Breking News

राष्ट्रध्वज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राष्ट्रध्वज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा
२६
जानेवारी व १५ ऑगस्ट या दिवशी आपण राष्ट्रीय ध्वज उभारतो. आपल्या सदऱ्यावर
लावतो; परंतु नंतर हेच राष्ट्रीय ध्वज दुसऱ्या दिवशी, रस्त्यावर, कचऱ्यात,
बसस्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, कुठेही चुरगळलेल्या अवस्थेत, फाटलेल्या
अवस्थेत पायदळी तुडविले जातात. याचा अर्थ आपण आपल्या देशाची शान पायदळी
तुडवितो. असे इतस्तत: विस्कटलेले राष्ट्रध्वज पाहिले की मनाला प्रचंड यातना
होतात.
याबाबत सरकारने, सामाजिक संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांनी, दक्ष
नागरिकांनी काही उपाय शोधले पाहिजेत. राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्याकरिता
पुढील काही उपाययोजना सुचवाव्याशा वाटतात.
सर्व शाळांमध्ये राष्ट्रध्वज
उभारून राष्ट्रीय सण सााजरे होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक
वर्गातून राष्ट्रध्वज गोळा करावेत व मुख्याध्यापकांकडे सुपूुर्द करावेत.
सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा जवळच्या शाळेत अथवा जवळच्या पोलीस
स्टेशनमध्ये राष्ट्रध्वज जमा करावेत. याकरिता शाळेने पोलीस स्टेशनने डबे
ठेवावेत. रेल्वे स्टेशन अगर बसस्टॉप वा इतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले
राष्ट्रध्वज नागरिकांनी कर्तव्यदक्ष भावनेने जवळच्या बस डेपोमध्ये अथवा
सरकारी कार्यालयात, पोलीस स्टेशनमध्ये जमा करावेत. स्थानिक समाजसेवक
संस्थांनी आपआपल्या विभागातील रस्त्यांवरील व कचऱ्यात पडलेले राष्ट्रध्वज
गोळा करण्याची व शासनाकडे जमा करण्याची जबाबदारी स्वीकारावी. शासनाने सर्व
जमा केलेले राष्ट्रध्वज योग्य रीतीने नष्ट करण्याकरिता तात्पुरत्या
स्वरूपात विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वज
नष्ट करताना आदरपूर्वक व सन्मानाने नष्ट करावेत. देशातील प्रत्येक राज्यात
याबाबत दक्षता घेऊन राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा.
कागदी लहान आकाराचे
राष्ट्रध्वज, प्लास्टिकचे काडीवाले राष्ट्रध्वज, धातूचे राष्ट्रध्वज असे
वेगवेगळे ध्वज जमा करावे. धातूचे राष्ट्रध्वज पुन्हा वापरता येणे शक्य
असते. ते जपून ठेवावेत. शासनाने अशा जमा केलेल्या विविध प्रकारच्या
राष्ट्रध्वजांची आदरपूर्वक व योग्य रीतीने विल्हेवाट लावावी.
वरील
उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत यात शासनाला सुधारणा करणेही शक्य आहे.
यातील किमान ५० टक्के उपाययोजना जरी अंमलात आणल्या तरी राष्ट्रध्वजाचा
होणारा अपमान टाळता येईल. त्याकरिता देशातील सर्व शाळांनी, समाजसेवी
संस्थांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी, कर्तव्यदक्ष नागरिकांनी ही गोष्ट मनावर
घेतली पाहिजे.









                                                                                                                                         

                                                                                                                               



राष्ट्रध्वज

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना
अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे
पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल
तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे
अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.
ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.


संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या
उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी
राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.
कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू
नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.



राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी
करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच
राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो
फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.
ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.
त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या
अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही
वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.



ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे
कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू
नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही
जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात
लावता येणार नाही.


केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या
ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक
कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी
ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात
असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज
जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय
व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.