Breking News

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

मद्यधुंद बसचालकाची अनकंट्रोल ड्रायव्हिंग

आमलाडजवळ बस फरशी पूलावर आदळल्याने फुटले तीन टायर; प्रवाशांचा थरकाप, कारवाईची मागणी
मद्याने चिंगाट झालेल्या बसचालकाने झिंगाट होवून भरधाव वेगाने सुसाट बस पळविली. प्रवाशी आमचे दैवत असे ब्रीद मिरविणाऱ्या परिवहन महामंडळाच्या या चालकाने वाहन चालविण्याच्या या चित्तथरारक सर्कसमुळे बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. सरळ महामार्गावरही नागमोडी घिरट्या घालणारी बस शेवटी आमलाडजवळील एका पूलावर आदळली अन बसचे एक-दोन नव्हे तर तीन टायर फुटल.ेमात्र तरीही मद्यधुंद चालकाची शुध्द हरपलेलीच. बऱ्हाणपूर-अक्कलकुवा बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी शहादा ते तळोदा प्रवासादरम्यान हा थरार अनुभवला. काहींनी तर चक्क मृत्यूच समोर पाहिल्याचे सांगितले. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या मद्यप्रिय बसचालकावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या काही वाहनचालकांचे कारनामे बऱ्याचदा ऐकण्यात येतात. काहीसा असाच प्रकार गुरूवारी घडला. बऱ्हाणपूर-अक्कलकुवा बसच्या चालकाने मद्य प्राशन करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला. शहादा येथून तळोदा येथे सदर वाहन येत असताना त्या वाहनात साधारण ४० ते ५० प्रवाशी बसले होते. दरम्यान आमलाड नजीक तोल जाऊन फरशी पुलाच्या कठड्यावर एसटी आदळली. त्यात या वाहनांचे ३ टायर जागीच फाटले तर एका चाकाची अक्षरश रिंग बाहेर आली. कसेबसे करत
 वाहनांवर नियंत्रण मिळविले मात्र तोपर्यंत प्रवाशांचा जीव भांड्यात पडला होता. प्रवाशांचा थरकाप उडाला. सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान याबाबत वाहन चालकाला विचारणा केली असता एस टी पंक्चर झाल्याचे कारण सांगत अरेरावीदेखील केल्याचे प्रवाशांनी सांगितले. शहादा ते तळोदा दरम्यान २ ते ३ ठिकाणी या बसचा अपघात होता होता वाचला. अक्कलकुवा आगाराच्या वाहन चालकाकडून प्रवश्यांशी अरेरावी करण्याबाबत वेळोवेळी तक्रारी येतात. मात्र आगार प्रशासनाकडून बेशिस्त व बेजबाबदार चालकांवर कारवाई होत नसल्याने या प्रकारात वाढ होत आहे. तर अक्कलकुवा आगाराच्या बसेस खरंच सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर रस्त्याची झालेली दुुरावस्था त्यावर मद्यपान करून बेजबाबदारपणे वाहन हाकणाऱ्या त्या वाहन चालकांवर कारवाई करावी अशी एकच मागणी यावेळी प्रवाशांकडून करण्यात आली..

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

बोरदला घरफोडी ; दागिन्यांसह पावणे नऊ लाखाचा ऐवज लांबविला

 ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या पोलिसांपुढे ठरताय आव्हान 21 Nov 2018FrontpageImage ViewPrintMailClose Button AAA बोरद तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. गावात पोलिस दुरक्षेत्र असून ३८ लहान-मोठे गावे जोडली आहेत. केवळ ४ पोलिस कर्मचाऱ्यांवर दुरक्षेत्राची जबाबदारी आहे. त्यापैकी अनेकदा काहींना काही कारणास्तव ते रजेवर राहत आहेत. पोलिस नियमित दुरक्षेत्रावर उपस्थित राहत नसल्याच्या फायदा चोरटे घेत आहेत. गावात दुकाने फोडणे, घरफोडी, व्यापारी लुटीच्या घटना, शेतातील मोटारी, केबल चोरी होणे, वाहने चोरी होणे आदीं घटनांमध्ये वाढ झाली आहे. वरिष्ठांना याबाबत कल्पना देऊनही पोलिस कर्मचारी हजर राहत नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. चोरांनी सध्या ग्रामीण भागाला लक्ष केले असून सातत्याने ग्रामीण भागात होत असलेल्या चोऱ्या पोलिसांपुढे आव्हान ठरत आहेत.. बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद येथील लक्ष्मण पाटील यांच्या घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले तब्बल ८ लाख किंमतीचे २६ तोळे सोन्याचे दागिने व ७५ हजार रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. चोरीच्या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या पोलिसांपुढे आव्हान ठरल्या आहेत. . तळोदा तालुक्यातील बोरद गावात कुंभार गल्लीत राहणाऱ्या लक्ष्मण यशवंत पाटील हे आपल्या पत्नीला सुरत येथे दवाखान्यात तपासणीसाठी घेऊन गेले होते.चोरट्यांनी संधी साधत दि.२० रोजी पहाटे २ ते ४ च्या सुमारास घराचा दरवाजाला लावलेले कुलूप टॉमीने तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले ११ तोळे सोन्याच्या बांगड्या, ५ तोळ्याचा राणी हार, अडीच तोळे वजनाच्याअंगठ्या, ३ तोळे बाजूबंद, अडीच तोळे वजनाची सोनसाखळी, २ तोळे कानातील दागिने, ३० भार चांदी असे दागिने व कापूस विक्रीतून आलेले ७५ हजार रुपये इतकी रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. सकाळी शेजारील महिला तुळसीला पाणी घालत असतांना लक्षात आल्याने घरमालकास माहिती दिली. सुरतहून परत आल्याने पोलिस स्टेशन गाठले. काल रात्री पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानने घरापासून तळोदा रस्त्यावर महादेव मंदिर पर्यंत रस्ता दाखविला..


पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढण्यावरून वाद.

पूर्वसूचना न देता अचानक बुलडोझर लावून अतिक्रमण काढण्यावरून अतिक्रमण धारक
 व अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये धकाबुकीं झाल्याचा प्रकार घडला, वाद विकोपाला जाऊ नये याकरिता लोकप्रतिनिधी पोलीस अधिकारी यांच्या समनव्याने वाद मिटवण्यात यश आले. तळोदा शहरात अतिक्रमण वाढत आहे. परिणामी समस्येत वाढ होत आहे. नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी येत्या जानेवारी पावेतो पालिकेचा कारभार जुन्या इमारतीतून नवीन इमारतीत होणार असल्याचा आश्वासन वजा दावा केला आहे. सध्या पालिकेच्या इमारतीचे काम अंतिम टप्यात आले आहे. मात्र या भागात येणाऱ्या रामगड या परिसरात अतिक्रमनात वाढ होत आहे. याबाबत स्थानिक रहवाश्यकडून उदभवनाऱ्या समस्यांबाबत तक्रारी करण्यात येत आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी पालिकेचे कर्मचाऱ्यांनी दोन ते तीनवेळा सम्बधित अतिक्रमण धारकास तोंडी सूचना केल्या मात्र या सूचनां झुगारून लावण्यात आले. 2011 नंतरच्या अतिक्रमनांवर हातोडा चालविण्याचा शासकीय आदेशंव्ये व मुख्याधिकारी यांना प्रक्षेपण, अतिक्रमण किंवा अडथडा नोटीस न देता अतिक्रमण काढून टाकण्याचा अधिकारांव्ये सकाळी 10 वाजे दरम्यान जेसीबी आणून पूर्व सूचना न देता पालिकेडकून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. याठिकाणी अतिक्रमण करून राहत असलेल्या इम्रान निसार अन्सारी यांच्या घरावर जेसीबी लावून पत्र्याचे शेड जमीन
 दोस्त करण्यास सुरुवात केली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे त्या जागेवर राहणाऱ्या कुटुंबिय बेघर झाल्याच्या भीतीने त्यांनी पालिका कर्मचाऱ्याचा विरोध केला विरोध झुगारून लावण्याच्या प्रयत्नात अतिक्रमन धारक कुटुंबीय व अधिकाऱ्यांनी शाब्दिक चकमक होऊन त्याचे पर्यावसान हातापाईत झाले. दरम्यान रामगडमध्ये केवळ आमच्याच घरावर कारवाई का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असता सर्वच अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावेळी रामगड उठवण्यात येत असल्याची अफवा पसरवून बेघर होण्याच्या भीतीने स्थानिक महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर चाल करून आल्याची घटना घडली. अचानक केलेल्या कारवाईबद्दल या भागातील रहवाशीकडून रोष प्रगट केला. तर अतिक्रमित जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस देणे बंधनकारक नसल्याचा दावा मुख्याधिकारी जनार्दन पवार व पथकातील अधिकाऱ्यांनी यावेळी केला. दरम्यान अतिक्रमण धारक व पालिका प्रशासन या दोघांनी एकमेकांविरोधात पोलीसात धाव घेतली. यावेळी आजी माजी नगरसेवक, व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थितीने पोलीस ठाण्यात बैठक घेवुन वाद संपुष्टात आणण्यात यश आले. यावेळी मुख्याधिकारी जनार्दन पवार, बांधकाम विभाग अभियंता गावित, नारायण चौधरी, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, नगरसेवक अमानोदीन शेख, रामानंद ठाकरे, माजी नगरसेवक कलु अन्सारी, योगेश चौधरी, कलु अन्सारी, आदी उपस्थित होते. दरम्यान रामगड परिसरातील महिलांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पालिकेला नमते घावे लागल्याचे समजते.. *चौकट* सार्वत्रिक निवडणूका 2018 च्या वाचनाम्यात रामगड भागात पालिकेच्या मालकी जागेवर झोपडी वजा घरे असणाऱ्या कुटुंबियांना हक्काचे घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात भाजपच्या वचन नाम्यात रामगडचा मुद्दा ठडक होता त्यामुळे आता वचनपूर्ती करत असताना सत्ताधाऱ्यांना येणाऱ्या काळात अतिक्रमण सारख्या विषयावरून विरोधाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आमदार उदेसिंग पाडवी नगराध्यक्ष अजय परदेशी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या प्रयत्नातून त्याठिकाणी घरकुल सारख्या योजनेतून अतिक्रमण धारकांना हक्काचे घर मिळण्यासाठी नगरविकास खात्याकडे व प्रशासन पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

पोलिस कर्मचारी, राजकीय कार्यकर्त्यांना अभय का?

दुचाकी चालकांवरील कारवाईत दुजाभाव तळोद्यातील वाहतूक कारवाईचे स्वागत ;
 दै. पुण्यनगरीच्या वृत्तानंतर तळोदा पोलिसांकडून शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरभर बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या तळोदा पोलिसांनी आधी स्वत:च्याच कार्यालयातील सहकाऱ्यांच्या वाहनांची तपासणी करणे गरजेचे झाले आहे. कित्येक पोलिस कर्मचाऱ्यांच्या फॅन्सी नंबर प्लेट वाहतूक शिस्तीसाठीच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. एवढेच काय तर तळोदा शहरात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांना नंबर ऐवजी केवळ पक्षाचे चिन्ह वापरून नियमांची पायमल्ली करण्याचा प्रकार पाहवयास मिळत असल्याने पोलिसांकडून कारवाईत दुजाभाव केला जात असल्याची चर्चा रंगत आहे. . ...आणि मोबाईल घेऊन दुचाकीवरुन केला पोबारा . तळोदा येथील तलावडी रोझवा रस्त्यावरुन महत्वाचा फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल मागून फोन न करताच मोबाईल घेऊन दुचाकीवरील दोघांनी पोबारा केला. . काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास येथील पत्रकार रमेशकुमार भाट हे नियमितपणे तलावडी रोझवा रस्त्यावर शतपावलीसाठी गेले होते. यावेळी त्यांना दुचाकीवरुन येणाऱ्या दोघांनी एक महत्वाचा फोन करायचा आहे, असे सांगून मोबाईल देण्याची विनंती केली. यावेळी रमेशकुमार भाट यांनी माणूसकी जपत दुचाकीवरील दोघांना मोबाईल दिला खरा मात्र त्यांनी कोणालाही फोन न करता सरळ दुचाकी सुरु करुन धूम ठोकली. यावेळी भाट यांनी त्यांना आरोळ्या दिल्या. मात्र दुचाकीवरील दोघेही सूसाट वेगाने मोबाईल घेऊन निघून गेले. काल रात्री उशिराने तळोदा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते. . रेडियम नंबर प्लेट बनविणाऱ्या व्यावसायिकांना पोलिस प्रशासनाने कायद्याचा जोर दाखवल्यास नंबर प्लेट नियमानुसार तयार केल्या जातील. तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांच्या कारवाईत सातत्य असल्यास याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. गाडी चोरीस जाणे, दुचाकीवरून येऊन अंगावरील दागिने हिसकावून घेऊन जाणे. अश्या घटनांमध्ये फॅन्सी अथवा विनाक्रमांक असलेल्या नंबर प्लेटचे वाहने वापरलेले आढळून आली आहेत. परिणामी अश्या वाहनांचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हानं ठरते.. वाहनांचा नंबर प्लेटवर नंबर व्यतिरिक्त काहीही लिहणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र तळोद्यात या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. कायद्याचे पाईक असणारे पोलिसच कायदा मोडीत काढत आहेत. यामुळे पोलिसांची भूमिका लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण अशी दिसू लागली आहे. शहर व ग्रामीण भागातील वाहनधारकांनी खिशाला ढिल देत नियम खिश्यात घातले आहेत. फॅन्सी नंबर प्लेट, दादा, भाऊ, आप्पा यासह वाहनांवर पोलिस व प्रेस लिहिलेले व त्या विभागाशी संबंध नसलेल्या वाहने तसेच पुढाऱ्यांचा वरदहस्त लाभलेले कार्यकर्ते वाहनांवर पक्षाच्या चिन्हासह तोऱ्यात शहरभर मिरत आहेत. कायद्याची भीती नसलेल्या वाहनधारकांनी ओन्ली माय रुल्स असे लिहून जणू पोलिसांना उघडपणे आव्हानच दिले आहे. फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या हौश्या नवश्याची संख्या वाढली असून त्यांना पोलिसांचा धाकच नाही. पोलिसांच्या समोरूनच ते बिनधास्तपणे सुसाट वाहने चालविताना दिसतात. पण त्यांच्यावर कठोर कारवाई होताना मात्र दिसत नाही. परिणामी अल्पवयीन व शाळकरी मुले मुली सुसाट वाहने चालवून जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. कायदा पायदळी तुडवणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. दै. 'पुण्यनगरी'च्या वृत्तानंतर पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. या कारवाईमुळे आजच्या घडीला तळोदा शहरातील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत झाली आहे. हातगाडीवाले, रस्त्यात पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. पोलिस अधीक्षक यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा आदेश दिला आहे. मात्र चक्क पोलिसांकडून या नियमांची पायमल्ली होत असल्याने खंत व्यक्त करण्यात येत आहे. .

शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तळोद्यातील वाहतुकीचे तीनतेरा

तळोदा शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून वाहनचालक रस्त्याच्या मध्यभागीच वाहने उभी करीत असल्याने सामान्य नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तळोदा पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीला लगाम लावाला अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.. तळोदा शहर हे तालुक्याचे ठिकाण असून शहरात विविध कार्यालये असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ विविध कामानिमित्त व बाजार करण्यासाठी नियमित शहरात येत असतात. शहरातील स्मारक चौक, बसस्थानक परिसर, आनंद चौक, कॉलेजरोड, बँक परिसर, भाजी मंडई आदी भागात नेहमीच नागरीकांची वर्दळ असते. शहरातील वाढती वाहनांची संख्या, वाढते अतिक्रमण, बायपासचे भिजते घोंगडे, जूने अरुंद रस्त्यांमुळे वारंवार वाहतूकीचा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान हातोडा पूल सुरु झाल्यापासून शहरातून परिवहन मंडळाचा बसेस जात असल्याने स्मारक चौक व तर वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक ठप्प होत असून पोलिसांच्या माध्यस्थीशिवाय वाहतूक सुरळीत करणे शक्य होत नसल्याची सध्याची स्थिती आहे. अनेकवेळा नंदुरबारकडे जाणारी व तळोदाकडे येणारी बस एकाचवेळी येत असल्याने एकच गलका करतात. तळोदा शहराला केवळ चार वाहतूक पोलिस देण्यात आले असून ते केवळ स्मारक चौकात दिसून येतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून वाहनधारकांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. बाजारपेठेत आलेले ग्राहक आपली वाहने रस्त्यावर कुठेही उभे करतात. मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. पालिकेमार्फत पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने हा कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच भाजीविक्रेते, फळ विक्रेते व इतर व्यावसायिक भर रस्त्यावर अतिक्रमण करीत आहे. परिणामी रस्ता अरुंद होऊन वाहने जाण्यास जागाच उरत नसल्याची स्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेकवेळा सर्वसामान्यांना वाद-विवादांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांच्या निष्क्रीयतेने अवैद्य वाहतूकीने डोके वर केले असून शिस्त बिघडली आहे. अवैध वाहतूक करणारे वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेत असतांना रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करीत असल्याने वाहतूकीची कोंडी होत आहे. मुख्य रस्त्यावर कुठेही नो पार्किंगचा बोर्ड लावण्याची तसदीही पोलिस प्रशासन घेत नाही. पालिकेने यापूर्वी रस्त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारले होते. मात्र सद्यस्थितीत ते पट्टे अदृश्य झाले आहेत. याबाबत पालिका व पोलिस प्रशासनाने वाहतूकीची समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे. . सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. दिवसभरातुन उसाने भरलेले अवजड वाहने शहराबाहेरील बायपास मार्गाचा वापर न करता सरळ शहरातून जातात. रस्त्यावर असलेले गतिरोधक तसेच वळण मार्गामुळे अपघाताची शक्यता निर्माण होते. अवजड वाहनांना अंकलेश्वर-बऱ्हाणपूर (बायपास) मार्गाचा अवलंब केल्यास काही प्रमानात का असेना वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. तर टॅक्सी चालकांना वीजवितरण कार्यालयाच्या मागील बाजूला तयार करण्यात आलेल्या रस्त्याचा वापर केल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.