Breking News

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

सूचना फलकाच्या वरती फलक लावून पालिकेला आव्हान !


तळोदयात विविध चौकात अवैध होर्डिंगस व फ्लेक्सचे साम्राज्य वाढल्याने शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे चित्र सर्वांसमोर आले आहे. पालिकेचा कर चुकवून नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर पालिका मेहरभान का असा सवाल आमजनेतून उपस्थित होत आहे. शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना दुसऱ्या बाजूला अशा अवैध होर्डिंगसमूळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याची समस्या शहराला भेडसावत आहे. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवसासह, विविध कार्यक्रमांचे, प्लॉट विक्री, क्लासेस, आदींसह विविध जाहिराती तसेच वेगवेगळ्या संस्थांच्या प्रसिद्धीसाठी चौक चौकांमध्ये आणि रस्त्यावरील पथ दिव्याच्या खांबांना होर्डिंग लावले जात असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे.. एकाचा फलक काढला, की लगेच दुसऱ्याचा फलक झळकन्याच्या प्रकार सुरू असून एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे फलक लावण्याऱ्यांसमोर पालिका कर्मचारी हतबल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनधिकृत फलक लावू नये व शहर विद्रूप करू नये, असे न्यायालयाचे आदेश असताना फलक लावले जात आहेत. तळोदा येथील मुख्य स्मारक चौकांसह ठिकठिकाणी फलकबाजी सुरू आहे. निवड, वाढदिवस, स्वागत, पुण्यतिथी, जयंती अशा वेगवेगळय़ा कारणास्तव जाहिरातीचे फलक लावले जात आहेत. मुदत संपल्यानंतर ते काढण्याचे सौजन्य दाखविले जात नसल्याने त्यामुळे जागोजागी फलकांचा सुळसुळाट झाला असून शहर विद्रूप होत आहे. फलकबाजी करणारे पालिकेच्या कारवाईला बिलकूल भीक घालीत नाहीत, उलट फलक काढल्यास दमबाजीची भाषा केली जाते. त्यामुळे वाद विवादाला कंटाळून डोळेझाक करण्याची सोयीस्कर भूमिका पालिकेने आतापर्यंत घेतली आहे. मात्र, लाजेखातर कागदपत्री कारवाई सुरू आहे असे दाखविले जात आहे. यापूर्वी, मुख्याधिकारी जनार्धन पवार यांनी कारवाईचे इशारे दिले आहेत, शहादा रस्त्याकडील पथदिव्याच्या ईलेक्ट्रिक खांबावर फलक लावल्यास म.अधिनियम 1995 म प्रिव्हेशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी 1995 चे कलम 5 अन्वये इलेक्ट्रिक पोलवर अथवा सार्वजनिक ठिकाणी झेंडे,फलक बॅनर, अन्य कोणत्याही प्रकारच्या वस्तू लावूंन विद्रुपीकरण करू नये अन्यथा आपल्यावर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल या आशयाची चेतावणी वजा सूचना करून, इशारा दिला असताना अगदी त्या चेतावनी वरच जाहिरातीचे होर्डिंग लावुन पालिकेला आव्हान केले असल्याने सदर प्लॉट जाहिरातीचे होर्डिंगस चर्चेचा विषय बनले आहे. याच रस्त्याने पालिकेचे मुख्याधिकारी दररोज वावरत असताना त्यांनी सदर जाहिरातीकडे कानाडोळा केला असल्याने सर्वसामान्यामध्ये एकच चर्चा रंगली आहे. पालिकेने लावलेल्या सूचना फलकांला केराची टोपली दाखवत फलक बहादरांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. कायदेशीर कारवाईचे सूचना फलक लावले असताना काही फलक बहाद्दर यांना न जुमानता कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता सरास फलक लावून पालिकेच्या नियमाना केराची टोपली दाखवन्याच्या प्रकार सुरू आहे. विनापरवानगी फलक पालिकेला डोकेदुखे ठरली असुन पालिकेचा कर बुडवत हे नियम धाब्यावर ठेवले जात आहेत.. फ्लेक्स आणि होर्डींग्स यामधून पालिकेला प्रचंड उत्पन्न मिळू शकते. मात्र पालिकेचे कर्मचारी कुठे तरी कमी पडत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 🔴 पर सेकवर फूट 10 रु प्रमाणे जाहिरातीचे दर आहेत. तसेच छोट्या मोठ्या जाहिरातीसाठी 100 रु दररोज प्रमाणे पालिकेची जाहिरात कर पावती घ्यावी लागते. पावतीन घेता संबंधित जाहिरात फलक जप्त करून कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. याबाबत मुख्याधिकारी यांनी निर्देश देखील दिले आहेत. मात्र तळोद्यात ठिकठिकाणी सरास नियमांचे उलन्घन होत असताना देखील एकही कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे...

सोमवार, २४ एप्रिल, २०१७

पुष्पेंद्र दुबे यांच्या कार्यला सलाम...

मितभाषी मनमिळावू सर्वांशी प्रमाणे वागणारे मित्रत्व जपत जातीपातीच्या तिढ्यात न पडणारे दिलदार व्यक्तिमत्व अशी ख्वाती प्राप्त झालेले तळोदा येथील सर्वांना परिचित असलेले दुबे परिवारात जन्मलेले पुष्पेंद्र दुबे उर्फ ददूच्या वाढदिवसानिमित्त दद्दुला भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभराटीची जाओ अशी प्रभू चरणी प्रार्थना. मनमिळावू मितभाषी जाती भेदाच्या तिढात कधी न पडता, दगडाच्या मूर्ती ऐवजी माणसात देव शोधणारा, सर्व धर्म समभाव मानणारा श्रीरामावर अपाट श्रद्धा असणारा सतत जयश्री राम नावाचा गजर मुखातुन करत, गौर गरीब जनतेचे सुख दुःखात सहभागी असणारा तळोदा येथील पुष्पेंद्र दुबे उर्फ पुत्तन/यांनी खरी मानवी सेवाच जणू वसाच घेतला आहे. पुष्पेंद्र यांची समाजसेवा करण्याची पद्धत ही जरा अनोखी असली तरी समाजासाठी प्रेरणादायी व गरजेची आहे. त्यांच्याकडे समस्यां घेऊन येणारा प्रत्येक व्यक्ती गरीब अथवा श्रीमंत असो कुठल्याही जाती पतीचा असो त्याची पूर्ण मदत पुष्पेंद्र दुबे हे करीत असतात. तळोदा तालुक्यात कुठल्याही जाती धर्माचा व्यक्तीचा अंत्यसंस्कार त्यांच्या उपस्थितीशिवाय पुर्ण होत नाही. आज पावेतो त्यांनी शेकडो जनांचे अंत्यसंस्काराला त्यांच्या हात लागला असावा. पुष्पेंद्र दुबे हे दद्दु व पुत्तन नावाने शहरात प्रसिद्ध आहेत. व्यक्ती आपल्या नावाने नव्हे तर आपल्या कार्याने प्रसिद्ध असतो. दद्दु हे त्यापैकीच एक आहेत.
कोणत्याही लालसापोटी नव्हे तर गौर गरीब व्यक्ती असो अथवा श्रीमंत व्यक्ती त्यांच्यासाठी आपल्या हातातील सर्व कामे सोडून ते स्वतःला दुसऱ्याच्या कामासाठी झोकून देतात. सामाजिक क्षेत्रातील कामे असो, धार्मिक क्षेत्रातील कामे असो, अथवा राजकीय क्षेत्रातील कामे असो गाव परिसरात लग्न समारंभ असो, कुणी आजारी असो, शहरात कुठे दुर्घटना घडली असो अपघात घडला असो, धार्मिक भंडारा, गावात होणाऱ्या मिरवणूका आदी सर्वच ठिकाणी दद्दु फक्त हजर राहत नाही तर प्रत्येक कार्य माझे आहे म्हणून ते पुढाकार घेऊन कार्यात राबतात व ते हसत मुखत पार पाडतात. शहरातील कुठल्याही जाती धर्माची व्यक्तीकडे विशेष श्रमदान करून ते कार्य पार पाडतात. गावातील जळीत प्रकरणे, आत्महत्येची प्रकरणे, दवाखान्यातील अपघात प्रकरणे, आदी विविध कार्यात दद्दुचा मदतिचा हात असते. गावातील कोणत्याही समाजाच्या व्यक्तीची अंत्ययात्रा असो, दद्दु तेथे आवर्जून उपस्थित राहतात. लाकडांपासून ते अग्निडाग देण्यापर्यंत सर्वच कार्य ते स्वतः करतात. मानव जन्म एकदाच मिळतो प्रत्येकाने मिळालेल्या आयुष्य समता व समभावाने जगले पाहिजे या कार्यापेक्षा दुसरे कोणतेच मोठे कार्य असू शकत नाही असेही ते सांगतात...

रविवार, २३ एप्रिल, २०१७

रस्तालुटीच्या घटनेने नागरिकांमध्ये दहशत

तळोदा शहरानजीकच्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाला लागुन असलेल्या वळण रस्त ते खर्डी नदी पुलाजवळ रस्ता लुटीचा प्रयत्न फसला असुन चोरट्यानी सात ते आठ नागरिकांना मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळूनही ते वेळीच घटनास्थळी दाखल न झल्याने चोरटे प्रसार होण्यात यशस्वी झाल्याचा आरोप करण्यात येऊन नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अक्कलकुवा रस्तावरील तळोदा शहरापासून दोन कि.म.अंतरावरील लक्ष्मण गंगाराम बत्तीसे यांच्या शेतापासून ते अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्गालगतच्या वळण रस्तानजीकच्या गायत्री मिनरल वाटर नजीक दि.२१ रोजी रात्री १0 वाजेच्या सुमारास या रस्त्यावरुन जाणार्‍या लोकांचे आठ ते दहा जणांनी वाहन अडवून लूट करण्याचा प्रय▪केला. रस्त्यावरून जाणारे प्रवासी, शेतकरी व शेतमजुर अशा आठ-दहा लोकांना चोरट्यांनी मारहाण करीत दहशत निर्माण केली. शहरातील गिरीश मधुकर मगरे हे शेतातून घरी परतत असतांना लक्ष्मण बत्तीसे यांच्या शेतानजीकच्या फरशी पुलाच्या जवळ काळे कपडे परिधान केलेल्या व तोंडाला रुमाल बांधलेल्या तरुणाने त्यांच्यावर वार केला. मात्र त्यांनी वार चुकवित पळ काढण्यात यश मिळविले. तसाच प्रकार येथून नजीकच असलेल्या गायत्री फिल्टर प्लॅन नजीक घडला. नातेवाईकांकडून जेवण करून घरी परतणार्‍या मंगेश वसावे व मनोज वसावे यांना चोरअ्यांनी मारहाण केली. मटावल, बुधावल, भंवर परिसरातून ये-जा करणार्‍या इतर आठ-दहा जणांच्या गाडीवर चोट्यांनी दगडफेक केल्याचे समजते. या घटनेबाबत तळोद्यातील डी.बी. हट्टी, मराठा चौक व मगरे चौक परिसरात माहिती मिळाल्याने संमारे दीडशे ते २00 तरुणांचा ताफा घटनास्थळाकडे रवाना झाला. मात्र तेवढय़ात चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. याबाबत पोलीस ठाण्यात अनेकवेळा दुरध्वनी करूनही माहिती देण्याचा प्रय▪करण्यात आला मात्र पोलिसांनी प्रतिसाद न दिल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. दरम्यान सदर घटनेनजीकच १५ दिवसापुर्वी एक खून झाला आहे. त्यामुळे या भागात चोरट्यांची टोळी सक्रीय आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली असून तात्काळ या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

अहो आश्चर्यम! कोंबडीच्या पिल्लूला चक्क तीन पाय


दोन-तीन डोकं असणारी जुळी मुले, प्राणी, दोन व्यक्ती असून हात-पाय एकत्र चिटकेलेली असणारी किंवा शरीराचे अवयव एकत्रित असणाऱ्या व्यक्तिविषयी आपण सर्वजण ज्ञात आहोतच. तळोदा तालुक्यातील प्रतापपुर येथील एका कोंबडीच्या पिलाबाबत असाच काहीसा प्रकार घडला असून या कोंबडीच्या पिलाला चक्क तीन पाय आहेत. प्रतापपुर येथील राणा प्रताप माध्यमिक विद्यालयत शिक्षकेतर कर्मचारी असणारे श्यामप्रसाद आगळे हे शेती बरोबर मर्यादित स्वरूपात कुकुटपालन देखील करतात.नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या कोंबळ्याच्या फैलाव व्हावा यासाठी पुनरुत्पादनासाठी अंडी उबवायला ठेवली होती.निर्धारित कालावधी पूर्ण होऊन उबवायला ठेवलेल्या अंडीमधून कोंबडीचे पिलू बाहेर आलेत.पण यापैकी एक पिल्लू हे चक्क तीन पाय असणारे जन्माला आले आहे. सुरुवातीचे आठ दिवस हे पिल्लू लहान असल्याने त्याला तीन पाय आहेत हे कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र,आठ-दहा दिसनानंतर ते पिल्लू तीन पायाचे असल्याचे आगळे कुटुंबियांच्या लक्षात आले. तीन पायांचे पिलू असल्याने त्याची सर्वांना उत्सुकता वाटली. तीन पाय असल्याने या पिलूला चालतांना अडचण होत असल्याचे दिसून आले आहे. अंधश्रद्धेचा पगडा असणारे अनेक जण याला दैवी चमत्कार असल्याचे समजत आहेत. तर अनेक लहान मुलांना ते पिलू दाखवून त्यांची करमणूक करण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. सोशल मिडियावर या तीन पायांच्या कोंबडीच्या पिल्लुचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून अनेक जण त्याला पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावत आहेत. सध्या हे तीन पायाचे कोंबडीचे पिल्लू गावात व परिसरात आश्चर्याचा व चर्चेचा विषय ठरला आहे.
 *कंजनाईटेल अबनॉर्मलिटी' या प्रकारामुळे असे तीन पायाचे,किंवा तीन,सहा डोक्याचे प्राणी व पक्षी जन्मास येऊ शकतात.गर्भातच तशी त्यांची' गुणसूत्रे जुळतात.काही प्राणी-पक्षी त्या स्थितीत जुळवून घेतात. तर काहींना ते शक्य नसते.त्यांची दगावण्याची शक्यता जास्त असते. अश्या परिस्थिती शक्य असल्यास शस्त्रक्रिया करून जास्तीचे अवयव काढून टाकले जातात.* *डॉ.किशोर सामुद्रे* *तालुका पशुवैद्यकीय अधिकारी,तळोदा*




रविवार, ९ एप्रिल, २०१७

शौचालयांच्या अनुदानाबाबत ग्रामसेविकेला कारणे दाखवा नोटीस

जीवननगर येथील प्रकार : गटविकास अधिकार्‍यांनी केली कारवाई
 तालुक्यातील जीवननगर येथेसन.२0१२-२0१३ या वर्षात १0 शौचालय लाभार्थ्यांचे ४६ हजार रुपयांचे अनुदान प्रत्यक्ष लाभार्थ्यांना न देता परस्पर काढून घेतल्याप्रकरणी गटविकास अधिकारी यांच्या आदेशावरुन संबंधित ग्रामसेविकेच्या मासिक वेतनातून ती रक्कम वसूल करण्यात येत आहे. आतापर्यंत ३६ हजाराची वसूली करण्यात आली असून उर्वरीत रक्कम तात्काळ वसूल केली जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी शरद मगर यांनी दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा तालुक्यातील गोपाळपूर येथील ग्रामस्थांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाचे अनुदान न मिळाल्याने येथील ग्रामसेविका यांच्याकडे विचारणा केली होती. त्यावर त्यांनी २0१२ व २0१३ या वर्षातील शौचालयाचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे ज्यांनी लाभ घेतला त्यांना दुबार लाभ मिळणार नाही असे सांगितले. याबाबत ग्रामस्थानी शौचालयाचे अनुदानात अपहार केल्याचा संशय व्यक्त करीत याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या आदेशांन्वये ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करुन पंचनामा करण्यात आला होता. चौकशीच्यावेळी लाभार्थ्यांना लाभ दिला नसल्याचे निदर्शनास आले. तसेच लाभार्थ्यांना अनुदान न देता प्रत्येकी चार हजार ६00 याप्रमाणो १0 लाभार्थ्यांचे एकूण ४६ हजार एवढी रक्कम काढण्यात आल्याचे दिसून आले. सदर अहवाल गटविकास अधिकारी शरद मगर यांना सोपविण्यात आला. त्यानुसार मगर यांनी संबंधित गरमसेविकेला नोटीस बजावून सदर रक्कम तात्काळ भरावी असे आदेश बजाविले होते. नोटीस नंतरही संबंधीत ग्रामसेविकेने रक्कम जमा न केल्याने त्यांच्या २0१६ च्या अखेरच्या दोन महिन्यांच्या मासिक वेतनातून १८ हजार प्रती महिना असे एकूण 36 हजार रुपये कपात करण्यात आले आहेत. एकूण ४६ हजारापैकी ३६ हजार रुपयांची वसूली करण्यात आली असून उर्वरीत रक्कम त्वरीत वसूल करण्यात येणार असल्याचे मगर यांनी सांगितले. याबाबत ३ एप्रिल २0१७ रोजी संबंधित ग्रामसेविकेला कारणो दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.


सोमवार, ३ एप्रिल, २०१७

साकळी

1
2
3
4
5

तळोदा डॉक्टर्स असोसिएशनचे आ.पाडवींना निवेदन..

डॉक्टरांना कागदपत्रे सादर करण्यास वेळ द्यावा...

शासनाच्या आदेशानुसार तपासणी पथकाने दवाखान्यांची तपासणी सुरु केली आहे. तळोदा शहरात पथकाने काही दवाखान्यांना भेटी दिल्या असता तांत्रिक अडचणींमुळे डॉक्टरांना प्रमाणपत्र व कागदपत्रे सादर करणे शक्य झाले नाही. असे असतांनाही पथकाने डॉक्टरांवर गुन्हे दाखल केल्याची कारवाई केली आहे. म्हणून कागदपत्रे सादर करण्यासाठी काही दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी तळोदा येथील डॉक्टर्स असोसिएशनने केली आहे. याबाबत आ.उदेसिंग पाडवी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, तपासणी पथकाने दवाखान्यांची तपासणी करणे हे योग्य आहे. शासनाच्या आदेशानुसार पथकांकडून तपासणी मोहीम सुरु आहे. तळोदा येथे पथकाने काही दवाखान्यांना भेटी दिल्या असता तांत्रिक अडचणींमुळे डॉक्टरांना कागदपत्रे व प्रमाणपत्र सादर करणे शक्य झाले नाही. डॉक्टरांकडून तपासणी पथकास सहकार्य केले जाईल. परंतू कागदपत्रे सादर करण्यासाठी काही दिवसांचा वेळ द्यावा. कोणत्याही शाखेची पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई होणे गरजेचे आहे. परंतू रजिष्टर मेडीकल प्रॅक्टिशनर्स डॉक्टरांवरही कारवाई केली जात असून बोगस डॉक्टर मोकाट आहेत. म्हणून कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ देऊन डॉक्टरांवर सनदशीर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी तळोदा येथील डॉक्टर्स असोसिएशनने केली आहे.

रविवार, २ एप्रिल, २०१७

आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करा

तळोदा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर चोविस तास सेवा पुरविण्यात यावी, आरोग्य केंद्रांवर तात्काळ एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करावी, डोनर पध्दत बंद करुन शेतमजुरांना अपघातसमयी मोफत रक्त पुरविण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन मार्क्‍सवादी कम्यूनिस्ट पक्षातर्फे गटविकास अधिकारी शरद मगर यांना देण्यात आले. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
                                 जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू आहे. तळोदा शहरातून डॉ.तुषार मिरघे, डॉ.प्रितेश चौधरी, मोड येथून नंदकिशोर चौधरी, अनिल धनगर आदींवर  तळोदा शहरासह ग्रामीण भागातून व्यवसाय करणार्‍या बोगस डॉक्टरांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे तालुक्यातील डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील अनेक बोगस डॉक्टरकीच्या व्यवसाय करणार्‍यांनी गाशा गुंडाळत पलायन केले आहे. गावात गल्लोगल्लीत दिसणारे डॉक्टर सापडत नसल्याने यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या वाढली आहे. अपूर्ण कर्मचार्‍यांमुळे रुग्णांना व नातेवाईकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या तापमानात आरोग्य सेवेअभावी रुग्णांना नंदुरबार, तळोदा, प्रकाशा, शहादा आदी ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. तळोदा तालुका कम्युनिस्ट पक्षाने बोगस डॉक्टर शोध मोहीमेला सर्मथन दिले असून मात्र यामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीसाठी तालुक्यातील आरोग्य केंद्रातील रिक्त पदांची भरती करण्याची मागणी केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी शरद मगर यांना निवेदन दिले असून आदिवासी भागातील रुग्णांसाठी २४ तास सेवा देणारे एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करावेत, अशी मागणी केली आहे. अपघातासमयी शेतमजुरांना रक्ताची आवश्यकता असताना असताना डोंनर उपलब्ध केला तरच रक्त उपलब्ध करून देऊ अशी अट टाकली जाते. डोनर पद्धत बंद करून शेतमजुरांना मोफत रक्त उपलब्द करून द्यावे, तात्काळ वरिष्ठानी याकडे जातीने लक्ष देऊन समस्या सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रुबाबसिंग ठाकरे, दयायनंद चव्हाण, अनिल ठाकरे, भाऊराव बिरारे, बहादूर पाडवी यांनी दिला आहे.

माझ्या बातम्या नंतर सलग चौथ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल.

तळोद्यात चौथ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल....

 पथकाची कारवाई सुरुच : अनेकांनी गुंडाळला गाशा!

 शासनातर्फे राबविण्यात येत असलेली बोगस डॉक्टर शोध मोहीमेने तालुक्यात चांगलाच जोर धरल्याने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. एकट्या तळोदा तालुक्यात डॉ.रेखा शिंदे व यांच्या पथकाने राबविलेल्या कारवाईत आतापर्यंत चार डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी पथकाने तळोदा शहरातील एका रुग्णालयात तपासणी करुन सदर डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शासनाच्या आदेशान्वये जिल्हाभरात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी नियुक्त पथक शहरांसह दुर्गम भागात धाड टाकून तपासणी करीत आहेत. दरम्यान, कारवाईच्या भितीने अनेक बोगस डॉक्टरांनी आपला गाशा गुंडाळत पलायन केले आहे. मोहीम सुरु झाल्यापासून आतापर्यंत तळोदा तालुक्यात चार डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. काल शुक्रवारी पथक प्रमुख डॉ.रेखा शिंदे यांच्या पथकाने तळोदा शहरातील सिटी मार्केट समोरील डॉ. प्रितेश डी.चौधरी यांच्या कुबेर बालरोग व जनरल हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी पथकाने डॉ.चौधरी यांच्याकडे पदवी प्रमाणपत्राची मागणी केली. डॉ.चौधरी यांच्याकडील कागदपत्रांची व औषधांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत डॉ.चौधरी यांच्याकडे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमीओपॅथी या पदवीचे प्रमाणपत्र आढळून आले. तसेच अँलोपॅथी औषधी वापरण्याची परवानगी नसतानाही रुगालयात अँलोपॅथी औषधी, प्रिस्क्रिप्शन व लॅब लेटर आढळून आले. तसेच संबंधित डॉक्टराची पदवी बीएचएमएस असताना अँलोपॅथीचे औषधी बाळगण्याबाबत व रुग्णांना देत असल्याचे आढळून आले. तसेच क्लिनिक चालवण्यासाठी तळोदा नगर पालिकेच्या नाहरकत दाखला, इंडियन मेडिकल कोन्सिलचा परवाना, महाराष्ट्र मेडिकल प्रक्टिशनर अँक्ट १९६१ नुसारचा परवाना मिळून न आल्याने त्यांच्यावर पथक प्रमुख रेखा शिंदे यांच्या फिर्यादीवरुन इंडीयन मेडीकल कौन्सिल अँक्ट १९५६ चे कलम १५/२, इंडियन मेडीकल कौन्सिल अँक्ट १९५६ चे १५ (२) तसेच महाराष्ट्र मेडीकल पॅ्रक्टिशनर अँक्ट १९६१ चे कलम ३३ (२) भादंवि कलम ४१९, ४२0, १७५, १७९ नुसार तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. डॉ.प्रितेश चौधरी यांच्याकडे भरारी पथकाने धाड टाकल्याची माहिती गावात पसरताच इतर बोगस डॉक्टरांनी आपला गाशा गुंडाळत दवाखाने बंद करुन पलायन केले. बोगस डॉक्टर शोध मोहीमेतंर्गत तळोदा पथकातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रेखा शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय पटेल, नायब तहसिलदार मंगला पावरा, पो.कॉ.प्रवीण अहिरे, औषध निर्माता गौतम वळवी यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाई सत्राने तळोदा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे...


शनिवार, १ एप्रिल, २०१७

बातमी नंतर त्या डॉक्टरावर गुन्हा दखल.....

अखेर 'त्या' डॉक्टरवर तळोद्यात गुन्हा दाखल

बोगस डॉक्टर शोध मोहीमेंतर्गत आलेल्या पथकासोबत हुज्जत घालुन एका मंत्र्यांशी दुरध्वनीवरुन संवाद साधुन पथकासोबत दबंगगीरी करणार्‍या 'त्या' डॉक्टर विरोधात अखेर तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी चक्क पथकाला आव्हान दिल्याने या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची हिंमत न झाल्याने पथकाला खाली हात परतावे लागले होते. याबाबत दै.'पुण्यनगरी' ने घटलेल्या प्रकाराबाबत वृतांकन करुन सदर प्रकार जनतेसमोर उजेडात आणला होता. दरम्यान काल गुरुवारी वरिष्ठांच्या आदेशावरुन पथकप्रमुख डॉ.रेखा शिंदे यांच्या फिर्यादीवरून संबंधित डॉक्टरावर तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत ठिकठिकाणाहून बोगस डॉक्टर आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी तालुक्यातील बोरद गावात पथकाने भेट देवून तपासणी मोहीम राबविली. गावातील एका खाजगी दवाखान्यास पथकाने भेट देऊन संबंधित डॉक्टराकडून वैद्यकीय पदवी प्रमाणपत्राची मागणी केली होती. यावेळी डॉक्टराकडे बीईएमएसची एलक्ट्रोपॅथीची पदवी प्रमाणपत्र असताना संबंधित डॉक्टर अलोपॅथिक व्यवसाय करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले होते. तसेच दवाखान्यात प्रतिजैविक सलाईन, इंजेक्शन आदींसह अलोपॅथीची औषधी आढळून आल्याने सदर औषधी बाळगणो व रुग्णांवर उपचार करणो कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगत याबाबत विचारणा करून संबधित डॉक्टरला तंबी दिली होती. मात्र, संबंधित डॉक्टरने यावेळी आलेल्या पथकासोबत चांगलीच हुज्जत घातली होती. माझ्यावर गुन्हे दाखल करुन दाखवावेत, संबंधीताच्या सर्व कुंडल्या मी उघडून त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही! असे आव्हान पथकाला गावकर्‍यांसमोर दिले होते. अनेकवेळा बोरद रुग्णालयात रात्री-बेरात्री गरोदर मातेचे बाळंतपण करण्यास मला या पथकातीलच एका अधिकार्‍याने बोलविले आहे, त्यावेळी माझी पदवी नाही पाहीली का? असा प्रती सवाल देखील आलेल्या पथकाला विचारत वाद घातला तसेच बोरद गावातील रुगणालाय निष्क्रिय असल्याचा आरोपासह विविध आरोप यावेळी डॉक्टरने केले होते. एवढय़ावर न थांबता या महाशयाने एका केंद्रीय मंत्र्यांना फोन करुन संबंधीत पथक हे मला त्रास देत असल्याची माहिती दिल्याचे पथकाने काढता पाय घेतला होता. मात्र घडलेल्या प्रकाराबाबत दै.'पुण्यनगरी' गुरुवारच्या अंकात वृत्त प्रकाशीत करण्यात आल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटल्या. तर पथकाबाबतही सांशक वातावरण निर्माण झाले होते. पथकातील अधिकार्‍यांनी घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ क्लशेट्टी यांना माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकृष्ण पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भोये आदींच्या आदेशांव्ये काल पथक प्रमुख डॉ.रेखा विठ्ठल शिंदे यांच्या फिर्यादीवरून डॉ.अनिल धनगर यांच्यावर तळोदा पोलीस ठाण्यात गुरन ६१/ २0१७ भादवी कलम ३५३, ४१९, ४२0, १७५, १७९ इंडियन मेडिकल कौन्सिल अँक्ट १९५६ चे कलम १५ (२) महाराष्ट्र मेडिकल प्रक्टिशन अँक्ट १९६१ चे कलम ९३ (२) प्रमाणो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई डॉ.रेखा शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय पटले, नायब तहसीलदार मंगला पावरा, असई जेरमा पावरा, औषध निर्माता गौतम वळवी यांच्या पथकाने केली. मोड येथील डॉक्टरवर कारवाई..

                           मोड येथील डॉक्टरावर ही गुन्हा दाखल.... 

तळोदा तालुक्यातील मोड येथील बसस्थानक जवळील मातोश्री क्लिनिकचे डॉ.नंदकिशोर चौधरी यांच्याकडे वैद्यकीय पदवीचे प्रमाणपत्र न आढळ्याने तसेच अलोपेथची परवानगी नसतांना त्यांचाकडे सदर ओषधी आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील मोड येथे गुरुवारी बोगस डॉक्टर शोध मोहीम पथकाने भेट देवून तपासणी केली. यावेळी पथकाने डॉ.नंदकिशोर चौधरी यांच्या मातोश्री क्लिनिक यांच्या दवाखान्याला भेट देवून तपासणी केली. डॉ.नंदकिशोर चौधरी यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली असता त्यांच्याकडे बीएचएमएस ही पदवी आढळून आली. सदर पदवी ही महाराष्र्ट् प्रॅक्टिशन अँक्ट १९६१ आणि इंडियन मेडिकल कौन्सिल अँक्ट १९५६ शेड्यूल मध्ये नमूद नसतांना त्यांच्याकडे अँलोपॅथी औषधी आढळून आली. याबाबत पथक प्रमुख तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रेखा शिंदे, नायब तहसीलदार मंगला पावरा, वैद्यकीय अधिकारी संजय पटले यांच्या पथकाने कारवाई करीत त्यांच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.