Breking News

रविवार, १ जानेवारी, २०१७

प्रेमवात्सल्य नबाबाई अनंतात विलीन!

       उदारह्रदयी प्रेमवात्सल्य नबाबाई अनंतात विलीन!
शाळकरी मुलांपासून ते तरुण वयोवृद्धापर्यंत सर्वांच्या आवडत्या
अश्या नबामाय...नबीआजी... उर्फ नबाबाई संपत मराठे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.. नबाबाई यांना मुलगा नसल्याने त्यांची मुलगी आशाबाई शांताराम मराठे यांनी मुलाचे कर्तव्य पार पाडीत आपल्या लाडक्या आईला अग्निडाग देवून अंत्यसंस्कार केला. मुलीने आपल्या आईचा अंत्यसंस्कार करून समाजात एक नवा आदर्श उभा केला आहे. या अंत्यसंस्काराची शहरात एकच चर्चा होती.....
                                    तळोदा येथील नबाबाई संपत मराठे यांचे वयाच्या 92 वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. काल शुक्रवारी दि: 30 डिसेंबर 2017 रोजी दु.3 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आली. या अंत्यसंस्काराचे वैशिष्टये म्हणजे नबाबाई मराठे यांना मुलगा नसल्याने त्यांची मुलगी आशाबाई मराठे यांनी त्यांना अग्निडाग देऊन समाजात एक आदर्श निर्माण केला. नबाबाई संपत मराठे हे तळोदा शहरातील एक प्रसिद्ध असे व्यक्तींमत्व होते. कोणासाठी त्या नबाआजी होत्या तर कोणासाठी त्या नबामाय होत्या, वयाच्या 92 व्या वर्षी पर्यंत त्यांनी परिस्थितीशी संघर्ष करीत आपला संसार सुखाचा केला. नबाबाई मराठे यांचा चना, मठ, पापड, गोळी, बिस्कीट, चॉकलेट विक्रीचा व्यवसाय होता, डोक्यावर डालके घेऊन नबाआजी तळोदा शहरात पायाला भिंगरी लावुन फिरयची. ती कधी सिनेमा
टॉकीजजवळ दिसायची. तर कधी जि.प.शाळा क्र 5 जवळ बसलेली असायची. आजीच्या डालक्यातला हा प्रसाद तळोदा शहरातील अनेकांना आवडीने खाल्ला आहे. तिच्या हातात जादु होती असे म्हणतात.. नबाआजी जि.प.शाळेवर आली की मुले वस्तु घेण्यासाठी तिच्याजवळ एकच गलका करीत असत. कोणी आजीचे पापड खाल्ले आहेत. तर कोणाला आजीचे चने आवडायचे. प्रत्येकासाठी नबाआजीजवळ काहींना काही विक्रीसाठी असायचे. लहान मुलांना खाऊच्या रूपाने समाधान देणारी तर मोठ्यानाही चना, मठ पापडची आवड निर्माण करणारी नबाआजी हि वेगळीच होती. नबाबाईच्या जन्म स्वातंत्रपुर्व काळात सन 1924 मध्ये तळोद्यात झाला. तेव्हा स्वातंत्र चळवळीने जोर धरला होता. पारतंत्र्याचे चटके नबाआजीने सोसले होते. इंग्रजांचा तो काळ तिने पाहिला होता. नबाआजी यांचे वडील कै.शँकर मराठे हे त्या काळी तळोदा नगरपालिकेचे विविध चौकामधील खुटावरील कंदील लावण्याचे काम करीत असत. लहानपणीच त्यांचे मातृछत्र हरपले होते.
त्यांचे पालनपोषण त्यांच्या वडिलांनी केले. वयात आल्यानंतर नबाबाई यांचे लग्न तळोदया पासून 3km अंतरावर दलेलपुर येथील बढे कुटुंबाचा संपत मराठे यांच्याशी झाले. मोठ्या कुटुंबात त्यांचा विवाह झाला होता मात्र काही कालावधीनंतर ते आपल्या माहेरी तळोदा येथे आल्या, तेथील चिंतेश्वर महादेव मंदिराच्या शेजारी छोट्याश्या पडक्या घरात त्यांनी आपल्या संसाराची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पोटभरण्यासाठी व संसाराचा गाढा ओढण्यासाठी आपल्या डोक्यावर चना मठ, पापडची डालकी डोक्यावर घेतली. ती तिने आयुष्यभर सतत डोक्यावर घेत संसाराला चालना दिली.
 नबाआजीच्या हातून चॉकलेट खाललेले, चना, मठ, पापड घेतलेले मुली आता मोठी झाली असली तरी त्यांना नबाआजी मात्र आताही आठवते. तिच्या आठवणी आजही मोठे पणी ते सांगतात त्यातील काही मोठ्या उच्च पदावर मोठे अधिकारी झाली आहेत. ते सुद्धा नबाआजीला विसरलेले नाहीत. असा तिच्या सर्वाना हवाहवासा स्वभाव होता. नबाआजी हि जेवढी कष्टाळू होती तेवढीच ती धार्मिक वृत्तीचीही होती. दररोज चिंतेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय तिचा दिवस उगवत नसे. मंदिरात कुणाची काही वस्तू राहिल्यास नबाआजी स्वतः ती द्यायला घरी जात असत. नबाआजीला मुलगा नव्हता त्यांना एकुलती एक मुलगी होती.
                                     
   1990 साली त्यांचे पती कै.संपत मराठे यांचे निधन झाले. दरम्यान त्यांची मुलगी आशाबाई मराठे यांना वडिलांच्या निधनानंतरची बातमी 4 दिवसानंतर कळल्यामुळे त्या आपल्या वडिलांच्या अंत्यसंकाराला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्याकाळी जंनसंपर्काची माध्यमे मोबाईल फोन व वाहने नसल्यामुळे एकुलती एक मुलगी वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकली नाही. यांची खंत नबाआजीला होती. त्यामुळे त्यांनी आपल्या जावई व मुलीला तळोदा येथे बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी जावई मुलीच्या संसाराला हातभार लावून संसाराला आकार दिला. नबाआजी यांची चनामठाची डालकी वयोमानाप्रमाणे सुटली होती. मात्र त्यांच्या जनसंपर्क हा मोठा होता. प्रत्येक जण त्यांना तळोद्यात ओळखत असे, सासू पासून सुने पर्यंत प्रत्येकाला नबाआजीच्या परिचय होता. निर्गर्वी, शांत, मनमिळावू व सालस स्वभाव, असलेल्या नबाआजी त्यांच्यावर लहानपणापासूनच अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्याने परिस्थिती हालकिची असली तरी नडलेल्या अडलेल्याना त्यांच्या हात मदतिसाठी नेहमी पुढे असायच्या,
नबाआजी  व मथुरा गवळीची खरी मैत्री.... 
 गावातील मथुरा गवळी यांच्याशी त्यांची मागील 60 वर्षापेक्षा अधिक काळापासून जिवाभावाची मैत्री होती. नबाआजी आजारी असल्याने गेल्या दीड माहिन्यापासून आशाबाई व नातवंडा सोबत तिनेही सेवा केली. माळी समाजात त्यांना प्रत्येक जण नबमाय म्हणून हाक मारत असे, त्यांच्या मोठा नातू योगेश व्यवसाय करतो, तर धाकटा नातू सुधाकर मराठे हा माध्यमिक शिक्षक असून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या नातवांवर त्यांनी आपल्या मुलांप्रमाणेच प्रेम केले. मदत केली, कोणताच फरक केला नाही व सुखा समाधानाने चालता बोलता त्या अचानक निघून गेल्या, आपल्या जाणिवेचा त्रास सुद्धा त्यांनी इतरांना होवू दिला नाही, आपल्या नातवंडाना गुणागोविंदाने राहण्याच्या सल्ला देत, नबाआजीने जगाचा निरोप घेतला, यांच्या आयुष्याची अखेर झाली असली तरी त्यांच्या कार्याची मात्र अखेर झाली नाही. त्यांची किर्ती तळोदयात आसमंतात दीर्घकाळ राहील असा विश्वास नबाआजीना ओळखणाऱ्या लोकांचा आहे......











 





























निधन वार्ता

 आज्जीची कीर्ती महान !...