणि कणसं फुटण्याच्या अवस्थेत आलं. हळूहळू कणसं फुटू लागली आणि काय चमत्कार, शेतातील बहुसंख्य ताटयांवर एक नव्हे तर चक्क चार-चार कणसं लागलेली आहेत. मकाच्या ताटयाच्या मध्यभागी कणसं तर शेडयांवर तुरा असतो. या मक्याच्या तुऱ्यातुन काही ज्वारी व दादर सदृष्य दाण्याची कणसं बाहेर आली आहेत. आजपर्यंत शिवारात कुणाच्याही शेतात एकाच ताटयावर चार-चार कणीस लागल्याचे उदाहरण नाही. प्रथमच अश्याप्रकारे कणसं दृष्टीस पडत असल्यामुळे शिवारातील बहुसंख्य शेतकऱ्यानी ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे निसर्गाचा हा चमत्कार नेमका कसा झाला हे जाणून घेण्याची देखील अनेकांना उत्सुकता आहे.


रविवार, ६ मार्च, २०१६

हा मीच

लोग कहते है हम मुस्कुराते बहुत है, और हम थक गए दर्द छुपाते छुपाते..
तुम दूर..बहुत दूर हो मुझसे.. ये तो जानता हूँ मैं…
पर तुमसे करीब मेरे कोई नही है.. बस ये बात तुम याद रखना… 
 
सुना था.. मोहब्बत मिलती है, मोहब्बत के बदले |
हमारी बारी आई तो, रिवाज हि बदल गया |
तुझको लेकर मेरा ‪ख्याल‬ नहीं ‪बदलेगा‬..
‪साल‬ बदलेगा, मगर ‪दिल‬ का ‪हाल‬ नहीं बदलेगा|
तुझ से रूठने का हक है मुझ को..
पर मुझ से तुम रूठो यह अच्छा नहीं लगता|
मै नासमझ ही सहीं मगर वो तारा हूं..
जो तेरी एक ख्वाहिश के लिये..सौ बार टूट जाऊं|
मै नासमझ ही सहीं मगर वो तारा हूं..
जो तेरी एक ख्वाहिश के लिये..सौ बार टूट जाऊं|
  
तेरा नजरिया मेरे नजरिये से अलग था…
शायद तूने वक्त गुजारना था और हमे जिन्दगी
  
तेरी यादो को पसन्द आ गई है मेरी आँखों की नमी,
हँसना भी चाहूँ तो रूला देती है तेरी कमी…!!
 
कभी टूटा नहीं दिल से तेरी याद का रिश्ता,
गुफ्तगू हो न हो ख्याल तेरा ही रहता है..
  
एक तु मिल जाती तो किसी का कया चला जाता..
तुझे उमर भर के लिए खुशीयाँ ही खुशीयाँ और मुझको मेरा खुदा मिल जाता|
 
सुना था.. मोहब्बत मिलती है, मोहब्बत के बदले |
हमारी बारी आई तो, रिवाज हि बदल गया |