Breking News

शुक्रवार, ३० जून, २०१७

तळोद्यात उद्यानाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण

तळोदा शहरातील एकमेव उद्यानाचे आज जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.. जेष्ठ नागरिक संघाकडून उद्यानाला बसण्याकरिता बाक तर तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाकडून 2 कचरा कुंड्या जाहीर करण्यात आल्या... तळोदा पालिके मार्फत विमलनगर या नवीन वसाहतीत गो.हु. महाजन शाळेला लागून तयार करण्यात आलेल्या उद्यानाचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार योगेश चन्द्रे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, नगराध्यक्षा रत्ना चौधरी, पालिकेचे गटनेते भरत माळी, उपनगराध्यक्ष रुक्सानाबी सैयद, बांधकाम सभापती, संजय माळी, नगरसेवक पंकज राणे, सुभाष चौधरी, प्रकाश ठाकरे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, यु.जी.पिंपरे आदी उपस्थित होते. तळोदा पालिका उद्यान हे जेष्ठ नागरिक व बाल गोपालांसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली असून, अश्या लोकाभिमुख कामा करिता प्रशासन नेहमी सकारात्मक आहे. येत्या काहीं काळात विरुगुळा सेंटर आदींसह जेस्ठसाठी व बालकांसाठी मनोरंजसाठी विविध उपाययोजना राबविणार असल्याचे मत जिल्हाधिकारी मलीनाथ कलशेट्टी यांनी लोकार्पण सोहळा प्रसंगी व्यक्त केलं. यावेळी भरत माळी यांनी देखील शहरात विविध विकासकामे माजी मंत्री पदमाकर वळवी यांच्या मार्गदर्शन खाली होत असून पुढील काळात देखील अशीच विकास कांमासाठी आम्ही बांधील आहोत असे प्रतिप्रदान केले. तळोदेकर जनतेसाठी हक्काचे उद्यान तयार झाले असून जेष्ठ नागरिक व बालकांनी मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे. यावेळी जेष्ठ नागरिक संघ व गावातील मान्यवरांनी उद्यानात बसण्यासाठी बाक देण्याचे आव्हान केले तर, उद्यान परिसर स्वच्छ व सुंदर राहावा या हेतूने तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे डॉल्फिन आकाराच्या 2 कचराकुंडी देण्याचे जाहीर केले. या उद्यानात बालकांसाठी क्रीडा साहित्य व खेळणी आदी बसविण्यात आले आहेत. उद्यानाला काँक्रीटची संरक्षण भिंत बांधण्यात आली असून, या उद्यानाला दोन प्रवेश द्वार असणार आहेत. जेष्ठ नागरिकांसाठी सकाळी व सायंकाळी पायी फिरण्यासाठी कॉंक्रीटचे पथ तयार करण्यात आला आहे. लहान मुलासाठी घसरगुंडी , छोटे झुले,सी,सॉ, व खेळणी असणार आहेत तसेच उद्यानाचा मद्यह्भागी पाण्याचे भलेमोठे कारंजे लावण्याचे काम जोरात सुरू आहे. तयार होत असलेले नवीन उद्यान हे शहराच्या मध्यभागी बसस्थानक जवळ व चिनोदा रस्त्या आदी वर्दळ ठिकाणी असल्याने या उद्यानात तरुणांसह बालके व वृद्ध मोठ्या संख्यने हजेरी लावतील अशी आशा आहे. उदघाटन प्रसंगी उद्धव पिंपळे, नगरसेविका सुनंदा पाडवी, कांता ठाकरे, अरविंद मगरे, बापू कलाल, गणेश सोशल ग्रुपचे हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे, संदीप परदेशी, आदींसह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार रमेश भट यांनी मानले.
  माजी मंत्री पद्माकर वळवी, गटनेंते भरत माळी, यांच्या मार्गदर्शनाने शहरातील विविध समस्यां सोडविण्यात यश येत आहे. शहरात हक्काचे उद्यान तयार झाले असून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. उद्यानात लावण्यात आलेल्या झाडे व खेळणी आदींची निगा राखणे तसेच स्वछता राखणे गरजेचे आहे. याकरिता सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. 
रत्नाताई चौधरी नगराध्यक्षा










गुरुवार, २९ जून, २०१७

आता म्हणे जुलै मध्ये हातोडा पुल सुरू होणार.

तळोदा तालुक्याच्या थेट जिल्ह्याच्या ठिकाण असलेल्या नंदूरबारशी संपर्क यावा,
यासाठी तत्कालीन मंत्र्याच्या प्रमुख पुढाकाराने सन २००७ - ०८ मध्ये हातोडा पूलाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात झाली. तेव्हा पासूनच या पुलाचे उद्घाटन दोन मंत्र्यानी केल्याने पूल चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा विकासाचा सेतू म्हणून ओळखला जाणारा गुजरात राज्याचा सिमेवरील हातोडा पूल विविध तांत्रिक अडचणींसह अन्य बाबींमुळे चर्चेत आला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी पुलावरील भराव खचून पूल चर्चेचा विषय बनला होता. तर तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार उदेसिंग पाडवी यांनी जून 2016 मध्ये पूल सुरू करण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे पुल तयार होण्यास विलब झाला होता... तर सध्या पूल पूर्णतः तयार होण्यापूर्वीच आमदार उदेसिंग पाडवी यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हातोडा पूलाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली होती. मात्र हातोडा पुलाची सध्याची स्थिती पाहता अद्याप काही महिने तरी पूलाचे काम पूर्ण होणार नसल्याचे चित्र समोर आहे. दि:-16 मे रोजी पुन्हा आमदार पाडवी यांनी अभियंता व सहकाऱ्या सोबत जाऊन पुन्हा एकदा पुलाची पाहणी केली. अभियंता पिंगळे यांनी जुलै मध्ये हतोडा पुलाचे कामे पूर्ण होऊन पूल उदघटनास तयार असले असे संगीतले. त्यावर पाडवी यांनी जुलैला हातोडा पुलाचे उद्घाटन होनार असल्याची माहिती उपस्थित पत्रकारांना दिली. सध्याची पुलाची स्थिती पाहता, 1 स्लॅब भरणे एवढेच काम जरी उरले असले तरी, क्रेनची आवश्यकता, येणाऱ्या तांत्रिक अडचणीसह, पाऊसाची चाहूल, यामुळे पुलाचे उद्घाटन लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊसाला सुरुवात होण्याआधी उरलेला 1 स्लॅब आज जरी भरून काढला तरी, साधारणतः तो स्लॅब सव्वा ते दीड महिना वाळण्यासाठी तसाच राहू द्यावा लागेल. मात्र सध्यातरी स्लॅबही भरण्यात आलेला नाही.... एकही मुसळधार पाऊस झाला, तरी 4 महिने पुलाचे कामे थांबविण्याशिवाय पर्याय राहणार नाही... लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेले हतोडा पूल लोकप्रतिनिधींनी, व बांधकाम विभागासाठी केवळ विरुगुंळाचा विषय बनला आहे. आहिराणीतील एक प्रचलित म्हण यावर खरी ठरत आहे. उंदिरना ना जीव जास अन मांजर ले खे व्हस.... पाहूया आता कधी सुरू होतो हतोडा पूल....



बुधवार, २१ जून, २०१७

अश्लील चित्रफित टाकणारा तो अधिकारी कोण?

जिल्हाधिकारीसह विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व यंत्रणेशी संबंधीत कर्मचारी असलेल्या
whatsapp ग्रुपवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्हाट्सअप्प ग्रुपवरती तळोदा तालुक्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अश्लील चित्रफीत टाकून त्याच्या बुद्धिमतेचा प्रत्यय दिला आहे. संबंधितांच्या या घृणास्पद कारनाम्याबाबत ग्रुपवरील महिला पुरुष अधिकाऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित व्यक्तीवर प्रचंड टीका केली जात आहे. मात्र सदर प्रकार हा वरिष्ठ अधिकारी व जबाबदारअधिकाऱ्यांना माहीत असून देखील त्यांनी याबाबत चुप्पी साधल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधता यावा, विविध कामे व योजनांची माहिती एकमेकांपर्यंत पोहचावी, आपापल्या भागातील मिटिंगस, करण्यात येणारी कामे याबाबत अधिकारी व कर्मचारी यांच्यातील संवादासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हाट्सअप्प ग्रुपचालविला जातो. या ग्रुपवर महिला तसेच पुरुष अधिकारीव कर्मचारी असून यातून प्रत्येक विभागाच्या कामाचा आढावा आगामी कामे याबाबत संवादाची देवाण घेवाण हाच प्रमुख हेतू असून या माध्यमातून ग्रुप सुरू आहे. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्यकार्यकारी अधिकारी मंगळे, प्रकल्प अधिकारी, निमा अरोरा, सिव्हिल सर्जन डॉ.भोये. आरोग्य विभागातील सर्वच डॉ. WHO चे प्रतिनधी, समीर पवार, चंद्रकला जयस्वाल, टाटा ग्रुपचे कोपोषण मुक्तचे अधिकारी, युनिसेफचे प्रतिनिधी राजलक्ष्मी नायर, राजमाता जिजाऊचे संचालक गोपाळ पंढगे, युनिसेफचे डॉ.तरुण खडेलवाल, नंदुरबारच्या सर्व पर्यवेक्षिका, (मुख्य सेविका) जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, युनिसेफचे राजलक्ष्मी नायर, प्रकल्पाचे बागुल,जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आदींसह वरिष्ठ अधिकारी महिला अधिकारी आदींच्या समावेश आहे.दरम्यान दि 16 जून रोजी तळोदा तालुक्यातील आरोग्य विभागाच्या एका जबाबदार डॉक्टराने अश्लील फोटो असलेली दोन पीडीएफ फाईल टाकल्याने खळबळ उडाली आहे. संबंधितांच्या या घृणास्पद प्रकाराचे चांगलेच पडसाद उमटले असून महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेधही व्यक्त केला गेला आहे. सदर प्रकार हा अत्यंत घृणास्पद व निंदनीय असून मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे आरोप देखील करण्यात येत आहे.तर अनेकांनी महिलांव्हा आदर करण्याच्या सल्ला ग्रुपवरून दिला आहे. संबंधित हे एका विभागाचे जबाबदार असून त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना किती अडचणीचा सामना करावा लागत असेल असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे संबंधीत ग्रुपवर संतापाची लाट पसरली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ ग्रुपच्या अडमीनने संबंधित अधिकारी, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रुपमधून रीमुव्ह केल्याचे समजते. सदर प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहू देखील याबाबत चुप्पी साधल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महिलांचा आदर न बाळगणाऱ्या संबंधितांची पाठराखण का केली जात आहे. असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. वर्षभरापूर्वी देखील संबंधित व्यक्तीने अन्य एका ग्रुपवर असा प्रकार केल्याची कुजबुज सुरू आहे. संबंधितांकडून सदर प्रकार हा पहिल्यांदा नसून तिसऱ्यादा घडल्याचे बोलले जात आहे. अश्लील चित्रफीत टाकून अनादर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात येत आहे.

सोमवार, १९ जून, २०१७

चिनोदा चौफुलीला आदिवासी क्रांतीकारकाचे नाव द्या.

तळोदा शहरात मुख्य रस्त्यावर अथवा मोक्याच्या ठिकाणी तयार करण्यात
आलेल्या चौफुलीवर आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, आदिवासी क्रांतिकारक यांचे नाव अथवा पुतळे उभारून आदिवासी संस्कुर्तीचे जतन करा अशी मागणी तळोदा आदिवासी महामोर्चा संघटने कडून करण्यात आली आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार व लोकप्रतिनिधीना निवेदन देण्यात आले आहे. तळोदा शहराच्या मुख्य रस्त्यावर अथवा मोक्याच्या ठिकाणी आदिवासी संस्कृती टिकावी या करिता चौफुलीना क्रांतीवीर किंवा आदिवासी संस्कृतीचे प्रतीके, पूर्णकृती पुतळे, आदिवासी क्रांतीवीर बिरसामुंडा अथवा आदिवासी क्रांतीवीर यांचे चौफुलीला नाव देण्यात यावे, अथवा पूर्णकृती पुतळे बसविण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन आदिवासी महामोर्चा संघटनेकडून मुख्याधिकारी जनार्दन पवार सह जिल्ह्यातील आमदार खासदार आदींसह लोकप्रतिनिधीना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हा हा आदिवासी म्हणून ओळखला जात असून. तळोदा तालुका हा आदिवासी समाजाच्या गड समजला जातो. तळोदा तालुक्यात 90/ आदिवासी समाज राहतो. मात्र तळोदा शहराला आदिवासी महापुरुषाचे एकही चौफुली अथवा रस्त्याला महपुरुषाचे नाव, पूर्णकृती पुतळे, बसविण्यात आले नसल्याने आदिवासी समाजावर एकप्रकारे अन्याय होत असून ही गँभिर बाब असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तळोदा शहरात बसस्थानक समोरील चिनोदा रस्त्यालगत असलेल्या चौफुलीला महापुरुष क्रांतिकारी बिरसामुंडा यांचे नाव देण्यात यावे. क्रांतीवीर बिरसामुंडा यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी अत्यंत कमी वयात ब्रिटिशांविरुध्द लढा देऊन सळो की पळो करून सोळले होते. इंग्रजांनी त्यांना कपटनीतीने पकडून फ़ाशी दिली. त्यांचा रक्ताचा प्रत्येक थेंब स्वतंत्रयासाठी त्यांनी वाहून देशासाठी बलीदान दिले. त्यांचे बलीदान व्यर्थ न जाता त्यांचे कार्य सतत तरुण पिढीला स्मरणात रहावे. या हेतूसत्व क्रांतिवीर बिरसामुंडा यांची पूर्णकृती पुतळा अथवा त्यांचे नाव, तथा आदिवासी सांस्कृतीचा प्रतीके अथवा पुतळे बसस्थापक समोरील चिनोदा चौफुलीत बसविण्यात यावे. येत्या 15 नोव्हेंबर क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती पूर्वीच पालिकेने याबाबत निर्णय घोषित करावा अन्यथा आदिवासी समाजाचा वतीने तळोदा तालुक्यात हजारोंच्या संख्येच्या उपस्थित रस्ता रोको व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदनावर अध्यक्ष गणपत पाडवी, उपाध्यक्ष योगेश रमेश पाडवी, सचिव उमेश वसावे, दिनेश पाडवी, दिपक वळवी, जेमलाल वळवी, ईश्वर पाडवी, चंदन पाडवी, रवि पाडवी,विष्णु गावीत, अजय वळवी, विजय पावरा, उमेश पाडवी, सागर पाडवी, राजूदादा पाडवी, सुनिल पाडवी, नितेशदादा पाडवी, पिंटू पाडवी, गोविंदा पाडवी, देविसिगं पाडवी, अमृत वळवी, आदींच्या सह्या आहेत....


शनिवार, १७ जून, २०१७

शिक्षकांना विद्यार्थी देता का विद्यार्थी म्हणण्याची वेळ.

 शिक्षणाचा दर्जा सर्वत्र उंचावला आहे ज्ञानाची गंगा सर्वत्र वाहू लागली आहे. परिस्थिती नुरूप खेड्या पाड्यातील पालक मुलाना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या एकंदरीतच फटका मराठी माध्यमाच्या शाळांना बसला आहे. विद्यार्थ्या अभावी मराठी अमध्यमांच्या शाळावर गंडांतर येऊन शिक्षण संकटात सापडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक मराठी शाळांवर विद्यार्थ्यांची कमतरता जाणवत आहे. विद्यार्थी पटसंख्या पूर्ण नसल्याने वर्ग बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांच्या फटका शिक्षकांसह शाळा व्यवस्थापनाला बसत आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेतील शिक्षकांना शाळा उघडण्याच्या आठवड्या पूर्वीच विद्यार्थी गोळा करून पटसंख्या वाढविण्याचे आदेश मिळाले आहेत. नौकरी वाचविण्यासाठी शिक्षक प्रत्येक खेड्या पाड्यात अतिदुर्गम भागत विद्यार्थ्यां शोधन्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे. विद्यार्थी मिळाले तर शाळा सुरू राहील व आपली नौकरी कायम राहील म्हणून शाळेत ज्ञानार्जन करून भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांवर विद्यार्थी देता का विद्यार्थी असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यातच आदिवासी विकास प्रकल्पामार्फत विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश दिला जात असल्याने विद्यार्थ्यांची कमतरता जाणवत आहे... जिल्हा परिषद अन खाजगी शाळांना 5 व 10 वि पुढील शिक्षण देणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्याकरिता विद्यार्थी व पालकांना कसरत करावी लागत होती. मात्र आता हे चित्र बदलले आहे. प्रत्येक मराठी माध्यमाचा विद्यार्थ्यांचा शोधासाठी दारोदारी फिरत आहेत. इतर शाळांपेक्षा आपली शाळा कशी चांगली आहे. आपल्या शाळेत भौतिक सुविधा आहेत, उत्तम दर्जाचे शिक्षक आहेत, भव्य पटांगण आहे, विविध खेळणी आहेत, अशी स्वतःच शाळेची जाहिरात करून विद्यार्थी व पालकांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. तर काही पालकांसाठी खास भेट वस्तू देण्याचे आमिशही शिक्षाकांकडून दाखविले जात आहे. एवढा आटापिटा करून देखील विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे, उन्हा तान्हात शिक्षक विद्यार्थी मिळविण्यासाठी अनेक की.मी ची पायपीट करत आहेत. उन्हाळच्या सुट्या सुरू असताना शासनमान्य खाजगी शाळेचे शिक्षक गावोगावी जाऊन विद्यार्थीची शोध करीत फिरत आहेत. आपल्या शाळेतील संबंधित वर्ग वाचविण्यासाठी, तुकडी वाचवण्यासाठी विद्यार्थी पटसंख्या टिकविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खेड्यापाड्यात ज्याप्रमाणे स्थानिक नेते मतदान मागन्यासाठी जातात, त्याचप्रमाणे शिक्षक अतिदुर्गम भागापर्यंत विद्यार्थी मिळविण्यासाठी पोहचले आहेत. जिल्ह्यातील काही शाळांचे चेअरमन हे राजकीय पदाधिकारी असल्याने आसपासची गावे खेड्यापाड्यातील सरपंच, ग्रामसेवक, स्थानिक शिक्षक पक्ष, यांच्याशी संपर्क ठेवून आहेत. अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, तालुक्यातील अतिदुर्गम भागात बस नसल्याने या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या खर्चाने खाजगी वाहन लावून दिले जाणार असल्याचे आश्वासन विद्यार्थी व पालकांना दिले जात आहे. तर काही ठिकणी शाळा सुरू होण्यापूर्वीच स्थानिक शिक्षकांना भेटून पटसंख्या जाणून घेऊन पटावरील नवे मिलवली आहेत. एका शाळेतील विद्यार्थी मिळविण्यासाठी 3 ते 4 शाळेचे शिक्षक त्या शाळांना भेटी देत आहेत, स्थानिक पदाधिकारी, सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक भेटी घेऊन विद्यार्थी आमच्या शाळेला द्यावे, अशी मागणी करीत आहेत. काही ठिकाणी प्रतिस्पर्धी शाळेच्या शिक्षणसोबत वाद देखील उफाळत आहेत. तर काही ठिकाणी प्रतिस्पर्धीचे वर्चस्व असल्याने गावातून शिक्षकांना कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षक वैतागला आहे.शाळेचे अस्तित्व टिकवण्यासाठी संस्थाचालक व शिक्षकांना परिश्रम घ्यावे लागत आहे आधुनिक काळात इंग्रजीचे शिक्षक अत्यन्त गरजेचे असते तरी मातृभाषेतीलजपणे गरजेचे आहे.... मागील वर्षांपासून आदिवासी विकास विभागाचा वतीने मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शालामध्ये प्रवेश देण्यास येत आहे. यावर्षी देखील सुमारे दोन हजार तीस विध्यार्थी तळोदा प्रकल्पातून अहमदनगर,नाशिक जिल्ह्यातील पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.पालकही या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येते. मोठ्या संख्येने आदिवासी विध्यार्थी या शाळांमध्ये प्रवेशित होत असल्याने जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळाना अनुसूचित जमातीचे विध्यार्थी मिळविणे जिकरीचे जात आहे....

रविवार, ४ जून, २०१७

मोड येथील शेतकरी भागवतोय वाटसरुंची तृष्णा!

 रस्त्यावर लावली पाणपोई : पाच वर्षापासून अवितरत उपक्रम सुरू
पुण्याचे काम म्हणुन ठिकठिकाणी अनेक व्यक्ती, राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्था वाजागाजा करीत, प्रसिद्धी मिळविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पाणपोई लावतात. काही दिवसापूरतेच पाणपोईच्या माठात पाणी पडते त्यानंतर पाणपोई कधी बंद होते हे कुणाला कळत नाही. मात्र मोड येथील शेतकरी माणक पाटील यांनी निस्वार्थ भावनेने मागील पाच वर्षापासून तहानलेल्या वाटसरुंची तृष्णा भागवण्याचे काम करीत आहेत. स्वार्थासाठी समाजकारण व समाजकारणातून राजकारण करणारे नेते व स्वयंघोषित समाजसेवक यांना उन्हाळ्यात शहरासह तालुक्यातील गावोगावी पाणपोई लावण्याचा विसर पडत चालला आहे. पाणपोई लावली तर फक्त फोटोसेशन करुन दोन-चार दिवस चालविली जाते. मात्र यास अपवाद तळोदा तालुक्यातील मोड येथील एक शेतकरी ठरले आहेत. माणक पाटील यांनी निस्वार्थ भावनेने मागील पाच वर्षापासून स्वखर्चाने
बोरद-मोड रस्त्यावर पाणपोई सुरु केली आहे. बोरद हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. येथे बाजार भरत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक मोठय़ा प्रमाणात बाजार करण्यासाठी येथे येतात. मोड ते बोरद या चार की.मी. रस्तावर अनेकदा पायपीट करणारे प्रवासी, गुराखी, शेतमजूर या रस्त्याने प्रवास करतात. रस्ता अंतर्गत कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे वाटसरुंची जिव्हाची लाही लाही होते. हे लक्षात घेत वाटसरुंची तहान भागावीया हेतूने मोड येथील माणक गोपाळ पाटील यांनी आपल्या शेताच्या बाधांवर दोन माठ ठेवून पाण्याची सोय उपलब्ध केली आहे. गुढीपाडवा पासून या पाणपोईला कुठलाही वाजागाजा न करता सुरुवात झाली असून ती अविरत सुरु आहे. दिवसातून तीनवेळा न चुकता माणकभाई पाण्याचे माठ भरतात. शेताजवळ झाडे असल्याने अनेकदा वाटसरू त्या झाडाच्या सावलीच्या थांबत होते. त्यांची तहाण भागावी म्हणुन मागील चार वर्षापासून पाणपोई सुरु केली आहे. यामुळे आत्मिक समाधान मिळत असल्याचे माणक पाटील दै.'पुण्यनगरी'शी बोलतांना म्हणाले.


तळोदयात बियाणे विक्री दुकानावर जिल्हास्तरीय पथकाची धाड.

तळोदा तालुका आदीवासी बहुल तालुका आहे. शेतकर्‍यांचा अशिक्षितपणाचा फायदा घेत अनेक विक्रेते बोगस बियाणो सर्रासपणे विक्री करुन फसवणूक करीत असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस येतात. राशी ६५९ या बीटी वाणावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत असल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होवून ६ मे रोजी शासनाकडून या वाणावर निर्बंध घालण्यात आला. बंदी होऊन १५ दिवसाच्यावरती झाले असून अद्यापही ठिकठिकाणी या बियाण्यांची विक्री करण्यात येत असल्याची तक्रार शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अनुप उदासी यांनी स्थानिक पातळीवरील संबधित अधिकार्‍यांकडे केली होती. मात्र थातूर-मातूर कारवाई करून याकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोप करीत उदासी यांनी दुरध्वनीवरून जिल्हा कृषी विभागाला याबाबत माहिती देवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या तक्रारवरुन कृषी विभागाचे जिल्हास्तरिय भरारी पथकातील कृषी विकास अधिकारी उमाकांत पाटील, मोहीम अधिकारी पी.बी.शेंडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ए.एफ.तायडे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी तळोदा शहरातील चिनोदा चौफुली परिसरात असलेल्या बियाणे विक्री केंद्रावर भेट देवून तपासणी केली. तपासणीत निर्बंध घालण्यात आलेले बियाणे आढळून आले नाही. मात्र स्टेटमेंट एक व दोन नसल्याकारणाने दोन हजार २६५ कॉटन पाकीटांना विक्रीबंद आदेश देण्यात आले. त्यानंतर पथकाने संबंधित दुकानदाराच्या घरी जाऊन देखील तपासणी केल्याची चर्चा शहरात सुरु असून याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
 वेधशाळेने यंदा पावसाळा लवकर होणार असल्याचे अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांकडून बी-बियाणे व खतांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. शासनाच्या आदेशावरून बीटीचे ‘राशी ६५९’ हे वाणवर निर्बंध घालण्यात आला आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्याची तपासणी करिता जिल्हास्तरीय भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाकडून बियाणे विक्री करणाऱ्या दुकाणाची तपासणी सुरू आहे. बोगस बियाणे विक्री करताना कोणीही आढळले तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. बाजारात बोगस बियाणे आणि खत विक्री करणाऱ्यांकडून त्याची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना सावधान राहण्याचा सल्ला देण्यात आला असून कोणतेही बियाणे खरेदी करताना त्याची पावती घेणे गरजेचे आहे. 
*पी.बी.शेंडे मोहीम अधिकारी*

 शासनाने राशी 659 बीटी या बियानावर निर्बंध घातला आहे. मात्र तळोदा शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी या वाणाचे हे बियाणे सरासपणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करून लूट केली जात आहे. याबाबत स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती, मात्र यावर थातूर मातूर कारवाई करण्यात आली आली. यामुळे सदर प्रकार दूरध्वनीद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्याने कळवून बोगस बियाणे विक्री करणाऱ्याची तपासणी करून कायदेशीर कारवाई व्हावी याबाबत तक्रार केली. अद्यापही शहरात ठीक ठिकाणी निर्बंध घातलेले बियाणे विक्री होत आहे. यावर शासनाने कडक कारवाई करून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी. अन्यथा शिवेसेनकडून आंदोलन करण्यात येईल. *शिवसेना तालुका अध्यक्ष अनुप उदासी*