Breking News

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०१४

शिक्षण महर्षी आप्पासाहेब लक्ष्मणराव माळी यांना मानाचा मुजरा

 शिक्षण महर्षी आप्पासाहेब लक्ष्मणराव माळी यांना मानाचा मुजरा !
महाभारताचे युद्ध सर्वाना परिचित आहे. या युद्धात पांडवांचा विजय झाला, युद्धानंतर विजयी पांडव अमर राहू शकले नाही. हे अनेकाना कदाचीत माहितही नसावे, स्वर्ग वाटेवर जाणारे पांडव एक एक करुण जमीनीवर कोसळले अनं त्यांचा स्वर्गवास थांबला ठेच लागुन पांचाली द्रोपदी कोसळली, धर्मराज पुढे चालत राहिले भिमाला राहवले गेले नाही, त्याचे प्रेम पाहून उच्चारलेले दोन शब्द ``थोरलाहो'' हिच महाभारत महारचनेची खरी गाथा आहे. द्रोपदीला थोर भाऊ अपेक्षित होता, कारण तो स्वर्गात घेऊन जाऊ शकत होता. मानवी
जीवनातल्या महाभारतात थोरल्याची हजारो वर्षापूर्वी धर्मराज युधिष्ठिरच्या असाच कर्तव्य कठोर वागणूकीने सिद्ध केले घरातली थोरली व्यक्ती कशी असावी, याचे दर्शन त्या व्यक्तीच्या कार्य कुशलता, धीर गंभीर धिरगंभीरता निर्णयक्षमता, प्रेम, स्नेहभाव यावर आधारलेली असते. मागुन मान मीळत नसतो, इतरानी तो स्वतःहुन द्यायचा असतो. स्वर्गवासी बबनराव छगनराव माळी यांच्या घरात थोरल्यारूपी आप्पासाहेब लक्ष्मणराव माळी यांची समाज कुटुंब अन सर्वदुर अशीच ख्व्याती आहे. न मागता न बोलता मान असणारा देव
माणुस म्हणून आप्पासाहेबाना मीळवलेली किर्ती, अन जोडलेली माणसे, शब्दात न मोजनारी आहेत. अत्यंत साध्या सरळ स्वभावाच्या आप्पासाहेबांचा वाढदिवस प्रत्येक कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा साक्षात् धर्मराज युधिष्टिराचा वाढदिवस म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सबका मालीक एक या तत्वाला मानणारे, सर्व धर्मियांचा आदर करणारे शिक्षण महर्षी माननीय आप्पासाहेब लक्ष्मण बबनराव माळी यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील सर्वात जुनी शैक्षणिक संस्था पी. ई. सोसायटीचे ते गेल्या १३ ते १४ वर्षापासुन अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात ही संस्था मोठ्या वैभवास प्राप्त झाली. आदिवासी भागात शाळा, कॉलेजेसच्या माध्यमातून तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाची द्वारे मुक्त केली. पी. ई. सोसायटींच्या शाळेत शिकून असंख्य विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत. याचे श्रेय आप्पासाहेब
लक्ष्मण माळी यांना जाते. मागास भागातील शैक्षणिक संस्थांची अवस्था काय असते ? हे सर्वांना माहित आहे. परंतु आप्पासाहेब लक्ष्मण माळी यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेला एक वेगळे स्वरूप प्राप्त करून दिले. या संस्थेतून ज्ञानाची दिक्षा घेणारे विद्यार्थी तयार झाले पाहिजेत असा त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे संस्थेतील शिक्षक, कर्मचारी वर्ग मोठ्या परीश्रमाने संस्थेच्या नांव लौकीकात भर घालत आहे. कमी बोला व जास्त ऐका या संतांच्या शिकवणी प्रमाणे आप्पासाहेबांचे बोलणे कमी असते परंतु आपल्या बोलण्यातून योग्य तो संदेश देण्याची कला त्यांच्यात आहे. त्यामुळे पी. ई. सोसायटी सारख्या मोठ्या संस्थेचा कारभार ते समर्थपणे चालवत आहेत. तळोदा, अक्कलकुवा, खापर, प्रतापपुर, बोरद या परीसरातील जनतेसाठी आप्पासाहेबांनी शिक्षणाची दारे खुली करून दिली आहेत. जेणेकरून या परीसरातील मुले शिकून सवरून मोठे होतील. आणि आपला विकास करतील. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आप्पासाहेबांचे कार्य सुरू आहे. पिताश्री स्व. बबनराव माळी (पहेलवान) व आई विमलताई माळी यांच्या आशिर्वादाने आप्पासाहेबांनी हे यश मिळविले आहे. लहान बंधू भरतभाई माळी व संजय माळी यांची त्यांना साथ मिळाल्याने आप्पासाहेबांनी कधी
मागे वळून पाहिले नाही. आप्पासाहेबांचे लहान बंधू भरतभाई माळी हे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष आहेत. तसेच ते तळोदा पालीकेचे गट नेते व माजी नगराध्यक्ष आहेत. दुसरे बंधू संजय माळी हे नगरसेवक असून गणेश सोशल गु्रपच्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य चालते. स्व. बबनराव पहेलवान यांच्या निधनानंतर सार्या कुटूंबाला आप्पासाहेब लक्ष्मण माळी यांनी आधार दिला. वटवृक्षासारखी मायेची सावली दिली. सतत कार्य मग्न राहणे हा आप्पा साहेबांचा स्वभाव आहे. कामात असले तरी कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीवर त्यांचे लक्ष असते. शैक्षणिक संस्थेचा व्याप त्यांच्या मागे असला तरी ते घरच्या शेतीत चांगलेच रमतात. शेतीत नवनवीन प्रयोग राबवून चांगले उत्पन्न काढल्यामुळे त्यांचा प्रगतीशील शेतकरी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आप्पा साहेबांना त्यांच्या पत्नी सौ. शारदाबाई यांची मोलाची साथ लाभली आहे. त्यांच्या स्नुषा सौ. योजनाताई भरत माळी ह्या तळोदा नगरपालीकेच्या नगराध्यक्षा आहेत. आप्पासाहेब लक्ष्मण माळी यांचे तीनही चिरंजीव शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहेत. आप्पासाहेबांचे जीवन म्हणजे एक मार्गदर्शक दिपस्तंभा सारखे आहे. अशा मार्गदर्शक नेतृत्वास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! तसेच त्यांना दीर्घ आयुष्य लाभो !
हीच सदिच्छा !
                                                                                                   
                                                                                    
                                                                                                  शब्दांकन- श्री.सुधाकर मराठे
                                                                                      उपशिक्षक
                                                                                 न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज अक्कलकुवा                                                                                                                                                                    

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

तलोदा झाले जलमय


तलोदा झाले जलमय 38 तासापासुन संतत धारा सुरु तलोदा तालुक्यातील खरडी नदी तुम्ब भरुन वाहते आहे. नदीचे पाणी शेजारी अशलेला मातंग चौक,मराठा चौक, कालिका देवी गल्ली,पाडवी हट्टी इत्यादी ठीकानातील रहवासियाना मोठ्या प्रमाणात नुक्सनिला सामोरे जावे लागले आहे.घरा घरात पाणी शिरले आहे. मोठ्या प्रमाणात लोक उघड्यावर आले आहेत. तशेच तलोदयात ठीक ठीकाणी अशी परस्तिथि ऊदभवली आहे.
कॉलेज रोड वरील सर्वच घरात व् दुकनित पाणी शिरले आहे. त्यात जैन लोकांचे कपड्यांचे दुकान तशेच चंदुलाल ठाकुरसिंह जैन यांचे दुकानाणी स्विमिंग पुलचे रुप घेतले आहे. त्यात जीवन कलाल ह्यांचा धान्याचा गोदामत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तशेच जनतेची सरक्षक भिंत मानले जाणारे पोलिस ह्यांची कॉलोनी देखिल पाण्यात बुडाली असून आसपासचे रहदारीचे मार्ग बंद झाले आहे. गौतम जैनचा घरा पासून तर कॉलेज पावेतो पुर स्तिथी निर्माण झाली आहे. सुप्रसिद्ध अशलेली होटल मराठाचा तळ मजला पाण्यात बुडाला आहे. बोम्बे झेरोक्स मधे देखील पाणी पोहचले आहे. तशेच बस स्टैंड वरुण 1 ही बस ये जा करू शकत नाही अशी परस्थिथि निर्माण झाली आहे. खरडी नदीचे पाणी गोरया मारूती मंदिरा पासून थेट विध्यानगरीत पोहचले आहे. व् त्यामुले तेथील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालोदयातिल उपजिल्हा रुग्णालयाला नदीचे स्वरुप प्राप्त झाले त्यात सिस्टर डॉक्टर्स व रुग्ण ह्याना बसन्यासाठी देखील जागा उपलब्ध नसल्याने त्याना सिटिंग चैर तशेच बाकावर्ती उभे राहून रुग्णाची तपासणी करावी लागली त्यात खुश्गवन येथील सरस्वती पाडवी हीची डबल बेड म्हणजेच एका पलंगा वरती एक पलंग ठेउन त्याची ऊँची वाढवून प्रसुती करण्यात आली त्या स्त्रीने मुलाला जन्म दीला असून डॉ संतोष परमार नामदेव महाले फुलारी सिस्टर आर कलाल l.b.वसावे तुकाराम बहिरम ह्यांचा मदतीने ही प्रसुती करण्यात आली.                 http://www.youtube.com/watch?v=OiR9Pcn7ntI
अश्याच प्रकारे ठीक ठिकाणी लोकांचे हाल झाले मा.प्रान्ताधिकारी अनिल भंडारी ह्यांचा घरात देखील पाणी शिरले व तालोद्यातिल आप्पती व्यवस्थापनेचे प्रमुख न्यायब तहसीलदार श्री मराठे साहेब त्वरित प्रान्ताधिकरिचा घरी पोहचले व् आपल्या व्यवस्थापनेचे कार्य पार पाडू लागले. पावसामुले सकाळ पासून लाइट नसल्याने सर्वच वायर्मन व् अभियंता आपापल्या कामत व्यस्त होते त्यात श्री. जयंतीलाल शिरसाठ हे विध्यानगरीतील विजेचा खामावरती काम करत असताना पाउसामुले त्यांचा पाय निसरला व् ते जमीनीवर पडले त्याना जबर मार बसला तसेच त्याना त्वरीत उपजिल्हा रुग्णालय तलोदा येथे एडमिट करण्यात आले मात्र काही कालावधीतयात त्यांचा मृत्यु झाला....... 23-9-2013तलोदयात संततधारा सुरुच काल व् आज मिळून 15 इंच पाण्याची नोंद तब्बल आज पावेतो 57 इंच पाण्याची नोंद झाली आहे. तलोदेकर पावसाने हैरान लाखोचे नुकसान शेकडो एकर शेती पाण्यात अनेक कुटुंब आले रस्त्यावर मातंग चौकातील लुका आहिरे ह्यांचा शेजारील घर अतिवृष्टी मुले कोसडले. तसेच गावात देखील zerox दुकानातील zerox मशीन टाइपिंग मशीन संगणक आदी इलेक्ट्रोनिक वस्तु मधे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुक्सनिचा आकड़ा बाहेर येण्याचे कडते. भवर नदीने घेतले रूद्र रूप 2 तासापेक्षा अधिक वेळ ट्रफिक जाम पोलिसांचा मदतीने ट्रफिक सुव्यवस्थित ...

भवर नदीचा पुला ख़ाली झाडे झुड्पे अडकल्याने नदीने रूद्र रूप घेतले तेच पाणी शेतात व् बायपास पावेतो आल्याने रहदारी थांबली व् मोठ्या प्रमाणात ट्राफिक जमा झाली..... खरडी नदीने आज ही पुलाचा वरून वाहून आपले रूद्र रूप कायम ठेवले त्यात सकाळी किराणा दुकानावर खरेदी करण्यासाठी आलेल्या प्रिया लोहार व् तीची लहान बहीन गायत्री लोहार वय 8 व 9 वर्ष ह्या दोघे ही घरी जात असताना अचानक प्रियाचा पाय घसरला व ती खरडी नदी जवळ असलेल्या अवधूत सोनार ह्यांचा घरा समोरील गटारित पाय निसटल्याने त्या गटारित जाऊन पडले त्याना स्थानीक लोकानी त्वरित बाहेर काढले व् त्यांचा जीव वाचवला.... शहादा रस्त्या वरील राजु गुरव ह्यांचा घरा समोरील असलेल्या पुलात प्रभाकर हशरथ माली हा तरुण पाण्यात वाहून गेला त्याला स्थानीक लोकानी 200 मी. पवेतो पोहुन त्याला गाठले व् त्याला बाहेर काढले त्यात भरत वलव़ी सुरेश पाडवी हंसराज राजकुले निलेश सूर्यवंशी सोन्या वलवी ह्यानी त्याचा जीव वाचवला व त्वरित त्याला उप जिल्हा रुग्णालय तलोदा येथे हलवण्यात आले त्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा रुग्णालयात हलवन्यात आले. 24-9-2013 तलोदा
तालुक्यात सोजरबार व गोर्यामाड ह्यांचा मध्यभागी
असलेली देवअंबा नदी जवळील राहणारे अतीदुर्गम भागातील वस्तीतील ऐका घरा वरती सतत होणार्या पाउसमुळे दरी कोसडली त्यात ऐकाचा मृत्यु झाला असून दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत तर 8 लोकांचा अद्यापही शोध लागलेला नाही हे. ह्या वरून सविस्तर वृत असे की दामा कागड़ा पाडवी हा पत्नी सुगराबाई 30 मुलगा विक्रम व मुलगी शर्मीला वळव़ी ह्यां त्याचा कुंटूबा सोबत सोजरबार ह्या गावी राहत होता. व त्याचा कड़े काही पाहुने मंडळी आली होती. त्यानी रात्री 11 वाजेचा सुमारास जेवण केले व गप्पा गोष्टी करून झोपी गेले मात्र मध्य रात्री 3 वजेचा सुमारास अचानक वरुण दरी कोसळल्याने विक्रम दामा वळव़ी (2) हा जागीच मृत्यु पावला त्या नंतर सकाळी सदर घटना शेजारी राहणारया इसमाने पाहीली व् त्या दरी ख़ाली अळकलेल्या लोकाना स्थानीक लोकांचा मदतीने काढन्याचा प्रयत्न केला. त्यात त्याना सुगराबाई दामा वळवी वय 30 ही स्त्री जख्मी अवस्थेत आढडली तसेच निमजी मादया वळव़ी हा देखील जख्मी अवस्थेत सापडला ह्यानी घडलेल्या घटनेचे वर्णन थोडक्यात केले त्यात अनेक लोक बेपता असल्याचे समजले त्यात दामा कागड़ा वळव़ी वय 35 शर्मीला दामा वळव़ी वय 5 आलेले पाहुने निमजी मादया वळव़ी वय 25 रमिला निमजी वळव़ी वय 22 इंदुबाई सोगदा वसावे वय 40 व इतर 4 बेपता असल्याची माहिती दामा वळवी ह्यांचा लहान भाऊ सार्या वळव़ी ह्यांचा कडून प्राप्त झाली...... सदर घटना ही अती दुर्गम भागात घडली असून तेथे दळण वळणाच्या सोयी नसल्याने ही उशीरा तलोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. त्वरीत पोलिसानी घटना स्थळी धाव घेतली...............

रोकड़मान हनुमान

तळोदयातील जागृत देवस्थान रोकड़मान हनुमान  एकेकाळी घनदाट वृक्षानी व वनराईने नटलेल्या सातपुडयाच्या पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या तळोदे शहरापासून एक (1) कि.मी. अंतरावर जवळच उत्तर दिशेला बर्‍हाणपूर अंकलेश्वर अंतरराष्टीय महामार्गावर मोठमोठ्या
वटवृक्षाच्या छायेत पुरातन काळापासून दक्षिण मुखी असलेल्या नवसाला पावणारा जागृत देवस्थान म्हणून शहरात व तालुक्यात अत्यंत प्रसिद्ध असलेल्या रोकडमन हनुमान मंदिराचे आगळे वेगळे महत्त्व आहे. तळोदे शहरातील जुनी जानकार मंडळी यांच्या सांगन्यावरून पूर्वी त्या भागात गवळण गवांची वस्ती त्या परिसरात होती. त्या वेळेपासूनच तेथे रोकड़मन हनुमानजीचे एक छोटेसे पुरातन मंदिर उभे आहे. मंदिराच्या शेजारी चौथेर्यावर पुरातन काळापासून काल भैरवाचे मंदिर आहे. अनेक दिवसापासून मंदिर जिर्ण अवस्थेत होते. तळोदे शहरातील व परिसरातील सर्व लहान थोर हनुमान भक्त व भाविकानी भावनेने मदत करुन निधी उभारून वस्तु स्वरूपात पत्रे, लाकूड ,सीमेंट,कलर, स्टाइल बागडे देऊन जीर्णोधार केला मंदिर उभारून पत्र्याचे शेड तारेचे कुंपण घातले गेले. सालाबादा प्रमानेआहे दर वर्षी तळोदयातील दानशूर व्यक्ती कडून भंडार्याचा कार्यक्रम होतो रामनवमीला दिवसभर रामधुन हनुमान जयंतीला भजनी मंडळीचा कार्यक्रम रात्र भर चालू राहतो व मोठ्या प्रमाणावर भंडाराचा कार्यक्रम होतो. तसेच विजया दशमीला सिमा उल्लंघनासाठी मंदिरात जाऊन दर्शन घेत असतात. त्यावेळी त्याठिकाणी यात्रेचे स्वरुप प्राप्त झालेले असते. आपल्या मनातील इच्छा आकांशा पूर्ण करण्यासाठी गुजरात व महाराष्ट्र येथून दुरदूरचे भाविक येतात. नवसाला पावणारा व मनोकामना पूर्ण करणारा म्हणून दक्षिण मुखी हनुमान रायाची ख्व्याती आहे.

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

मा.श्री भरत भाई माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लोकमान्य लोकनेता भरतभाई!
‘पहेलवानाचं गाव’ म्हणून एकेकाळी तळोदा शहराची पहेचान होती.

कुस्ती हा येथील शहरवासियांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे तळोद्याचा लोकांना ‘पकड’पासून ‘धोबीपछाड’पर्यंत सर्व डाव माहित होते. परंतु आता ती कुस्ती राहिली नाही. अन् तिचे ते वैभवही राहिले नाही. पहेलवान गेले अन् त्यांचे लंगोट रोहिले, अशी परिस्थिती आहे. शंभर जोर मारु शकत नाही ते आता तालिमींचे अध्यक्ष आहेत. असू द्या आपल्याला काय त्याचे. कुस्तीचक फड तळोद्यात होत नसले तरी त्याची जागा आता राजकीय आखाडे रंगु लागले आहेत. काटेदार मुकाबला ऐवजी रंगतदार निवडणुका होत आहेत. तळोद्याच्या राजकीय आखाड्यात उतरण्याचा मोह खुद्द माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांना सुध्दा आवरता आला नाही. तळोद्याच्या मातीचीच किमया अशी आहे. तळोद्याच्या राजकीय रिंगणात असंख्य रथीमहारथी आले अनं गेले. परंतु तळोदा शहर वासियांचे इमान एकाच व्यक्तीशी कायमचे बांधले गेले. ते म्हणजे लोकमान्य युवा नेतृत्व भरतभाई बबनराव माळी यांच्याशी. जनतेने नगरपालिकेच्या माध्यमातून तळोद्याच्या विकासाची ढाल व गदा भरतभाईंना मोठ्या विश्‍वासाने सोपविली. लोकांच्या विश्‍वासाला तडा न देता भरतभाई माळींनी तळोदा शहराचा जो विकास केला आहे त्याला तोड नाही. विकास अनं प्रगतीचा ध्यास असलेला असा नेता आमच्या पाहण्यात नाही. आज तळोदा शहराचे भाग्यविधाते, विकासपुरुष मा.श्री.भरतभाई माळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. भरतभाईंचे अभीष्टचिंतन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तळोद्यात त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी होईल.
यानिश्‍चित या शब्द शुभेच्छा! वयाच्या २४ व्या वर्षी ते तळोदापालिकेचे नगराध्यक्ष झाले. महाराष्ट्रातील सर्वाधिक तरुण नगराध्यक्षाचा मान भरतभाईंना मिळाला. सन १९९० सालापासून त्यांच्या राजकीय जिवनाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी मात्र मागे वळून पाहिले नाही. सार्वजनिक जिवनात असंख्य पदे भुषविली. लोकांची कामे केली. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तळोदा पिपल्स एज्युकेशन संस्थेचे संचालक, माळी समाज सुधारणा मंडळचे अध्यक्ष, तळोदा न.पा.चे प्रतोद आदी पदांच्या माध्यमातून भरतभाईंनी जनसेवा केली आहे. भरतभाईंचा राजकीय प्रवास मोठ्या संघर्षांनी भरलेला आहे. तळोदा पालिकेत वर्षानुवर्षे असलेली त्यांची सत्ता विरोधकांच्या नजरेत खुपत होती. भरतभाईंचे यश अनेकांना सलत होते. राजकीय पोटदुखी सुरु झाली. अशातच तळोदा पालिकेत सत्तांतराचा प्रयत्न झाला. सर्व विरोधकांची अभ्रद युती झाली. परंतु भरतभाई सर्वांना पुरुन उरले. पुन्हा गमावलेले स्वराज्य त्यांनी प्रयत्नाने मिळविले. या प्रयोगानंतर स्वराज्यावर घाला घालण्यासाठी आलेल्या शाहिस्तेखानची पुरती बोटे छाटली गेली.  भरतभाईंच्या या प्रसंगात शांत, संयमी,धिरोदत्त, लढावूवृत्तीचे दर्शन झाले. भरतभाई हे चाणाक्ष नेते असून त्यांच्यात राजकीय संधी ओळखण्याची मोठी खुबी आहे. तळोदा शहराच्या विकासासाठी कुठलीही तडजोड करायची नाही, अशी त्यांची वृत्ती आहे. वेळप्रसंगी स्व.पक्षीयांशी झगडावे लागले तरी ते मागे हटणार नाहीत, असा त्यांचा स्वभाव आहे. भरतभाईंकडे त्यांचे पिताश्री बबनराव पहेलवान यांचा समर्थ वारसा आहे. ते राज्यातील नामांकीत कुस्तीपटू होते. १९६५ साली तळोद्याचे नगराध्यक्ष होते. मातोश्री विमलताई माळीही नगरसेविका होत्या. पत्नी सौ.योजनाताई माळी ह्या विद्यमान नगराध्यक्षा आहेत. तसेच त्यांचे मोठे बंधू आप्पसाहेब लक्ष्मण माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा शहराचा सर्वांगिण विकास होतो आहे.

बंधू संजय माळी हे नगरसेवक असून त्यांची साथ भरतभाईंना नेहमी असते. तळोदा शहराच्या विकासासाठी भरतभाई नेहमीच झिजले. पालिकेच्या माध्यमातून शहर सुशोभिकरण केले. रस्त्यांवर भव्य हायमस्ट लावले. वार्डा-वार्डात रस्ते केले. ड्रेनेज लाईन, गटारी बांधल्या. शहराला विकास निधी मिळावा. यासाठी मंत्रालयातून निधी मंजूर करुन आणला. जलशुध्दीकरण प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेस पालकमंत्री ऍड.पद्माकर वळवी, केंद्रिय राज्यामंत्री माणिकराव गावित, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सहकार्याने भरतभाईंनी मंजुरी मिळवून घेतली. या योजनेमुळे शहराला २४ तास शुध्द पाणी मिळू शकेल. भरतभाई माळी हे अजब रसायन आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये रमणारा हा सर्वप्रिय नेता आहे. लोकांचे प्रश्‍न सोडविण्यात त्यांचा सारा दिवस जातो. भरतभाईंचे नेतृत्व आता तळोदा शहर, तालुका ते व्हाया नंदुरबार जिल्हा असे सर्वदूर झाले आहे. जिल्ह्यातील नामांकीत नेत्यांमध्ये त्यांचा समावेश मोठ्या गौरवाने होतो आहे. भरतभाई माळीयांचे नेतृत्व स्वःकर्तृत्वावर पुढे आले आहे. कोणीही गॉडफादर शिवाय ते राजकारणात यशस्वी झाले आहेत, ही मोठी गोष्ट आहे. लोकांच्या आशिर्वादाने स्वतःचा शिक्का निर्माण करणार्‍या लोकमान्य लोकनेते भरतभाई माळी यांना वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!                     
                                                                                                                                    
                                                                                           
                                                                               शब्दांकन- श्री.सुधाकर मराठे
                                                                                  उपशिक्षक
                                                                               न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज अक्कलकुवा