Breking News

सोमवार, ३१ जुलै, २०१७

हातोडा पूल तत्काळ सुरु करावा तळोद्यातील पालकांसह नागरीकांचे जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदन
 हातोडा पुलाचे काम पूर्ण होताच उद्घाटनासाठी विलंब न करता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता व रुग्णवाहिकेसाठी सदरचा पुल सुरु करावा, अशी मागणी तळोदा शहरातील पालक वर्ग व नागरिकांनी केली आहे.. याबाबत जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींना पालक व नागरीकांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा महत्वाचा दुवा समजला जाणारा हातोडा पुलास विविध अडचणीमुळे विलंब होत आहे. मागील वर्षापासून तारीख पे तारीखचा सिलसिला सुरु आहे. हातोडा पुलाचे या शैक्षणिक वर्षात उद्घाटन होईल. या आशेवर अनेकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश नंदुरबार येथे जिल्हास्तरीय शाळेते केले आहेत. मात्र हातोडा पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव हे अतिदुर्गम भागाचे अंतर कमी व्हावे. या दूर दृष्टीकोनातून शासनाने दि.२८ फेब्रुवारी २००९ पासून तापी नदीवर तळोदा हातोडा सज्जीपुर- नंदुरबार असा हातोडा पुलाचे बांधकाम सुरू आहे. तापी नदीला येणारा पुर, निधीची समस्यांसह वेळोवेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे पुल चर्चेचा विषय बनला आहे. मागील आठ वर्षांपासून पुलाचे बांधकाम सुरू आहे. येत्या दि.१५ ऑगस्ट रोजी हातोडा पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली असता सध्या अध्र्याहून अधिक रस्त्याचे डांबरीकरण अद्याप बाकी आहे. अप्रोच रस्त्याची लेव्हलिंग करणे, रेलिंग करणे, साईडपट्टया बांधणे, पाणी निचरा होण्यासाठी पाईप जोडणी आदींचे कामे बाकी आहेत. आ.उदेसिंग पाडवी यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हातोडा पुलाचे उद्घाटन करणार असल्याचे सांगितले आहे. सध्याची स्थिती पाहता पुलाचे उद्घाटन लांबण्याची शक्यता आहे. तळोदा येथून नंदुरबार येथे येण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रकाशा मार्गे लांब अंतराचा प्रवास करुन यावे लागते. म्हणून कामे पूर्ण होताच उद्घाटनासाठी विलंब न करता हातोडा पूल तात्काळ सुरू करावा, अशी मागणी पालक वर्ग व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, खा.डॉ.हिना गावीत, आ.चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, गटनेते भरत माळी यांच्याकडे केली आहे. निवेदनावर चेतन पवार, डॉ.अमर राजकुळे, मुकूंद वाघ, ॲड.सरजू शहा, निमेश सूर्यवंशी, मुकेश वाणी, राम सूर्यवंशी, अमोल गुजराती, संदेश सूर्यवंशी, सूर्यकांत पिंपरे, दिनेश पाटील, सचिन सुगंधी, जितेंद्र जावरे, डॉ.पंजराळे, मुकेश कर्णकार यांच्यासह ५० पालकांची नावे आहेत..


 

महावितरणने केला पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत!

तळोदा तालुक्यातील नऊ ग्रा.पं.कडे ३५ लाखांची वीज बिले थकीत .

 तळोदा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेची सुमारे ३५ लाख ८६ हजाराची वीजबील थकबाकी असल्याने सदर विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यातच पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाण्यासाठी नागरीकांना भटकंती करावी लागत आहे. सुमारे २० टक्के वीज बिले भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असा कठोर पवित्रा विद्युत वितरण कंपनीने घेतला आहे. म्हणून लोकप्रतिनिधींची पैश्यांसाठी जुळवाजुळव सुरु आहे.. तळोदा तालुक्यात ३१ कोटींपेक्षा अधिक वीजबिले थकीत आहेत. यात पाणीपुरवठा योजनेचे एकूण ७१ ग्राहक असून त्यापैकी ४९ ग्राहकांवर १ कोटी ५० लाख इतकी वीजबिले थकली आहेत. त्यात तालुक्यातील नळगव्हाण ग्रामपंचायतीकडे ३ लाख २५ हजार, राजविहीर ४ लाख ४७ हजार, भवर ४ लाख ९९ हजार, धवळीविहीर ४ लाख ६२ हजार, दलेलपूर ४ लाख ६८ हजार, रापापूर ४ लाख ५५ हजार, नर्मदानगर, ३ लाख २७ हजार, लहान सोमावल ३ लाख दोन हजार, भागलपूर ३ लाख एक हजार रुपये अशा एकूण नऊ ग्रामपंचायतीच्या ३५ लाख ८६ हजार रुपयांची वीज बिले थकली आहेत. म्हणून या नऊ ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचे विजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. विद्युत वितरण कंपनीने वीज बंद करण्याची पूर्व सूचना ग्रामपंचायतींना दिल्यानंतरही सरपंचांनी वीजबिले भरली नाहीत. म्हणून पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. याबाबत ग्रामस्थांना काही माहिती नसल्याने त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच पाण्यासाठी नागरीकांसह गुरांचेही हाल होत आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक महावितरणकडे जावून वीज बिलात तडजोड करण्यास विनंती करुन बिले भरण्यासाठी पैश्यांची जुळवाजुळव करीत आहेत. मात्र पाणी पुरवठा योजनांची थकीत वीज बिले भरल्यानंतरच वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे..
 महावितरणने केला पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत! तळोदा तालुक्यातील विज बिले भरण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना कळविले होते. तगादा लावूनही थकीत वीज बिले भरली जात नसल्यामुळे पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. थकबाकीदार ग्रामपंचायतींनी २० टक्के प्रमाणे वीजबिले भरणे आवश्यक आहे. अन्यथा थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींचा देखील पाणी पुरवठाचा विज पुरवठा खंडीत करण्यात येईल.. -सचिन काळे . (उपमुख्य कार्यकारी अधिकारी तळोदा).



शनिवार, २९ जुलै, २०१७

डॉ.बाबासाहेबांच्या तळोदा भेटीस ३० जुलैला ८० वर्ष पूर्ण!

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळोदा भेटीला
दि.३० जुलै २०१७ रोजी ८० वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून डॉ.बाबसाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तळोदा येथील समाज परिवर्तनवादी संघर्ष समितीतर्फे रविवारी (दि.३०) विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.. तळोदा तालुक्यासह शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तळोदा शहराला अनेक महापुरुषांनी भेटी दिल्या आहेत. यात दि.३० जुलै १९३७ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तळोद्यास भेट दिली असल्याचे जाणकार मंडळी सांगतात. धुळे शहरात कोर्टाच्या कामकाजासाठी सन १९३७ मध्ये शहरातील प्रेमसिंग तवंग नावाच्या वकीलांकडे खटला चालविण्यासाठी डॉ.बाबासाहेबांना बोलविण्यात आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी दि.३१ जुलै १९३७ रोजी शहरातील मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या लळींग किल्ल्यावरील लांडोर बंगला येथे मुक्काम करीत शहराची माहिती घेतल्याची नोंद आहे. त्याचदरम्यान त्यांनी तळोदा शहरालाही भेट दिली असल्याचे जुने जाणकारांकडून सांगण्यात येते. दि.३० जुलै १९३७ रोजी होळीच्या सहाय्याने गुजरातकडून सज्जापुर हातोडा मागे बाबासाहेबांनी भेट दिली. जुलै महिन्यात पावसाच्या सरी कोसळत होत्या, पाऊसामुळे चिखलाचा अंदाजा न आल्याने त्यांचा पाय चिखलात गेल्याने त्याकाळी १४ रुपये किंमतीचे महागडे बुट चिखलात खराब झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात येते. तळोदा शहराचे जहागीरदार
स्व:रणछोड गुरुजी  
अमरजित बारगळ यांचे आजोबा  शंकरराव बारगड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत केले होते. शहरातील महात्मा गांधी छात्रालयात त्यांनी भेट दिली होती. तळोदा शहरातील बबन माळी पहेलवान, संभु चौधरी आदी पहेलवानांसह अनेक मल्ल व विद्यार्थी घडविणारे स्व.रणछोड माळी गुरुजी हे या छात्रालयाचे गृहपाल होते. यावेळी बाबासाहेबांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची विचारपूस करुन त्यांचा गरजा जाणून संवाद साधला होता. तसेच जातांना तेथील शेरे बुकात नोंद करुन गेले असल्याचे स्व.रणछोड गुरुजी यांनी जहागीरदार अमरजीत बारगळ यांना सांगितले आहे. सन.१९९७ मध्ये रणछोड गुरुजींचे निधन झाल्याने ऐतिहासिक सणाचा एकुलता एक वारसदार पडद्याआड गेले आहे. त्यानंतर तहसिलला भेट देऊन शासकीय कामकाज आटोपून डॉ.बाबासाहेबांनी धुळ्याकडे मार्गक्रमण करुन त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह लळींग किल्ल्यावर विश्वासू व लाडके सेवक पुनाजी लळींगकर यांची भेट घेतली. त्यांच्या घरी भोजन करुन डोंगरावरील लांडोर बंल्यावर कार्यकर्त्यांशी भेटीगाठी केल्याची नोंद आहे. तळोदा शहराच्या भेटीबाबत शासकीय नोंदीचा पाठपुरावा सुरू असला तरी अद्याप शासकीय दस्तऐवज हाती लागलेले नाहीत. जुने जाणकार मंडळींच्या तोंडून याबाबत माहिती मिळते. म्हणून सामाजिक परिवर्तनवादी संघर्ष समितीकडून तारीख व शासकीय माहिती इतिहास तज्ञ,
राजवाडे संशोधन मंडळ, जहागीरदार अमरजित बारगड यांच्याकडे माहिती काढली होती. याबाबत ठोस असे पुरावे हाती लागले नसले तरी तत्कालीन पोलीस ठाणे, नगरपालिका, महसुल विभागातील नोंदी यावरून दि.३० जुलै रोजी डॉ.आंबेडकरांनी भेट दिली असल्याचे कळते. याबाबत सतत मागील काळापासून तळोदा भेटीच ऐतिहासिक पुरावे व जुने दस्तवेज शोधून पुरावे गोळा करण्यासाठी परिवर्तन वादी संघर्ष समिती अध्यक्ष राजेंद्र बिरारे, उपाध्यक्ष नथ्थु साळवे, सचिव प्रदीप मोरे, सिद्धार्थ महिरे, प्रा.अशोक वाघ, शशिकांत सोनवणे हे प्रयत्न आहेत. दि.३० जुलै रोजी डॉ.बाबासाहेबांच्या तळोदा भेटीला ८० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी प्रेरणा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तळोदा येथील वामनराव बापू मंगल कार्यालयात सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक डॉ.संजय अपरांती हे मेळाव्यात मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे..



गुरुवार, २७ जुलै, २०१७

धरणामुळे 272 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार

मागील 15 वर्षांपासून रखडलेल्या धनपूर धरणाचे काम पूर्ण झाल्याने सातत्याने लढा देणाऱ्या संघर्ष समितीला खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. या धरणामुळे 272 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. बोरद सह परिसरातील खेड्या पाड्यासह 20 ते 25 गावातील शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होणार आहे. परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होणार असून शेतकऱ्यांचा पाण्याच्या प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
                               1 जुले 1998 रोजी नंदुरबार जिल्हा निर्मीतीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाठबंधारे मंत्री एकनाथ खडसे आदीं उपस्थित असताना कै. पी.के.अण्णा पाटील यांनी धनपूर धरणाचा प्रस्ताव सादर करून या विषयाला चालना दिली. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे नंदुरबार जिल्हा दौरावर असताना भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते लखनजी भतवाल यांच्या साखर कारखान्याच्या विशेष भेटी दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष राजेंद्र राजपूत, प्रवीणसिंग राजपूत, डॉ.शशिकांत वाणी, अजय परदेशी, विजय राणा, संजय चौधरी आदींनी धनपूर धरणाचा आहवाल यावेळी सादर केला. तर निझरी नदीवर धरण व्हावे यासाठी 2003 साली कॉ.जयसिंग माळी, यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय धनपूर संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या समितीत पुरुषोत्तम नारायण पाटील, उदेसिंग पाडवी, विजय चतुरसिंग राणा, कांतीलाल नारायण पाटील, राजेंद्र राजपूत प्रवीणसिंग भटेसिंग राजपूत, उद्धव पाटील, जर्मनसिग वळवी, कै. लालसिंग वळवी, विजय मराठे, ब्रिजलाल चव्हाण, असे 11 सदस्य या संघर्ष समिती स्थापन केली. प्रथम या संघर्ष समितीने 3 सप्टेंबर 2003 साली मोड येथे रस्ता रोको करून आंदोलन केले. त्यानंतर 26 जानेवारी 2005 रोजी आमलाड येथे अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गवार 5 हजार शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यावेळी प्रांताधिकारी रिचा बागला यांच्या मध्यस्थीने तत्कालीन पालक मंत्री शिवणकर यांची भेट घेऊन चर्चा करून आंदोलन स्थगित करण्यात आले. या बैठकीनंतरच धरणाला खरी चालना मिळाली. मात्र या धरणाचा क्षेत्रात वनविभागाची पाडळपूर, धनपूर, सावरपाडा, राणीपुर, खर्डी पेठे, आदी परिसरातील जमीन जात असल्याने तेवढी जमीन वनविभागाला शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात शासकीय दरात धनपूर धरणाचा मोबदल्यात देण्यात आली. व यामुळे धनपूर धरणाचा कायमचा मोठा अडसर असलेला प्रश्न सुटला. हे धरण पूर्ण होण्यासाठी माजी खासदार माणिकराव गावित, माजी पालकमंत्री ऍड.पद्माकर वळवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार स्वरूपसिंग नाईक, यांनी
शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला, तर विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांनी 2016 साली अर्थ समितीचे अध्यक्ष आमदार आशिष देशमुख यांच्या सबोट जाऊन धनपूर धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. व त्याच वेळी विशेष निधीतून 9 कोटी रुपी या धरणाच्या कामासाठी पदरी पाडून घेतले. व धनपूर धरणाचा प्रश्न मार्गी लागला.... त्यामुळे हे धरण पूर्ण झाले. व जून 2017 पासुन या धरणाच्या पाणी साठवण केली जात आहे. हे धनपूर धरण पूर्ण झाल्याने बोरद परिसरातील मोड, मोहिदा, कडमसारा, धनपूर, सिलिंगपूर, पाडळपुर, खर्डी, लाखपूर, फॉ. न्युबन, छोटा धनपूर, राणीपुर आदी गावातील 272 हॅकटर जमीन ओलिता खाली येणार आहे. या परिसरातील शेती बागायती होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. व शेतकऱ्यांचे राहणीमान उंचवूंन सुखी समाधानी होणार आहेत. हा परिसर पूर्णपणे आदिवासी परिसर असून सातपुड्यावर राहणारा आहे. आदिवासी बंधूं आहेत. त्यांच्या परिसरातील बदल झाल्यावर मुलांच्या क्षिकणाकडे कल झुकणार आहे. यासाठी धनपूर धरण हे या परिसरातील आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश होता तो कायमचा सुटला आहे. या धरणाची लांबी 422 मीटर असुन उंची 20.18 मीटर तर 160 मी. खोली आहे. पाण्याची पातळी वाढण्यानंतर कमी अधिक प्रमाणात धरणाचे पाणी, निझरी नदीत सोडण्यात येणार आहे. या धरणामुळे परिसरातील बोरवेल मध्ये, पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेहमीचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. हा परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. 15 वर्षानंतर या धरणाचे काम पूर्ण स्वरूपाने परिसरातील शेतकऱ्यांची स्वप्न पूर्ती झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाचे लोकप्रतिनिधीचे, व विशेषतः धनपूर धरण संघर्ष समितीचे आभार मानले आहेत. या धरणाला तत्कालीन मुख्यमंत्री ना.मनोहरराव जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, यांच्या शासनाने मंजुरी दिली. या धरणाच्या तत्कालीन पाठबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांच्या विशेष प्रयत्नाने या धरणाला चालना मिळाली आहे. हे धरण धनपूर येथे व्हावे यासाठी कै. पी.के अण्णा पाटील यांनी कृती आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला होता. तेव्हापासून धरणाच्या कामाला सुरुवात झाली होती. विशेषतः यावर्षीच शेतकऱ्यांना या धरणाचा फायदा जाणवू लागला आहे. परीसरातील खालावलेली पाण्याची पातळी या धरणामुळे वर आली आहे.











तळोदा पालिकेचे आरक्षण जाहीर...

 तळोदा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अ जा, अ ज, ना मा प्र, आणि त्यामधील महिला व
सर्वसाधारण महिला संबंधी आरक्षण सोडती द्वारे प्रभाग निश्चित करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी तथा करण्यात आले आहे निवडणूक उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेत काढण्यात आले तळोदा नगरपरिषदचे सार्वत्रिक निवडणुक २०१७ चा आरक्षण व सोडत कार्यक्रम आज पालिकेचा आवारात घेण्यात आला. यावेळी निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र सैंदाणे, कार्यालयीन लिपिक नितीन शिरसाठ तसेच माजी नगरसेवक सुभाष चौधरी, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, पंकज राणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष जगदीश परदेशी, सेनेचे तालुकाध्यक्ष अनुप उदासी, संजय पटेल, आनंद सोनार, बापू कलाल, गणेश पाडवी आणि पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.... यावेळी एकुण ९ प्रभागातील १८ जागांसाठी अनुसूचित जाती (एस सी), अनुसूचित जमाती (एस टी), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्यांमधील महिला व सर्वसाधारण महिला यांचे प्रभागनिहाय आरक्षण प्रेमकुमार गबा अहिरे या मुलाच्या हस्ते ईश्वर चीट्टी द्वारे काढण्यात आले. त्यानुसार
प्रभाग १ मध्ये अ अनुसूचित जमाती (एस टी) ब सर्वसाधारण महिला.
प्रभाग २ मध्ये अ अनुसूचित जाती (एस सी) ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला.
प्रभाग ३ मध्ये अ अनुसूचित जमाती महिला (एस टी) ब सर्वसाधारण व्यक्ती.
प्रभाग ४ मध्ये अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला. ब सर्वसाधारण व्यक्ती.
प्रभाग ५ मध्ये अ अनुसूचित जमाती (एस टी) ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला.
प्रभाग ६ मध्ये अ अनुसूचित जमाती महिला (एस टी) ब सर्वसाधारण व्यक्ती.
प्रभाग ७ मध्ये अ अनुसूचित जमाती (एस टी) ब सर्वसाधारण महिला.
प्रभाग ८ मध्ये अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला.
प्रभाग ९ मध्ये अ अनुसूचित जमाती महिला (एस टी) ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
याप्रमाणे अनुसूचित जमाती (एस टी) साठी ६ जागा त्यांपैकी ३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती साठी १ जागा तसेच नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी ५ जागा त्यांपैकी ३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी ३ जागा राखीव आहेत आणि सर्वसाधारण व्यक्तियांसाठी ३ जागा याप्रकारे एकुण १८ जागांसाठी आरक्षण निघाले आहे. आज काढण्यात आलेल्या प्रभागातील आरक्षण सोडतीवर व प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्य पदांचा आरक्षणाची रहीवासांचा माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविण्याकरिता २४ जुलै पर्यंत प्रसिद्धी करणे. हरकती व सूचना यांवर कार्यवाही साठी २४ जुलै ते ३१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे....

चांदसैली घाटात दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत.

सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक असणाºया चांदसैली घाटात ठिकठिकाणी दरडी
 कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यातच धुक्यांमुळे या घाटातील प्रवास सध्या अधिकच जिकरीचा झाला आहे. चांदसैली मार्ग हा धडगावला जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा सर्वात कमी अंतराचा मार्ग आहे. त्यामुळे तळोदा, नंदुरबार, परिसरातील वाहनधारक धडगावला जाण्यासाठी चांदसैली घाटमार्ग जाणे अधिक पसंत करतात. या मार्गाने वेळेसह पैशांचीही बचत होते. शिवाय सातपुड्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागाला जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडणारा चांदसैली घाट हा महत्त्वाचा दुवा आहे. यामुळे दिवसभर या घाटात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मागील आठ ते दहा दिवसापासून सातपुड्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. दरवर्षाप्रमाणे या घाटात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मागील दोन वर्षापेक्षा या वर्षी घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्याभरात चांदसैली घाटात पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. दरडी कोसळल्याने घाटातील रस्त्यांच्या कडेला माती व दगडांचा ढिगारा साचला असून, अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीचे ढिगारे रस्त्यांवर पसरले असून, अर्धा रस्ता साकला गेलेला आहे. आधीच घाटात रस्ता अरूंद व त्यातच रस्त्यावर साचलेल्या मातीच्या ढिगाºयांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत घाटातून वाहने चालवावी लागत आहे. अनेक ठिकाणी मातीच्या ढिगाºयांमुळे रस्त्यावर चिखल निर्माण झाला असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रकारही घडत आहेत. या प्रकारांमुळे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचप्रमाणे मागील दोन दिवसात चांदसैली घाट परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने घाटात दिवसभर दाट धुके दिसून येत आहे. या धुक्यांमुळे घाटातील रस्ता हरवल्यासारखी स्थिती निर्माण होते. अगदी पाच ते सहा फुटांवरील वाहनेदेखील नजरेस दिसून येत नाही. आधीच या घाटात ठिकठिकाणी दरडींमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने त्यात दाट धुक्यांची भर झाल्याने घाटातून प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने घाट रस्त्यावर कोसळलेल्या मातीचे ढिगारे हटविण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घाटातून प्रवास करताना वाहनधारकांना मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. घाटात सुरक्षा कठडे चांदसैली घाटात अनेक ठिकाणी संरक्षक कठडे बसवायची गरज असून, संरक्षक कठड्यांअभावी प्रवाशांचा जीव टांगणीला असतो. या विषयी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून संरक्षक कठड्यांची मागणी लावून धरल्यामुळे चांदसैली घाटात ठिकठिकाणी नव्याने संरक्षक कठडे बसविण्यात आले आहेत.



अतिवृष्टी काळात धरण व नदीपरिसरात सावधानतेने फिराण्याचा सूचना

तळोदा सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यात मुसळधार पाऊस होत तालुक्यातील धनपुर व बोरद परिसरास वरदान
ठरलेल्या धनपुर धरण दीड महिन्याचा पावसात पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने जलसाठा साठवणूक झाल्याने सांडवल वरून पाणी वाहतअसून ओव्हरफ्लोअ झाल्याने निझरी नदी खळखळून वाहत आहे धरण भरल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे धरण परिसरात तहसीलदार व संबधित विभागाचे अधिकाऱयांनी भेट देऊन पाहणी केली नागरिकांनी अतिवृष्टी काळात धरण व नदीपरिसरात सावधानतेने फिराण्याचा सूचना दिल्या आहेत. तळोदा तालुक्यातील धनपुर धरण गेल्या १४वर्षांपासून रखडले होते आमदार उदयसिंग पाडवी यांचा प्रयत्नातून ९ कोटी निधी उपलब्ध झाला होता एकूण २६ कोटी खर्च लागलेल्या या लघुप्रकलपात ३.१८ द ल घ मीटर पाणीसाठा झाला आहे धरण परिसरात एकूण २७२ हेक्टर जमीन सिंचना खाली येणार असून शेतकऱयांना रब्बी व खरीप हंगामात पिकांना पाणी उपलब्ध होणार आहे परिरात भुर्गभातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल शेतकरी आर्थिक उन्नती साधण्यात मदत होईल आप्रिल मे महिन्यात पूर्ण झालेल्या धनपुर धरण दीड महिन्याचा पावसात पूर्ण क्षमतेने जलसाठा झाला असून धरणाचा सांडवल वरून ओसंडून वाहत आहे धरण परिसरात तहसीलदार योगेश चंद्रे यांनी संबंधीटविभागाचे अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे धरण परिसरात जातांना ग्रामस्थानीं सावधान सतर्क बाळगावी अश्या सूचना परिसरात दिल्या आहेत. धरण असलेल्या निझर नदी खळखळून वाहत आहे मोड,मोरवड,खेडले या भागातील गावात पाणी शिरलं होत यामुळ काही घरात व शेतात पाणी शिरून काही प्रमाणत नुकसान झालं आहे दरम्यान या बाबत तहसीलदार योगेश चन्द्रे यांच्याशी संपर्क केला असता कोणतेही जीवित नुकसान झालं नसून शेतात शिरलेले पाणी ओसरले आहे ,आता सांडवाच्या सुरक्षित जागेतून पाणी वाहत आहेत अति वृष्टीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठी घर असलेल्या ग्रामस्थांनी पुराचा पाण्याचा पासून सावधानता बाळगावी असे असे आवाहन केले आहे

बुधवार, २६ जुलै, २०१७

शासकीय मदतीसाठी मयताच्या वडिलांची अधिकारी लोकप्रतिनिधीकडे चकरा!


 धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तळोदे शहरातील दोघा भावांचा तोल जाऊन नदीत पडल्याने त्यांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना धडगाव तालुक्यात बिलगाव येथे वर्षभरापूर्वी घडली होती. या घटनेचा शासकीय पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी अधिकारी व लोकप्रतिनिधीनी भेटी देऊन शासकीय शासकीय निधी मिळवून देण्याचे पालकांना आश्वासन दिले होते. या घटनेला काल सोमवारी एक वर्ष पुर्ण झाला आहे. मात्र शासकीय निधीसाठी मयताचे वडील गेल्या 6 महिन्यापासून प्रशासनाच्या दारी चकरा मारत आहेत. अधिकारी त्यांना कागदोपत्राची पूर्ततासाठी वेळोवेळी त्यांची दिशाभूल करीत आहेत. यामुळे मुलांच्या अपघाती निधनानंतर मनाने खचलेले वडील शरीरानेही खचले असून त्यांना संबंधीताना वेळीच शासकीय मदत उपलब्ध करून धीर देण्याची गरज आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की; धड़गाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या बिलगाव येथे "बारामुखी" धबधबा आहे, पावसाळ्यात नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.यात तरुण वर्गाचा मोठा प्रमाणात समावेश असतो. तळोदे शहरासह जिल्ह्यातील तरुणांचे ग्रुप बिलगाव येथील धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी हजेरी लावतात. मागील वर्षी तळोदयातील सात मित्रांचा ग्रुप बिलगाव येथे सहलीसाठी गेला होते. त्यातील काही तरुणधबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी उतरले असता त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने, त्यातील राहुल पाटील व विशाल पाटील हे दोघे सखे भाव पाण्यात बुडाले. यावेंळी बाकीच्या तरुणांनी मानवी साखळी करून त्याना वाचविण्याचा पर्यन्त केले मात्र त्यांना यश आले नाही. पाण्यात बुडल्याने दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याबाबत पंचनामा करून शासकीय सोपस्कार करण्यात आले. यावेळी मयताच्या कुटूंबियांना सांत्वन देण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पो.अधिक्ष राजेंद्र दहाडे, यांच्यासह आमदार उदेसिंग पाडवी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी भेटी दिल्या होत्या. अधिकारी व लोकप्रतिनिधीनी मयताच्या कुटुंबियांना सांत्वन करताना नियमानुसार शासनकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या घटनेला वर्ष होऊन देखील अद्याप शासनाकडून मदत उपलब्ध करण्यात आली नाही. या मदतीसाठी शिवसेनेचे जेष्ठ नेते यांच्याशी देखील संपर्क करण्यात आल्याचे कळते.मयताचे वडील देविदास पाटील हे जिल्हा बँकेत शिपाई पदावर कार्यरत असून त्यांनी दरम्यानच्या काळात आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली आहे. याबाबत देविदास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, शहादा प्रांताधिकारी कार्यालय, तळोदा प्रांताधिकारी व तहसील कार्यालय, धडगाव पो.ठाणे व तहसील कार्यालयासह मुंबई मंत्रालयात निधीसाठी पाठपुरावा केला आहे. मात्र प्रयत्न सुरू आहे. असे त्यांना सांगितले जात आहे.देविदास पाटील हे मुलांच्या निधनानंतर खचले आहेत. तर मदतीसाठी आता त्यांना शासकीय दरबारी चकरा माराव्या लागत असल्याने शरीराने ही खचत असल्याचे त्यांना चेहऱ्यावरील भाव सांगतात. संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने मदतनिधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.




गुरुवार, १३ जुलै, २०१७

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज तळोदा क्रीडा संकुलाचे उदघाटन

आपले तळोदे- तळोदा तालुक्यातील क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहत असलेल्या तालुका क्रीडासंकुल लोकार्पण सोहळा पर्यटन मंत्री तथा जील्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा हस्ते आज होणार आहे. या सोहळ्याला खासदार हिनाताई गावित आमदार उदयसिंग पाडवी जिल्हाधिकारी मलीनाथ कलशेट्टी, तसेच क्रीडायुवक सेवा संचानालय नाशिक विभाग संचालक जयप्रकाश दुबळे तसेच उपविभागीय अधिकारी तळोदा अमोल कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या क्रीडा संकुलाचे लोकार्पण व्हावे याकरिता तळोदा शासकीय विश्राम गृहात आमदार उदेसिंग पाडवी यांचा प्रमुख अध्यक्षतेखाली विविध सदस्यच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी तळोदा तहसीलदार योगेश चन्द्रे, जिल्हाक्रीडाधिकारी घानश्याम राठोड कार्यकारी अभियानता अनिल पवार आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहादा व तळोदा तालुका क्रीडा संकुलाच्या हस्तांतरण तसेच इतर म्हत्वपुर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. शनिवारी दिनांक १० रोजी शहादा व तळोदा या दोन्ही ठिकाणच्या तालुका संकुलाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे ठरले.. तळोदयातील आय. टी. आय. कॉलेजचा शेजारी तालुका क्रीडा संकुलाचा बांधकाम करण्यात आले आहे. याकरिता आमदार उदेसिंग पाडवी यांनी क्रीडा संकुलाचा निर्मितीकडे विशेष लक्ष दिले आहे. लवकरच क्रीडा संकुल तयार होवून त्याचा उपयोग खेळाडूंना घेता येनार आहे. क्रीडा संकुलला रंग रंगोटी करून लोकार्पनासाठी तयार करण्यात आले आहे, येत्या 10 तारखेला पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार हिना गावित, आमदार उदेसिंग पाडवी आदींच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा संकुलाचे उदघाटन होणार आहे. या क्रीडा संकुळामुळे शहरातील व तालुक्यातील खेळाडूं व क्रीडा पटूंना हक्काचं स्थळ उपलब्ध होणार आहे, संबंधित ठेकेदाराने अद्याप पावेतो संकुलाची इमारत क्रीडा संकुल प्रशासनाकडे हस्तांतरित केलेली नसल्याने क्रीडा प्रेमींचा हिरमोड होत होता, इमारत हस्तांतरित झाल्यानंतरच क्रीडा संकुलाचा इमारतीत बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आदी खेळांचे तर परिसरात खो - खो, कबड्डी आदी खेळांसाठी आवश्यक असणारे साहित्य व त्यासाठी लागणारे मैदान तयार करता येणार आहे, क्रीडा संकुलाचे जवळपास काम पूर्ण झाले आहे. आणि उर्वरित काम झाल्यानंतर शहरातील व तालुक्यातील खेळाडूंना सरांवासाठी आपल्या हक्काचे मैदान उपलब्ध होणार आहे. या सर्व खेळांना त्याद्वारे एकप्रकारे चालना मिळण्यास मदत होणार आहे....


तळोदा शहर हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी.

 तळोदा शहरात राष्ट्रीय एकात्मता बंधु भाव सामाजिक सलोखा राखणे प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे समाज सलोख्यासाठीची भूमिका कौतुकास्पद असून मराठी पत्रकार संघाचा या विविध उपक्रमातुन दिसून येते. असा सुर उपस्थित मान्यवरांनी इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केला. तळोदा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर, हिन्दू - मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, आ उदेसिंग पाडवी हे होते. तहसीदार योगेश चन्द्रे, पोलिस उप अधीक्षक शिवाजी गावित, पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे, न पा गटनेते भरत माळी, भाजपा प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, मौलाना शोएब रजा नूरी, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, पंकज राणे, अजय परदेशी, निसार मक्रानी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, अनिल माळी, हेमलाल मगरे, डॉ.स्वप्नील बैसाने, अकबर शेख, अकील अंसारी, रईसअली अब्बास अली, इम्तेयाज कुरैशी, शब्बीर पिंजारी हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे, संदीप परदेशी, अदि उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी, मल्लिनाथ कलशेट्टी, आमदार उदेसिंग पाडवी, मौलाना शोएब रजा नूरी, निसारदादा मक्राणी, आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की; इफ्तार पार्टी मुळे जातीया सलोखा जपन्यास मदत होते बंधुभाव भाईचारा अधिक वृंदिगत होतो तसेच तळोदा शहरात पूर्वीपासून असलेल्या या दोन्ही पंथियांचे एकीचा संबंधाचे दाखले दिलेत. हिन्दु - मुस्लिम या दोन्ही पंथियांनी गुण्या गोविंदयाने रहात, शहराची शांतता कशी टिकून राहील या बददल ही मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात तळोदा शहराला समाज कंटकांमुळे लागलेला डाग पुसून काढण्यास दोन्ही समाजाच्या वतीने प्रयत्न झाले पाहीजे.. तळोदा शहराचे नाव राज्यभरात हिंदू मुस्लिम एकतेसाठी ओळखले जाईल. तसेच मराठी तालुका पत्रकार संघाने असे प्रभोधणात्मक कार्य पुढेही सुरु ठेवावे अशी अपेक्षा सर्वांनी आपल्या मनोगनत व्यक्त केली. यावेळी मुस्लिम समाजातील लहान बालकांचा संपूर्ण एक महीना रोजे केलेल्या बालकांचा प्रमुख अथितींचा हस्ते सत्कार करुन त्यांना गिफ्ट देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. शेवटी सर्वांना केळी, खजूर व शरबत वाटप करण्यात आले, मुस्लिम बांधवांनी फराळ खाऊन आपला उपवास सोडले कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक सर्व क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सचिव उल्हास मगरे यांनी केले तर सूत्र संचालन फुंदीलाल माळी व आभार संघाचे सदस्य सुधाकर मराठे यांनी मानलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ईश्वर मराठे, सचिव उल्हास मगरे, विकास राणे, फुंदीलाल माळी, सुधाकर मराठे, किरण पाटील, चेतन इंगळे, राकेश पवार, तुषार नाईक, नरेश चौधरी अक्षय जोहरी आदींनी परिश्रम घेतले...











बुधवार, १२ जुलै, २०१७

वीजबिल भरण्याकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

जनजागृतीचा अभाव : १३ हजारपैकी ४७८ ग्राहकांनी भरले ऑनलाईन बिल ऑनलाईन

 महावितरणने ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, तळोदा तालुक्यात १३ हजार ग्राहकांपैकी केवळ ४७८ ग्राहकांनीच या सुविधेतंर्गत वीजबिलाचा भरणा केला आहे. यामुळे ग्राहकांनी या सुविधेला प्रतिसाद न देता चक्क याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. एकूण महावितरण विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. महावितरण मोबाईल अँपद्वारे महावितरणच्या सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. विजबिल भरणा करणो आदींसह विविध समस्यांचे निराकरण घरबसल्या व्हावे, याकरिता महावितरण विभागाकडून विविध ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तळोदा तालुक्यात १३ हजार १९0 एवढी विजग्राहकांची संख्या आहे. यातील थकबाकीधारकांकडे ३१ कोटींपेक्षा अधिक बिलांची थकबाकी आहे. वीजबिल भरणा करण्यासाठी वीजवितरण विभागांना विविध उपयोजना करण्यात आल्या आहेत. वीजबिल भरण्यासाठी वीजबिल भरणा केंद्राजवळ अनेक ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत होती. तालुक्यातील ग्राहकांना वीजबिल भरणा करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागत होती. यामुळे वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. शिवाय वेळ व पैसाही वाया जात होता. यामुळे महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय मोबाईल अँपवरही सदर सुविधा उपलब्ध आहे. मात्र या सुविधेकडे ाग्राहकांनी पाठ् फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. १३ हजार १९0 ग्राहकांपैकी जानेवारी महिन्यात १५२ ग्राहकांनी चार लाख ६४ हजार, फेब्रुवारी महिन्यात १५४ ग्राहकांनी तीन लाख २७ हजार तर मार्च अखेरीस १७२ ग्राहकांनी चार लाख सात हजार एवढाच वीजबिल भरणा केला आहे. त्यातही औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांनीच ऑनलाईन वीज बिल भरणा केल्याचे समजते. वीजवितरण विभाग याबाबत जनजागृती करण्यात कमी पडत असल्याने ग्राहकांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांनी वेळ वाचवून घरच्या घरी सदर बिल अदा करणो गरजेचे आहे. मात्र आदिवासी बहुल जिल्हा असून तालुक्यातील काही भाग दुर्गम भागात वसला आहे. यामुळे विविध अडचणी निर्माण होवून अनेकांना ऑनलाईन वीजबिल भरणा करता येत नाही. याबाबत संबंधित विभागाने कार्यक्षाळेचे आयोजन अथवा ठिकठिकाणी ऑनलाईन भरणा करण्याबाबत मार्गदर्शक फलक लावून जनजागृती करणो गरजेचे आहे.

ऑनलाईन पेमेंट  घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक,  शेतीपंप
जानेवारी २0१७ ग्राहक वसूली १0६ ६९000 २३ २४, ८000 २३ १४, ७000 00 00 १५२ ४६,४000 
फेब्रुवारी २0१७ ग्राहक वसूली १0५ ६९000 २२ ८१,000 २३ १,६३,000 0४ १४,000 १५४ ३२,७000
मार्च २0१७ ग्राहक वसूली १२0 ८४,000 २७ १,३५,000 २४ १,६७,000 0१ २१,000 १७२ ४0,७,000 



 

तळोदा तालुक्यातील विजग्राहकांकडे तब्बल 31 कोटी विज बिल थकले

तळोदा तालुक्यातील विजग्राहकांकडे तब्बल 31 कोटी विज बिल थकले असून हि
रक्कम वसूल करण्यासाठी लवकरच विज कंपनी सरसावणार आहे. शिवाय भारनियमातही लवकरच वाढ करण्याचे संकेत कंपनीने दिले आहे... तळोदा तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात विज पोहचावी याबाबत युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. विज मिटर मिळण्याबाबत असंख्य ग्राहकांचे अर्ज दररोज कार्यालयात येत आहेत. ग्रामीण भागासह शहरात देखील विज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच कोट्यवधीने थकीत असलेल्या विजबिलामुळे विजमंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक उपाय करून हि थकीत जमा होत नसल्याने.. विज मंडळ विविध उपाय योजना राबवत आहे. तळोदा तालुक्यात सर्वप्रकारची 13 हजार दोनशे 21 एवढी ग्राहक संख्या आहे. यात बहुतांश ग्राहकांकडे साधारणतः 32 कोटी एवढी थकबाकी आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये, औद्योगिक, व्यावसायिक घरगुती, आदींच्या समावेश आहे. तर सर्वाधिक वीज बिल शेतक-यांकडे थकीत असून त्याच्या आकडा 26 कोटी वर गेला आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चाललेला आहे. भारतीय जनता पक्षाचे व शिवसेनेचे युती।सरकार आल्यानंतर शेतकरऱ्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र युतीच्या सरकार कडून आश्वासन पूर्तता झाली नाही. आश्वासनाच्या भरोस्यावर अनेक शेतकरी अद्याप हि प्रतीक्षेत आहेत. आस्मानी सुलतानी संकटाना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागते. याविविध कारणांमुळे ग्रामीण भागातून शेतक-यांनी कृषीपंपाची वीजबिले आदी बिले थकली आहेत. शेतकरी हवालदील झाले असताना बिल भरण्यास विविध संकटे येत आहेत. यांच्या फटका मात्र विजवितरण विभागाला होत आहे. विज कंपनीकडून घरगुती विज ग्राहकांवर कारवाई सुरू करण्यात आली असुन विजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांचा विज पुरवठा खंडित केला जात आहे. विज गळती व विज चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. तालुक्यात ठिकठिकाणी भर दुपारी देखील पथदिवे सुरु असतात. अनेक शासकीय कार्यालय, बँका, आदी ठिकठिकाणी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित नसताना हि ac पंखे, कुलर आदींच्या गैरवापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यातून नाहक विज वाया होत आहे. याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. अश्या विविध कारणामुळे विज कंपनिला प्रचंड आर्थिक नुकसानिला सामोरे जावे लागत आहे.

*विजग्राहक*                               *संख्या*                         *थकबाकी* 
घरगुती ग्राहक                               6522                        86 लाख 40000
व्यावसायिक ग्राहक                        566                         13 लाख 23000
औद्यीगिक ग्राहक                          187                         2 लाख 7 हजार 
तालुक्यात पाणीपुरवठा                   70                          1 कोटी 2 लाख 23000 
शेतीपंप                                          5784                     26 कोटी 63 लाख 33000
पथदिवे                                           92                        2 कोटी 47 लाख 92000

तालुक्यात एकूण 13221 ग्राहक संख्या असून 31 कोटी 15 लाख 23 हजार एवढी थकबाकी आहे... 

*विजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची टीम बनवण्यात आली असून विजबिल थकीत असलेल्या ग्राहकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीसा बजावूनही बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे तात्पुरता स्वरूपात विज खंडीत करण्याचे कामे सुरु आहेत. दिर्घकाळा पासून विजबिल भरणा न करणाऱ्या ग्राहकांचे कायमस्वरूपी विज खंडीत करण्याचे कामे सुरू आहेत. तालुक्यात रिक्षा फिरवून बिल भरण्याचे आव्हान करने सुरु आहे. ग्राहकांना विज बिले भंरण्याचे आव्हान सहाय्यक अभियंता सचिन काळे यांनी केले आहे.*

तळोद्याच्या सरवारे दांम्पत्याने समाजापुढे एक नवा आदर्श

स्वत:साठी तर सर्व जगतात. मात्र, जे जिवंतपणी व मृत्यूनंतर देखील दुसर्‍यांसाठी जगतात ते खरच आदर्शवत ठरतात. जिवंतपणी समाजासाठी देह झिजवत असलेले पण मृत्यूनंतर देखील देहदान करून मानवतेसाठी सर्व काही अर्पण करणार्‍या तळोद्याच्या सरवारे दांम्पत्याने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तळोदा शहरातील वरिष्ठ महाविद्यालयाचे माजी हिंदी विभाग प्रमुख प्रा.पुरुषोत्तम शंकरसा सरवारे (कलाल, वय ८३) व त्यांच्या अर्धांगिनी सौ.लीलावती सरवारे (वय ७७) यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्र विभागाला त्यांचे देह सूपूर्द केले जाणार आहे.
 वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना चिकित्सा व संशोधनासाठी मानवी देहाची गरज असते. परंतु देहांच्या अभावापोटी ते योग्य शिक्षण घेऊ शकत नाही. या विद्यार्थ्यानी आपल्या देहाचा उपयोग करून मानवी शरीराची रचना अभ्यासून चिकित्सक बनावे व पुढे आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत रुग्णांवर योग्य उपचार करून रुग्णांचे जीवन वाचवावे, अशी प्रा.पुरुषोत्तम सरवारे यांची इच्छा असून यासाठी त्यांनी आपल्या मृत्युपत्रात सुद्धा आपल्या देहदानाचा संकल्प लिहून ठेवला आहे. पतीच्या देहदानाने प्रेरित होऊन त्यांच्या पत्नी सौ.लीलावती सरवारे यांनी देखील पतीप्रमाणो देहदानाची इच्छा आपल्या मुलांजवळ मांडली. मुलांनी संमती दिल्याने या उभयतांची देहदानाची संकल्पपूर्ती त्यांच्या मरणोत्तर त्यांचे मुले योगेश सरवारे, डॉ.हेमंत सरवारे, पंकज सरवारे, मुलगी सौ.श्यामला नारायण सोनवणो हे करणार आहेत.
                                       प्रा.सरवारे यांनी पुणो विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले असून तळोदा येथील कॉलेज ट्रस्टचे ते माजी कार्यकारिणी सदस्य होते. त्यांनी हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी तळोद्यात हिंदी सेवा संघाची स्थापना केली. सध्या ते जेष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष असून ते उत्कृष्ट हिंदी सूत्रसंचालक आहेत. सरवारे दाम्पत्याचा देहदानाच्या संकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.


मृत्यूनंतर सदगती मिळते या अंधश्रद्धेपायी शरीर जाळून नष्ट करण्याऐवजी चामड्यासह सर्व शरीराचा अधिकाधिक उपयोग मानवजातीला व्हावा, सर्व अवयवांच्या गरजू व योग्य लोकांना फायदा व्हावा, जास्तीत जास्त लोकांना देहदानाची प्रेरणा मिळावी, या हेतूने आम्ही देहदानाचा निर्णय घेतला आहे. कालबाह्य रूढी-परंपरा तसेच वेळ व पैसा वाचविण्यासाठी आमच्या मृत्यूनंतर उत्तरकार्य देखील पाच दिवसाचे व त्यात फक्त गोती कुटुंबच सहभागी होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. प्रा.पुरुषोत्तम शंकरसा सरवारे (कलाल)