Breking News

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०१४

अस्तंबा ऋषीची यात्रा

सातपुडयातील उंच डोंगर....
 दोन्ही बाजुला असलेल्या हजारो फुट खोल दरी....
नागमोडी खडतर रस्ता..
अन शिखरावर असलेले अस्तंबा ऋषीचे विश्राम स्थान...
 अस्तंबा ऋषीच्या दर्शनाची ओढ़ घेवुन घोषणा करीत भाविक हजारो फुट शिखर सहज चढतात. दिपावली पर्वावरील धनत्रयोदशीला अस्तंबा ऋषीची यात्रा भरते. ह्या यात्रेला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील हजारो तरुण पदयातत्रेने अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी शिखराकड़े रवाना होतात. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेचे भाविकांना आकर्षण असते. म्हणुनच या यात्रेला येणा-या भाविकांची संख्या वर्षानवर्ष वाढत आहे. समुद्र सपाटीपासुन ४ हजार फुट उंच शिखरावर अस्तंबा ऋषीचे देवस्थान आहे. भाविकांची अपार श्रधा असल्याने हाती भगवा झेंडा घेत `अस्तंबा ऋषी महराज की जय ' चा जयघोष करीत भाविक पदयात्रेने हजेरी लावतात. दिवाळीच्या पर्वावर धनत्रयोदशीला यात्रोत्सवाला प्रांरभ होत असते. शापस्थ अवस्थेत जखमांनी विव्हळणारा अश्वस्थामा आपल्या जखमांसाठी सातपुडयाचा द-याखो-यात तेल मागतो. आजही शिखरावर जाणा-या यात्रेकरूंणा तो भेटतो व वेळप्रसंगी रस्ताहीन झालेल्या यात्रेकरूंना मार्गदर्शन
करतो, अशी अस्तंबा ऋषीचे दंतकथा आहे. अश्वस्थामा यांचा महाभारतात उल्लेख असला तरी त्यांचे स्थान भारतात कुठेही आढळत नाही. मात्र अश्वस्थामा ( अस्तंबा ) उल्लेख सातपुडयाच्या कुशिमधे उंच शिखरावर असल्याचे दिसुन येते. दिवाळीच्या पर्वाला अस्तंबा ऋषीच्या यात्रेला प्रारंभ होतो. तळोदा येथुन एक दिवस अगोदरच कॉल्लेज रोडपासुन वाजत-गाजत मिरवणुकीने मंदिराचे दर्शन घेवुन यात्रेकरू अस्तंबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात. कोठार, देवनदी, असली, नकट्यादेव, जूना अस्तंभा, भिमकुंड्या या मार्गाने अस्तंबा ऋषी यात्रेला जातात. रानटी श्वापदांना दूर ठेवण्यासाठी ढोल, आगीसाठी टायर, दिवट्या, टेंभे,मशाली अशा दिर्घकाळ जळणार्या वस्तू या यात्रेत घेतल्या जातात. रात्रीचा प्रवास करुण अस्तंबा
ऋषीच्या शिखरावर जाऊन धनत्रयोदशीला पहाटेच्या सुमारास दर्शन घेवुन ध्वज लावतात. सुमारे तीन दिवस ही यात्रा पूर्ण केली जाते. एकवेळा, पाच वेळा, अकरा वेळा यात्रा करण्याचा नवस बोलला जातो. चिरंजीव अश्वथामा पुजण्यामागे केवळ एक श्रध्दा आहे. त्याच्यासारखे दिर्घायुष्य मिळावे यासाठीच कदाचित ही यात्रा असते असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यानंतर आदिवासी बांधव तळोदा येथे एकत्रित येवुन ढोल ताश्याचा गजरात भव्य मिरवणुक काढतात. त्यानंतर नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे येथील पावबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात. या पदयात्रेदरम्यान डफच्या तालावर ठेका घेत `अस्तंबा ऋषी की जय ', `पावबा ऋषी की जय' असा जयघोष करुण नृत्य करतात. त्यानंतर पदयात्रा पुर्ण करुन परतीच्या प्रवास करीत घरी परततात.












































सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

नवसालारी पावणा खटाई माता

तलोदा शहराच्या उत्तरेला खटाई माता नगर येथिल स्व:रमन सुर्यवंशी यांच्या शेतात खटाई मातेचे मंदिर आहे. नवरात्रोत्सवा निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. नवरात्रात नवसपूर्तीसाठी भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. तलोदा येथील बबनराव छगनराव माळी यांचे मोठे बंधु रमन छगन सुर्यवंशी यांच्या मालकी शेतात खटाई माता नगर येथे 300 वर्षापूर्वीचे अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील खटाई मातेचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम साध्या स्वरूपाचे आहे. अहिल्याबाईच्या काळापासून भाविक नवरात्रित नवस व मानता करता. नागरिकांची अशी भावना आहे की, नवरात्रीत मंदिरात येवून मातेजवळ नवस केल्याने मनातील इच्छा आकांशा पूर्ण होवून कार्यसिद्धि प्राप्त होते. पुणे नाशिक शिंदखेड़ा मालेगाव आदि परिसरातील वैष्णव समाजाची कुलदैवत असल्याने येथून मोठ्या प्रमाणात नागरिक चैत्र पोर्णिमेला मानता फेडण्यासाठी येत असतात. तसेच आसपासच्या परिसरासह गुजरात राज्यातील भाविक देखील मोठ्या संखेने नवस मानण्यांसाठी येतात. मंदिराचे तोंड पूर्वेस असुन मंदिर हे चार फुटाच्या उंचीवर चौरसावर बांधलेले आहे.मंदिराच्या मागील बाजूस एक लहान मंदिरात एका अखंड दगडात दोन मुर्त्या कोरलेल्या आहेत. त्यापैकी एक मूर्ती खटाई मातेची व दूसरी मूर्ती तीची बहिन आहे. मुर्त्या शेंदुरने फासलेल्या आहेत. मंदिराला पत्र्याचे मंडप करण्यात आले आहे, मंदिराच्या डाव्या बाजूला 4 फुटाचे तीन महादेवाचे लहान मंदिरे आहेत.
व समोर एक लहान मंदिर आहे, मंदिरात पादुका व लहान लहान शिवलिंग आहेत. मातेच्या मंदिराच्या उजव्यादिशेला भवानी माता व महिषासुर यांचे स्थान आहे. कार्तिकी एकादशिला बालाजी वाड़यात होणाऱ्या दशअवतार कार्यक्रमा नंतर गावात भवानी माता व महिषासुर यांचा मिरवणुक निघत असते . सदर मिरवणुकीचा आदल्या दिवशी खटाई मातेचे दर्शन घेवुनच गावात भव्य मिरवणूक निघत असल्याचा इतिहास आहे.. नवरात्रोत्सवा निमित्त दररोज सकाळी आणि सायंकाळी महाआरती करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांकडून नावरात्रित मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली जाते. तळोदा शहरातील जुनेजाणते नागरिक आजही कोणतेही नवीन कार्य करण्या अगोदर मातेचे दर्शन घेऊनच सुरू करतात. नवसाला पावणार्‍या खटाई मातेला नारळ वाहून नागरिक नवस करतात. नवरात्रोत्सवनिमित्त मंदिराच्या विश्‍वस्तांनी विशेष तयारी केली आहे.... मंदिराचा सांभाळ मंदिराचे पूर्वज दगुलाल रमन सुर्यवंशी, भास्कर रमन सुर्यवंशी, सुरेश रमन सुर्यवंशी आदि करीत आहे...

मनातील इच्छापूर्ती करणारी मनिषापूरी माता

मनिषापूरी माता भक्तांच्या मनातील इच्छापूर्ती करणारी देवी म्हणुन तळोद्यातील ऐतिहासिक मनिषापुरी मातेवर भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराची उभारणी ३०० वर्षापुर्वी जहागिरदार श्रीमंत नारायणराव भोजराज बारगळ यांनी केली. नारायणराव भोजराज बारगळ हे त्यावेळी राजस्थानातील उदयपुर संस्थानाचे सेनापती असताना त्यांनी मनातील इच्छा पूर्ण झाली तर मनिषापुरी मातेची स्थापना तळोदा गावात करीन असा नवस केला होता. नवसाप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण झाल्याने श्रीमंत नारायणरावानी मनुषापुरी देवीची स्थापना केली. देवी पार्वतीचे रूप असल्याने मंदिराशेजारी कालभैरव रूपी शिवाची स्थापना करण्यात आली आहे. अवघ्या पंचक्रोशितिल हे एकमेव कालभैरवनाथाचे मंदिर असल्याने येथे सुद्धा नेहमी भक्तांची गर्दी असते. तळोदयात पूर्वी वर्षभरात दोन यात्रा भरत असत, त्यापैकी चैत्र नवरात्रिला मनिषापुरी
मातेची व अक्षय्य तृतीयेला कालीका देवीची या मनिषा पुरिमातेची यात्रा त्याकाळी पंचक्रोशितिल सर्वात मोठी यात्रा होती. १९०० शतकाच्या सुरुवातीला तळोदा परिसरात प्लेगने थैमान घातले. त्यावेळी संसर्ग होवु नये म्हणुन ही यात्रा बंद करण्यात आली. मनिषापुरी मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे याठिकाणी एकाच जागी दोन मुर्त्या आहेत. त्यापैकी उजव्या बाजूला मनिषापुरी मातेची व डाव्या बाजुला सटवाई देवीची एकाच जागी सटवाई व मनिषापूरी देवी असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. तळोदयाचे जहागीरदार बारगळ हे 15 व्या शतकात सुलतानपुर- शहादा येथे संस्थानिक होते. त्यावेळेस त्यांच्या कुटुंबातील छटी (सटवाई) पूजण्यासाठी सुलतानपुर येथे सटवाई स्थापण्यात आली होती. ती सटवाई देवी कालांतराने 1921 साली तत्कालीन
जहागिरदार श्रीमंत कृष्णराव बारगळ यांनी तळोद्यातील मनिषापुरी माता मंदिरात आणून स्थापली. १९२१ साली सटवाई स्थापनेच्या वेळेस या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. नवरात्र काळात नवस फेडणारे व नारळ करणाऱ्या भक्तांची गर्दी असते.तसेच नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते..