Breking News

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

विविध कार्यक्रमांनी ॲड.वळवींचा वाढदिवस साजरा

कार्यकर्त्यांनी केली लाडूतुला ; अभिष्टचिंतनासाठी दिवसभर चाहत्यांची गर्दी राज्याचे माजी क्रीडा मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री पद्माकर वळवी यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्याकरीता गर्दी केली होती. कार्यकत्यांर्च्यावतीने ॲड.वळवी यांचा भव्य सत्कार व लाडूतुला करण्यात आली.. ॲड. पद्माकर वळवी यांच्या वाढदिवसानिमित्त काल सकाळी ९ वाजता तळोदा उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच त्यांच्या निवासस्थानी नगरपालिका महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप करण्यात आले. सकाळी ११ वाजता हातपंप दुरुस्ती पथक व रिक्षांचे लोकार्पण करण्यात आले. शहर व तालुक्यातील प्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्त्यांसह राजेंद्र गावित, दीपक पाटील, मकरंद पाटील, शिरीष नाईक, लक्ष्मण माळी, भरत माळी यांच्यासह जिल्ह्याभरातून नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा.विलास डामरे व कार्यकर्त्यांनी ॲड.वळवी यांची लाडूतुला केली. वजन काट्याच्या एका पारड्यात ॲड.वळवी व दुसऱ्या बाजूला त्यांच्या वजनांएवढे लाडू ठेवण्यात आले होते. यानंतर लाडू वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, प्रतोद संजय माळी, तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, शहराध्यक्ष गौरव वाणी, प्रा.विलास डामरे, शहादा-तळोदा मतदार संघाचे समनव्यक योगेश मराठे, नगरसेवक सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, मोती बॅँकेचे चेअरमन निखिल तुरखिया, भाजपा प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, के.डी.पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे रवि राऊळ, जितेंद्र माळी, सतिवान पाडवी, शिंदखेड्याचे नगरसेवक दीपक अहिरे, आदिवासी विद्यार्थी संघटना विभागीय अध्यक्ष रोशन गावित, मंगलदास सुर्यवंशी, युवराज पवार, सुनिल सोनवणे, राजेश मालचे, सामाजिक कार्यकर्ते संदिप परदेशी, माजी सभापती आकाश वळवी, माजी उपसभापती नंदुगीर गोसावी, दिवाकर पवार, दीपक मोरे, नरहर ठाकरे, गौतम जैन, साहेबराव चव्हाण, प्रकाश ठाकरे, अनिल माळी, अरविंद पाडवी, पंकज राणे, बापू कलाल, कुणाल चौधरी, अरविंद मगरे, शांताराम पाडवी, अंबालाल चव्हाण, भाऊदादा पाडवी, अमृत पावरा, गोविंदा पाडवी, मुकुंदा गुरव, दगुलाल माळी, भागीराम पाडवी, भट्यादादा पाडवी, सईद पठाण, नरेश चौधरी, असलम पिंजारी, इस्माईल शेख, योगेश पाडवी, भगवान पाडवी, राजकुमार पाडवी, सुरेश इंद्रजीत, वेस्ता पावरा आदींसह ग्रामीण भागातील सरपंच, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते..


मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८

२६/११ घटनेतील वीरांच्या शौर्यगाथेचे स्मरण तळोद्यातील तरुणांनी सायकल रॅली काढून वाहिली शहिदांना श्रध्दांजली

२६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्यातील शहिद वीर पोलिस व जवानांना आदरांजली देण्यासाठी उनपदेव ते तळोदा सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शहादा येथे पोलिसांच्या वतीने वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली.. २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह सुमारे १९७ जण ठार झाले. तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलिस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. मात्र, या घटनेत १७ पोलिस व वीर जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. या शहिद वीर जवान व पोलिस यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करून त्यांच्या कार्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तळोदा
येथील भन्साली व्यापारी संकुलातील सर्व व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी सकाळी उनपदेव या तीर्थस्थळापासून ते तळोदा पर्यंत सायकल यात्रा काढली. वीर जवान अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. या सायकल यात्रेत डॉ.लक्ष्मीकांत गिरणार, जितेंद्र कलाल, तळोदा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर मराठे, प्रकाश मराठे, अमित कलाल, निखिल केदार, राकेश मराठे, मानसिंग गिरासे, रवि मराठे, प्रमोद चौधरी, हेमंत चौधरी, विक्रांत पाटील, महेंद्र लोहार, कल्पेश पाटील, बंटी कोळी, विक्की कोळी, गजेंद्र परदेशी, शुभम जोहरी, लक्ष्मण पाटील, पारस पाटील, लखन पाटील, संदीप गुरव आदिसह २५ जण सायकल यात्रेत  सहभागी होते. रम्यान शहादा येथील तहसील कार्यालय परिसरात शहीद वीरांना कॅन्डल लावून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधीक्षक पुंडलिक सपकाळे, मनलेश जयस्वाल, गोपाळ गांगुर्डे, बजरंग ग्रुपचे सहकारी आदीसह शहादा शहरातील मान्यवर उपस्थित होते. बोरद, म्हसावद या ठिकाणी वीर जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप तळोदा येथे स्मारक चौकात करण्यात आला. या ठिकाणी पोलिस प्रशासनाकडून शिीदांना श्रध्दांजली अर्पण करीत सायकल यात्रेकरूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, नगराध्यक्ष अजय परदेशी, नगरसेवक हेमलाल मगरे, अनुप उदासी, सुनिल सुर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, अक्षय कलाल यांनी मनोगत व्यक्त केले.




 
 







गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

पत्रकारितेचे शस्त्र समाजातील धगधगत्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी करा अनिल चव्हाण :

 तळोदा तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन सकारात्मक
 पत्रकारिताकडे कल द्या, आपल्या सकारात्मक वृतांमुळे समाजात ऊर्जा निर्माण होते. माती अन माणसाची बातमी केल्यास ती हृदयस्पर्शी ठरते. सोशल मिडीयाच्या वाढता प्रकोप पाहता बातमीदाराने जबाबदारी लक्षात घेऊन वास्तव पत्रकारिता करण्याचा दृष्टिकोन ठेवावा, असे मत धुळे येथील एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालयातील पत्रकारिता विभाग प्रमुख तथा पत्रकार अनिल चव्हाण यांनी व्यक्त केले. . तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन तळोदा महाविद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक
 म्हणून धुळे येथील एस.एस. व्ही.पी.एस महाविद्यालयातील पत्रकारिता विभाग प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार अनिल चव्हाण, इलेक्टॉनिक्स मिडीयाचे पत्रकार प्रशांत परदेशी होते. याप्रसंगी पत्रकार हिरालाल चौधरी, बळवंत बोरसे, निलेश पवार, भिकेश पाटील, धनराज माळी, जयप्रकाश डिगराळे, रमेशकुमार भाट, मंगेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अनिल चव्हाण म्हणाले की, पत्रकारिता हे शस्त्र असून त्याचा वापर समाजातील धगधगत्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी करा, असे सांगत पत्रकारांची भूमिका, बातमी म्हणजे काय?
लेख, वार्तापत्र, अग्रलेख म्हणजे काय? पत्रकारांची जबाबदारी आणि त्यातील बारकावे, इलेक्ट्रॉनिक मिडीया आणि प्रिंट मिडीया यातील बदलते प्रवाह यासह विविध पत्रकारितेचे बदलते संदर्भ व इतिहास अश्या विविध विषयाबाबत त्यांनी सखोल माहिती दिली. प्रशांत परदेशी म्हणाले की, सध्याची पत्रकारिता गतिमान झाली आहे. क्षणातच ई-पेपरच्या माध्यमातून वृत्त प्रत्येकापर्यंत पोहचत आहे. अफवा असलेले वृत्त तसेच खऱ्या-खोट्या बातम्यांची शहानिशा करणे हे आव्हान पत्रकारितेत निर्माण झाले आहे. यामुळे भविष्यात पत्रकारितावर देखील आचारसंहिता लादली जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. डिजिटल युगात संवादाची साधने वाढली असली तरी संवाद मात्र कमी झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यशाळेत शहादा, अक्कलकुवा ,नंदुरबार, दोंडाईचा, तळोदा, धडगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते. सुत्रसंचालन फुंदीलाल माळी यांनी केले. प्रास्ताविक सुनील सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष सुधाकर मराठे, सचिव सम्राट महाजन, उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी, कोष्याध्यक्ष चेतन इंगळे आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले..





शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

तळोद्याच्या भाग्यश्री मगरेला दुबईत नोकरीची संधी

तळोदा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील कन्या व मोशन इ्स्टिटट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जळगांवची विद्यार्थिनी भाग्यश्री उल्हास मगरे हिची इंटरनॅशनल प्लेसमेंट होऊन दुबई येथील हॉस्पिटलमध्ये एच.आर.असिस्टंट मैनेजर पदावर नियुक्ती झाली आहे. . भाग्यश्री हीचे बारावी पर्यंतचे शिक्षण तळोदा येथे झाले आहे. त्यानंतर जळगांव येथुन बी.ई.बायोटेक केल्यावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.टेकचे उच्चशिक्षण घेतले आहे. नॅशनल इ्स्टिटट्यूट ऑफ रिसर्च नागपूर येथे संशोधनाची संधी मिळाली असता तिच्या तेथील संशोधन प्रबंधला अमेरिकेतील इंटरनॅशनल सायन्स जर्नलने जगभर प्रसिद्धी देऊन गौरव केला असून सुवर्णपदक विजेती ठरली आहे. सध्या ती मोशन इ्स्टिटट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जळगांव येथे हेल्थकेअर मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. या निवड प्रक्रियेत पात्र होऊन संयुक्त अरब अमिरातीत दुबई स्थित प्रथितयश अश्या इंटरनॅशनल मॉडर्न हॉस्पिटल मध्ये एच.आर.असिस्टंट मॅनेजर म्हणून तिची नियुक्ती झाली आहे. तळोदा सारख्या एका लहानश्या गांवातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलीची इंटरनॅशनल प्लेसमेंट होऊन तिला परदेशात नोकरीची संधी मिळाल्याबद्दल मिम्स जळगांवचे संचालक नितीन पाटील, संचालिका शैलजा पाटील तसेच तळोदा शहरातील अनेकांनी कु.भाग्यश्रीचे कौतुक केले आहे. भाग्यश्री ही तळोदा येथील दै.'पुण्यनगरी' चे प्रतिनिधी व कन्या विद्यालयात कार्यरत उल्हास मगरे व सौ .नीलिमा मगरे यांची कन्या आहे. आजोबा माजी प्राचार्य स्व.एन.सी.मगरे यांची प्रेरणा व माझ्या प्रत्येक पावलाला माझ्या आजीने, आईवडिलांनी दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरला. त्यांनी मला कधीही इतरांच्या वाटेने जाण्याचा आग्रह केला नाही. माझी वाट मला निवडू दिली, अशी प्रतिक्रिया कु.भाग्यश्रीने दिली..

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

कपडा बॅकेत जमा झालेले वस्त्र अनाथांसाठी ठरताय आधार

तळोदा येथील युवकांचा उपक्रम; बालदिनाचे औचित्य साधत केले वस्त्र वाटप
आपल्याकडे असणारे जुने कपडे फेकुन देण्यापेक्षा कपडा बँकेत जमा केल्यास गरजूंची गरज भागणार आहे. अनेकांना आधार मिळतो. यामुळे जास्तीत जास्त कपडे जमा करण्याचे आवाहन कपडा बँकेमार्फत करण्यात आले.. बोरद : तळोदा येथील कपडा बँकेत जमा झालेले कपडे नंदुरबार येथील निराधार मुलांचे बालगृह व अनाथ निराधार मुलींचे निर्मल बालिकाश्रम केंद्रातील चिमूकल्यांसाठी आधार ठरणार आहे. बालदिनाचे औचित्य साधत तळोदा येथील कपडा बँकेचा उपक्रम राबविणाऱ्या युवकाच्या एका गृपने कपडा बँकेतील सुमारे १०० ड्रेसचे वाटप करून खऱ्या अर्थाने बालदिन साजरा केल्याचे सार्थक केले.. गरीब व गरजूंसाठी तळोद्यातील संतोष माळी, पंकज शेंडे, सुकलाल जाधव, राहुल राणे, अमोल चव्हाण, दीपक जाधव, चेतन माळी, सचिन सूर्यवंशी, कार्तिक माळी या युवकांनी तळोद्यात कपडा बँकेचा उपक्रम राबविण्यात सुरूवात केली आहे. कपडा बँकेच्या माध्यमातुन अनेकजण जुने कपडे गरजूंची गरज भागविण्यासाठी देत आहेत. सद्या मध्यमवर्गीय व गरीबांच्या महागाईच्या चटक्याने हाल सुरू आहेत. या उपेक्षित वर्गाला दिलासा देण्यासाठी तळोद्यातील या युवकांनी समाजाचे ऋण अदा करण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून कपडा बँकेचा उपक्रम सुरू केला. यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. काल बालदिनाचे औचित्य साधुन नंदुरबार येथील निराधार मुलांचे बालगृह व अनाथ निराधार मुलींचे निर्मल बालिकाश्रमात कपडा बँकेच्या माध्यमातुन सुमारे १०० ड्रेस वाटप करण्यात आले. दरम्यान हेमंत विश्वनाथ हिवरे यांनी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे २० चादरी वाटप केल्या. तसेच विनोद पाठक यांनीही सुमारे ५० शालेय गणवेश वाटप केले. याप्रसंगी अनाथ आश्रमाचे बालकल्याण समिती सदस्य नितीन सनेर, सुरेश पाटील, नितीन पाटील उपस्थित होते. .