Breking News

रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

तळोदयातील श्री दादा गणपती

।।एकोप्याचे दर्शन घडविणारा तळोदयातील श्री दादा गणपती।। 

सातपुड्याचा पायथ्याशी वसलेले निसर्गाची खाण लाभलेले, स्वातंत्र संग्रामात सहभागी, वि.दा.सावरकर ह्यांचा पावन स्पर्शाने पावन झालेले तळदे, सर्वधर्म एकत्रीत एकोप्याने व गुण गौरवाने राहण्याची परंपरा जपणारे अशी सर्वदूर ख्व्याती तळोदा शहराने जपली आहे. भारताच्या स्वातंत्रप्रापतीच्या वर्षी सन 1947 साली एकोप्याचे प्रतिक म्हणून तळोदा शहरातील मराठा चौकात सार्वजनिक श्री दादा गणपतीची स्थापना करण्यात आली. सर्वदूर मानाचा व नवसाला पावणारा गणपती म्हणून दादा गणपतीची ओळख आहे. यंदा मंडळ आपले 68 वे वर्ष साजरे करीत आहे. लोकमान्य टिळकांनी सन 1893 पासून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतर सण 1947 पासून तळोदे शहरात मराठा चौकात सार्वजनीक गणेशोत्सव साजरी करण्याची परंपरा सुरु झाली. यासाठी मराठा समाजातील शिवाजी मराठे (बोराळे) ह्यानी तळोदा शहरात श्री.दादा गणपतीची स्थापना केली. स्वत दोन महिन्यापुर्वीच गाड़े भरुन काळी माती आणून ती पाण्यात भिजत ठेवली जात होती. त्यात असणारे दगड धोंडे आदी काढून त्यात घोड्याचे लीद व पराळचे
मिश्रण करुण माती मळली जात होती. आषाड ते भाद्रपद ह्या दोन महिन्यात मूर्तीचे कामकाज पूर्ण केले जात होते. तदनंतर शेठ के डी हाईस्कूल येथील स्व प़ी व्ही पाटील सरांचा मदतीने मूर्तीला रंग रंगोटी करुण दादा गणपती तयार केला जात होता. ११ ब्राह्मण बोलवून लघुरूद्र व शास्त्रवर्तनाचे पाठ करूण श्री दादा गणपतीची स्थापना करण्यात येत होती. ह्या कामात त्यांचे सहकारी मित्र माजी नगरसेवक छबुलाल परदेशी, स्व:ताराचंद परदेशी, लाला हरी पाटील, स्व:रामभाऊ फोके, भास्कर पाटिल, आदिचा श्रीदादा गणपतीच्या स्थापनेत महत्वाची भूमिका होती. तर त्याना आर्थिक सहकार्यात तळोदा शहराचे नगराध्यक्ष भरत बबनराव माळी ह्याचे वडिल स्व बबनराव छगनराव माळी(पहेलवान) ह्यांचे आर्थिक सहकार्य लाभत होते. सुरवाती पासूनच श्री.दादागणपती हां अनंत चतुर्दशीला विसर्जन होण्याची प्रथा आहे. ती प्रथा अद्यावत सुरु आहे. या उत्सवासाठी मराठा गुरव, पाटील,माळी आदिवासी बांधवांसह इतर समाज बांधवांनीही गणेशोत्सव सुरू करण्यास सहकार्य केले. आणिबाणीच्या काळात देखील खंडन न पड़ता श्री दादा गणपतीची स्थापना करण्यात आली होती. तळोदा तालुक्यातुन मोठ्या प्रामाणात भाविक श्री.दादा गणपतीचा दर्शनासाठी उत्सकुतेने येवून मान मानतात.
त्यात नारळाची माळ, मोद्कांचा प्रसाद, पुढील वर्षासाठी गणेश मूर्तीला लागणारा खर्च, आदि सह विविध मानता मागितल्या जात होत्या. अद्यावत दादा गणपतीकड़े मागीतले सर्वच मानता पूर्ण झाल्या असल्याचे परिसरातील लोकांकडून सांगितले जाते. म्हणूनच श्री.दादागणपतीला मानाचा गणपती अशी सर्वदूर ख्व्याती प्राप्त झाली आहे. गणपती स्थापनेनंतर संपूर्ण गाव जागरण करुण भजन, कीर्तन, पोवाडे, आदि धार्मिक कार्यक्रम त्याकाळी घेण्यात येत होते. मात्र आता त्यांची जागा रंगोळी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमानी घेतली आहे. सुरवातीला फक्त काळ्यामातीचा गणपती बनवुन लाकडाच्या बंगोळीवर किवा बैल गाडीच्या चाकावर बसवण्यात येत होता. कालांतराने विविध आरास देखावे तयार करण्यात आले. मंडळाने विविध जागतीक विषयांवर प्रभोदनात्म्क देखावे, तयार केले. त्यात संस्कृतिक व धार्मिक देखाव्याचा सहभाग होता.
अंबरनाथची गुफा, बालाजी दर्शन, कलगी अवतार, अष्टविनायक दर्शन, वैष्णवी देवी,जालंधर नाताचा जन्म, भद्रा मारुती, पंढरपुर दर्शन, गेट ऑफ़ इंडिया, कारगिल युद्ध, राम मंदिर, व परिसराला गरुड़चे रूप देवून, विविध धार्मिक देखावे तयार करण्यात आले. तर मागील वर्षी शाहिदाना श्रदांजली देवुन सजीव देखावा तयार केला होता. सदर देखावे पाहण्यासाठी व नवस फेडण्यासाठी तालुक्यासह शेजारी असलेल्या गुजरात व मध्यप्रदेश राज्यातुन नागरिक गाडीबैलच्या साहयाने श्री दादा गणपतीचे दर्शन घेण्यास येत होते. दर्शनासाठी संख्या वाढत असल्याने मूर्तीची विटंबना होवू नये म्हणुन स्थापनेपासुन तर विसर्जना पावेतो ओंकार गाढे हे उपवास ठेवून ब्रमचर्याचे पालन करीत मूर्तीची देखभाल करत आहे. रात्री मंडपातच त्यांची झोपण्याची व्यवस्था केली जाते. ओंकार गाढे ह्यांची गणपतीवर विशेष
श्रदा असल्याने विसर्जनाच्या दिवशी विविध रूप धारण करुण, लाकडा पासुन विविध प्राणी घोड़ा, वाघ, हत्ती, उंदीर, रथ आदि बनवून ते ढोल ताश्यांचा तालावर आजही थिरकत आहेत. ह्यापुर्वी स्व: बाबू परदेशी हे सवा महीना उपवास करुण विसर्जनाच्या दिवशी हनुमानाचे रूप धारण करुण नृत्य करत होते. त्यांचे हे रूप पाहण्यासाठी कल्लोळ गर्दी दाटत होती. पुढच्या वर्षी स्व: बाबू परदेशी व ओंकार गाढे काय कल्पना सुचवतील ह्याची ओढ़ सर्वानाच लागायची. लाकडी तगद बनवुन श्री दादा गणपतीची गावभर मिरवणुक काढण्यात येत होती. सर्व धर्मातिल लोक एकत्रित येवून रात्रभर ढोल ताश्याचा तालावर थिरकत होते. सकाळच्या सुमारास गणेशजीचे विसर्जन केले जात होते. सध्या श्री दादा गणपती तळोदयातील माझी उपनगराध्यक्ष अनुप उदासी व नगरसेवक अजय परदेशी, जेष्ट शिवसैनिक संजय पटेल ह्यांचा मार्गदर्शनाने बसवीला जात आहे. मागील वर्षी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरास स्पर्धेत व पोलीस स्टेशन कडून विविध बक्षिस प्राप्त केले. मागील वर्षा पासून राकेश गुरव हे मंडळ चे अध्यक्ष आहेत. तर उपाध्यक्ष सचिन उदासी, सचिव राजू गाढे, राहुल  पाटिल, मयूर पाटिल पंकज गुरव, योगेश गुरव, चद्रकांत पाटिल, राकेश शिंदे, दत्ता चित्ते, गणेश पाटील, विक्की गवळे आदी आहेत. ह्या वर्षी मंडलाने गो धन रक्षा ह्यावर सजीव आरास तयार केली आहे.
संकलन:- सुधाकर मराठे ९५९५००८८७४







शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४

एस.टी. बसेसमध्ये आपत्कालीन सुविधांचा अभाव

एस.टी. बसेसमध्ये आपत्कालीन सुविधांचा अभाव जनतेच्या दळणवळणासाठी हक्काचे साधन म्हणजे
 बससेवा. दिवसभरातून अनेक प्रमाणात बसेसच्या माध्यमातून उलाढाल होते. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद असणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये मेडिकल प्राथमिक उपचारासाठी कीट नसल्यामुळे आपात्कालीन स्थितीत अपघात घडला तर करावे काय असा प्रश्न निर्माण होतो. परिवहनाच्या नियमानुसार प्रत्येक वाहनामध्ये प्रथमोपचार पेटी तथा अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. अपघातप्रसंगी लवकरात लवकर कमीत कमी अपघाती प्रवाशाला प्राथमिक उपचार तरी मिळेल व तो स्वतःचा वेदना कमी करू शकेल अशी अपेक्षा असते. मात्र दररोज हजारांच्या संख्येने प्रवाशाची वाहतूक करणार्‍या महामंडळाच्या बससेमध्ये मेडीकल कीट उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. बससेच्या प्रवासाकडे सर्वात सुखाचा व सुरक्षित प्रवास म्हणून पाहिले जाते. मात्र अशा असुविधामुळे हाच प्रवास धोकादायक ठरू शकतो. अक्कलकुवा व शहादा येथील डेपोच्या बससेमध्ये प्रथमोपचार किट व
अग्निशामक यंत्रणा नसल्याचे आढळून येते. काही ठराविक बसेस सोडल्यानंतर अग्निशामक यंत्रणा जवळजवळ नाहीत तर प्राथमिक उपचार कीट बसेसमध्ये उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. तसेच आपात्कालीन खिडक्या देखील घडत नाही. आपात्कालीन प्रसंगात वरील अभावामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागु शकतो, अशी भिती व्यक्त होत आहे. अक्कलकुवा , शहादा आगारातील 60 टक्यांपेक्षा अधिक बसेसमध्ये मेडिकल कीट प्रथमोपचाराची व्यवस्था नाही. काही बसेसमध्ये खाली प्राथमिक पेटया आहेत. तर काही बसेसमध्ये पेटया असून त्यातील मेडीकल किट नाही. खेडया पाडयापावेतो पोहचणार्‍या प्रवाशांना खराब रस्त्यांमुळे नेहमी लहान मोठया अपघातांना सामोरे जावे लागते. तसेच मागील वर्षात व या वर्षात बरेच अपघात घडले आहेत. त्यातून प्रवाशांचे लहान मोठे अपघात झाले आहेत. मात्र त्यामध्ये आजपर्यंत कोणत्याही जखमीवर प्रथमोपचार होत नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. मागील 15 ते 20 दिवसापुर्वी धुळयाहून तळोद्याकरीता येणार्‍या शहाद्यालागत असणार्‍या प्रकाशाजवळ तब्येत खराब झाल्याने त्याला कुठलीही सेवा लवकर मिळाली नसल्याने ड्रायव्हरच्या व कंडक्टरच्या माथी हे प्रकरण पडू नये, याकरीता
त्यांनी तळोदा उपजिल्हा रूग्णालयात एस.टी. बस आणून प्रवाशांनी रूग्णाचा उपचार केला होता. तळोदा- अक्कलकुवा शहरातील कुठल्याही बसस्थानकातील मोजक्या बसेस सोडता अग्निशमन व्यवस्था आढळून आली नाही. बसेसमध्ये अचानक आग लागली तर ती विझविण्यसाठी महामंडळाने कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. त्यावरच आपत्कालीन खिडक्यादेखील जाम झाल्या आहेत. यावरूनच एस.टी. महामंडळ प्रवाशांसाठी किती दक्ष आहे हे दिसून येत आहे. संबंधित यंत्रणेने याची दखल घ्यावी व प्रवाशांसाठी वरील सुविधा जनतेसाठी पुरवावी अशी मागणी केली जात आहे.

सोमवार, २५ ऑगस्ट, २०१४

बैल पोळा

उन्हातान्हात दिवसभर राबणार्‍या, बळीराजाचा आजन्म मित्र, मायबाप असणार्‍या बैलांच्या विश्रांतीचा,
 त्यांच्या कष्टाचे कौतुक करणारा वर्ष सण म्हणजे बैलपोळा होय. कर्नाटकात यालाच बैंदूर असेही म्हणतात. बैल पोळा हा श्रावण अमावास्या अर्थातच पिठोरी अमावास्येला महाराष्ट्रात सार्ज‍या होणार्‍या या सणाला विशेष महत्त्व आहे. शेतकर्‍याकरिता हा दिवस म्हणजे दिवाळीचा पाडवाच जणू. या दिवशी आपल्यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या सर्जा-राजाला मनोभावे सजवण्याचीच जणू बळीराजांमध्ये स्पर्धा सुरू असते. ग्रामीण भागात गावोगावच्या चावड्यांसमोर बैलांना सुशोभित करीत त्यांच्या मिरवणूका काढल्या जातात. बैल सुशोभनाच्या स्पर्धा, तसेच बैल गाड्यांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. यंदा न्यायालयाने बैलगाड्यांच्या स्पर्धांवर बंदी घातली असल्याने या स्पर्धा यंदा भरवल्या जाणार नाहीत, असे दिसते. शेतकर्‍यांच्या घरोघरी पुरणपोळ्यांचा घास आज सर्जा-राजाच्या कष्टाकरिता कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता बनवला जातो.
. शहरी भागातले चाकरमानी आजच्या दिवशी मातीच्या बैलाच्या प्रतिकृतींची पूजा करतात आणि ज्यांनी आपल्याला घडवलं त्या सर्जा-राजाची आठवण काढतात. आपला देश शेतीप्रधान असल्याने या देशात बैल पोळा या सणाला महत्त्व आहे. ग्रामीण भागातील शेतकरी हा कृषिप्रधानतेवर अवलंबून असल्याने तो आपला उदरनिर्वाह शेतीवरच करत असतो. शेती म्हटली की, ती बैलाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. ऊन, वारा, पाऊस असो अशा कोणताही ऋतू असला, तरी बैलांकडून शेतीचे काम करून घेतले जाते. यामध्ये बैलांना कोणत्याही प्रकारचा आराम मिळत नसतो. बैलांना आराम मिळावा, यासाठी हा सण शहरी आणि ग्रामीण अशा दोन्हीही ठिकाणी मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बैलांना आंघोळ घातली जाते,
त्यांच्या अंगावर रंगरंगोटी करून त्यांना सजवले जाते. त्यानंतर त्यांची पूजा केली जाते. बैलांना सजवून गावातल्या गावात त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यांच्या अंगावर गुलाल फेकला जातो. बैलांना गावतल्या गावात मिरवले जाते. प्रत्येकांच्या घरासमोर जाऊन बैलांची पूजा केली जाते. - या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे.पोळ्यास 'बैलपोळा' असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.
ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आटोपलेली असते. या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.' या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात
येते. पोळ्याला त्यांना नदी, ओढय़ात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकले जाते. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार), गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य. बैलाची निगा राखणार्‍या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात. या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात.
बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे. पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्‍हेने सजविण्यात येते. शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित
करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत जातात व त्याला 'अतिथी देवो भव:'प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत 'अतित कोण?' असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.

रविवार, २४ ऑगस्ट, २०१४

सातपुडयातील निसर्गाच्या सनिग्द्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जळगाव जिल्ह्यातील दो-यात धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नांवर आंदोलन होईल. या पार्श्वभूमीवर लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे याना तलोदा पोलिसांनी सकाळी 4:30 च्या सुमारास पोलीस ताफ्यासह चिनोदा चौफुलीजवळ रोखुन प्रतिबंधात्मक कारवाईसाठी त्यांना ताब्यात घेतले होते. या कारवाईच्या निषेधार्थ गावोंगावच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. तदनंतर रास्ता रोको देखील करण्यात आला. सदर बातमीचा आढावा आम्ही पत्रकार बांधव अगदी सकाळपासूनच घेत होतो. वातावरणात सतत विवीध मोड़ घेत होते. आता प्रतीभाताई शिंदे पुढे काय करतील ह्याची प्रतीक्षा माझ्यासह सर्वानाच लागली होती. मधेच माझा एका मित्राचा कॉल आला. सायंकाळ खुपच तनावात जात होती. एका मित्राचा अचानक कॉल आला. काही दिवसापुर्वी त्याने नविन grand i ten  कार घेतली होती. ब-याच दिवसानी त्या कार मधे बसून बाहेर कुठेतरी जाण्याचा प्लान होता मात्र वेळे अभावी ते शक्य होत नव्हते. मात्र आजचा प्रकरणाने दिवस खुपच तनावात गेला होता. सुट्टीचा दिवस, मात्र काहीच करता आले नाही. मित्राने कॉल केला कुठेतरी फिरायला जाऊया असे सांगीतले,
जुन्या मित्रासोबत फिरायला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो नाही का ? लहानपणीच्या पावसाच्या गंमती आज कितीही मोठे झालो तरी आपल्या स्मरणात असतात. खरंच शालेय जीवनातल्या पावसाची मजा तर काही अनोखीच असते. कोणाचीही पर्वा न करता पावसाचा आनंद लुटायचा. शाळेत असताना पावसात भिजण्याचा, क्रिकेटच्या मैदानावर पावसाच्या सरी अंगावर घेत मैदानावर मज्जा करण्याचे दिवस आज पुन्हा आठवले तेच मित्र पुन्हा एकत्रित आले. निसर्गाच्या सांनिद्यात बाल मित्रासोबत वेळ घालवायला पुन्हा सज्ज झालो, असही मित्रासोबत वेळ घालवणे हां माझा छंदच आहे. शाळेतील आठवणी त्यांना आजही आठवल्या की, ते पुन्हा पुन्हा त्या पावसात भिजण्याचा अनुभव देतात. मी त्यांचा कडुन काही काळाचा अवधी मागितला. घरी जावून काही खाऊन परतावे असा विचार मनात होता. परंतु ते ही शक्य झाले नाही. एका मित्राच्या दुकानीवर जावुन फ्रेश झालो. प्याटीस खावुन पोटपूजा केली. निसर्गाचा सनिग्द्यात जाणार ह्या विचारानेच खर तर पोट भरले होते. त्यावर बाल मित्रांसह जाणे हां माझ्यासाठी एक सुखद असा अनुभव ठरणार होता. चेतन पाटील, प्रशांत पाटील, मनोज ढोले हे तिघे ही नवीन.............
कार घेवुन मला पिकउप करण्यासाठी आले. कुठे जायचे? कोणते स्पॉट चांगले आहे? हां प्रश्न विचारून त्यानी माझा समोर एक तिढाच निर्माण केला. सायंकाळचे 5:०० वाजले होते. आता जायचे कुठे हां ही एक गंभीर प्रश्नच होता. जास्त विचार न करता अगदी जवळचे व माझे आवडते असे ठिकाण मी सुचवले सर्वानी त्याला होकार दर्शवला. तलोद्यापासुन 4 ते 5 km अंतरावर निसर्गाचा कुशीत वसलेले, सबोताली नैसर्गिक खाण असलेले कोठार हे गाव आहे. उंच उंच टेकडयानी नसलेला हिरवा शालू, पक्षांची किलबिलाट, नागमोडी वळण असलेले रस्ते, विविध पक्षांचे थवे, उंचीवरुन वाहणारे धबधबे, विविध रंगी बेरंगी पक्षी, डोक्यावर चारा घेवुन घराकडे परतना शेतमजूर, सायंकाळच्या वेळी घराकड़े धाव घेणारी गुरे गुराना हाकणारा गुराखी, बैलगाडी हाकत घराकडे पलायन करणारा शेतकरी, अशी विविध दृश्य आम्हास पाहावयास मीळाल्या . रस्तालगत असलेल्या कोठार जलसिंचनात प्रकल्पात(तलाव) पोहण्याचा आनंद घेणारी लहान लहान मंडळी, तलावात विविध पद्धतीने उड्या मारून पोहन्याचा आनंद घेणा-या मुलानी आमचे लक्ष वेधले. तलावाच्या काठावर बांधलेल्या बांदावर सैरावैरा      
धावणारी मुले त्यात काहीतर अगदीच लहान होती मात्र पोहंण्याचा शर्यतीत ते कोणालाही अगदी सहज हरवू शकतील असेच वाटत होते. आम्ही त्यांचे काही क्षण आमच्या कैमेरात कैद केले. त्यानंतर आम्ही कोठारच्या दिशेने पलायन केले. मधेच मनाला मोहित करणारा निसर्ग आमच्या कारला ब्रेक लावुन आमच्या कैमेरात कैद होण्यासाठी विविध रंग छटा दाखवत होता. कधी पहाडावर आलेले पांढृशुभ्र धुके आमच्या कैमरात कैद होत होती तर कधी नागमोडी वळण असलेले रस्ते , कधी खोल अश्या दरी, अश्या विवीध प्रतिमा आम्ही आमचा कैमेरात कैद करुण आपणासाठी देखील आणल्या.. आपण ही जरुर  या..
सातपुडयातील सनिग्द्यात निसर्गाच्या खाणीत. निळे निळे आकाश अन उंच भरारी घेणारे पक्षी, रवी किरणांची उमटली सोनेरी नक्षी हिरवी हिरवी झाडे अन रंगीबेरंगी फुले मोर नाचरे साजरे, पिसारा फुलवून डुले धुंद, मंद वारा अन कोसळणाऱ्या धारा मखमली सुगंधाने भरला आसमंत सारा डोंगराच्या कुशीतून वाहणारी नदी फुला-फळांनी बहरलेली झाडाची फांदी सांजवेळी अवकाशी चंद्र आणिक चांदण्या लाजिरया, साजिरया अन रूपाने देखण्या वर्णू किती देवा ह्या निसर्गाची महती शब्द नाहीत मजकडे सांगण्यास किर्ती देवबाप्पा तुम्ही तर निसर्ग शिल्पकार अन तोच तर आहे मानवा तुझा जीवनाधार न जाणिलेस तू ह्या आविष्काराचे महत्त्व सृष्टी नव्हे तर दिसतेय तुला फक्त तुझे कर्तुत्त्व स्वार्थासाठी करत आहेस तू हे सारेच फस्त स्वतःहून बघणार का रे तूच तुझा अस्त? हे माणसा, आता तरी सोड तुझा अहंकार येईल रे तुझ्या जीवनात कायमचाच अंधकार वाचव ह्या वसुंधरेला सोडून मनातील अहंकार, जप निसर्गाचा स्वाभिमान सोड तु मनातील अहंकार,