Breking News

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१२

एक ग्लास पाणी

एक ग्लास पाणी एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती.
मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते.
 मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव.
आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती.
मुलगाही आईला कामात मदत करत असे.
 काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई.
एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती.
 तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला.
बरेच दिवस झाले तरी आईच...ा ताप उतरेना. खांण बंद झालं.
ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत.
आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे.
तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे.
एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली.
'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस' लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला.
पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली.
गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली.
गार वार्याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली.
तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता.
आई म्हणाली 'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ?
वेडया अरे मला उठवायचे नाही कां ? लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला,
'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'.! ...................................

मंगळवार, २४ जुलै, २०१२

धुंवाधार पाऊस....


तू गेल्यापासून आपल्या अंगणात...
पहिल्यासारखा मुसळधार ..
पाऊस नाही ग कोसळत ..!


कारण ..
... त्याला हि समजलेय कि ..
तू नाहीयेस आता या घरात ..
पाहिलं कसं तू घरात ..
यायच्या अगोदर ..


तो धुंवाधार कोसळायचा ..
आणि
तुला चिंब चिंब भिजवायचा ..


अगदी मनसोक्त ....!
आता तो येतो फक्त ..
काळेभोर ढग आणि ..
विजांचा कडकडाट घेऊन ..
अगदी रागावून ..


बहुतेक ..तुलाच हाक मारत असावा ..!
माझ्यासारखाच त्यालाही ....
तुझा विरह सहन होत नाही म्हणून ..!


कदाचित ..माझ्या इतकंच तुझ्यावर
त्या पावसाचं देखील प्रेम होतं...
हे आजकाल मला प्रत्येक ..
पावसाळ्यात पटायला लागलंय ..


मी कोण?


                                                                           मी कोण?

मी एक थेंब...
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा..
आयुष्याच्या पानावर विसावणारा...
काही क्षण विसावून ओघळून जाणारा....
दुसर्‍या थेंबाशी एकरूप होणारा...


कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमणारा..
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्‍यान्ना आनंद देणारा...
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा.


पुन्हा तोच पाउस


पुन्हा तोच पाउस कालचा
पण आज नव्याने आलेला,
कालही तोच होता
पण आज परका झालेला,
काल होता आपलासा वाटणारा
...भीजउन गेला तरी सुखाऊन टाकणारा,
आजही तोच आहे
पण खूप नवीन झालेला,
काल होता तेव्हा ती होती सोबतीला
आज मात्र एकट्याला भीजउन गेलेला,
कालच्या पावसात भिजायचं होत ,
आज मात्र आडोश्याला उभं राहायचं होत,
आज मात्र आडोश्याला उभं राहायचं होत..

आला पावसाळा

पानाफूलांचा हिरवा पसारा
झोकात आवेशात वाहतो वारा
कोकिळा घेते स्वैर भरारी
गातो निसर्ग क्षणा क्षणाला
आला पावसाळा .. आला पावसाळा

अंगावर झेलत पाऊस धारा
चिमुकली पहा वेचिते गारा
थुईथुई नाचे मोर अंगणी
सप्तरंगी सारा नजारा
आला पावसाळा .. आला पावसाळा


दरवळला हा गंध मातीचा
मोहरला हा ॠतू प्रीतीचा
जुळता नाते धरती नभाचे
उसळ्ल्या सागरी लाटा
आला पावसाळा .. आला पावसाळा

तिचं माझं नातं फ़क्त पावसालाच कळलं होतं


तिचं माझं नातं फ़क्त पावसालाच कळलं होतं...
भरलेलं आभाळ रात्रभर गळलं होतं
तिचं माझं नातं फ़क्त पावसालाच कळलं होतं


रात्रभर पाऊस थेंब अन् थेंब सांडुन गेला
तिच्या माझ्या आठवणींवर ओलावा मांडून गेला
...भिजण्यासाठी मग मन माझं वळलं होतं
तिचं माझं नातं फ़क्त पावसालाच कळलं होतं

तिचं माझं नातं फ़क्त पावसालाच कळलं होतं

पावसाळा


आज अचानक पाऊस आला
अंतरी उमलला पावसाळा


भिजवु नये म्हणून घेतला
आडोसा जवळ वाहनाचा
कळले जेव्हा कांदे त्यात
आठवले मला डोळे तुझे


कातर आठवणीने भारलेले
ढाळीत अश्रू संतत पावसाळा
भिजलो जरीही होतो बाहेर
अन अंतरी चिंब पावसाळा


अंगावरी थेंब थोडे थोडे
आठवांचा ओथंबला पावसाळा 


ढगांचे डोळ्यातले काजळ
अन देशांतरीचा पावसाळा


पाऊस किती चालला आज
अगदी पावलांवर तिच्या
ती तशीही येत असते आठवात
आज आला तिच्यासारखा पावसाळा


पाऊस आता थांबला होता
हिवाळा उधळत वारा आला
उब आठवणीची तग धरून
एक आठव सांद्र उमलून गेला पावसाळा


बाहेर पाऊस थांबला जरी
अंतरी मात्र तसाच आहे पावसाळा

पाऊस आलाय….

पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

शनिवार, ९ जून, २०१२

पहिला पाऊस

                                                       पहिला पाऊस पडतो तेंव्हा
                                                 
                                                    पहिला पाऊस पडतो तेंव्हा
                                                     एकच काम करायचं...
                                                     हातातली कामं टाकुन
                                                     पावसात जाऊन भिजायचं!

                                             
                                                  आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
                                                  कोसळणार्‍या धारा
                                                   श्वासांमध्ये भरून घ्यायचा
                                                       सळाळणारा वारा.....
                                              

शुक्रवार, ८ जून, २०१२

अजूनही जागवलेस तू


नात्यात बांधुनी मला
रडता हसवलेस तू.....
डोळ्यांत झोप येता
स्वप्नात जागवलेस तू......
काही शब्द तुझे होते
काही मी दिले
शब्दांच्या या खेलात
नवे अर्थ आले
काही अर्थात माझ्या
भाव आणलेस तू...
ओळख होती नवीच
जुने काही वाटायचे
तुझ्या नसन्या च्या ओलखितहि
मी मला भेटायचे
काही माझ्या ओलखिच्या
जाणीवेत आलास तू....
नसे जरी काही आपल्यात
आपलेच काही असायचे
नसताही भाव नात्यात
भाव मला शोधायचे
काही माझ्या भावाला
प्रेम दिलेस तू........
रात्र ती संपली नाही
डोळ्यांत मी जागली
तुझ्या ओढित जायचे
स्वप्नासाठी झोपली....
काही माझ्या स्वप्नासाठी
अजूनही जागवलेस तू.....

सांग तू माझाच ना

सांग तू माझाच ना, राहू कशी तुझिया विना ?
चालता वाटेवरी हे कोवळे सुख भेटले
प्रीतीच्या वळणावरी मी थांबले गुंतले
भासते उतरून खाली स्वर्ग ये जणू पाहुणा ||१||

भेट होता एक: झाले मी नवी जगही नवें
वाटते,आले जुळुनी जन्म्जान्मीचे दुवे
जीवना लाभे किनारा, स्वप्न लाभे लोचना||२||

हात हाती गुंफलेले ना कधी सोडायचे
एक नाते जोडलेले ते ना कधी तोडायचे
दूर नाही जायचे स्वपानातही मनमोहना......

सौंदर्य


नजर लागायची भीती असते...
पाहुनी आज कळले मला
परमेश्वराची कलाकृती किती असते....
सौंदर्याने तुझ्या.....आज तू....
शब्दांना हि निशब्दकेलंस,
त्याच सौंदर्याला... आज तू....
सौंदर्याचं उदाहरण दिलंस.
तुझ्या डोळ्यात रात्रीची निरागस शांतता आहे,
तुझ्या हसण्यात एक"विलक्षण" शक्ती आहे,
उगाच नाही मिळत हे असं...
त्यातही देवाची भक्ती आहे...
क्षितिजा पलीकडेही बरेचसे क्षितीज
अजूनही पाहणे माझे बाकी आहे....

कुणीतरी


खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,
... कुणीतरी आपला विचार करत पापनीवर पापनी अलगत टेकवनं.
झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच पाहणं..
काळजात साठवनं ,
कुणालातरी आपला अश्रू मोत्यासमान वाटणं..
कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,
देवसमोरही स्वताआधी आपलं सुख मागणं!!

खरच !किती छान असतं ना....?

खेळ मनाचा

किती छान असतो न हा खेळ मनाचा,
स्वप्नांचा आधार घेऊन हवेत भरारी मारण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजा आहे म्हणत स्वप्नात हरवण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तुझ्या माझ्या अबोल प्रीतीचा किती छान असतो न हा खेळ मनाचा,
मी करत आलेल्या एकतर्फी प्रेमाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू जवळ नसलास कि तुला अनुभवायचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
सत्यात न उतरणाऱ्या स्वप्नाचा किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजाच म्हणून मनाला समजावयाचा
खरच खूप छान असतो रे हा खेळ मनाचा,
सत्य माहित असूनही मनालाच फसवण्याचा.. मनालाच फसवण्याचा !!!!!!!

मैत्री केली आहेस

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस

सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे '
नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस

बुधवार, ६ जून, २०१२

मी तुझ्यावर प्रेम करतो,

मी तुझ्यावर प्रेम करतो,
म्हणून तुही केलच पाहीजे अस काही नाही,
भावना नक्की समजुन घे,
प्रेम स्विकारलच पाहीजे अस काही नाही,
कदाचीत तु तसा विचारही केला नसेल,
कदाचीत तुला तसा संकेतही मिळाला नसेल,
उशीर होण्यापुर्वीच समजुन घे स्वतःला,
का जाणावे लागते काळजातील प्रेमाला,
ही कविता तुझ्याचसाठी,
शब्दांतील भाव तु समजुन घे,
माझ हसु-आसू तुच आहेस,
न सांगताच जाणून घे !!!

सोमवार, ४ जून, २०१२

तुला पाहण्यासाठी

तुला पाहण्यासाठी,
आता माझ्या बरोबर चंद्र हि थांबतो,
तारे हि लाऊन बसतात डोळे, तुझ्या वाटेकडे,
वाराहि गाऊ लागतो, तूझ्या येण्याचे गाणे,
अन वेडे होऊन वाट पाहतो, आम्ही सारे शहाणे...

तू दिसताच, चंद्र हि लाजतो,
तारे हसू लागतात,
अन वारा नाचू लागतो...

मी हि हसतो, तुला पाहून ,
वार्या बरोबर नाचतो, मी हि थोडा जाऊन...
आज तरी सांगेन तुला मनातल गुपित ,
अस रोज मी ठरवतो...
पण तू समोर येताच,
कळतच नाही कधी, मी तुझ्यातच हरवतो...

रात्र निघून जाते तुझ्याशी बोलण्यात,
पण मनातल गुपित मनातच राहत...
तुला पाहून रोज माझ असच होत,
रोज ठरवतो मी बोलायचं,
अन तू समोर येताच,
शब्द गोठतात माझे,
आणि रोज माझ हस होत...
आणि रोज माझ हस होत...

ते दिवस

ते दिवस असे होते की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
अणि मी फ़ोन केला नाही की मात्र
स्वतच फ़ोन करून गप्पा मारायचं
ते दिवस असे होते की
कोणीतरी माझ्यासाठी जुरायच
अणि मी नाही बोलले की रड रड रडायच
ते दिवस असे होते की
माजा आवाज़ ऐकन्यासाठी कोणीतरी दहादा फ़ोन करायच
में busy असेंन म्हणून फ़ोन करन टाळायच
ते दिवस असे होते की
कोणीतरी माझाय्शी भेटण्यासाठी आतुर असायच
में नाहीं येणार म्हटले की डोळ्यात पानी अनायच
आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
काम नसेंन तरी busy आहे ग म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं
आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन नात तोडायाच
का दुस-याचं जीवन भकास करायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
अणि आता मात्र नुसते भकास जिवन जगायच , भकास जिवन जगायच

गुरुवार, २४ मे, २०१२

कुणीतरी असावे प्रेम करणारं

कुणीतरी असावे आपल्यावर प्रेम करणारं
आयुष्याच्या वाटेवर टेच लागली तर सावरणार
कुणीतरी असावे आपल्यावर जीव लावणार
आपल्या मनातील गोष्ट न सांगताच ओळखणार
मी हि अश्याच दिवसाची वाट पाहतेय
भेटेल का मला असे कोणी ?
ज्याला पाहता क्षणी हृदयाचा ठोका चुकवा
असेल का असा कोणी ?
सुख दुक्खाचे सारे क्षण सोबत घालवावेत
आयुष्याची स्वप्ने एकमेकांच्या डोळ्यात पहावीत
भेटेल का मला अस कोणी
ज्याला पाहता दूर होतील साऱ्या दुखः यातना
एकमेकांच्या सहवासात पूर्ण होतील साऱ्या मनोकामना

मलाही वाटत

                                                           मलाही वाटत


                                                    मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                                     आणि आपण दोघांनी प्रेम कराव.....

                                                       मलाही वाटते तुझ्या हातात हात घालून
                                                       तुझ्या खांद्यावर डोके ठेऊन शांत बसाव,,,

                                                   मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं
                                                  मलाही वाटते तुझ्या डोळ्यात डोळे घालून
                                                   सगळ्या जगाला विसरून जावं.......

                                                मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                     भेटायला तू आल्यावर आपण दोघांनी पावसात भिजावं
                                त्या चमकणाऱ्या वीजाच्या आवाजाने घाबरून तुझ्या जवळ यावं
                                                         मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                                       कधीतरी तू मला स्वताहून जवळ घ्यावं
                                                          तुजे माझ्यावर प्रेम वसावं
                                                        मलाही वाटत तुजे माझ्यावर मन याव ,
                                                     मी तुझ्या bike वर बसाव तू ब्रेंक दाबलास
                                                         कि तुझ्या मुद्दाम जवळ याव
                                                    मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                                    मलाही वाटते तुजे माजे लग्न व्हावं
                                                माझे नाव सगळ्यांनी तुझ्या नावासोबत घ्यावं
                                                       आणि आपलं छोटासा घर असावा
                                                    मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                                तू हि माझ्यावर माझ्या इतकेच प्रेम कराव
                                                     तू हि माझ्यावर माझ्या इतकेच प्रेम कराव