Breking News

बुधवार, २४ ऑगस्ट, २०११

दिवसा स्वप्ने बघतो



दिवसा स्वप्ने बघतो मी
रात्री जागत बसतो मी...
उगाच कविता करतो मी
जगात वेडा ठरतो मी...

मनात इमले रचतो मी
आशेवरती जगतो मी...

असतो तेथे नसतो मी
मलाच शोधत बसतो मी...

वरवर नुसते हसतो मी
'अजब' मनाशी कुढतो मी...

शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

कुणी असं सोडुन का जातं?

मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?
जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?
कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास
काट्यांतच मग खुडावं लागतं.....
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं
बरसतानाच नकळत हरवुनही जातं
भर चांदरातीही मनास मग
एकट्यालाच झुरावं लागतं...कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये
झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये
वाळवंटी या जगात
एकट्यालाच मग जगावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मी जगुन घेते एकटी
माझ्याशीच मी हसुन घेते एकटी
तरी येकटीलाच रोज रोज मला मरावचं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

तुझं न येणं ठरलेलंच आहे…

तुझं न येणं ठरलेलंच आहे…
त्या दगडावरच्या खोल घळीसारखं…
अनं माझं वाट पाहाणंही…
त्याच दगडातून उगवलेल्या इवल्य़ाश्या रोपासारखं…
किलकिल्या दारातून येणारी झुळूक…माझं असं डोळे लावून बसणं…..होवून अगतिक…
आणि तुझं न येणं….अपरिहार्य…व्यवहार्यही कदाचित …
तुझ्या स्पर्शाला पारखे झालेले…अश्रूही…
अक्षरश: टपून बसलेले असतात….गनिमासारखे…
डोळ्यातल्या हसरेपणातही घेवून फिरते एक भिजला तीळ..
अन्‌ दुखा:त आहे तुझं इंद्रधनुष्य …रंगीत..
काय करू सांग आता तूच…
खिडकीतून येणारा प्रकाशाच कवडसा…
मंद्रसप्तकातलं एखादं गाणं…

तुझ्याच आठवांची बेहोशी घेवून घेते….

बेहिशोबीपणे…..!!!
घेवून येते तुझाच गंध…
घेवून येते मनाच्या गर्ता..अनामिक लाटांच्या भरत्या….