Breking News

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

तळोदा शहराला रथोत्सवाची लाभलेली 120 वर्षाची परंपरा

तळोदा शहराला रथोत्सवाची लाभलेली 120 वर्षाची परंपरा.. तळोदा शहरात कोजागरी पौर्णिमेला पार पडणार्‍या संत खंडोजी महाराजांच्या रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. आज होणार्‍या रथोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह गुजरात राज्यातील भाविकांची गर्दी होते. १२0वर्षांची आध्यात्मिक परंपरा असलेल्या रथोत्सवामुळे तळोदा शहराची सांस्कृतिक ओळख आजही कायम आहे. गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यातील कुकरमुंडा येथे संत खंडोजी महाराजांचे समाधी मंदिर आहे. त्यांच्या प्रेरणेने दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला रथोत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम संस्थानतर्फे होतात. येथील विठ्ठल मंदिराचे संस्थापक संत विठ्ठलस्वामी महाराज यांनी संत खंडोजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रथ तयार केला. या रथाचे कोरीव काम व कलाकुसर म्हणजे गतकालीन लाकडी शिल्पकला आणि कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. १00 वर्षांपूर्वी तळोदा शहरात उत्कृष्ट गवंडी, मिस्तरी व लाकडी काम करणारे कुशल कारागीर होते. हा रथ तयार करण्यासाठी या कारागिरांसोबतच परराज्यातील शिल्पकार बोलावण्यात आले होते. त्यांच्या अथक परिश्रमातून लाकडी रथ तयार करण्यात आला आहे. रथ तयार करणारे संत विठ्ठलस्वामी महाराज हे मूळचे कर्नाटकचे तेथून ते पंढरपूरला आले, तेथे ते संत खंडोजी महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर तळोद्याला आले. विठ्ठल महाराज खंडोजी महाराजांना ते गुरू मानत असल्याने गुरुंच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला तळोदा शहरात रथोत्सव मिरवणुकीची संकल्पना त्यांनी सुरू केली. १२0 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आजही सुरू आहे. या रथाची दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला येणार्‍या संत खंडोजी महाराज पुण्यतिथीला तळोदा शहरातून मिरवणूक काढण्याची १२0 वर्षांची पंरपरा आहे. पूर्वी रथाच्या मिरवणुकीत लेझीम, तालीम, ढोल, ताशांच्या गजरात वाद्य व लेझीम पथक प्रमुख यांचे आकर्षण होते. स्मारक चौक, मेन रोडवर रथ मिरवणुकीत शहरातील विविध व्यायामशाळेतील मल्ल मल्लखांब, दांडपट्टा व इतर र्मदानी खेळांचे प्रात्यक्षिक करत. भाविकांचा या कसरतींना भरभरून प्रतिसादही मिळे. कालांतराने रथाच्या मिरवणुकीतील या कसरती बंद करण्यात आल्या. या रथोत्सवात तळोदा शहरातील आबालवृद्ध सहभागी होतात. या रथोत्सवाच्या परंपरेचे हे यंदा १२१ वे वर्ष आहे. यानिमित्त यंदा भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे. रथोत्सवाचे संयोजन रथोत्सव समितीतर्फे दरवर्षी केले जाते. या समितीत तळोदा शहरासह नंदुरबार जिल्ह्यातील सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हे धार्मिक कार्य पार पाडतात. शहरातील ओंकारदास वाणी यांनी त्यांचे घर रथ ठेवण्यासाठी दान म्हणून दिले होते. १00 वर्षांपूर्वी दिलेले हे घर कालांतराने जीर्ण झाल्यानंतर ह.भ.प. उद्धव महाराज व दात्यांच्या अर्थसाहाय्याने घराचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे.

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

नवरात्रोत्सवाला झेंडूच्या फुलाना

झेंडूच्या फुलाना वाढली मागणी तळोदयात पहिल्याच दिवशी दीड लाखांची उलाढाल नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात पहिल्या माळेपासून फुलांची मागणी वाढली आहे. फुलांच्या दरात तेजी आली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दीड लाखांची उलाढाल झाली आहे. नवरात्रोत्सवाला मंगळवार पासून प्रारंब झाला देवीला हार आणि पूजेसाठी फुलांची भाविकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. झेंडूचा फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. बाजारात झेंडूचे फूल मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून 60 ते
70 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. यंदा पावसाअभावी झेंडूच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने फुलांचा तुटवडा भासत आहे. साधारणतः पाच किंवटल पेक्षा अधिक फुलांची आयात करावी लागत आहे. सुरत, इंदौर, अहमदनगर, बंगलौर सह नंदुरबार जिल्ह्यातील निजामपुर छडवेल आदि परिसारातून फूले मागवली जात आहे. फुलांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. 40 रु कीलो दराने वीकली जाणारी फुले सध्या 60 ते 70 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. मात्र भाविक मोठ्या प्रमाणात फुले खरीदी करीत आहे. दरवर्षी नवरात्री उत्सवात 12 ते 15 लाखांची उलाढाल होते. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सुमारे दीड लाखापेक्षा अधिक उलाढाल झाली असल्याने फूल विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
तलोदा शहरात महाकाली फूल भंडार सदगुरु फूल भंडार जयगुरुदेव फूल भंडार आदी फूल विक्रेत्यांच्या दुकाना आहेत. शहरात ठीक ठिकाणी किरकोळ विक्रेते फुले निर्यात करुण विकत आहेत. झेंडूची कलकत्ते झेंडू फुले, एक्वाऑरेन्ज पिवळी गिरी अश्या विविध प्रकारची झेंडू बाजारात उपलब्ध असुन शेवंती 150 रु किलो अहमदनगर गजरे 400 रु किलो बैंगलोर कुंडाकळी 200 रु किलो इंदौर गेलेंडर 40 रु कोलो तलोदा गुलाब 1रुपया पासुन ते 5 रु पर्यन्त एक नग जरबेरा 10 रु एक नग सूरत आदि विविध प्रकाराची फुले ठीक ठिकानाहुन मागवली जात आहे... झेंडूच्या २ फूटाच्या हारासाठी सुमारे पन्नास रूपये तर ४ फूटाच्या हारासाठी शंभर ते सव्वाशे रूपये मोजावे लागत आहेत.

स्वतः 3 एकरात झेंडू व गुलाबाची लागवन केली आहे. मात्र पावसाच्या अभाव व करपा रोगामुळे फुलाच्या उत्पादनात घट झाली. याकरिता गुजरात मद्यप्रदेश आदि राज्यातून फुले विक्री साठी मागवावि लागत आहे. पितृपक्षामुळे फुलांची मागणी घटली होती. यामुळे फुलांचे दर कमी झाले होते. मात्र नवरात्रोत्सवात फुलांची मागणी वाढून दरही वाढले आहेत. नवरात्रोत्सवाच्या कालावधित दररोज नऊ दिवस फुलांचे हार व फुले मिळाले पाहिजे, यासाठी अनेकांनी शहरातील फुले विक्रेत्यांकडे आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात फुलांचे भाव आणखीनच वाढणार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे... बब्बु माळी फूल विक्रेता महाकाली फूल भंडार



शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५

प्रा.पी.पी.भोगे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील व क्रिडा क्षेत्रातील एक अष्टपैलू परिचीत व्यक्तिमत्व म्हणजे माजी क्रिडा संचालक
प्रा.पी.पी.भोगे सर. प्रा.पी.पी.भोगे मुळचे धुळे जिल्ह्यातील त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यामुळे सामाजिक दृष्टया मागासलेल्या समाजात जन्माला येवून देखील घरातील वातावरण उच्च विचारांचे, उच्च श्रेणीचे यामुळेच सराना उच्च शिक्षणाची संधी मिळाली. त्यांनी आपले उच्च शिक्षण धुळे, औरंगाबाद व मुंबई येथे पूर्ण केले अध्यापक शिक्षण मंडळाचे संस्था मा.प्राचार्य. गो.हु. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली १९७४ पासुन आपल्या सेवा कारकिर्दीला सुरुवात केली. विद्यार्थी हेरण्याचा गुण अंगी असलेले प्रा.भोगे यांनी आपल्या सेवा कार्याला सुरुवात केलेल्या वर्षापासूनच आंतर महाविद्यालयीन स्पर्धा व राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपले विद्यार्थी चमकवले. भोगे सरांच्या काळात 200 पेक्षा अधिक विद्यार्थी विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली यशस्वी कारकीर्द नोंदवून आलेले आहेत. तसेच माध्यमिक विद्यालयात ज्यु. कॉलेज व सीनियर कॉलेज, पोलीस व विविध क्रिडा प्रकारांमधे महाविद्यालयाची विशेष छाप उमटवली आहे. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे नंदुरबार जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धेचे जेतेपद सतत 18 वर्ष आपल्याकडे कायम ठेवले. मुलांप्रमाणेच मुलींना देखील क्रीडास्पर्धामधे भाग घेण्यास प्रेरित करुण त्यांच्यामधे खेडाळुवृत्ती निर्माण केली व विविध खेळाच्या माध्यमातून त्यांच्यावर मेहनत घेत त्यांना राज्य स्तरापर्यन्त पोहचवले. प्रा. भोगे सरांची सेवा कारकीर्द सदैव उच्च राहिली. महाविद्यालयात रुजु झाल्यानंतर ज्या महाविद्यालयाचे ते क्रिडा संचालक राहिले. त्याच महाविद्यालयाच्या सुसज्य व सर्व सोयीयुक्त जिमखाना आहे. त्यांच्या उभारणीमधे सरांचा महत्वाचा वाटा आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बोर्ड़ ऑफ़ स्टडी,स्टूडन्ट कॉंन्सिल इत्यादि महत्वाच्या समीतीवर त्यांनी आपली विशेष मोहर उमटवली आहे.२००३ ते २००८ पर्यन्त ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहिले. नंदुरबार जिल्हा स्पोर्ट कमेटीचे सेक्रेटरी म्हणुन त्यांनी कार्य पाहिले. याच कालावधीत त्यांच्याकडे महाविद्यालयाचे प्राचार्य पद व संस्थेचे सेक्रेतारि पद आले. त्यांनी आपल्या व्यवस्थापन कौशल्याच्या आधारे प्राचार्य पदाचा कालावधी यशस्वीपणे पूर्ण केला व महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली कडून महाविद्यालयासाठी 44 लाखाँचा निधी प्राप्त मिळवला. आयुष्यभर महाविद्यालयात सायकलीने प्रवास करुण विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला. एक प्रेमळ व निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणुन प्रा. भोगे क्रिडा क्षेत्रात व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरावर प्रसिद्द आहेत. कुठल्याही व्यक्तीशी व विद्यार्थ्यांशी संबंध आल्यानंतर त्यांची आपुलकीने चौकशी करणे त्याना निस्वार्थ हेतुने मदत व मार्गदशन करणे यामुळे त्यांना असंख्य मित्रपरिवाराचा गोतावळा आहे. शैक्षणिक जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आपल्या कुटुंबियांकडेही विशेष लक्ष दिले. म्हणूनच त्यांचे दोन्ही लहान बंधू पुणे येथे एम्.एस. व एम्.डी. म्हणुन वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या मुलाबाळावरही चांगले संस्कार करुण त्यांनी आपल्या कुटुंबियांमधे चरित्र संपन्न, पिढी घडवली. अश्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या 10 ऑक्टोंबर रोजी जन्म दिवसा निमित्त ढेर साऱ्या  शुभेच्छा............

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

तलोदा येथील अँड. अजयकुमार मगरे औरंगाबाद खंड पिठाच्या सहाय्यक सरकारी वकील व अभीयोक्ता पदी

तलोदा येथील अँड. अजयकुमार मगरे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठाच्या सहाय्यक सरकारी वकील व अभीयोक्ता पदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय मुख्य सरकारी वकील पदी अँड.गिरासे अमरजीतसिंग तसेच चार अतिरिक्त सरकारी वकील व 31 साहाय्यक सरकारी वकिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सदर नियुकत्या निधि व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत दि 8 ऑक्टोंबर रोजी 2 वर्षाकरिता जाहिर करण्यात आल्या आहेत. या नविन नियुक्तया नुसार तलोदा येथील रहवासी अँड. अजयकुमार मगरे ह्याची सरकारी वकील व अभियोक्ता पदी नीवड़ झाली आहे. मगरे यांना 17 वर्षाच्या वकीलीचा अनुभव असुन त्यांनी आतापर्यन्त वन अतिक्रमण जमीनी दावे नगरपालिका निवडणुकी संदर्भात व इतर महत्वाचे नौकरी विषयक खटले प्रकरणात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. 3 हजारापेक्षा अधिक खटले चालवल्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. अँड. मगरे यांनी त्यांची ही निवड वडील कै. गोवरलाल उखा मगरे ह्यांच्या स्मृतिस अर्पण केली आहे. अँड. अजय मगरे यांचे वडील कै. गोवरलाल मगरे हे अक्कलकुवा येथील कृषी उतपन्न बाजार समितिवर कार्यरथ होते. अजय मगरे यांच्या निवडीनंतर त्यांच्या सर्वत्र अभिनंदन होत आहे.

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

काका गणेश मंडळ

तलोदा येथील काका गणेश मंडळाने तलोद्यातील स्वातंत्र्यपुर्व काळापासुन चालत आलेल्या परंपराचा आरास साकारुण एकोप्याचे व शांततेचे प्रतीक तलोद्यातील प्राचीन संस्कृतीचे दर्शन दिले आहे. समाजातील स्तरातील लोकांचे एकत्रीकरण व्हावे, शिक्षणाचा प्रसार व्हावा, नाट्य कथानकातुन समाज प्रबोधन व ज्ञानदान व्हावे, धर्म व संस्कृतीची जाण समाजात जागृत रहावी अशा अनेक उद्दिष्टानी गेल्या दिडशे वर्षांपासून तळोदा येथील गांवाच्या मध्यवर्ती असलेल्या बालाजी वाडयातील श्री विठ्ठल मंदिरात महिषासुर मर्दीनी श्री भवानी मातेचा दशावतारी ललित षटरात्री उत्सव प्रतिवर्षी कार्तिकी एकादशी पासून सहा दिवस केला जातो, सदर सहा दिवसाच्या देखावा एकच दिवशी कठोर परिश्रम घेवुन काकाशेठ गल्लीतील काका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यानी सादर केला आहे. सतत 3 दिवस सुरु असलेली पावसाची संततधारमुळे काही प्रमाणात गणेशभक्तांच्या उत्साहात विरजन आले होते. मात्र चौथ्या दिवशी थांबलेल्या पावसात भाविकाना उत्साह भरून काढला. भवानी मातेची टक्कर पाहण्याकरीता भाविकानी प्रचंड गर्दी केली होती.,....











क्षत्रिय नवयुवक मंडळ


तलोदा येथील क्षत्रिय नवयुवक मंडळ तलोदा शहरात 1974 साली क्षत्रिय
माळी नवयुवक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी विविध आरास व शांततेच्या प्रतिक असलेल्या क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ ह्यावर्षी 41 वे वर्ष साजरी करत आहे. ह्यावर्षी अंधश्रद्धेवर देखावा सादर करुण नरेंद्र दाभोळकराना श्रदांजली अर्पली आहे. देखावा पाहण्याकरीता भाविकानी प्रचंड गर्दी केली होती. तलोदा शहरात शांततेच्या व एकतेचे प्रतिक असलेल्या क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ असुन, या मंडळाची स्थापना सुकलाल माळी, श्रीराम मगरे, विनोद मगरे, कै.गोवर्धन मगरे आदिनी सन 1974 साली केली. स्थापनेनंतर राम मंदिर, बालाजी मंदिर, कुबेर भंडार, कश्मीरचा बाग़, बंगोळीवरील झुलावणारा गणपती, मच्छीन्द्रनाथ गुफा, चायना टाऊन मंदीर, मीनाक्षी मंदीर, शिर्डी साईबाबा, अश्या विविध आरास तयार कले आहेत. तर विविध विषयांवर जनजागृती व प्रभोदनात्मक देखावे सादर करण्यात क्षत्रिय माळी समाज नवयुवक मंडळ अग्रेसर आहे, मागील वर्षी पुणे जिल्ह्यातील दरी कोसळलेल्या माळीन गावाची व्यथा मांडली होती. ह्या वर्षी अंधश्रद्धेच्या साहाय्याने गोर गरीब जनतेची व शेतकऱ्यांची होणारी फसवणूक ह्यावर आरास साधारली आहे. याकरीता- वैभव माळी, (बाबा) चंदर मगरे व सूरज
सुर्यवंशी- (शेतकरी) रोहित मगरे- (मवाली) हेमंत मगरे-  (भक्त) प्रसाद मगरे व कुशल मगरे यांनी महिलांची भुमिका  साकारली असुन हिमांशु सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांची भूमिका साकारली आहे,,, समाजात अंधश्रद्धेचा पगडा कमी न होता  वाढतच आहे. अंधश्रद्धा थांबवने गरजेचे आहे.
समाजात द्वेष पसरविणारी विचारसरणी बंद पडली पाहिजे.  ही शरीराची हत्या असून विचाराची हत्या नाही. स्वत:साठी काही न करणारा दुस-यांसाठी उभे आयुष्य वेचणा-या डॉ.  नरेंद्र दाभोळकर यांचे विचार पुढे नेण्याची गरज आहे  असाबी संदेश ह्या देखाव्यातून दिला आहे..मंडळाचे अध्यक्ष- श्रीराम मगरे, उपाध्यक्ष, सुनील सुर्यवंशी, सचिव- अविनाश  टवाळे व रत्नाकर शेंडे, कोष्याध्यक्ष- हेमचंद्र टवाळे, मधुकर  मगरे, सुधीर माळी, संकेत माळी,अरुण मगरे, अरविंद   टवाळे, भिका मगरे, हेमलाल मगरे, अनिल माळी, भगवान मगरे, रविंद मगरे, गिरधर  सुर्यवंशी, राकेश मगरे, गजानान मगरे, उमेश मगरे, मनोज मगरे, आदीनी कठोर  परिश्रम घेतले आहेत,



क्षत्रिय माळी नवयुवक मंडळाच्या उपक्रम

क्षत्रिय माळी नवयुवक मंडळाच्या उपक्रम
``गुलाला ऐवजी फुलांची उधळण करत लाडक्या बाप्पाला निरोप'' ढोल व ताश्यांच्या गजरात फुलांची उधळण करीत तलोदा येथील क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळातर्फे श्रीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विघ्नहर्ता गणरायाला उत्साह व जल्लोषात निरोप देण्यात आला. या विसर्जन मिरवणुकीत नागरिकांना पर्यवरणाच्या दृष्टीने इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. तसेच मल्लखांबद्वारे विद्यार्थ्यांनी विविध कसरती दाखविल्या. या थरारक कसरती पाहून तलोदेकर भारावले. यावेळी शहरातील गणेश सोशल ग्रूपने मंडळाच्या पदाधिकाऱ्याचा गौरव केला.. तलौड़ा येथील क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने लाडक्या गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली होती. दहा दिवसाच्या मुक्कामाला आलेल्या श्रीची काल शनिवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोल ताश्यांच्या गजर करीत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करुण गुलाला ऐवजी फुलांची उधळण करुण गणरायाला निरोप देण्यात आला. मगरे चौक येथून चार वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. वाजंत्री पथकाने लयबद्ध व एकाताला सुराने वाजंत्री वाजवली. त्या वाजंत्री पथकांवर उमेश माळी व राजेश टवाळे हे नियंत्रण ठेवले.
 बालगोपालानी मिरवणुकीत सक्रिय सहभाग नोंदवित झांझ नृत्य सादर केले. तसेच युवकानी लेझीम नृत्याद्वारे उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले. त्यांना गिरधर सुर्यवंशी, संकेत माळी रोहित पिंपरे यांनी मार्गदर्शन केले. मिरवणुकीचे आकर्षण हे मल्लखांब वरील पिरयामिंड व गोफ ठरले. नयनरम्य देखावे पाहण्यासाठी लहान बालकांसह महिलानी गर्दी केली होती.. परंपरा जपत विमल पैलेस येथे माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्या हस्ते श्रीची महा आरती करण्यात आली,
तसेच आ. उदेसिंग पाडवी,भाजपा प्रवक्ते, प्रा.विलास डामरे, नगरसेवक अजय परदेशी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, भाजपा शहर अध्यक्ष भास्कर मराठे, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, आदिनी भेट दिली. मिरवणुक यशस्वीतेसाठी न.पा.प्रतोद भरत माळी, नगरसेवक संजय माळी, सुधीर माळी, माजी उपनगराध्यक्ष अनिल माळी, अरविंद मगरे, जयेंद्र माळी, उखा पिंपरे,माजी उपनगराध्यक्ष सुरेश गुलाल सुर्यवंशी, नीलेश माळी, गिरधर सागर, योगेश्वर पंजराळे, सुधाकर टवाळे अजित टवाळे, निमेश सुर्यवंशी, चन्द्रकांत माळी मंडळाचे अध्यक्ष श्रीराम मगरे, उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, सचिव अविनाश टवाळे, रत्नाकर शेंडे, कोष्याध्यक्ष हेमचंद्र टवाळे, मधुकर मगरे,अरुण मगरे आदिनी परिश्रम घेतले. मिरवणुकीत गणेश सोशल ग्रुपतर्फे संजय माळी, हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे, व पदाधिकाऱ्यानी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे सत्कार केला, यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवुन मिरवणूक शांतता पार पाडली....