Breking News

धार्मिक स्थळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धार्मिक स्थळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

आमलाड येथील भक्तांच्या नवसाला पावणारी मा सतिभवानी


 तळोदा - पासून अवघ्या 2 कि.मी अंतरावर असलेल्या आमलाड येथील भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या मा सतिभवानी मंदिरात नवरात्री निमित्त भक्तांची मांदियाळी जमली आहे. शउ तकापूर्वी आमलाड येथील भागाबेन जाधव पटेल यांच्या स्वप्नात मा सतिभवानी देवी ने दर्शन देऊन आपणास जमिनीतून बाहेर काढ तुझा त्रास कमी होईल, असे सांगितले म्हणून स्वप्नातील जागेत आमलाडच्या शेत शिवारातून भगवान जाधव पटेल रघुनाथ जाधव पटेल यांनी देवी तांदळे स्वरूपात बाहेर काढून तेथेच प्रतिस्थापणा केली.  कालांतराने देवीने पुन्हा स्वप्नात येऊन मला शेत शिवारातून गांव शिवारात आणून स्थापन करा. असा दृष्टांत दिला म्हणून 1972 मध्ये देवीची स्थापना मंदिर बांधून आमलाडच्या पूर्वेला भगवान जाधव पटेल यांच्या शेतात वेशीवर करण्यात आली. आजतागायत तेथेच देवी असून त्याच्या सोबत बहिरम देवाची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. बाजूला तीन छोट्या मंदिरात ग्रामदैवत बसविण्यात आले आहेत. असे सांगितले जाते की देवी काढल्यापासून आमलाड मधील ग्रामस्थाची भरभराट झाली. कालांतराने देवी नवसाला पावते म्हणून भक्तांची गर्दी वाढू लागली. अनेकजण पूर्ण झालेला नवस फेडण्यासाठी तर अनेक जण नवस बोलण्यासाठी येऊ लागले. भक्तांची गर्दी वाढू लागले म्हणून आमलाड येथील पटेल कुटुंबियांचे आजचे वारस नरेंद्र भाई भगवान पटेल, सुदामभाई रघुनाथ पटेल, अंबालाल भाई काशिनाथ पटेल यांनी पुन्हा मंदिर जीर्णोद्धार करून भक्तांच्या सोयीसाठी भव्य सभामंडप हवनकुंड बनविले. दरवर्षी येथे माघ शुद्ध अष्टमीला देवीचा भव्य स्थापना दिवस साजरा होतो.
नवरात्रित पंचक्रोशीतील अनेक भक्त मनोकामना पूर्ण झाली म्हणून देवीची तुला करून चांदीचा पाळणा चढवून विविध प्रकारे नवस फेडतात. मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून अनेक जण नवस करतात. याच सोबत येथे पटेल कुटुंबीय त्यांचे वडील भगवान जाधव पटेल रघुनाथ जाधव पटेल यांच्या काळापासून म्हणजे सन 1974 पासून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविक भक्तांसाठी सदाव्रत चालवून त्यांच्या राहण्याची व जेवणाची रोज व्यवस्था केली जाते. एकावेळी 200 भाविक।निवास करू शकतात एवढी भव्य वास्तू त्यासाठी बांधण्यात आली आहे. या ठिकाणी रोज परिक्रमावासी थांबतात त्यांच्या साठी वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाते. याचा आज पर्यंत पटेल कुटुंबीयांनी कुठेच गाजावाजा केला नसून निस्वार्थ व अव्याहत पणे सेवा सुरू आहे......

भाविकांचे श्रद्धास्थान तळोदयातील आशापुरी माता..

तळोदा शहरा पासून काही अंतरावर असलेल्या आशापुरी मातेचे मंदिर असून सर्व समाजातील चव्हाण कुळासह इतर समाजाची कुलदैवत असल्याने काही वर्षापूर्वी बांधलेल्या या आशापुरी माता मंदिर भाविकाचे श्रध्दास्थान बनले असल्याने नवस पूर्तिसाठी व दर्शनासाठी गर्दी होत आहे....
                                       तळोदा शहरापासून थोड्याच अंतरावर अंकलेश्वर ब-हाणपुर अंतरराज्यीय महामार्गावर शिरीष जगजाळ यांच्या शेतात वसलेल्या आशापुरी माता मंदिरांची स्थापना दि १/५/२०१४ मध्ये करण्यात आली आहे तळोद्यातिल कै शिवराम जगजाळ यांच्या कुटूबिंय गिरीश जगदाळ, शिरीष जगदाळ, दिलीप जगदाळ, कै नानाभाऊ जगदाळ, जयंत जगदाळ, शाम जगदाळ या परिवाराने आशापुरी माता देवीची स्थापना मोठ्या उत्साहाने झाली त्या देवीची आजपर्यंत मोठ्या समारंभाने पूजा अर्चा सुरु आहे भव्य मंदिर सभा मंडप असून संगमवर सुमारे तीन फुटाची आकर्षक विलोभनिय मातेची मूर्ति आहे मराठा, पाटील, लोहार या सह अनेक समाजातील चव्हाण कुळाची कुलदैवत असल्याने अनेक समाजातील चव्हाण कुळासह इतर समाजाचे कुलदैवत असलेल्या आशापुरी माता मूळ राजस्थान येथे भव्य दिव्य मंदिर आहे. मात्र परिस्थिति नुसार गरीब भाविकांना जाने शक्य
 नसल्याने यापूर्वी शिंदखेड़ा पाटण येथील आशापुरी मंदिरात दर्शना साठी जात असत मात्र तळोद्यातिल जगजाळ परिवाराने काही वर्षापूर्वी आशा पूरी मातेची स्थापना केल्याने तळोदा तालुका परिसरा सह जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात नवरात्रि उत्सवानिमितांने सर्व समाजातील भाविकांची रेलचेल सुरु आहे नवरात्ति निमित्ताने भाविक नवस फेडत असतात सत्यनारायण पूजा, होम हवन कार्यक्रम होत आहेत...

रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

सिद्धेश्वर महादेव मंदीर

तलोदा शहरातील वांणी गल्ली परिसरातील वृंदावन वाडी शेजारी असलेले सिद्धेश्वर महादेव मंदिर हे 300 वर्षापूर्वीचे अहिल्याबाईच्या काळातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक आहे.. सिध्देश्वर महादेव मंदिरातील महादेवतेच्या दर्शनाला आलेल्या भविकांच्या मनोकामना पूर्ण होवून कार्यसिद्धि पाप्त होते. म्हणून या मंदिराला सिध्देश्वर महादेव मंदिर असे नावलोकीक झाल्याचे जानकार सांगतात. महादेवाच्या दर्शनाने लोकांची संकट दूर होवून मनोकामना पूर्ण होत असल्याने  बाराही महीने सिध्देश्वर महादेव मंदिरात भक्तांची गर्दी होत असते. श्रावण महिन्यात भक्तगणांचा रांगा लागत असुन परिसरातील नागरिक भंडारा सह भजन किर्तन आदि कार्यक्रमाचे आयोजन करतात. ह्याकाळात मंदिर परिसर भाविकानी फुलुन निघतो. सिध्देश्वर महादेव मंदिर हे तळोदे शहरात व आसपासच्या परिसरात  खोल (ऊँडा)महादेव म्हणून प्रसिध्द आहे.  मंदिर हे जमीन लेवल पासुन 5 फुट खाली आहे, त्यामुळे मंदिरातील सर्व मुर्त्या ही जमीनी पासुन 5 फुट खाली आहेत आणि स्थानिक भाषेत त्याला उंड म्हणतात. म्हणून शहरात व परिसरात या मंदिराचे प्रचलीत नाव उंडा किंवा खोल महादेव झाले आहे. मंदिरात पूर्वी दगडी मुर्त्या कोरलेल्या होत्या परंतु त्यांची झिज झाल्याने त्यांना तापी नदीत विसर्जित करण्यात आल्यात. सन 1999 मधे बासवाड़ा येथून गणपती, दत्त व लक्ष्मीच्या मुर्त्या आणून त्यांची प्राणप्रतीस्थापना करण्यात आली.
{ सिध्देश्वर महादेव मंदिरात दत्तमुर्ती, गणपती मुर्ती, लक्ष्मी मातेची मुर्ती व नंदीची मुर्ती आहे. मंदिरातील मुर्त्या संगमेंश्वर  पाषणात कोरलेल्या आहेत.  मंदिरात नंदी  पच्छिमेस तोड़ करुण एका चौरसावर वसलेला आहे. नंदी हा दगडयात कोरलेला आहे. मुख्य मंदिराच्या गाभार्यात मध्यभागी शिवलिंग आहे व शिवलिंगचा प्रवाह हा उत्तरेस आहे.}


शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५

तळोदा येथील चिंतेश्वर महादेव मंदीर

तळोदा  शहरासह जिल्ह्याभरात महादेवी मंदीरे महाशिवरात्री निमित्त सजली असून मंदिरांवर आकर्षक
रोषणाई करण्यात आली आहे. सर्वत्र महादेव मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी भजन किर्तन, महाप्रसाद, यात्रोत्सव आदी कार्यक्रम घेण्यात आले. हर हर महादेव या जयघोषात तलोदा शहरातील चिंतेश्वर मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली़ मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता़. यावेळी महिला, लहान मुलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती़. सकाळी आरती, पूजा आदी कार्यकम पार पडले़ याशिवाय गावातील महादेव मंदिरांमध्येही भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली़........ शहरातील वानी गल्लीतील सिद्धेश्वर महादेव मंदिरात भंडाराचा आयोजन करण्यात आले असून गावातील पाताळेश्वर मंदिर, काकाशेठ महादेव मंदिर,त्रिपाळेश्वर महादेव मंदिर,तर शहादा रस्त्यावरील कंकेश्वर महादेव मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर महादेव मंदीरावर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तर
 तलोदा शहराच्या पश्चिमेकड़े मोठ्या माळी वाडयात कालिका देवी गल्लीला लागून 350 पेक्षा अधिक वर्षापूर्वीचे चिंतेश्वर महादेव मंदीर आहे. ह्या मंदिरात जावून भाविकांच्या चिंता दूर होते अशी ख्व्याति ह्या मंदिराला प्राप्त झाली आहे. चिंतेश्वर मंदिर हे आहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधले गेले असुन ह्या मंदिराच्या स्थापनेपूर्वी गावातील नागरिक वेगवेगळ्या रोगानी व आजारानी ग्रस्त झाले होते.व अश्या काळात मंदिराची स्थापना झाली व योगायोगाने लोकांचे आजार नष्ट होऊ लागले. व लोकां ची अशी भावना झाली की या मंदिराचा स्थापनेमुळे लोकांच्या चिंता दूर होतात. अशी आख्यायिका प्राप्त झाली आहे. म्हणून मंदिराला चिंतेश्वर म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. ह्या मंदिराचा परिसराची लांबी 17 फूटापेक्षा अधिक असून रुंदी 24 फुट आहे. चिंतेश्वर मंदिरात श्री. गणपती श्री. कृष्ण तर माता लक्ष्मी अश्या दीड दीड फुटाच्या 4 मुर्त्या आहेत. तर मध्यभागी 24×29 इंचची महादेव पिंड असून पिंडच्या प्रवाह उत्तरेस आहे. मंदिराच्या
गाभाऱ्या समोर पश्चिमेस तोड़ करुण नंदी बसविला आहे. स्थळाच्या गाभाऱ्यात चारही बाजुनी कोरीव गोखले असुन मंदिराला 14 फुट व्यासाच्या घूमट असुन त्यावर 3 फुटाचा कोरिव कळस आहे..... सध्या असलेल्या मुर्त्यांच्या जागी सन् 2001 पुर्वी या वर्षापुर्वी जुन्या मुर्त्या होत्या, त्या मूर्तीची झिज झाल्याने त्यांचे तापी नदीत विसर्जन केले. व त्यांच्या जागी राजस्थान येथून नविन मुर्त्यांची स्थापना करण्यात आली आहे. सदर मुर्त्या ह्या संगम रवरच्या पाश्याणाने कोरलेल्या आहेत. श्रावण महीना व् महाशिवरातत्रीला, भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. पाउसाळयात पाऊस येण्यास उशीर झाला तर परिसरातील नागरिक मंदिर पाण्याने भरतात ह्यामुळे पाऊस यतो अशी भावना आहे. तसेच ह्या मंदिरावर येवून मनातील इच्छा पूर्ण होवून लोकांची चिंता दूर होत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते.



तलोदा शहरात मगरे चौक व कालिका देवी गल्लीला लागून 350 पेक्षा अधिक वर्षापूर्वीचे चिंतेश्वर महादेव मंदीर आहे. ह्या मंदिरात जावून भाविकांच्या चिंता दूर होते अशी ख्व्याति ह्या मंदिराला प्राप्त झाली आहे. चिंतेश्वर मंदिर हे आहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधले गेले असुन ह्या मंदिराच्या स्थापनेपूर्वी गावातील नागरिक वेगवेगळ्या रोगानी व आजारानी ग्रस्त झाले होते. अश्या काळात मंदिराची स्थापना झाली व योगायोगाने लोकांचे आजार नष्ट होऊ लागले. ह्यामुळे लोकांची भावना झाली की या मंदिराचा स्थापनेमुळे लोकांच्या चिंता दूर होते. व ह्यामुळे मंदिराला आख्यायिका प्राप्त झाली. म्हणूनच मंदिराला चिंतेश्वर म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. ह्या मंदिराचा परिसराची लांबी 17 फूटापेक्षा अधिक असून रुंदी 24 फुट आहे. चिंतेश्वर मंदिरात श्री. गणपती श्री. कृष्ण तर माता लक्ष्मी अश्या दीड दीड फुटाच्या 4 मुर्त्या आहेत. मध्यभागी 24×29 इंचची महादेव पिंड असून पिंडच्या प्रवाह उत्तरेस आहे. मदिराच्या गाभाऱ्या समोर पश्चिमेस तोड़ करुण नंदी बसविला आहे. स्थळाच्या गाभाऱ्यात चारही बाजुनी कोरीव गोखले असुन मंदिराला 14 फुट व्यासाच्या घूमट आहे त्यावर 3 फुटाचा कोरिव कळस देखील आहे.. सध्या असलेल्या मुर्त्यांच्या जागी सन् 2001 या वर्षापुर्वी जुन्या मुर्त्या होत्या, त्या मूर्तीची झिज झाल्याने त्यांचे तापी नदीत विसर्जन केले. व त्या जागी राजस्थान येथून नविन मुर्त्यांची स्थापना करण्यात आली आहे. सदर मुर्त्या ह्या संगम रवरच्या पाश्याणाने कोरलेल्या आहेत. श्रावण महिना व महाशिवरात्रि काळात भाविकांची प्रचंड गर्दी असते. पाउसाळयात पाऊस येण्यास उशीर झाला तर परिसरातील नागरिक मंदिर पाण्याने भरतात ह्यामुळे पाऊस यतो अशी भावना आहे. तसेच ह्या मंदिरावर येवून मनातील इच्छा पूर्ण होवून लोकांची चिंता दूर होत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते. (आपल्या आठवणी शेयर करा) सुधाकर मराठे http://sudhaspari.blogspot.in/2015/02/blog-post_42.html?m=1

सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

नवसालारी पावणा खटाई माता

तलोदा शहराच्या उत्तरेला खटाई माता नगर येथिल स्व:रमन सुर्यवंशी यांच्या शेतात खटाई मातेचे मंदिर आहे. नवरात्रोत्सवा निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. नवरात्रात नवसपूर्तीसाठी भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. तलोदा येथील बबनराव छगनराव माळी यांचे मोठे बंधु रमन छगन सुर्यवंशी यांच्या मालकी शेतात खटाई माता नगर येथे 300 वर्षापूर्वीचे अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील खटाई मातेचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम साध्या स्वरूपाचे आहे. अहिल्याबाईच्या काळापासून भाविक नवरात्रित नवस व मानता करता. नागरिकांची अशी भावना आहे की, नवरात्रीत मंदिरात येवून मातेजवळ नवस केल्याने मनातील इच्छा आकांशा पूर्ण होवून कार्यसिद्धि प्राप्त होते. पुणे नाशिक शिंदखेड़ा मालेगाव आदि परिसरातील वैष्णव समाजाची कुलदैवत असल्याने येथून मोठ्या प्रमाणात नागरिक चैत्र पोर्णिमेला मानता फेडण्यासाठी येत असतात. तसेच आसपासच्या परिसरासह गुजरात राज्यातील भाविक देखील मोठ्या संखेने नवस मानण्यांसाठी येतात. मंदिराचे तोंड पूर्वेस असुन मंदिर हे चार फुटाच्या उंचीवर चौरसावर बांधलेले आहे.मंदिराच्या मागील बाजूस एक लहान मंदिरात एका अखंड दगडात दोन मुर्त्या कोरलेल्या आहेत. त्यापैकी एक मूर्ती खटाई मातेची व दूसरी मूर्ती तीची बहिन आहे. मुर्त्या शेंदुरने फासलेल्या आहेत. मंदिराला पत्र्याचे मंडप करण्यात आले आहे, मंदिराच्या डाव्या बाजूला 4 फुटाचे तीन महादेवाचे लहान मंदिरे आहेत.
व समोर एक लहान मंदिर आहे, मंदिरात पादुका व लहान लहान शिवलिंग आहेत. मातेच्या मंदिराच्या उजव्यादिशेला भवानी माता व महिषासुर यांचे स्थान आहे. कार्तिकी एकादशिला बालाजी वाड़यात होणाऱ्या दशअवतार कार्यक्रमा नंतर गावात भवानी माता व महिषासुर यांचा मिरवणुक निघत असते . सदर मिरवणुकीचा आदल्या दिवशी खटाई मातेचे दर्शन घेवुनच गावात भव्य मिरवणूक निघत असल्याचा इतिहास आहे.. नवरात्रोत्सवा निमित्त दररोज सकाळी आणि सायंकाळी महाआरती करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांकडून नावरात्रित मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली जाते. तळोदा शहरातील जुनेजाणते नागरिक आजही कोणतेही नवीन कार्य करण्या अगोदर मातेचे दर्शन घेऊनच सुरू करतात. नवसाला पावणार्‍या खटाई मातेला नारळ वाहून नागरिक नवस करतात. नवरात्रोत्सवनिमित्त मंदिराच्या विश्‍वस्तांनी विशेष तयारी केली आहे.... मंदिराचा सांभाळ मंदिराचे पूर्वज दगुलाल रमन सुर्यवंशी, भास्कर रमन सुर्यवंशी, सुरेश रमन सुर्यवंशी आदि करीत आहे...

मनातील इच्छापूर्ती करणारी मनिषापूरी माता

मनिषापूरी माता भक्तांच्या मनातील इच्छापूर्ती करणारी देवी म्हणुन तळोद्यातील ऐतिहासिक मनिषापुरी मातेवर भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराची उभारणी ३०० वर्षापुर्वी जहागिरदार श्रीमंत नारायणराव भोजराज बारगळ यांनी केली. नारायणराव भोजराज बारगळ हे त्यावेळी राजस्थानातील उदयपुर संस्थानाचे सेनापती असताना त्यांनी मनातील इच्छा पूर्ण झाली तर मनिषापुरी मातेची स्थापना तळोदा गावात करीन असा नवस केला होता. नवसाप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण झाल्याने श्रीमंत नारायणरावानी मनुषापुरी देवीची स्थापना केली. देवी पार्वतीचे रूप असल्याने मंदिराशेजारी कालभैरव रूपी शिवाची स्थापना करण्यात आली आहे. अवघ्या पंचक्रोशितिल हे एकमेव कालभैरवनाथाचे मंदिर असल्याने येथे सुद्धा नेहमी भक्तांची गर्दी असते. तळोदयात पूर्वी वर्षभरात दोन यात्रा भरत असत, त्यापैकी चैत्र नवरात्रिला मनिषापुरी
मातेची व अक्षय्य तृतीयेला कालीका देवीची या मनिषा पुरिमातेची यात्रा त्याकाळी पंचक्रोशितिल सर्वात मोठी यात्रा होती. १९०० शतकाच्या सुरुवातीला तळोदा परिसरात प्लेगने थैमान घातले. त्यावेळी संसर्ग होवु नये म्हणुन ही यात्रा बंद करण्यात आली. मनिषापुरी मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे याठिकाणी एकाच जागी दोन मुर्त्या आहेत. त्यापैकी उजव्या बाजूला मनिषापुरी मातेची व डाव्या बाजुला सटवाई देवीची एकाच जागी सटवाई व मनिषापूरी देवी असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. तळोदयाचे जहागीरदार बारगळ हे 15 व्या शतकात सुलतानपुर- शहादा येथे संस्थानिक होते. त्यावेळेस त्यांच्या कुटुंबातील छटी (सटवाई) पूजण्यासाठी सुलतानपुर येथे सटवाई स्थापण्यात आली होती. ती सटवाई देवी कालांतराने 1921 साली तत्कालीन
जहागिरदार श्रीमंत कृष्णराव बारगळ यांनी तळोद्यातील मनिषापुरी माता मंदिरात आणून स्थापली. १९२१ साली सटवाई स्थापनेच्या वेळेस या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. नवरात्र काळात नवस फेडणारे व नारळ करणाऱ्या भक्तांची गर्दी असते.तसेच नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते..










शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

तळोदा वासियांचे श्रद्धास्थान असलेली कालीका माता

तळोदा शहराच्या खर्डी नदीकाठावर सुमारे ११४ वर्षांपूर्वी बारगळ जहागीरदारांनी कालिकादेवी मंदिराची उभारणी केली होती. गावाच्या वेशीवर असलेल्या या मंदिरातील कालिकादेवीवर शहरासह तालुक्यातील भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणी दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची नवस फेडण्यासाठी गर्दी होत असते. उत्सव काळात जिल्हाभरातील भाविकांकडून कालिका मातेला साडीचोळीचा अहेर करण्याची परंपरा आहे. यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरावर रोशणाई करण्यात आली आहे. परिसरातील भाविक पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिराची देखभाल वत्सलाबाई गुरव ह्या करीत आहेत. तालुक्यासह गुजरात व मध्य प्रदेशातील भाविकांची कुलदेवता असल्याने येथे नवरात्रोत्सवात नवस फेडणार्‍यांची मोठी गर्दी होते. नवरात्रोत्सवानिमित्त दररोज सकाळी आणि सायंकाळी महाआरती करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांकडून वर्षभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली जाते. तळोदा शहरातील जुनेजाणते नागरिक आजही कोणतेही नवीन कार्य मंदिरावर दर्शन घेऊनच सुरू करतात. नवसाला पावणार्‍या कालिकामातेला नारळ वाहून नागरिक प्रवासाला प्रारंभ करतात. तळोदावासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कालिकामाता मंदिरात नवरात्रोत्सवात गरब्याचे आयोजन केले जाते. शहराच्या वेशीवर असलेल्या कालिका मातेचा दरवर्षी अक्षय्यतृतीयेला मोठा यात्रोत्सव होतो. या यात्रोत्सवात हजारोंच्या संख्येने जिल्ह्यासह गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील भाविक येऊन नवस फेडतात.

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

बुधावल येथील श्री गणेश मंदिर

तळोदा तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणुन सर्वदुर ख्व्याती असलेले बुधावल येथील श्री गणेश मंदिर
भाविकांचे श्रध्दा स्थान आहे या गणेशाच्या मंदिरामुळे या गावाला गणेश बुधावल म्हणुन प्रसीद्धी
मिळाली आहे या मंदिराचा तब्बल 250 वर्षाचा इतिहास् आहे. गणेश उत्सवा निमित्त येथे भाविकांची गर्दी उसाळत असते. तळोदा राजवीहीर रस्त्या वर तळोदा शहरा पासून सुमारे चार किलो मीटर अंतरावर असलेले बुधावल गाव तेथील प्राचीन गणेश मंदिर विशेष प्रसिद्ध आहे या मंदिराच्या परिसरात असलेली प्राचीन विहीर मंदिराचा इतिहास 200 वर्षा पुर्वी पेक्षाही जास्त असल्याची साक्ष देते येथे कमानी असलेली प्राचीन पाय विहीर आहे या विहिरिला लागुनच गणेशाचे मंदिर होते परंतु या मंदिराचा भींतिची धुप झाल्याने मंदिर पडण्याच्या मार्गावर होते त्यामुले येथील भाविकांनी 1960 -61 मध्ये हे प्राचीन मंदिर पाडले त्या नंतर 1961 मध्ये छोटेसे मंदिर बांधण्यात आले याच मंदिराच्या अवती भोवती 1986-87 मध्ये पत्र्याचे शेड उभारण्यात आले 2007 मध्ये सिमेंट कांक्रीट चे मंदिर बांधण्याच्या निर्णय घेण्यात आला व भाविकांनी दिलेल्या देणगीतुन या मंदिराच्या उभारनिचे काम सुरु असल्याचे येथील कामकाज पाहणारयां भाविक सांगितात पूर्वमुखी मंदिरातील गणेशाची मूर्ति सुंदर रेखीव व आकर्षक असून एकाच कला पाशानातील आहे या मूर्तीला चढ़वन्यात आलेल्या सेंदुरामुळे तिचे तेज अधिकच खुलुन दिसते . या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी लांबचे भाविक या ठिकाणी येतात. श्रावण महिन्यात सत्यनारायनाची महापूजा तसेच चतुर्थिला येथे भाविकांची गर्दी होते. परिसरात असलेले वडा चे झाड भाविकांना शीतल छाया देण्यात व लीन होण्यास मदत करते. मंदिर परिसरात 1963 पासून गुढीपाढव्याला मोठी यात्रा ही भरते.
या मंदिराचे बांधकाम व परिसरातील कामे भाविकांनी दिलेल्या देणगीतूंनच पूर्ण केले जात असल्याचे सागण्यात आले . येथे येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी खुर्च्या वेलदा येथील पटेल कुटुंबीय व तलोदा येथील जगन्नाथ एकनाथ माळी यानी बसविल्या आहेत. तसेच मंदिराचे बांध काम अजुनही अपूर्ण अवस्थेत असल्याने भाविक व देंणगी दारानी अधीकाधीक देणगी द्यावी , अशी अपेक्षा येथील देखरेख करनारे भाविक व्यक्त करतात. पर्यटनाच्या दृष्टीनेही येथील मंदिर प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्यटन विभागाकडूनही येथील मंदिर विकासाकडे लक्ष देण्याची अपेक्षा भाविकानी व्यक्त केलि आहे. या मंदिर परिसरात असलेली प्राचीन विहीर जुन्या बांधकाम शैलिची आठवण करुण देणारी आहे. या विहिरीत उतरन्या करीता पायवाट असून पायर्यावर तीन ठिकाणी तीन व दोन व एक अश्या कमानी आहेत. याच विहिरिचे पाणी पिउन 1971-72 व 1984-85 च्या दुषकाळी काळात परिसरातील जनतेचे हाल थांबले होते.
या विहिरीत आजही पाणी असल्याने श्री गणेशा मुलेच पाणी टिकून असल्याची भावना परिसरातील नागरिकांची आहे.या प्राचीन गणेशाच्या मंदिराची देखरेख कोमा नेहरु वळवी यांच्या कुटुंबाकडे आहे. येथील धार्मिक विधी ते पार पाडतात तसेच येथील भाविक सूर्या केमन्या पाडवी, विजय वेजू वळवी, शिवाजी वेरत्या वसावे, मनोज श्रीराम कर्नकार, जीवन दत्तु पवार, सुनील गोपाळ पाटिल यांच्या सह कार्याने सुख सोयी पुरविल्या जातात. आजपर्यंत भाविकानी दिलेल्या देणगीतुनच मंदिराची उभारनी होत आली आहे. परंतू अपूर्ण अवस्थेतील काम पूर्ण होण्यासाठी देनगीदार व भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कोमा वळव़ी यानी केले आहे. भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा, अशी ख्व्याती असलेल्या या गणेशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. भाविकांच्या 'गणपती बाप्पा मोरया' च्या जय घोषाने येथील परिसरात चैतन्य पसरलेले असते.





आदिशक्ती कालीकादेवी

शहराचे आराध्य व जागृत दैवत आदिशक्ती कालीकादेवी मातेच्या यात्रेलावै शाख शुद्ध 3 दि 2 में पासून प्रारंभ होतो यापरिसरात शेवटची यात्रा असते शहरात खर्डी नदीच्या तीरावर वटवृक्षाखाली वसलेले नवसाला पावणारी व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी कालिकामाता मंदिर आहे अक्षय्य तृतीयेपासून आठ दिवस यात्रा भरते या नंतरही यात्रासुरुच राहते तालुका परिसरातुन हजारो भक्तगण दर्शनासाठी मंदिरात रांगा लागत असतात पूर्वी यात्रा खर्डी नदिपात्रात भरत असे कालां तराने यात्रा आठवडे बाजारात भरु लागली असून तळोद्याची यात्रा म्हटली म्हणजे पुर्वी वर्षाला लागणारे संसार उपयोगी वस्तु भांडी मसाले,कांदा , लसून व विशेष म्हणजे बैल जोड़ी , लाकडी मजबूत टिकाऊ बैलगाड़ीसाठी खान्देशात प्रसिध्द होती. तळोद्यातील बैलगाड़ी खरेदी करण्यासाठी शेतकरी हजेरी लावत असत तसेच व्यापारीही हजेरी लावत मात्र यांत्रिक युगात लाकडी बैलगाडी ला मागणीत घट झाली आहे तसेच बैलजोडी खरेदी विक्री मोठ्या होत असते खर्डी नदी शेजारी बैलविक्री बाजारात लाखो रूपयांची उलाडाल होते या बैल बाजारासाठी तळोदा कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे व्यापा-यांसाठी पाण्याची दीवा बत्तीची व्यवस्था करण्यात येते यात्रेत विवीध प्रकारचे पाळणे सर्कस मौत का कुवा डॉगी शो लोखंडी साहित्याचे व्यापारी भांड्याचे व्यापारी लसून कांदा मसाले दुकाने थाटतात विशेष म्हणजे भांड्याचे व्यापरियात्रा संपल्या नंतरही पंधरा दिवस असतात तळोदा पालिकेत यात्रेकरुच्या सुविधा पुरवीण्यासाठी परिश्रम घेत असतात.


कुंडलेश्वर शबरीधाम

गरम पाण्याचे झरे अन थुई थुई 
नाचणारा मोर कुंडलेश्वर परिसर देतो मनाला शांती

सातपुडयाच्या पायथ्याशी निसर्गाच्या वनराईत उंच टेकडयांवर वाहणारे गरम पाण्याचे झरे आणि त्याच परिसरात थुई थुई नाचणारा मोर पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेड़ते. तळोदा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील कुंडलेश्वर शबरीधाम महादेव मंदीर हे पाचशे वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर असुन याठीकानी नेहमी भाविकांची गर्दी असते. नवसाला पावणारा व मनाला शांती देणारा महादेव असल्याची ख्व्याती येथे प्राप्त झाली आहे. त्यामुळे आदिवासी उपायोजनेंतर्गत वनपर्यटक विकास निधीतुन निसर्गरम्य पर्यटन स्थळाची विकास कामे याठिकाणी करण्यात आली आहेत. तळोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र कुंडलेश्वर शबरीधाम महादेव पाचशे वर्षापुर्वीचे पुरातन मंदिर आहे. मंदिर उंच। टेकडीवर असुन सातपुडयाच्या रांगेतुन एक नदी बारमाही वाहते. या नदीजवळ दोन गरम पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. या। झ-यांच्या पाण्यात अंघोळ केल्याने त्वाचारोग बरा होत असल्याची भावना आहे. या तीर्थक्षेत्रावर मकरसंक्रांतीला मोठी
यात्रा भरते. १५ वर्षापुर्वी याठिकाणी संत तारादास बापुंनी मौनवरद घेतले. यावेळी भाविकांनी या मंदिराच्या पायथ्याशी टेकडी खोदुन भव्य असे पटागन तयार केले आहे. मंदिराच्या पटागंनावर कौलारु आश्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. याठीकानी भाविकांना मुक्काम करण्याची सोय झाली आहे. महादेव मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात सातपुडयाच्या पर्वत रांगांमधुन पाणी वाहते. या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. त्याला भाविक गुप्तगंगा असे देखील म्हणतात. मंदिराच्या पायथ्यालगत नदीच्या किनारी पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. या पाण्यात गंधकाचे स्त्रोत असल्याने त्वचारोग दुरुस्ती होत असल्याची भावना भाविकांची आहे. मकरसंक्रातीच्या यात्रेला भाविक रात्रीच्या प्रवास करुण या झ-याखाली अंघोळ करतात.
त्यानंतर जागरूत महादेवाचे दर्शन घेवुन निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद लुट्तात. कुंडलेश्वर परिसराला पर्यटनाचा दर्जा लाभल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी ओसाडु लागली आहे. शाळा, महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलीसह निसर्गप्रेमी येथे भेट देतात. त्यामुळे याठिकाणी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे। आहे. भाविकांसाठी भक्त निवास, महिलांसाठी स्वतंत्र प्रासधनगृह बांधन्याची गरज आहे. श्रीक्षेत्राकड़े जाण्यासाठी अर्धा km अंतराच्या कच्चा रस्त्याने प्रवास करावा लागतो. पारंपारीक कौलारू घरे मनमोहित करतात. कुंडलेश्वरला पोह्चताच त्याठिकाणी असलेले मोर आपल्या नृत्यात दंग असल्याचे दिसून येते. याठिकाणी वनविभागाने विश्रामगृह उभारली आहे.
तर अद्यावत निसर्ग पर्यटन कुटीची निर्मिती करण्यात आली आहे. निसर्गाच्या आनंद लुट्ण्यासाठी निसर्गप्रेमी, पर्यटक नेहमीच याठीकाणी गर्दी करतात. त्यामुळे परिस्रालाक यात्रेचे स्वरुप प्राप्त होते. बदलत्या काळानुसार श्रीक्षेत्र कुंडलेश्वराचे पारंपारिक रूप बदलत। आहे. या धार्मिक स्थळाचे जतन करणे गरजेचे आहे.














बुधवार, ९ जुलै, २०१४

तलोदा तालुक्यातील प्रती पंढरपुर रांझणी

तळोदा- तालुक्यातील प्रती पंढरपुर रांझणी येथे श्री विठ्ठल-रुखमाई मंदिरात गेल्या दहा वर्षापासून देवशयनी आषाढी एकादशीला दर्शनासाठी वैष्णवाचा मेळा भरतो यत्रोत्सव साजरा होतो. तळोदा तालुक्यातील प्रतीपंढ़रपूर रांझणी श्री विठ्ठल-रुखमाई मंदिरात देवशयनी एकादशीनिम्मित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते याच दिवशी यात्रा भरते जिल्हा परिसरातुन साक्षात पांडुरंगाचा दर्शनासाठी हजारो भविक हजेरी लावत असतात दिवसभर विठ्ठल नामाचा गजरात वैष्णवांचा मेळा भरतो सकाळी काकड आरती महापूजा महाआरती होते गावात पांडुरंगाची पालखी मिरवणुक निघते तसेच प्रतापपुर,चिनोदा, सदगव्हान व् परिसरातील गावातून पायी पालखी दिंडी येत असतात शेकडो भाविक नवस फेडण्यासाठी येतात रांझणी चारवेदासह शास्र आठरा पूरण मुखोदगत असणारया ब्रम्हचार्य पाळणारया हृषीतुल्य संतमूनी नंद योगिराज कृष्णानंदजी महाराज यांच्या प्रेरणेतुन रांझणी गावात विविध मंदिर बांधणीस प्रोत्साहन मिळाले गावात हनुमान,गणपती मंदिर नंतर भव्य दिव्य श्री विठ्ठल-रुखमाई मंदिर कै भटाभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र एकादशी दि 24 एप्रील 1995 मध्ये एका वर्षात श्रमदानाने व जिल्हयातील दानशुर दात्यांच्या सढळहाताने देणग्याँच्या मदतीने श्री विठ्ठल-रुखमाईचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे श्री विठ्ठल-रुखमाई विलोभनीय अश्या मुर्तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मंदिरात संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ व श्री गणेशाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे रांझणी गावात प्रतीपंढरपुरचे स्थान निर्माण झाले असुन गोरगरीब भक्तांना येथे पांडूरंगाचे दर्शनाचे सुख प्राप्त करून देत असतात मंदिर परिसरात पूजा प्रसाद विविध वस्तु खेळणी दुकाने लहान पालख्या श्रीफळ फुलांची दुकाने थाटली जातात दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचे रेलचेल असते दानशूर दात्यांच्या सहकार्याने फराळाची सोय उपलब्ध केली जाते यामुळे प्रतीपंढरपूर रांझणी म्हणुन नांव लौकिकास आले आहे...