Breking News

शनिवार, १८ जुलै, २०१५

आईच्या पार्थिवाला अग्निडाग

मातृ पितृत्वाचे हरपलेले छत्र...पतीचेही झालेले निधन...या संघर्षाचा सामना करीत स्वतः काबाडकष्ट करुण उदरनिर्वाह करणाऱ्या सुमनबाई हरी चौधरी यांचे वयाच्या ७५ व्यावर्षी निधन झाले. त्यांना मुलगा
नसुन केवळ दोन मुलीच असल्याने त्यांच्या पार्थिवेला(मृतदेहास) अग्निडाग कोण देईल ? असा प्रश्‍न सर्वापुढेच उभा ठाकला. यावर धाकटया मुलीने धीर धरत आईच्या पार्थिवाला अग्निडाग देवून अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पार पडला. या क्षणाने अंतयात्रेसाठी स्मशानभूमीत जमलेल्या नातेवाईकासह उपस्थिताना गहिवरुन आले. मुलीच्या धेर्याने तिचे कौतुक करण्यात आले...... तळोदा येथील स्व.सुमनबाई हरी चौधरी यांनी आपल्या नावासमोर वडील हरी चौधरी यांचे नाव कायम राहु दिले. सुमनबाई या मागील काही वर्षापासुन आपल्या माहेरी येवून आई- वडीलांकडे राहत होत्या. काही वर्षापूर्वीच सुमनबाई यांच्या आईच्या निधानानंतर वडीलांचे ही निधन झाल्याने मातृ पितृ छत्र हरपले. तसेच मागील दोन वर्षापूर्वीच पतीचेही निधन झाले. सुमनबाई चौधरी यांना दोन मूली असुन त्यांचा विवाह झालेल्या आहे. सुमनबाई या स्वत काबाडकष्ट करून आपला उदरनिर्वाह करीत होत्या. मात्र वयाच्या ७५ व्या वर्ष झाल्याने मागील आठवडया भरापासून प्रकृती खालावली. म्हणून सुमनबाईंने आपली मोठी मुलगी हंसा ईश्वर चौधरी हिला बोलावुन घेतले. दि-13 जून रोजी सुमनबाई हिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे उपचारासाठी दखल केले असता अखेर दुपारी २:३० वाजेच्या सुमारास सुमनबाईची प्राणज्योत मालवली... अंत्यसंस्कार करण्यासाठी आज दि 14 रोजी नातेवाईक व समाजबांधव जमले. घरापासून ते अमरधाम पर्यन्त स्व.सुमनबाई चौधरी यांची अंतयात्रा काढण्यात आली.यावेळी अमरधाममधे सुमनबाईचे पार्थिव तयार करण्यात आले. मुलगा नसल्याणे त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग कोण देईल, असा प्रश्न ठाकला वडीलानंतर अचानक मातृत्वाचे छत्र हरपल्याने सुमनबाईची मोठी मुलगी हंसा ईश्वर चौधरी व धाकटी मुलगी सुरेखा सुरेश चौधरी या दोघांचे अश्रु थांबत नव्हते. यावेळी धाकटी मुलगी सुरेखा चौधरी हिने स्वतःला सावरत धीर धरत आपल्या आईच्या मृत्यदेहाला अग्निडाग देण्याचा निश्चय केला. त्यानुसार सुरेखाने आपल्या आईच्या पार्थिवला अग्निडाग देवून अंत्यसंस्कार पूर्ण केले. या क्षणाने जमलेल्या उपस्थितानी गहिवरुन आले. आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या सुरेखा व हंसा या दोघी मुलींच्या धैर्याने सासरची मंडळी व समाजाकडून कौतुक करण्यात आले.... वडील पूजा आदि केले. स्मशानभूमितील हे दृश्य पाहून उपस्थिताना गहिवरुन आले. वडीलानंतर अचानक आईपण हरवल्याने मुलगी सुरेखा व हंसा हयांचे अश्रु थांबत नव्हते.. आई वडिलांचे छत्र हरविलेल्या सुरेखा व हंसा ह्या दोघे मुलींचे सासर कडून व चौधरी समाजाकडून आत्मिकतेने व आपुलकिने कौतुक केले......