Breking News

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६

भाग्य तुझ्या विना.....

मी वाट पाहीन तुझी.....
जीवनात आल्यावर मला खूप काही भेटले. वस्तूही आणि व्यक्तीही.
त्यातलीच एक तू.
 तू माझ्यासाठी विशेष आहेस,
कारण माझ्या मनाच्या प्रत्येक कोपर्‍यावर तुझच राज आहे.

तसं ही माझ्या जीवनात संग नव्हती.
 तू आलीस आणि मला संगही भेटली,
तेव्हाच मला जगण्याचा रंगही कळला.
एकमेकांशी बोलायचो, भेटायचो,
खेळायचो, भांडायचो
आणि पुन्हा एकत्र येऊन हसायचो.
खूप छान होतं सर्वच!

प्रत्येक आठवणी मी तुझ्याशी वाटल्या आणि तू सुद्धा.
मला तर आताही तुझ्याशिवाय काहीच सुचत नाही.

तू माझ्याशी बोललीस की खूप छान वाटयचं.
अगदी हृदयातून मी तुला मिठी मारली असंच व्हायचं.
 तू हसली की जणू गुलाबाच्या कळीवर
दवबिंदूचा चमकणारा थेंबच दिसायचा.

फक्त तू आणि फक्त तूच..
मला तर तुझ्याशिवाय आणखी काहीच सुचलं नाही,
सुचत नाही.अन सुचनार ही नाही.
 असं कसं ग तू माझ्या हृदयात घर केलंस की तुझी क्षणोक्षणी आठवण येते.
प्रत्येक पावलांच्या खुणा मलाच का खुणावतात!  सांग ना.?
 पण आता परिस्थिती वेगळीच झाली.
आयुष्यात पाहिलेले सर्वच स्वप्न आता भंग झाली आहेत. मला पुन्हा खीळखिळायचंय हसायचंय हासवायचंय तुझ्यात रमायचंय...
आठवणींच्या भार कमी करायचंय,
मनसोक्त खूप रडायचं आहे. पण तू नाहीस..
पण हे सगळं माझ्याशीच का? असा मी कोणता गुन्हा केला?
ज्याची मला एवढी भयानक कठीण शिक्षा दिलीस..
माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला खरोखर माफ कर.. मी नाही जगू शकणार तुझ्याविना..
तू माझा जीव की प्राण आहेस..!... ..
       
    
Wish u Happy velentine Day...

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

मैत्री हि हरवली,


ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस ! 
 स्वप्न परीचे पाहिले की तिला सांगायचो, 
 परीचा राजकुमार मीच अशा काही कल्पना करायचो, 



स्वप्नात हि स्वप्ने रंगवत असाच काही वागायाचो, 
 ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस ! 
 मनातल्या भावना तिच्या कडे व्यक्त करायचो,


 उगवत्या सूर्या पासून ते मावलत्या सूर्या पर्यंत फक्त तिच्या गोष्टी करायचो, 
 रात्रीच्या चंद्रा कडे पाहुन तिच्याच स्वप्नात डुबायचो, 
 ती नेहमी म्हणायची पण ऐक्नार्यातला मी कोण...? 


स्वप्ने पहाता-पहाता इतका काही गुंतलो, 
 की पुन्हा वास्तव्यात येन स्वप्न होउन राहिले, 
 मैत्री हि हरवली, परी हि हरवली, राहिला तर फक्त पचतावा....! 
 अस तुमच्या सोबत होउन देऊ नका

तुझी आठवण

देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे..

रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे





      तुझी आठवण येते तेव्हा
   तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
   तु येणार नाहीस माहित असतं
  डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..

एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल

तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस |
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस ||

तो ढग बघ कसा
बरसण्यासाठी आतुरलाय
तुझ्या चिंब गालावरुन ओघळला
म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय
-
माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.
-



येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही.
-
आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
-
तेव्हा सागर किनारी साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू
तो चंद्र ढगात लपता........
-
नजरेत जरी अश्रू असले
तरी ओठावर हास्य असाव
ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.
-



कसे करू माफ़ तुला
जे घाव तू मला दिले......
घेऊन माझी फूले
तू काटेच मला दिले......
-
डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला,
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला.
-


आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना...
कळलेच नाही, कधी रडु लागलो...
-
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
-
मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का?
ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६

सुंदर छायाचित्र

                                            काहि फोटोच सर्व काहि बोलुन जातात.. ...








तळोदा महाविद्यालयाचा संजय वळवी याला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक..

तळोदा महाविद्यालयाचा संजय वळवी याला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक....
सुविधा द्या आम्ही आम्ही काहीतरी करून दाखवू अशी आर्त हाक अनेक वर्ष नंदुरबार जिल्हातील खेळाडू देत आहेत, त्याचाच प्रत्यय किसन तडवी ने दाखवून दिले मात्र किसन तडवी पाठोपाठ अक्कलकुवा तालुक्यातील सोजरीबर येथील मूळ रहिवासी असलेल्या व आश्रम शाळेत शिकणारा विद्यार्थी संजय वळवी याने नुकत्याच रांची येथे झालेल्या वनवासी आश्रम अंतर्गत पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं असून अक्कलकुवा तालुक्या सह पाठोपाठ नंदुरबार जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पुन्हा एकदा नेले आहे. तळोदा महाविद्यालयाच्या विद्यार्थी संजय सुंडा वळवी याने रांची झारखंड येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 5000 मिटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले आहे. 10 एप्रिल 1995 रोजी सल्लीबार ता.अक्कलकुवा येथे जन्मलेला संजय हा वेलिमता आश्रम शाळेचा माजी विद्यार्थी असून इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यन्तचे शिक्षण त्याने वेली माता आश्रम शाळेत पूर्ण केले. संजय सध्या तळोदे येथील महाविद्यालयात एस.वाय.च्या वर्गात शिकत असून नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम तर्फे रांची येथील राष्ट्रीय स्पर्धेत 5000 मीटर धावण्यात सुवर्ण पदक मिळवून आपल्या विभागाला गौरव प्राप्त करून दिला आहे. या स्पर्धेत भारतातील नेपाळसह 29 राज्यातील स्पर्धक सामील झाले होते. या आधी केरळ येथे झालेल्या ऑल इण्डिया क्रॉस कंट्री स्पर्धेत 120 वा तर 2015 मध्ये झालेल्या याच स्पर्धेत संजय हा अखिल भारतीय स्तरावर 56 वा आला होता. वनवासी कल्याण आश्रम तर्फे झालेल्या स्पर्धेत मात्र सुवर्ण पदकाची कमाई त्याच्या मेहनतीला मिळलेल फळ होय.