Breking News

शनिवार, २२ ऑगस्ट, २०१५

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा....

आदरणीय,
श्री.पप्पा मम्मी, व आजी 
यांना आपल्या मुलीचा शिरसाष्टांग नमस्कार, 
दादा व वहिनींना माझ्या आशिर्वाद,
 गुंजन व देवला गोड गोड पापा.....

मी खूप प्रेमाने व स्नेहभावाने या चिठ्ठीसोबत राख्या पाठवत आहे. जरी मी येऊ शकत नसली तरी राखीतील प्रत्येक धागा तुमचे संरक्षण करेल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. प्रत्येक रक्षाबांधनाला असे वाटते की मी प्रत्येक्ष माझ्या भावांचे औक्षण करायला हवे परंतु मला राख्यांचेच औक्षण करून पाठवावे लागते. मी खूप प्रेमाने व मायेने राख्यासोबत ओक्षणाचे साहित्य पाठवत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी मम्मी कडून माझ्या राख्या आठवणीने बांधून या बहिनीच्या अल्पशा भेटीचा स्विकार करावा. तुम्हाला दीर्घआयुष्य लाभो, माझे आशिर्वाद, स्नेह, प्रेम नेहमी तुमच्या पाठीशी राहतील. वहिनींना सांगेन की आजीची मम्मीची खूप खूप काळजी घ्या. पप्पाना वेळेवर औषधे द्या अथवा घ्यायला लावा. सर्वांनी एकत्रित गुना गोविंदाने राहा, तुम्ही सर्व व्यवस्थित सांभाळालच यात शंकाच नाही. स्वतःही तबेतीची काळजी घ्या.

``चंद्र भाऊराया माझा तू ग चांदणी वाहिनी,
नांदा सुखाने रे सारे असे सांगते बहिनी, 
चंद्राच्या गालावरती देव लावी गालबोट, 
मीरविते गुंजन तुझ्या गाली माझे ओठ, 
पापणीत गोठवली मी नदी आसवांची, 
गेली विसरुनी माय लेकरांची,
मायेची माझ्या माय जोडली तू ग जोडी,
 समजावूनी माय लावीली तू ग गोडी, 
पुढे सुरु झालं संसाराचं गोड गीत,
मायेची माझ्या माय तू ग लावीली रीत, 
उचकी लागे माय काही केल्याने राहिना,
नको काढू आठवणी सुखी आहे तुझी मयना''....

 मम्मी व पप्पा दोघांनी तबेतीची काळजी घ्या, आजी तू पण तगतग करू नकोस. वाहिन्या सांभाळून घेतील सर्व. सुधाकर दादाला सांगेन गाडी हळू चालव, मोठ्या दादाला सांगेन रात्री घरी लवकर येत जा, मोठा वहिनीला सांगेन स्वतःसह गुंजन व देवाची काळजी घे. बाकी सर्व ठीक आहे. आत्याची (आईची) तेबेत चांगली आहे. जानु आता खूप किलबिल करते. तुम्हा सर्वांना खूप आठवण करते. आमची सर्वांची तबेत चांगली आहे. गुंजन व देवला आतुचा अनेक आशीर्वाद....
  तुमची लाडकी 
रुपाली

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५

तलोद्यातील नयन चित्ते घेतोय संगीत क्षेत्रात भरारी


सातपुड्याच्या सांगिद्यात राहणारे अनेक रत्न दर वर्षी देशातच नव्हे तर परदेशात ही आपली चमक दाखवित आहेत. त्यात धड़गाव तालुक्यातील बर्डीतील किसन पवार असो किंवा नुकत्याच दगड फोडून न्यायाधिशाची ऊची गाठनारे गरीब कुटुंबातील ईश्वर ठाकरे असो, असे विविध रत्न दर वर्षी विविध क्षेत्रात काम बजावत आहेत. त्याच प्रमाणे तलोदा येथील नयन चित्ते या युवकाने संगीत क्षेत्रात ऊंची गाठन्यास सुरुवात केली आहे. कुठल्याही क्षेत्रात जिद्द, मेहनत व चिकाटी या त्रिसुत्राच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. त्यासाठी आत्मविश्वास हवाच हे प्रत्यक्षात तळोद्यातील नयन चित्ते या युवकाने दाखवुन दिले. आपल्या गायन कलेचा जोरावर तो मुंबई येथे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताचे धड़े घेत आहे. यासोबतच हिंदी-मराठी गाण्याची निर्मिती नयन करीत आहे. तळोदा येथील जि.प.शिक्षक सुनील माधव चित्ते यांचा मुलगा नयन हां मुंबईसारख्या मायानगरीत जाऊन आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने गायन क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. मुळात लहान पणापासूनच गायनाची आवड़ असणाऱ्या नयनचे शिक्षण बी.ए. डी.एड.पर्यन्त झाले आहे. डी.एड. पुर्ण झाल्यावर शिक्षकी पेशाकडे वळत असतानाच त्याला त्यांच्यातील कलावंत चैन पडु देईना. नयनने फेसबुकच्या माध्यमातून
मुंबई येथील प्रसिद्ध लेखक संदिप नगरकर यांच्याशी ओळख झाली. नगरकर यांनी 'मेरी बेकरारी' या थिंगसॉग साठी त्याची निवड केली. नयनने व्हाट्सअप्पच्या माध्यमातून आपल्या आवाजाची चाचणी दिली. 'व्हाईस टेस्ट' मधे निवड झाल्यानंतर नयनला अहमदनगर येथे गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी बोलविण्यात आले. विशेष म्हणजे 'मेरी बेकरारी' या गाण्याला नयन याने स्वतःच लयबद्ध व सुरबद्ध करुण गायल्याने त्याचे विशेष कौतुक झाले, नयन हां मुंबई या मायानगरीत संगीत क्षेत्रात नावारुपाला येण्याच्या प्रयत्नात असुन त्यादृष्टीने त्याची वाटचाल सुरु आहे. लवकरच त्याने स्वतः लिहलेली व स्वतः संगीतबद्ध केलेल्या 'ओरे पिया' या हिंदी व 'मन हरवले' हे मराठी गाणी प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. प्रसिद्द गायक सुरेश वाडकर यांच्या तालीमीतून भविष्यात आपण यशस्वी संगीतकार होण्याचे स्वप्न उराशी बाळगले असुन यासाठी वडील सुनिल चित्ते, आई माधुरी चित्ते तसेच मित्रपरिवाराची मोलाची साथ लाभत असल्याचे नयन सांगतो...




रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

चैत्र गौर

चैत्र पाड्व्या नंतर चैत्र शुद्ध तृतीयेस सुरु होतो तो चैत्र गौर उत्सव. चैत्र गौर म्हणजे पार्वतीचा उत्सव ,
 चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरात गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा करून हा उत्सव साजरा होतो, पार्वती माहेर वासासाठी घरी आल्याचे मानले जाते, शंकर पार्वती यांच्या संदर्भात या विषयी एक दंतकथा प्रचलित असुन शंकरांना पाहुणचारासाठी पार्वतीचे घरी या काळात ठेऊन घेतल्याचे मानले जाते, खरेतर पार्वती या माहेरवाशिणीचं कौतुक करण्यासाठी हा सोहळा असतो. जुन्याकाळी विवाहित मुली या काळात माहेरवासा साठी माहेरी येत असत .देवघरातील मातीची, पितळी, लाकडी, सोन्याची पूर्वापार जशी चालत आली असेल त्याप्रमाणे ती चैत्रगौर कोणत्या तरी कोनाड्यात, देवघरात किंवा छोट्याशा झोक्यावर विराजमान करून . चैत्र शुद्ध तृतीयेस देवघरात चैत्र गौरीची स्थापना करतात काही ठिकाणी ती झोपाळ्यात बसविण्याची प्रथा असते, काही भागात अन्नपुर्णे ची पुजा केली जाते, गौरीच्या पुढे आरास करण्याचीही प्रथा दिसते ,आरशीतही कलात्मकता प्रदर्शन असते . कुठं पायऱ्या पायऱ्या करून गौरीची सजावट केलेली तर कुठे
गौरीसाठी खास मखर केलेलं असते ,पायऱ्यांवर सुशोभीत चादर आणि तिन्ही बाजूंनी भरजरी साडय़ांचे पडदे. सर्वात वरच्या पायरीवर गौर. तिच्या समोर घरातली खेळणी. गौरीपुढे कलिंगड टरबूज यांच्या अर्ध्या फळांची कापून केलेली फुले, फराळांच्या विविध पदार्थांची ताटंही ठेवतात . गौरीपुढं एक बाळ ठेवलेलं असते. गौरी पुढे या काळात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात या रांगोळ्याना चैत्रागण असे म्हणतात, या मध्ये झोक्यावरची गौर, कमळ, स्वस्तिक, ज्ञानकमळ, नाग, शंख, त्रिशूळ, तुळशी वृंदावन, डमरू, चंद्र, सूर्यगदा, बेलाचे पान, कैरी किंवा आंबा, गोपद्म, कलश, ध्वज, पंखा, अश्या विविध रांगोळ्या काढल्या जातात. बेल, तुळस, दुर्वा, ब्रह्मा, विष्णू, महेश सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या देवता चैत्रांगणात असाव्यात असा संकेत आहे. या दिवसात चैत्र गौर बसलेल्या घरांमधून मंगळवार, शुक्रवार, या दिवसांना हळदीकुंकू सभारंभ आयोजित केले जातात, संध्याकाळी बायका नटूनथटून एकमेकींकडे चैत्रगौरीच्या
हळदीकुंकवाला जातात, महिलांना कैरीची डाळ, केशरयुक्त पन्हं, बत्तासे, खिरापत देतात. फळे ,हरभ-यांनी ओटी भरतात. या दिवसान मध्ये येणारे मंगळवार, शुक्रवार,या दिवसांना चैत्रगौर विसर्जित करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे तर ठिकाणी वैशाख शुद्ध तृतीयेस म्हणजेच अक्षय तृतीयेस हिचे विसर्जन करण्याची प्रथा आहे, चैत्रगौर सर्व घरात साजरी होत नाही. काही लोकच या चैत्रगौरी बसवतात. सर्वत्र ही प्रथा दिसत नाही स्त्रीशक्तीचं प्रतीक असणारा चैत्रगौर एकप्रकारे स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा वसंतोत्सव असतो.

शनिवार, १५ ऑगस्ट, २०१५

HAPPY BIRTHDAY


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही., 
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. 
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.. 
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण.. 
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण
 एक "सण" होऊ दे हिच सदिच्छा..!