Breking News

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८

ओंकार काका गाढे तळोदा गणेशोत्सवाचे एक आकर्षण

गणरायावर विशेष श्रद्धा असणारे तळोदा येथील ओंकार शंकर गाढे हे मागील 50 वर्षापासून सार्वजनिक दादा गणपती मंडळात सक्रिय आहेत. दरवर्षी गणरायाच्या स्थापनेपासून मूर्तीची विटंबना होऊ नये याकरिता देखरेखेची जबाबदारी त्याच्याकडे असते. त्याकरिता 11 दिवस मंडपातच त्याचा पडावा असतो. शेवटल्या दिवशी कागद व बांबू पासून साकारलेले प्राणी व पशुचे प्रतिकात्मक अवतार धारण करून ते मिरवणूकित सहभागी होतात. मागील 50 वर्षांपासून अखंडीतपणे सुरू असलेल्या हा अवतारी उपक्रम आजही मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहे. ओंकार गाढे यावर्षी कुठला अवतार बनवतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. यंदाचा मिरवणुकीत गाढे यांनी अश्व तयार केले होते. अश्वनृत्य पाहण्यासाठी बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. ओंकार गाढे हे हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. ओंकार गाढेचे सार्वजनिक दादा गणपती मंडळाला लाभलेले कार्य उल्लेखनीय आहे. यावरूनच त्यांची गणराया बद्दल असलेली श्रद्धा लक्षात येते. वयाच्या आकडेवारीत म्हातारपण आलेला पण तरुणाला ही लाजवणारे 67 वर्षीय ओंकार गाढेचा या कार्याला सर्वाच दाद मिळत आहे... ह्यापुर्वी स्व: बाबू परदेशी हे गंणेशोत्सवापूर्वी सवा महीना उपवास करुण विसर्जनाच्या दिवशी हनुमानाचे रूप धारण करत होते. त्यांचे हे रूप पाहण्यासाठी कल्लोळ गर्दी दाटत होती. त्यानंतर ओंकार गाढेनी ही परंपरा कायम ठेवली आहे....

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

संत गोरा कुभार देखावा ठरला आकर्षण

तळोद्यातील बडादादा गणेश मंडळाची ६० वर्षाची परंपरा चिखल मळताना विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले गोरा कुंभार आपल्या बालकाला चिखलात तुडवतात, मात्र त्यावेळी विठ्ठल धावून येत बालकाला कसे वाचवितात हा अविस्मरणीय भक्तीमय प्रसंग तळोदा शहरातील बडादादा गणेश मंडळाने साकारला आहे. सदर जिवंत देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. . तळोदा शहरातील शनिगल्लीतील बडादादा गणेश मंडळाची स्थापना ६० वर्षा पासून करण्यात येत आहे. मंडळाकडून दरवर्षी प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात. यापूर्वी शिवाजी महाराज दरबार, फिरते कमळाचे फुल, गाढवाचे लग्न, जमिनीवर चालणारे विमान, फिरते मंदिर, कडक लक्ष्मी, असे अनेकाधिक जनप्रभोधनात्मक देखावे मंडळाने सादर केले आहेत. यावर्षी जनप्रबोधन देखाव्याची परंपरा कायम ठेवत १९६७ साली राजू ठाकूर यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘संत गोरा कुंभार’ या चित्रपटातील देखावा सादर केला आहे. यात गोऱ्या कुंभराची पांडुरंगावरील असलेल्या अतूट भक्तीचे दर्शन घडविले आहे. भक्त्तीत तल्लीन झालेला गोरा कुंभार हा प्रत्येक घटकात पांडुरंगाचे नाम स्मरण करतो..
एकेदिवशी त्याची पत्नी तानुल्या बाळाची जबाबदारी सोपवून नदीवर पाणी भरण्यास जाते. पांडुरंग नामस्मरनात तल्लीन होऊन कुंभार हा मटकी घडण्याकरिता माती मळनेचे काम करत असतो. दरम्यान चिमुकले बालक किंकाड्या करून जोराजोराने रडू लागते. मात्र भक्त्तीत तल्लीन झालेल्या गोरा कुंभाराला त्याचे भान नसते. बाळ रेंगाळत रेंगाळत पायीखाली येते. भक्त्तीत वेळा झालेला गोरा कुंभार अक्षरशः पाया खाली आपले चिमुरडे बाळ तुडवुन काढतो. त्याची पत्नी पाणी भरून परतल्यावर घडलेला सर्व प्रकार पाहते. पायाखाली रक्तभभाळ अवस्थेत पडलेल्या बाळाला पाहून माझे बाळअअअअअअ अशी जोराची किंचाळी देते. कसे वडील आहेत तुम्ही, स्वतःच्या पोटाचा पोराला पायाखाली चिरडून मारून टाकले. तरी सुद्धा तुला विठलाची पडलीय,
त्यावेळी भानेवर आलेल्या कुंभार सर्व प्रकार पाहून अचंबित होतो. हे कसे घडले त्यावर त्याला विश्वास बसत नाही. तो हमरडा फोडून रडतो. विठला कुठल्या पापाची शिक्षा दिली असा प्रश्न करतो. हे ऐकून त्याची पत्नी विठलाचा अंध भक्त्तीत तुला तुझा स्वतःचा मुलगा दिसला नाही. तू त्याला पाया खाली रोंदले, हत्यारा आहेस तू, पापी आहे. एवढे होऊनही त्या काळ्या विठलाचे नाव काढतोय. ज्याचे तुझ्या पूजा अर्चनाने पोट भरले नाही. तुझा एकुलता एक मुलाचा बळी तुझ्याकडून मागितला. अश्या कठोर हृदयाचा काळ्या देवासाठी माझ्या घरात जागा नाही. या दगडाला बाहेर काढ जर मी हे पहिले केले असते तर आज हा दिवस आला नसता. अश्यावनिक शब्दात राग व्यक्त करून विठलाची मूर्ती घरा बाहेर नेते. तेवढ्यात गोरा कुंभार तिच्या हातातून मूर्ती घेतो. व असा अनर्थ करू नकोस म्हणतो. यानंतर विठलाचे दर्शन होते. अश्या परिस्थितीत सुद्धा तू माझी साथ सोडली नाहीस,
माते तुझ्या मुलांसाठी देवासोबत सुद्धा भाडण्यास तू तयार झाली. जसा आईसाठी तिचा पुत्र तसाच माझ्यासाठी माझा भक्त असे म्हणत विठ्ठल त्या बाळाला जीवदान देतो. या देखाव्यात गोरा कुंभाराची भूमिका पवन गुरव यांनी साकारली तर त्याची पत्नीची भूमिका गौरव गुरव याने साकारली आहे. अत्यंत सात्त्विक असा चेहरा आणि भावना ओतून साकारलेल्या ही भूमिका पाहण्यासाठी आलेल्या भक्ताचा अंगावर शहारे उभे करत आहे. सदर देखावा पाहताना अनेकांचे डोळे पाणावत आहे. देखावा सादरीकरनासाठी निंबा गुरव , भिला गुरव, तुषार गुरव, दिनेश लोहार,नितीन दातीर, रितेश देडगे, महेंद्र गुरव, सनी पाटील, हरीश साळुंखे, सुयोग पाटील, गोकुळ मिस्तरी, राकेश गुरव,सूरज शिंपी, नंदू पाटील, शिरीष भावसार आदींसह सदस्यांनी संयोजन केले...

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

फुलांची उधळण करत पत्रकार संघाचा दीड दिवशीय गणरायाचे थाटात निरोप

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवशीय गणरायाचे आज थाटात विसर्जन करण्यात आले. गुलाला ऐवजी फुलांची उधळण करून पर्यावरणपूरक मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होते.. पत्रकार संघातर्फे सालाबादप्रमाणे दीड दिवशीय गणरायाची विधिवत पद्धतीने स्थापना करण्यात आली होती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्री.ची स्थापना पत्रकार संघाने केली होती. आज सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत गुलाला ऐवजी फुलांची उधळण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सकाळी १० वाजता स्मारक चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. स्मारक चौक मार्गे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. गो.हू. महाजन शाळेतील संकेत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या लेझीम पथकाने आकर्षक नृत्य सादर केले. तर नेमसुशील विद्यामंदिर मधील प्रमोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी नंदुरबार वाजंत्रीवर शिस्तबद्ध पद्धतीने लेघीम नृत्य सादर केले. मारुती मंदिराजवळ आमदार उदेसिंग पाडवी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी . मुख्याध्यापक अजित टवाळे, अतुल सूर्यवंशी, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, भास्कर मराठे, योगेश पाडवी, सुभाष चौधरी, सतिवान पाडवी, नितीन पाडवी, निखिल तुरखिया, भाजपा तालुका अध्यक्ष शाम राजपूत, मनसे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे, पृथ्वीराज राजपूत, प्रा.विलास डामरे, विपुल कुलकर्णी, अनुप उदासी, हेमलाल मगरे, माजी उपसभापती आकाश वळवी, शहादा-तळोदा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे समन्वयक योगेश मराठे, संदीप परदेशी, बबलू माळी, आनंद सोनार, नंदु जोहरी, कल्पेश सूर्यवंशी, संतोष वानखेडे, जयेश सूर्यवंशी, भिका ठाकरे, रसिक वाणी आदींसह सर्व राजकीय पक्षाचे पुढारी, जेष्ठ नागरिक व गणेश भक्त उपस्थित होते. विसर्जन मिरवणुक यशस्वी पार पाडण्यासाठी संघाचे अध्यक्ष प्रा.अशोक वाघ, उपाध्यक्ष ईश्वर मराठे, सचिव सुधाकर मराठे, कोषाध्यक्ष सम्राट महाजन आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले..















   
 










मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

सार्वजनिक दादा गणपती मंडळाचा देखावा घेतोय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव 'कचरों के खिलाडी' आरास मधून नागरिकांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न

तळोद्यात ७२ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक दादा गणपती मंडळ नाटीकेच्या स्वरूपात सादर करीत असलेल्या 'कचरों के खिलाडी' ही आरास लक्षवेधी ठरत असून या ठिकाणी नाटीका बघण्यासासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. या देखाव्यात अस्वच्छता रूपी कचरासुरला मारण्यासाठी विविध सिने अभिनेते येतात व आपल्या शक्तीचा, बॉम्ब व बंदुकीने कचरासुरला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र कचरासुर अशा नायकांच्या शक्तीने नष्ट होत नाही. तर हातात झाड़ू, नैतिक जबाबदारी व योग्य समजदारीनेच अस्वच्छता रूपी कचरासुर नष्ट होईल. हे स्वच्छतेचे व्रत जो स्विकारेल तोच खरा नायक व तोच खरा बाहुबली होय, असा संदेश या देखाव्यातून सादर करण्याचा प्रयत्न सार्वजनिक दादा गणपती मंडळाने केला आहे.. सार्वजनिक दादा गणपती हा तळोदा शहराचा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या व मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री दादा गणपतीवर असलेली श्रद्धा व प्रेम अवर्णनीय आहे. श्रद्धा व समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून मंडळाची ओळख आहे. ७२ वर्षापासुन दरवर्षी विविध आकर्षक व समाजप्रबोधनावर आधारित देखावा सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. यावर्षी प्रबोधनात्मक व राष्ट्रीय मोहिम स्वच्छ भारत अभियानावर आधारातीत जीवंत देखावा 'कचरों के खिलाडी' या देखाव्याने तळोदा शहरातील व तालुक्यातील इतर खेड्यातील गणेशभक्तांची मने जिंकत आहे. यात सीनेअभिनेत्यांचा माध्यमातून स्वछतेचा संदेश दिला जात आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पंतप्रधान व या महानायक अमिताभ बच्चन यांना जनजागृती करण्याची वेळ येते, ही शोकांतिका आहे.या देखाव्यात अस्वच्छतारूपी कचरासुरला मारण्यासाठी केलेले विविध प्रयत्न फोल ठरत असल्याने शेवटी नागरिकांनी हातात झाड़ू घेऊन स्वत:ची नैतिक जबाबदारीची योग्यता समजूनच अस्वच्छतारूपी कचरासुर नष्ट होईल असा संदेश या देखाव्यातून सादर करण्याचा प्रयत्न सार्वजनिक दादा गणपती मंडळाने केला आहे. या नाटीकेची संकल्पना शिक्षक अरुण गुरव यांची असून सादरीकरण मराठा चौकातील बालक व तरुण करीत आहेत. यासाठी मंडळाचे अध्यक्ष राहुल धनगर, उपाध्यक्ष मयूर पाटील, खजिनदार विक्की गुरव, सचिव चेतन मराठे, सदस्य सुभाष शिंदे, रविंद्र गाढे, चंद्रकांत पाटील, चेतन गुरव, प्रशांत गवळे, योगेश पाटील, योगेश परदेशी, संदीप गुरव, गणेश कलाल, राजेंद्र जाधव व सहकारी परिश्रम घेत आहेत. त्यांना नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, न.पा. बांधकाम सभापती भास्कर मराठे, शिवसैनिक संजय पटेल, माजी नगरसेवक प्रल्हाद फोके, नवनीत शिंदे, वसंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे..





आरासमधून मांडली स्थलांतरीतांची व्यथा तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळाचा उपक्रम

आरासमधून मांडली स्थलांतरीतांची व्यथा तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळाचा उपक्रम तळोदा येथील ठाणेदार गल्लीतील सर्वोदय गणेश मित्र मंडळातर्फे स्थलांतराची व्यथा या ज्वलंत विषयावर सजीव देखावा सादर केला आहे. देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

 तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीतील सर्वोदय गणेश मित्र मंडळाची स्थापना २3 वर्षापासून करण्यात येत आहे. यापुर्वी कारगिल युद्धातील शहीदांना श्रदांजली, बारा ज्योतिर्लिंग दर्शन, स्त्रीभ्रूण हत्या, बाल कामगार रोखणे, भूत महल, शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा स्वातंत्र्य संग्रामातील यशोगाथा, बेटी बचावाचा संदेशसह, धार्मिक, पौराणिक, देशभक्तीपर, देखावे सादर केले आहेत.. या वर्षी *स्थलांतराची व्यथा* या ज्वलंत विषयावर आरास तयार केली आहे. गावाकडे रोजगाराचे साधन नाहीत, शासनाचे सतत बदलणारे धोरण, आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतीत होणारे आर्थिक नुकसान आदींवर मार्ग काढणे कठीण होते. शासनाच्या भरवश्यावर न राहता स्वत:च रोजगार कसा मिळेल यासाठी अनेक कुटुंबे गावोगावी भटकतात. वीटभट्टी, इमारत बांधकाम, रेती काढणे यासारखे मिळेल ते काम करून जगण्यापुरतीच मजूरी पदरात पडली तरी ते समाधानी राहतात. परंतु रोजगाराच्या या भटकंंती मुळेच आरोग्याचे गंभीर प्रश्न, तसेच वर्षातील ७ ते ८ महिने रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागल्याने मुलांचा शिक्षणाचा प्रश्न, गरोदर माताचे व कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमानात वाढ झालेली पहावयास मिळते. या ज्वलंत विषयावर सर्वोदय गणेश मंडळातर्फे आरास स साकारण्यात आली आहे. यात एक गरीब कुटुंब आर्थिक परिस्थितीशी झुंजत असल्याचे दाखवले आहे. कुटुंब प्रमुख असलेला श्यामने
कामासाठी अटीतटीचे प्रयत्न करून ही त्याच्या नशिबी निराशाच येते. कुटुंबाच्या दै. गरजा पूर्ण होत नाहीत. मुला बाळाच्या शिक्षणापेक्षा त्यांचे पोट भरणे अवघड होते. या करिता रोजगाराच्या शोधात श्याम कुटुंब घेऊन शहराकडे उदरनिर्वाहासाठी जातो. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतो. मात्र शहरात आल्याने त्याच्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम झाल्याने मुलगा अपयशी झाल्यावर नैराश्यातून आजारी पडतो. मात्र श्यामकडे पैसे नसल्याने तो मुलाचे उपचार करु न शकल्याने मुलगा दगावतो. तर यातून श्याम पूर्णपणे खचून दारुच्या आहारी जाऊन त्याचाही व्यसनामुळे मृत्यू होतो, असे देखाव्यातून दाखविण्यात आले आहे. अशाप्रकारे स्थलांतरीय कुटुंबाची व्यथा सजीव देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न सर्वोदय गणेश मित्र मंडळाने केला आहे. यात पप्पू साळवे, कल्पेश चौधरी, जितेंद्र चित्ते, कुशल चौधरी, गुंजन चौधरी, शुभम ठाकरे, हर्ष किनगावकर, संदेश देवरे, जयेश चित्ते, उमेश पाटील, रोहित कलाल, समीर ठाकरे आदींनी अभिनय केला आहे. मंडळाचे अध्यक्ष गणेश चौधरी, उपाध्यक्ष किरण ठाकरे, सचिव राकेश साळवे, खजिनदार दीपक पवार सदस्य दीपक चौधरी, उमेश ठाकरे, नरेश चौधरी, दीपक सूर्यवंशी, कुणाल ठाकरे आदींसह सदस्यांनी देखावा सादरीकरणासाठी परिश्रम घेतले..

तळोद्यात भाजपाला खिंडार

 पदाधिकाऱ्यांनी नाशिक मेळाव्यात केला कॉँगेसमध्ये प्रवेश मागील काही महिन्यांपासून भाजपात नाराज असलेले जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. विलास डामरे यांनी नुकताच नाशिक येथे काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत इतर १५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.. संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात विभागीय मेळावा नाशिक येथे घेण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील,युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे , माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवृत्त वनक्षेत्रपाल लक्ष्मण पाडवी, लक्ष्मण माळी, माधव मराठे, भिमसिंग ठाकरे, शाहीद पठाण, इस्माईल शेख, प्रविण पाडवी, माजी नगरसेवक भरतसिंग राहसे, शिक्षक आघाडीचे एस.डी.पाटील, भाजप युवा मोर्च्यांचे उपाध्यक्ष अमृत पावरा, राहुल पाडवी, जत्र्या पावरा,
अस्लम पिंजारी,सेवा निवृत्त प्राचार्य अशोक वाघ, शिक्षक आघाडीचे एस.एम. महिरे आदींनी कॉग्रेसमध्ये प्रवेश घेतला.यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, काँग्रेसचे तळोदा शहराध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक सतीवान पाडवी, बापू कलाल, तळोदा-शहादा समन्वयक योगेश मराठे, लक्ष्मण पाडवी,कुणाल चौधरी उपस्थित होते.प्रा.विलास डामरेंसह अनेकांनी भाजपात प्रवेश केल्याने शहरात एकच चर्चा सुरू आहे..

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

कचरा संकलनासाठी स्वखर्चातून दारोदारी फिरणार घंटागाडी

तळोद्यातील प्रभाग क्र.२ च्या नगरसेवकांचा उपक्रम अनेकवेळा फोन करूनही पालिका कर्मचारी येत नाही, कचरा साचून असतो, दुर्गंधी पसरते, रोगराई निर्माण होते, यासारख्या समस्यांवर पर्याय काढत तळोदा येथील प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक अनिता परदेशी व हितेंद्र क्षत्रिय यांच्या संकल्पनेतून स्व-खर्चाने कचरा संकलनासाठी घंटागाडी तयार करण्यात आली आहे. या वाहनाची जबाबदारी एका गरजू महिलेकडे राहणार असून ती प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन कचरा संकलन करणार आहे. मोबदल्यात त्या महिलेस १ रुपया द्यावा लागणार आहे. एक रुपयातूनच महिलेच्या पगाराची सोय होणार असून रोजगार प्राप्त होणार आहे.. दररोज एक रुपया देऊन परिसर होणार स्वच्छ तळोदा येथील प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व अनिता परदेशी यांनी नवनवीन उपक्रम राबवून एक वेगळी छाप निर्माण केली आहे. विविध समाजपयोगी कामांमुळे ते जिल्हाभरात परिचित आहेत. पालिकेमार्फत कचरा व्यवस्थापनाचा ठेका अनेकवेळा विविध कारणास्तव बंद पडतो. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे नियमित कचरा संकलन करणे कठीण होते. परिणामी दुर्गंंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. यावर मार्ग निघावा यासाठी नागरिक पालिकेत चकरा मारतात, अनेकवेळा या कारणांमुळे वाद उफाळण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर कायमचा मार्ग काढत एक नामी शक्कल प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेवकांनी लढवली आहे. पालिकेवर अवलंबून न राहता प्रत्येकाने स्वावलंबी व्हावे, 'हम सब का एकही नारा साफ सुधरा हो प्रभाग हमारा' हा विचार ठेवून त्यांनी स्व-खर्चाने एक कचरा संकलन वाहन तयार केले आहे. या वाहनाची जबाबदारी एका गरीब महिलेकडे सोपविण्यात आली आहे. सदर वाहन नियमितपणे प्रभाग क्र.२ मध्ये दारोदारी जाऊन कचरा संकलन करणार आहे. पर्यायी प्रत्येक घरातून १ रुपया या महिलेस द्यावयाचा आहे. या एक रुपयातूनच या महिलेला पगार दिला जाणार आहे. त्या माध्यमातून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार असून चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटणार आहे. लग्न, समारंभ, वाढदिवस आदी कार्यक्रमस्थळी सदर वाहन दिवसभर उभे राहणार आहे. गणेश चतुर्थीचे औचित्य साधत रिद्धी-सिद्धी मंदिरात नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी, योगेश मराठे, छोटू चौधरी यांच्या उपस्थितीत या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. .