Breking News

प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ जुलै, २०२०

हेच तर खरं प्रेम असतं.


डोळयातून वाहणारं पाणी कोणी तरी पाहणारं असाव..
 ह्रदयातून येणार दु:खकोणी तरी जाणणारं असाव.
'मनातून येणा-या आठवणी कोणी तरी समजणारं असाव..'
जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असावं...
आठवण येताचं जे मनाला रडवतं..
रडताना जे ओठांनवर हसू आणतं,
हसताना जे डोळ्या तून ह्रदयात उतरतं..
ह्रदयातून जे श्वासात
दरवळतं हेच तर खरं प्रेम असतं...

शनिवार, २१ मे, २०१६

.चारोळ्या

साथीला आता तु नाहीस,
हे ह्रदयाला कसं समजावु,
अविरत पाझरणार्‍या डोळ्यांना,
 तु नसण्याचं शल्य कसं दाखवु.....

तुझ्या पासुन दुर होण,
माझ कोणतही पथ्य नाही....
कारण फक्त एकच की, पुन्हा एकदा प्रेमात पडुन,
विरह सहन करण आता मला शक्य नाही....।।

प्रत्येक वेळी भेटीच वचन मीच मागायचं का
पहा कधीतरी स्वताहून देता आल तर...
पाखर सुद्धा भेटतात परस्परांच्या ओढीन
 बघ त्यांच्या कडून काही घेता आल तर .

मनाला बांध घातला होता
हृदयातला पूर थोपवला होता..
पण डोळ्यांनी चुगली केली
होती अन आसवांनी दगा दिला होता.

कधि तू कधि मी
एकमेकांशी भांडू ....
राग ओसरल्यावर
मात्र पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू.....

आजकाल कोणाशी जास्त पटत नाही..
बोललेल कोणाला आवडत नाही..
जवळ असलेलेच मग दूर होताना..
क्षणाचाही विचार करत नाही..

बोटांना माझ्या आता वेगळं
राहायला आवडत नाही ..
तुझ्या बोटात गुंतल्या शिवाय
त्यांना ही करमत नाही ....

रविवार, ८ मे, २०१६

याडं लागलं ग याडं लागलं गं

याडं लागलं ग याडं लागलं ग
याडं लागलं ग याडं लागलं ग रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं वास ह्यो उसात येई कस्तूरीचा चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं चांद भासतो दिसाच मावळाया लागलं आस लागली मनात कालवाया लागलं गं याडं लागलं ग याडं लागलं गं…

रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
सांगवना बोलवणा मन झुरतया
दुरून पळतया टळतया वळतया
माग फिरून सजल गा धजल गा
लाज काजल सारल

येंधल हे गोंधळल
 लाड लाड गेल हरून भाळल
अस उरात पालवाया लागलं
ओढ लागली मनात चालवाया लागलं याडं लागलं ग याडं लागलं गं…



सुलग ना उलगना जाळ आतल्या 
आतला, दुखन हे देखन ग ऐकलंच हाय, साथीला काजळीला उजाळल, 
पाझळुन ह्या वातीला चांदणीला,  आवताण धाडतोय रोज रातीला, झोप लागणं सपान जागवाया लागलं, पाखरू कस आभाळ पांघराया लावतोया

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

मैत्री हि हरवली,


ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस ! 
 स्वप्न परीचे पाहिले की तिला सांगायचो, 
 परीचा राजकुमार मीच अशा काही कल्पना करायचो, 



स्वप्नात हि स्वप्ने रंगवत असाच काही वागायाचो, 
 ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस ! 
 मनातल्या भावना तिच्या कडे व्यक्त करायचो,


 उगवत्या सूर्या पासून ते मावलत्या सूर्या पर्यंत फक्त तिच्या गोष्टी करायचो, 
 रात्रीच्या चंद्रा कडे पाहुन तिच्याच स्वप्नात डुबायचो, 
 ती नेहमी म्हणायची पण ऐक्नार्यातला मी कोण...? 


स्वप्ने पहाता-पहाता इतका काही गुंतलो, 
 की पुन्हा वास्तव्यात येन स्वप्न होउन राहिले, 
 मैत्री हि हरवली, परी हि हरवली, राहिला तर फक्त पचतावा....! 
 अस तुमच्या सोबत होउन देऊ नका

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०१५

हुबेहूब चित्र तुझे




हुबेहूब हे चित्र तुझे तरी
काय कमी न त्यांत कळे?
ओठ गुलाबी, गहिरे डोळे
त्यांत परी ना तूच कुठे!


हुबेहूब हे शिल्प तुझे तरी
काय कमी न त्यांत कळे?
हसरा चेहरा, सुडौल बांधा
त्यांत परी ना तूच कुठे!



घेता हात हातांत तुझा मी
कळले मज ते काय उणे
हुबेहूब हे चित्र, शिल्प तरी स्पर्श,
गंध त्यां तुझा कुठे?




निरभ्र आकाश,
झरे खळाळते चंद्र
तूच अन तूच चांदणे
उमलते फुल, तान मधुर पहाट
तूच अन तूच धुके आकाश,
धुके हे चंद्र, चांदणे फुल,
तान जरी रूप तुझे पहाट
धुक्यापरी सर्व हि खोटे कारण.........
स्पर्श, गंध त्यां तुझा कुठे?

गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

प्रेम भावना

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का?
 माझ्या मनाच्या कोपऱ्यात नयनांच्या माझ्या पापण्यात थोडा वेळ विसावशील का ?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
 तुझ्या एका नजरे साठी असतो सदा तुजपाठी मज भरकटलेल्या जीवन मार्गावर आणशील का?
 माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
 एकच ध्येय माझ्या जगण्याचे तुला माझी झालेली बघण्याचे करण्या मज इच्छापूर्ती तू पुढे येशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
 तुझ्यात असतो मी गंभीर करतेस मज तू अधीर शेवटचे मागणे ..
हाती हात देशील का? माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

शुक्रवार, ८ जून, २०१२

अजूनही जागवलेस तू


नात्यात बांधुनी मला
रडता हसवलेस तू.....
डोळ्यांत झोप येता
स्वप्नात जागवलेस तू......
काही शब्द तुझे होते
काही मी दिले
शब्दांच्या या खेलात
नवे अर्थ आले
काही अर्थात माझ्या
भाव आणलेस तू...
ओळख होती नवीच
जुने काही वाटायचे
तुझ्या नसन्या च्या ओलखितहि
मी मला भेटायचे
काही माझ्या ओलखिच्या
जाणीवेत आलास तू....
नसे जरी काही आपल्यात
आपलेच काही असायचे
नसताही भाव नात्यात
भाव मला शोधायचे
काही माझ्या भावाला
प्रेम दिलेस तू........
रात्र ती संपली नाही
डोळ्यांत मी जागली
तुझ्या ओढित जायचे
स्वप्नासाठी झोपली....
काही माझ्या स्वप्नासाठी
अजूनही जागवलेस तू.....

गुरुवार, २४ मे, २०१२

कुणीतरी असावे प्रेम करणारं

कुणीतरी असावे आपल्यावर प्रेम करणारं
आयुष्याच्या वाटेवर टेच लागली तर सावरणार
कुणीतरी असावे आपल्यावर जीव लावणार
आपल्या मनातील गोष्ट न सांगताच ओळखणार
मी हि अश्याच दिवसाची वाट पाहतेय
भेटेल का मला असे कोणी ?
ज्याला पाहता क्षणी हृदयाचा ठोका चुकवा
असेल का असा कोणी ?
सुख दुक्खाचे सारे क्षण सोबत घालवावेत
आयुष्याची स्वप्ने एकमेकांच्या डोळ्यात पहावीत
भेटेल का मला अस कोणी
ज्याला पाहता दूर होतील साऱ्या दुखः यातना
एकमेकांच्या सहवासात पूर्ण होतील साऱ्या मनोकामना

मलाही वाटत

                                                           मलाही वाटत


                                                    मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                                     आणि आपण दोघांनी प्रेम कराव.....

                                                       मलाही वाटते तुझ्या हातात हात घालून
                                                       तुझ्या खांद्यावर डोके ठेऊन शांत बसाव,,,

                                                   मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं
                                                  मलाही वाटते तुझ्या डोळ्यात डोळे घालून
                                                   सगळ्या जगाला विसरून जावं.......

                                                मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                     भेटायला तू आल्यावर आपण दोघांनी पावसात भिजावं
                                त्या चमकणाऱ्या वीजाच्या आवाजाने घाबरून तुझ्या जवळ यावं
                                                         मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                                       कधीतरी तू मला स्वताहून जवळ घ्यावं
                                                          तुजे माझ्यावर प्रेम वसावं
                                                        मलाही वाटत तुजे माझ्यावर मन याव ,
                                                     मी तुझ्या bike वर बसाव तू ब्रेंक दाबलास
                                                         कि तुझ्या मुद्दाम जवळ याव
                                                    मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                                    मलाही वाटते तुजे माजे लग्न व्हावं
                                                माझे नाव सगळ्यांनी तुझ्या नावासोबत घ्यावं
                                                       आणि आपलं छोटासा घर असावा
                                                    मलाही वाटत तुजे माझ्यावर मन यावं ,
                                                तू हि माझ्यावर माझ्या इतकेच प्रेम कराव
                                                     तू हि माझ्यावर माझ्या इतकेच प्रेम कराव

हा खेळ मनाचा

किती छान असतो न हा खेळ मनाचा,
स्वप्नांचा आधार घेऊन हवेत भरारी मारण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजा आहे म्हणत स्वप्नात हरवण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तुझ्या माझ्या अबोल प्रीतीचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
मी करत आलेल्या एकतर्फी प्रेमाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू जवळ नसलास कि तुला अनुभवायचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
सत्यात न उतरणाऱ्या स्वप्नाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजाच म्हणून मनाला समजावयाचा
खरच खूप छान असतो रे हा खेळ मनाचा,
सत्य माहित असूनही मनालाच फसवण्याचा.. मनालाच फसवण्याचा ........

तू समजुन का घेत नाही..

तू समजुन का घेत नाही..
कसं गं तुला काही समजत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !

इतक्या सहजासहजी जाऊ का विचारतेस,
भावना का माझ्या तुला जाणवत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला करमत नाही !

तू दुर असलीस की जगही खायला उठतं,
कशातच लक्ष माझं लागत नाही !
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही !

कधी कधी असं वाटतं, तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही !
माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,
पण मुद्दामच तू मला भेटत नाही !!

न भेटण्याने आता काही होणार नाही,
मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही !
आपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा,
त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !!

तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे,
हा काही आज उद्याचा खेळ नाही !
तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू,
असं स्वप्नातही शक्य होणार नाही !!

किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
 तू हे समजुन का घेत नाही !!

लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही,
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही,
पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो,
फक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलो,
खरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलो,
काय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाही,
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही,
आज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहे.
कधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहे.
यशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहे,
खरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाही,
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही,
दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.
माझी पावले तुझ्याच मागे जातच आहे
हृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहे,
काय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाही.
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही... ........

माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का?
माझ्या मनाच्या कोपऱ्यात नयनांच्या माझ्या पापण्यात थोडा वेळ विसावशील का ?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
तुझ्या एका नजरे साठी असतो सदा तुजपाठी मज भरकटलेल्या जीवन मार्गावर आणशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
एकच ध्येय माझ्या जगण्याचे तुला माझी झालेली बघण्याचे करण्या मज इच्छापूर्ती तू पुढे येशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
तुझ्यात असतो मी गंभीर करतेस मज तू अधीर शेवटचे मागणे ..
हाती हात देशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?


                                                                                                                       साभार - कवी: म.श.भारशंकर

तुझा पासून खूप दूर गेले तर


मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
माझी आठवण काडशील ना...

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
एकांतात एकदा तरी माझासाठी रडशीला ना...

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
एकदा तरी मनापासून love you बोलशील ना...

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
तुझा जवळ असलेला माझा फोटो कधी तरी बगशील ना...

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
एका क्षणापुरता मी तुझा जवळ आहे असा विचार करशीला ना..

सोमवार, ५ मार्च, २०१२

मिलनाची ही रात्र अचानक आली


मिलनाची ही रात्र अचानक आली
आणि क्षणात सर्व रुसवे-फुगवे घेऊन गेली

लाजत लाजत ती माझ्या मिठीत आली
आणि मला जगाचा विसर पाडून गेली
...
दोन जीवांचे हे पवित्र मिलन पाहून
आकाशातील चंद्राला पण हेवा वाटला
आणि माझ्या मिठीत माझ्या प्रियेला
पाहून तोही क्षणभर वेडावून गेला

साक्षात माझी प्रेरणा माझ्या समोर आली
आणि उरलेल्या ओळींची मला विस्मृती झाली

होना तू हलका वारा

होवुनी अलगद सर सख्या भिजव ना मला जरा
मनास माझ्या स्पर्श करण्या होना तू हलका वारा

रंगी तुझ्या न्हाले मी
नकळत तुझे झाले मी
का गुणगुणू लागल्या आज त्या
हृदयाच्या अजीर्ण तारा
होवुनी अलगद सर सख्या भिजव ना मला जरा

अबोल वेलींशी बोलते मी
तुझ्यात मला शोधते मी
नजर जाई जिथे माझी
दिसे फक्त तुझाच चेहरा
होवुनी अलगद सर सख्या भिजव ना मला जरा

पाखरू माझ्या मनाच
बसत कधी तळ्याकाठी
अतूट बंधन जुळल तुझ्यासवे
ज्याने बनल्या नात्यांच्या रेशीमगाठी
एवढी गुंतते तुझ्यात मी कि
भर उन्हात पडताना दिसतात पावसाच्या गारा

होवुनी अलगद सर सख्या भिजव ना मला जरा
मनास माझ्या स्पर्श करण्या होना तू हलका वारा.....

शुक्रवार, २ मार्च, २०१२

नाही विसरलो


नाही विसरलो ते डोळे तुझे....
हरिणीलाही लाजवणारे
नाही विसरलो ते गाल तुझे....
... गुलाबाहून गुलाबी असणारे
नाही विसरलो ते केस तुझे....
वाऱ्यावर भुरभुरणारे
शोधतो रोज नवी युक्ती
प्रेम व्यक्त करण्याची
पण आहे मनात इच्छा अजून
चोरून तुला बघण्याची ...
आहे मनात इच्छा अजून
पुन्हा प्रेमात तुझ्या पडण्याची .....
कसे विसरू ग ते क्षण
सोबत माळावर फिरण्याचे
कसे विसरू ग ते क्षण
तुझ्या मिठीतल्या आनंदाचे...
पण वाटते कधी कधी !!!
पुरेल तुझं ते हसण रुसण आयुष्यभर
ये ना पुन्हा अशी मिठीत क्षणभर
फक्त क्षणभर ....
पुरवेल तो क्षण मी आयुष्यभर
फक्त आपल्या प्रेमाखातर ..

माझे तुझ्यावर प्रेम आहे हे

माझे तुझ्यावर प्रेम आहे हे
मी तुला रोज सांगणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे

पहिले मी जेव्हा तुला
... फक्त तूच दिसत होतीस
जिथे तिथे मी पाहावे
फक्त तूच भासत होतीस..
माझ्या नजरेपासून दूर जरी गेलीस
तुझ्याबरोबर मीही चालणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे

प्रेमाला प्रेमाने जिंकता येते
अशीच मला आशा आहे
प्रेम दिल्याने वाढत जाते
हीच प्रेमाची भाषा आहे
प्रेमाला फक्त प्रेम द्या हेच
मी सर्वाना सांगणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे —

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

तुला वेळ मिळाला तर.

तुला वेळ मिळाला तर...
आपण दोघांनी प्रेम करायचं,
मी समोरुन जाताना
तु दारात उभं रहायचं
आईला संशय नको म्हणुन
झाडानां पाणी घालायचं,
फुलानां फुलवायचं,
आईला भुलवायचं
तुला वेळ मिळाला तर...
को~या कागदावर्,
किवा रुमालावर
मन मोकळ करायचं
अस् एकमेकांनी
काळजात जपायचं
तुला वेळ मिळाला तर...
कळेल एक दिवस तुझ्या घरी
कळेल एक दिवस माझ्या घरी
तेव्हा अखेरीस परिक्षा प्रेमाची
दोघांत एक विषाची बाटली
तु आधी कि, मी आधी
असं नाही भांडायचं
दोघांनी एक-एक घोट घ्यायचं
हातात हात घेउन झोपी जायायचं
तुला वेळ मिळाला तर...
आपण दोघांनी प्रेम करायचं.