Breking News

सोमवार, ५ मार्च, २०१२

मिलनाची ही रात्र अचानक आली


मिलनाची ही रात्र अचानक आली
आणि क्षणात सर्व रुसवे-फुगवे घेऊन गेली

लाजत लाजत ती माझ्या मिठीत आली
आणि मला जगाचा विसर पाडून गेली
...
दोन जीवांचे हे पवित्र मिलन पाहून
आकाशातील चंद्राला पण हेवा वाटला
आणि माझ्या मिठीत माझ्या प्रियेला
पाहून तोही क्षणभर वेडावून गेला

साक्षात माझी प्रेरणा माझ्या समोर आली
आणि उरलेल्या ओळींची मला विस्मृती झाली

होना तू हलका वारा

होवुनी अलगद सर सख्या भिजव ना मला जरा
मनास माझ्या स्पर्श करण्या होना तू हलका वारा

रंगी तुझ्या न्हाले मी
नकळत तुझे झाले मी
का गुणगुणू लागल्या आज त्या
हृदयाच्या अजीर्ण तारा
होवुनी अलगद सर सख्या भिजव ना मला जरा

अबोल वेलींशी बोलते मी
तुझ्यात मला शोधते मी
नजर जाई जिथे माझी
दिसे फक्त तुझाच चेहरा
होवुनी अलगद सर सख्या भिजव ना मला जरा

पाखरू माझ्या मनाच
बसत कधी तळ्याकाठी
अतूट बंधन जुळल तुझ्यासवे
ज्याने बनल्या नात्यांच्या रेशीमगाठी
एवढी गुंतते तुझ्यात मी कि
भर उन्हात पडताना दिसतात पावसाच्या गारा

होवुनी अलगद सर सख्या भिजव ना मला जरा
मनास माझ्या स्पर्श करण्या होना तू हलका वारा.....

जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून

‎|| जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून ||
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून झळकले मंदिराचे कळस
 जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून दिसले सुहासिनिंच्या कुंकू भाळी
 जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून पतीव्रतांच्या किंकाळ्या विरल्या नाहीत रानोमाळी || १ ||
... ... जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून दिसले स्वप्न स्वराज्याचे
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून फुलले कर्तुत्व शिवरायांचे
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून विझली सतीच्या सरणाची आग
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून मुर्दाड मनाला आली जाग || २ ||
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून झाली अन्याय,अत्याचार ाची अधोगती
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून स्वराज्याला मिळाले दोन दोन छत्रपती
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून पिलांना क्रांतीचे पंख फुटले
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून भटशाहीचे बुरुज तुटले || ३ ||
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून शिवबा सार्वभौम छत्रपती बनले
जिजाऊ तुमच्याच हयातीत रयतप्रिय राजाला भटांनी शुद्रात गणले
जिजाऊ तुम्ही सल अपमानाची काळजात ठेवून पाचाडी विसावल्या तेव्हा विव्हळल्या मनानं दुखाश्रू ढाळत होत्या रायगडच्या सावल्या || ४ ||
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणूनच लढला मावळा जगला महाराष्ट्र आणि तगला मानव धर्म
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून पेटून उठला आज मराठा आणि प्रगटला घराघरातून शिवधर्म....
 || जय जिजाऊ || || जय शिवराय ||

राजा शिवछत्रपती


सत्याची ढाल होती
नीष्ठेची तलवार
वीरतेचा भाला होता
हर हर महादेव नारा होता
सह्याद्रीची साथ होती
... जिजावुंचा आशिर्वाद
मरणाची भीती नव्हती
स्वराज्य हाच ध्यास
तोफांचा आवाज होता
घोड्यांच्या टापांचा नाद
कडेकपारीत फिरत होता
मर्द मराठ्यांचा वाघ
यौवनांच्या छातीत धडकी होती
आमच्या छातीत राम
पळता भुई कमी पडली ज्याच्या भीतीने
राजा शिवछत्रपती त्यांच नाव .

माझा राजा शिवछत्रपती

माझा राजा शिवछत्रपती

परवा परवा मुंबईमध्ये हिंदु - मुसलमानांची दंगल झाली , का झाली , कशासाठी झाली ,
कारणं परंपरा हा भाग वेगळा ,... पण त्या दंगलीचा फायदा उठ्वून ,
 एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काहि गुंड होते
आणि त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये एन पंचविशितली एक लावण्यखणी युवती होती .
देखणी ,.... आरसपणी .. बस बघावं आणि बघतच रहावं इतकी लावण्यखणी ,
 या गुंडांचा तिच्यावर डोळा होता , दंगलीच्या कल्लोळाचा फायदा...
उठ्वावा आणि त्या युवतीची आब्रु लुटावी ......
असा बेत त्यांनी आखला आणि दंगल एन जोमात असतानाच ,
रात्रिच्या बारा साडे बारा वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकू लागले ..........
बघता बघता दरवाजावर धड्का पडू लागल्या , आतली ती बावरली ..... शहारली ........ घाबरली ,
खिडकितुन बघितलं .... गुंड दिसले ... इरादा ध्यानी आला तसे जिवाच्या आकांताने धावत सुटली .

मुंबईच्या रस्त्यावरुन रात्रिच्या बारा साडे बारा वाजता बेभानपणे पळतेय .
गुंड पाठलागावर आहेत , तिला कळून चुकलं ....
या गुंडांच्या तावडीत जर सापडलो तर आपल्या आब्रुची लक्तरे ईथे रस्त्यावरच टांगली जातील ,
म्हणून बेभान पळतेय जिवाच्या आकांताने काळोख चिरत धावतेय ..... धावता .... धावता एका बोळात
शिरली बोळातल्या एका घरात तीला उजेड दिसला धपापत्या उरानं दारापुढं आली ....
दार ठोठावलं दार उघडलं गेलं ..... दारात उभा होता एक एन तिशीतला एक हिंदु युवक .........
दारात मुसलमानी पाहीली त्याला आश्चर्य वाटले . बाहेर दंगल चाललीय हिंदु - मुसलमानांची हि मुलगी मुसलमान मग या हिंदुच्या दारापुढं कशी ?.....
त्याने विचारले " काय हवयं ?"

ती युवती म्हणाली " काही गुंड माझ्या पाठलागावर आहेत , एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का ? माझी आब्रु लुटायचा बेत आहे त्यांचा ."
हा युवक म्हटला " निश्चिंत आत ये घर तुझच आहे " तिला आत घेतलं , स्वतःच अंथरुण् - पांघरुन दिलं आणि सांगितलं " शांत झोप इथ तुला कसलीही भिती नाहि , मी स्वता : दाराशी राखण करीत राहतो रात्रभर .. ते गुंड परत येणार नाहित तुला त्रास दयायला ."

ती युवती युवती झोपी गेली , हा दाराशी राखण करीत बसला , पण राखण करता करता डोक्यात विचार आला .... बाहेर दंगल चाललीय हिंदु - मुसलमानांची हि मुलगी मुसलमान मी हिंदु मग या हिंदुच्या घरात तिने आसरा मगितलाच कसा ?..... तिला भिती नाही का वाटली ?.....
आणि ते गुंड तिची आब्रु लुटाण्यासाठी तिच्या मागावर आहेत ..... मि ही घरात एकटाच आहे ,
मी हि तरुण आहे ,
मनात आणलं तर ... आता ... याक्षणी .... इथच ... या युवतीची आब्रु मि लुटु शकतो , हिला माझ्या तावडीतून वाचवणारं देखिल कोणी नाही ...... मग कुठ्ल्या भरवशावर ती माझ्या घरात निश्चिंत पणे थांबलीय ?
रात्रभर विचार केला उत्तर मिळलं नाहि ..... सकाळ झाली ति युवती जायला निघाली जाताना तिनं आभार मानले ......... पण न रहावून याने विचारले

" बाहेर दंगल चाललीय हिंदु - मुसलमानांची त मुसलमान मी हिंदु मग माझ्या घरात आसरा कसा मगितलास ? ते गुंड तूझी आब्रु लुटाण्यासाठी तूझ्या मागावर होते ... पण मि ही घरात एकटाच होतो ....... मी हि तरुण होतो ........... मनात आणलं तर रातोरात तुझी आब्रु मि लुटु शकलो आसतो ........
तूला माझ्या तावडीतून वाचवणारं देखिल कोणी नव्हतं ......
 मग कुठ्ल्या भरवशावर ती माझ्या घरात थांबलीस ?
त्यावर ती युवती म्हणाली " त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी बेभानपणे धावत होती .
मुंबईच्या रस्त्यावरुन सैरावैरा पळत होते ....... धावता .... धावता या बोळात शिरली
बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला धपापत्या उरानं मी दारापुढं आले ....
 पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मि आत डोकावुन पाहिलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला ....... छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला .
........ आणि
मगच मी दार ठोठावलं ................
कारण मला माहिती आहे ,... ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आब्रुला धोका नाही .....

पाहिलतं गेल्या साडेतीनशे वर्षा नंतरही माझ्या शिवाजी राजा बद्द्ल जनमाणसांमध्ये जी प्रतिमा आहे ... ती हिच प्रतिमा आहे
शिवाजी राजे स्मरणात आहेत ते फक्त एव्हढ्यासाठी .......... त्यांचा जयजयकार आहे तो फक्त एव्हढ्यासाठी .......... त्यांच्या विचरांचा जागर आहे तो सुद्धा फक्त एव्हढ्यासाठी......
॥जय शिवराय॥


                                 जय हिँद                                                                      जय महाराष्ट्र

तो फक्त मराठाच

वाघाला जो हरवतो, अन शत्रूलाही रडवतो,
तो फक्त मराठाच .
अपमानही जो रिचवतो,
अन हलाहलही पचवतो,
तो फक्त मराठाच .
... कोणासही ना जो दुखवितो, अन बाग मैत्रीची फुलवतो,
तो फक्त मराठाच .
अपार कष्ट जो सोसतो,
अन प्रेम... जगी वाटतो,
तो फक्त . मराठाच ,
वचनाची लाज जो राखतो, अन दिल्या शब्दास जगतो.
तो फक्त .मराठाच ,
पर्वतालाही जो हरवतो,
अन आकाशाला नमवतो,
तो फक्त...... ... मराठाच . ..........
मराठाच .......... !!!!

कोण तूं रे, कोण तूं ?

"महाराज" या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ग्रंथातून साभार :-

--------------------------------------------------------
कोण तूं रे, कोण तूं ?....

कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ?


जानकीचे अश्रु तूं ? की उकळता लाव्हाच तूं ?


खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतिल त्वेष तूं ?


वाल्मिकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ?


भगिरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ?


मोहिनीची युक्ति तूं ? की नंदिनीची शक्ति तूं ?


अर्जुनाचा नेम तूं ? की गोकुळीचे प्रेम तूं ?


कौटिलाची आण तूं ? की राघवाचा बाण तूं ?


वैदिकाचा घोष तूं ? की नीतिचा उद् घोष तूं ?


शारदेचा शब्द तूं ? की हिमगिरी नि:शब्द तूं ?


की सतीचे वाण तूं ? वा मृत्युला आव्हान तूं ?


शंकराचा नेत्र तूं ? की भैरवाचे अस्त्र तूं ?


की ध्वजाचा रंग तूं ? वा बुद्धिचा श्रीरंग तूं ?


कर्मयोगी ज्ञान तूं ? की ज्ञानियांचे ध्यान तूं ?


चंडिकेचा क्रोध तूं ? की गौतमाचा बोध तूं ?


तापसीचा वेष तूं ? की अग्निचा आवेश तूं ?


मयसभेतिल शिल्प तूं ? नवसृष्टिचा संकल्प तूं ?


द्रौपदीची हांक तूं ? प्रलंकराचा धाक तूं ?


गीतेतला संदेश तूं अन् क्रांतिचा आदेश तूं !


संस्कृतीचा मान तूं अन् आमुचा अभिमान तूं !

शुक्रवार, २ मार्च, २०१२

छत्रपती शिवाजीराजे

अंधाराला घाबरत नाय
आभाळाची साथ हाय,
मोडेन पण वाकणार नाय अशी मराठ्याची जात आहे,
शब्दा मध्ये गोडवा आमच्या,
रक्तामध्ये इमानदारी,
बघत नसतो कधीच आम्ही..
किती कोणाची जहागीर दारी,
भगव्या समोरच महाराष्ट्रात मराठीचा घात हाय,
मोडेन पण वाकणार नाय अशी
मराठ्याची जात आहे,
हक्कासाठी भांडतोय आम्ही,
नोकरीसाठी लढतोय,
महाराष्ट्रात क्रांतीचा इतिहास पुन्हा घडतोय,
हे नुसतेच तांडव नाही,
आम्हचे अन्यायावर मात हाय,
मोडेन पण वाकणार नाय अशी मराठ्याची जात आहे,
पुरे झाले आता हे तुमचे मराठीवर हल्ले,
बुरुजा सकट जागे करु महाराष्ट्रातील किल्ले,
पाठीवरती अजुन आमच्या शुर शिवाचा हात हाय,
मोडेन पण वाकणार नाय अशी मराठ्याची जात आहे,
स्मरण ठेवा तानाजीच,
मरण आठवा संभाजीच,
स्वराजासाठी रक्त सांडल पावनखिडीत बाजीच,
साल्यानी पाठीमागुन वार केले,
हाच मोठा घात हाय, मोडेन पण वाकणार नाय अशी मराठ्याची जात आहे,
जय हिँद
जय महाराष्ट्र

नाही विसरलो


नाही विसरलो ते डोळे तुझे....
हरिणीलाही लाजवणारे
नाही विसरलो ते गाल तुझे....
... गुलाबाहून गुलाबी असणारे
नाही विसरलो ते केस तुझे....
वाऱ्यावर भुरभुरणारे
शोधतो रोज नवी युक्ती
प्रेम व्यक्त करण्याची
पण आहे मनात इच्छा अजून
चोरून तुला बघण्याची ...
आहे मनात इच्छा अजून
पुन्हा प्रेमात तुझ्या पडण्याची .....
कसे विसरू ग ते क्षण
सोबत माळावर फिरण्याचे
कसे विसरू ग ते क्षण
तुझ्या मिठीतल्या आनंदाचे...
पण वाटते कधी कधी !!!
पुरेल तुझं ते हसण रुसण आयुष्यभर
ये ना पुन्हा अशी मिठीत क्षणभर
फक्त क्षणभर ....
पुरवेल तो क्षण मी आयुष्यभर
फक्त आपल्या प्रेमाखातर ..

माझे तुझ्यावर प्रेम आहे हे

माझे तुझ्यावर प्रेम आहे हे
मी तुला रोज सांगणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे

पहिले मी जेव्हा तुला
... फक्त तूच दिसत होतीस
जिथे तिथे मी पाहावे
फक्त तूच भासत होतीस..
माझ्या नजरेपासून दूर जरी गेलीस
तुझ्याबरोबर मीही चालणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे

प्रेमाला प्रेमाने जिंकता येते
अशीच मला आशा आहे
प्रेम दिल्याने वाढत जाते
हीच प्रेमाची भाषा आहे
प्रेमाला फक्त प्रेम द्या हेच
मी सर्वाना सांगणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे —

(Romantic Propose - Marathi Love Story .

हो ..... मलाही !

तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे
तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच !
दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ...
दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ...
त्यालाही काही विचारायचं होतं ,
तिलाही काहीतरी बोलायचं होतं ,
पण ... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं !
शेवटी तिला सुचली एक कल्पना ...
नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ...
ती लाडात येऊन म्हणाली ,
काल मला एक स्वप्नं पडलं ...
स्वप्नात कोणीतरी मला propose केलं ...
" will you marry me ? "
त्याने न राहवून विचारलं, मग उत्तर काय दिलंस ?
ती म्हणाली " हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही "
त्याने उत्सुकतेने विचारलं " कोण होता ? सांगशील का ? "
ती लाजून म्हणाली " वेड्या ! तूच , आणखी कोण ? "
तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला
" खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं "
ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली
" हो ..... मलाही ! "