Breking News

मंगळवार, २४ जुलै, २०१२

धुंवाधार पाऊस....


तू गेल्यापासून आपल्या अंगणात...
पहिल्यासारखा मुसळधार ..
पाऊस नाही ग कोसळत ..!


कारण ..
... त्याला हि समजलेय कि ..
तू नाहीयेस आता या घरात ..
पाहिलं कसं तू घरात ..
यायच्या अगोदर ..


तो धुंवाधार कोसळायचा ..
आणि
तुला चिंब चिंब भिजवायचा ..


अगदी मनसोक्त ....!
आता तो येतो फक्त ..
काळेभोर ढग आणि ..
विजांचा कडकडाट घेऊन ..
अगदी रागावून ..


बहुतेक ..तुलाच हाक मारत असावा ..!
माझ्यासारखाच त्यालाही ....
तुझा विरह सहन होत नाही म्हणून ..!


कदाचित ..माझ्या इतकंच तुझ्यावर
त्या पावसाचं देखील प्रेम होतं...
हे आजकाल मला प्रत्येक ..
पावसाळ्यात पटायला लागलंय ..


मी कोण?


                                                                           मी कोण?

मी एक थेंब...
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा..
आयुष्याच्या पानावर विसावणारा...
काही क्षण विसावून ओघळून जाणारा....
दुसर्‍या थेंबाशी एकरूप होणारा...


कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमणारा..
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्‍यान्ना आनंद देणारा...
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा.


पुन्हा तोच पाउस


पुन्हा तोच पाउस कालचा
पण आज नव्याने आलेला,
कालही तोच होता
पण आज परका झालेला,
काल होता आपलासा वाटणारा
...भीजउन गेला तरी सुखाऊन टाकणारा,
आजही तोच आहे
पण खूप नवीन झालेला,
काल होता तेव्हा ती होती सोबतीला
आज मात्र एकट्याला भीजउन गेलेला,
कालच्या पावसात भिजायचं होत ,
आज मात्र आडोश्याला उभं राहायचं होत,
आज मात्र आडोश्याला उभं राहायचं होत..

आला पावसाळा

पानाफूलांचा हिरवा पसारा
झोकात आवेशात वाहतो वारा
कोकिळा घेते स्वैर भरारी
गातो निसर्ग क्षणा क्षणाला
आला पावसाळा .. आला पावसाळा

अंगावर झेलत पाऊस धारा
चिमुकली पहा वेचिते गारा
थुईथुई नाचे मोर अंगणी
सप्तरंगी सारा नजारा
आला पावसाळा .. आला पावसाळा


दरवळला हा गंध मातीचा
मोहरला हा ॠतू प्रीतीचा
जुळता नाते धरती नभाचे
उसळ्ल्या सागरी लाटा
आला पावसाळा .. आला पावसाळा

तिचं माझं नातं फ़क्त पावसालाच कळलं होतं


तिचं माझं नातं फ़क्त पावसालाच कळलं होतं...
भरलेलं आभाळ रात्रभर गळलं होतं
तिचं माझं नातं फ़क्त पावसालाच कळलं होतं


रात्रभर पाऊस थेंब अन् थेंब सांडुन गेला
तिच्या माझ्या आठवणींवर ओलावा मांडून गेला
...भिजण्यासाठी मग मन माझं वळलं होतं
तिचं माझं नातं फ़क्त पावसालाच कळलं होतं

तिचं माझं नातं फ़क्त पावसालाच कळलं होतं

पावसाळा


आज अचानक पाऊस आला
अंतरी उमलला पावसाळा


भिजवु नये म्हणून घेतला
आडोसा जवळ वाहनाचा
कळले जेव्हा कांदे त्यात
आठवले मला डोळे तुझे


कातर आठवणीने भारलेले
ढाळीत अश्रू संतत पावसाळा
भिजलो जरीही होतो बाहेर
अन अंतरी चिंब पावसाळा


अंगावरी थेंब थोडे थोडे
आठवांचा ओथंबला पावसाळा 


ढगांचे डोळ्यातले काजळ
अन देशांतरीचा पावसाळा


पाऊस किती चालला आज
अगदी पावलांवर तिच्या
ती तशीही येत असते आठवात
आज आला तिच्यासारखा पावसाळा


पाऊस आता थांबला होता
हिवाळा उधळत वारा आला
उब आठवणीची तग धरून
एक आठव सांद्र उमलून गेला पावसाळा


बाहेर पाऊस थांबला जरी
अंतरी मात्र तसाच आहे पावसाळा

पाऊस आलाय….

पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या