Breking News

गुरुवार, २१ मे, २०१५

सातपुड्यातील केसर आंबा सातासंमुद्रापार

सातपुड्यातील केसर आंबा सातासंमुद्रापार
 सातपुड्याच्या सौंदर्यात उंच-उंच टेकड्यासह विविध जाती प्रजातींचे वृक्षांचे वेगळेच महत्व आहे. काळानुपुर वृक्ष संपदा कमी होवुन, सातपुडा बोड़खा होवु लागला असला तरी आजही विविध प्राणी पक्षी ह्यांचे अस्तित्व टिकून आहे. सातपुड्यातील रानमेव्यास तेवढेच महत्व असुन राज्यासह परराज्यातून आलेले पर्यटक याची चव चाखल्याशिवाय येथून परत नाही. शुद्ध वातावरण, सेंद्रिय खतांच्या वापरातून उत्पादीत केलेले बोर, आवळा, सिताफळ ह्यासह स्ट्रॉबेरीला सिझननुसार मागणी वाढते. याच सातपुड्याचा कुशीतील गोपाळपुर येथील ` केसर' आंबाने सातासमुद्र ओलांडून तो विदेशातील लोकांचा पसंतीचा बनला आहे. ६० एकरच्या आमराईतील केसरसह विविध जातीचा आंबा राज्यचा कानाकोपऱ्यासह दुबई, इंग्लैंडसारख्या देशात पोहचला आहे. तर येथील आमराई सातपुड्याच्या सहलीवर आलेल्या पर्यटकानां आकर्षित करीत आहे. नंदुरबार जिल्हा हां सातपुड्याच्या पायथ्याशी बसला आहे. विशेषतः तळोदा, अक्कलकुवा, व धड़गाव हे तालुके सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात आहेत. या तालुक्यांमधे भौतिक सुविधा
नसल्या तरी सातपुड्यातील वनसंपदा आजही टिकून आहे. काळानुरूप वृक्षतोड़ झाल्याने आज सातपुड्याच्या डोंगर बोड़खा दिसून येतो. मात्र याच दऱ्याखोऱ्यामधे आदिवासी बांधव बोर, आवळा, सिताफळ, स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतात. शुद्ध वातावरण सेंद्रिय खतामुळे आरोग्याला चांगले असलेल्या या फळाना, सर्वत्र खुपच मागणी असते. तळोदा,तालुक्यातील गोपाळपुर येथील किर्तीकुमार राणा ह्या प्रगतशील शेतकाऱ्याने ६० एकर क्षेत्रात वनराई उभारली आहे. ह्या वनराईतील केसर आंबा हां राज्यातील कानाकोपऱ्यासह दुबई व इंग्लॅण्डसारख्या देशात निर्यात होवु लागला आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या ह्या आंब्याला विदेशातून मागणी वाढली आहे. ह्या आमराईतील श्री राणा ह्यांनी केसर सह हापुस, तोतापुरी, राजापुरी, गावठी, लंगड़ा अश्या विविध जातीच्या आंब्याचे उत्पादन घेत आहेत. यावर्षी उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्याने ४० लाखाला आंबे काढण्याचा ठेका घेतला आहे. श्री राणा हे आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करतात त्यांना २००४ ह्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे ह्यांच्या हस्ते उद्यानपंडीत पुरस्काराने गौरवन्यात आले आहे. १७ वर्षापुर्वी कीर्तिकुमार राणा ह्यांचे आजोबा स्व. रघुवीरसिंग राणा यांच्या आजोबाच्या संकल्पनेतून उभी राहिलेली गोपाळपुरची आमराई पाहन्याचा मोह अनेकांना होतो. हे विशेष, तर ह्या आमराईतील आंबा हां राज्यातील नंवे तर विदेशातील लोकांचा आवडीचा होत असल्याने साहजिकच त्याची मागणी वाढली आहे.....
                                         *आमराईत भटकंती करताना, 
                                            *आमराईची पाहणी करताना,
                                              *केसर आंब्याची चव घेताना,
                                      *आंब्याचा सावलीचा गारवा अनुभवताना,
                        *चटकदार, चवदार, दर्जेदार सातपुड्यातील केसर आंबा,



                                                             *बहरलेली आंब्याची बाग़

सोमवार, १८ मे, २०१५

अंसारी यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक


आजच्या धावपळीच्या जीवनात प्रामाणिकपणा कमी होत चालला आहे,
मात्र काही उदाहरणातून आजही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. अशीच एक घटना तळोदयात घडली आहे. टैक्सीत पाँच ग्राम सोने व दोन हजाराची हरवलेली रोकड़ चालकाने महिलेच्या स्वाधीन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा येथील एक विवाहिता आपल्या दोन मुलांसह शहादा येथून तळोदा प्रवासादरम्यान मुलांच्या खेळणी काढण्यामुळे पाँच ग्राम सोने व सुमारे दोन हजाराची रोकड़ असलेली पर्स टॅक्सी (क्र एम्.एच.39-7488) मधे हरवली. सदर बाब दुसऱ्या दिवाशी महिलेच्या लक्षात आली. त्यामुळे पर्सचा शोध सुरु झाला. सदर महिलेने शहादा येथील माहेरी आई व भावाला फोन करुण विचारणा केली. मात्र त्यानीही घरी शोध घेतला. मात्र पर्स न सापडल्याने कदाचित पर्स टैक्सीत राहिले असावे. अशी शक्यता धरून चालकाच्या शोध घेतला. टॅक्सी चालाक अनीस अंसारी यांची भेट घेवुन त्यांना विचारणा केली असता श्री अंसारी यांनी क्षणाचाही विलंब न करता पर्स असल्याचे सांगीतले. व सदर पर्स नातेवाईकांच्या स्वाधीन केले. पर्स उघडुन पाहीले असता त्यात सर्व ऐवज सुरक्षीत होते. चालकाच्या प्रामाणिकपणा म्हणुन श्री. अनिस अंसारी यांना बक्षिस रूपाने काही पैसे देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नम्रपने नाकारले. मागील १२ वर्षापासुन टॅक्सी चालवित असुन अनेक प्रवाशांचा वस्तु वाहनात राहतात. मी दिवसभरातुन पाच वेळा नमाज पठण करतो. या वस्तु ग्राहकांना परत देताना मला समाधान लाभत असल्याचे अन्सारी यांनी दै. पुण्यनगरीशी बोलताना सांगितले दरम्यान अंसारी यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे...

रविवार, १० मे, २०१५

लाकडी बैलगाडे संपुष्टात


तळोदा तालुक्यात सध्या मशागतींच्या कामांना शेतकर्‍यांनी वेग दिला असून खरिप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरीवर्ग सज्ज झाला असून मशागतींसाठी लागणार्‍या लाकडी औजारे व लाकडी बैलगाडे संपुष्टात आले आहेत. ग्रामिण भागात लाकडी साधनांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. मशागतीसाठी लागणार्‍या नांगर, पांभर, वखर, टिकाव, फावडी, कोळपे आदी प्रकारच्या लाकडी औजारांची ग्रामिण भागात कमतरता जाणवत असून त्याजागी लोखंडी औजारांचा प्रामुख्याने शेतकरी वर्गाकडून वापर करण्यात येत आहे. ग्रामिण भागात सुरुवातीच्या काळात लाकडी औजारांची दुरुस्ती गावातील सुताराकडून धान्याचा मोबदला देवून करण्यात येत होती. परंतु आता चांगल्या प्रकारच्या लाकडांची उणीव जाणवत असल्याने त्याचप्रमाणे ते बनविण्यासाठी खर्च व वारंवार दुरुस्ती करावी लागत असत.काम चालु असताना बिघाड झाल्यास काम सोडून घरी येणे भाग पडत असत. यासाठी लाकडी
औजारांच्या जागी लोखंडाची औजारे शेतकरी वर्गाकडे दिसत आहेत. या औजारांना वारंवार दुरुस्तीची आवश्यकता भासत नाही. भासते तर तत्काळ दुरुस्ती करणारा कारागिर तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावात उपलब्ध होतो. मात्र लाकडी औजारे दुरुस्ती करणार्‍या कारागिरांचा ग्रामिण भागांमध्ये तुटवडा जाणवत असतो. तालुक्यातील ग्रामिण भागांमध्ये लाकडी बैलगाडे संपुष्टात आली असून त्याजागी लोखंडी बैलगाड्यांचा सर्वत्र वापर दिसून येत आहे. लोखंडी बैलगाडे जास्त कालावधीपर्यंत टिकत असते. त्याचप्रमाणे वारंवार दुरुस्तीची गरज पडत नसल्याचे मत शेतकरी सांगतात. सध्या तालुक्यात मशागतींच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर प्रामुख्याने करताना दिसून येत आहे.
बहुतेक शेतकर्‍यांनी आपली बैलजोडीची बाजारपेठेत विक्री केली असल्याचे मत अनुभवी शेतकरी सांगतात. अल्पभूधारक शेतकर्‍यांना बैलजोडी सध्या परवडण्यायोग्य नसल्याचे समजते. यांत्रिक साधनांच्या वापरात दिवसेंदिवस वाढ होत असून तालुक्यातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना दिसून येत आहेत. नवनविन   प्रयोग शेतकर्‍यांकडून  करण्यात येत आहेत. यामुळे आर्थिक उत्पादनात वाढ होताना दिसून येत आहे....