Breking News

लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

४५ वर्षांचा नित्यनियम आज कायमचा थांबला... स्व.सावित्री आज्जीं अनंतात विलीन

काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून जातात. त्यांचं असणं इतकं सहज आणि स्वाभाविक वाटतं की, एक दिवस ते आपल्यात नसतील, याची कल्पनाही मनाला शिवत नाही.

सावित्री आज्जी आमच्यासाठी अशाच होत्या.

गेल्या तब्बल ४५ वर्षांपासून त्यांचा एक नित्यनियम होता. आमच्या शेजारी असलेल्या चिंतेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या न चुकता आमच्या घरी यायच्या. आमच्या आईला त्यांनी भाची मानलं होतं. मंदिराचं दर्शन झालं की त्यांची पावलं आपोआप आमच्या घराकडे वळायची.

आई बाहेर येईपर्यंत त्या दाराबाहेर उभ्या राहायच्या आणि आई दिसताच नतमस्तक होऊन तिचे पाय पडायच्या.

हा केवळ पाय पडण्याचा विधी नव्हता...

त्यामागे होता नात्याचा आदर, मनातली श्रद्धा, आपुलकी आणि त्यांनी जपलेले संस्कार.

४५ वर्षांत कितीतरी दिवस आले आणि गेले. परिस्थिती बदलली, माणसं बदलली; पण सावित्री आज्जींचा हा नित्यनियम मात्र बदलला नाही. अगदी अंथरुणाला खिळेपर्यंत त्यांनी हा नित्यक्रम जपला.

त्यांनी आम्हाला केवळ नात्यांचा आदर शिकवला नाही, तर नाती कशी जपायची, माणसांशी कसं प्रेमाने वागायचं आणि मनातलं दुःख कुणाजवळ सांगून मन हलकं कसं करायचं, हेही शिकवलं.

आज्जींची आणखी एक खास गोष्ट होती—त्यांची हाक.

त्या कधीच एकाच व्यक्तीला एक हाक मारत नसत.

दारातून किंवा अंगणातून त्यांची आरोळी आली की ती अशीच असायची...

"आशा... संगीता... उषा... शालिनी... शेजल... बेना..."

एकेक नाव घेत त्या सगळ्यांना हाक मारायच्या. त्यांच्या आवाजात एक वेगळीच आपुलकी असायची. ती हाक ऐकली की, आज्जी आल्या आहेत, हे घरातल्या प्रत्येकाला कळायचं.

आणि मग त्यांची छोटीशी भेट सुरू व्हायची.

कधी दोन मिनिटं, कधी थोडा वेळ...

मनात साठवलेल्या काही गोष्टी सांगायच्या. एखादी अडचण, एखादा जुना प्रसंग, घरातील एखादी गोष्ट किंवा मनातली खंत—सगळं मोकळेपणाने सांगायच्या.

मनातलं बोलून त्यांचा भार हलका व्हायचा आणि मग त्या पुन्हा आपल्या मार्गाने निघून जायच्या.

त्यांची ही दोन मिनिटांची भेट आज किती मोठी होती, हे त्यांच्या जाण्यानंतर जाणवत आहे.

त्या येताना कधी मोठ्या अपेक्षा घेऊन येत नव्हत्या. फक्त माणसं भेटायची, दोन शब्द बोलायचे, आईचे पाय पडायचे आणि समाधानाने निघून जायचं.

कधी कधी आपल्या आयुष्यातील छोट्या वाटणाऱ्या गोष्टींची किंमत आपल्याला त्या कायमच्या हरवल्यानंतर समजते.

आज्जींच्या बाबतीतही तसंच झालं.

आज त्यांची ती हाक ऐकू येणार नाही.
"आशा... संगीता... शालिनी... शेजल... बेना..."
अशी नावं घेत अंगणात घुमणारा त्यांचा आवाज आता फक्त आठवणीत राहणार आहे.

आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता सावित्री आज्जींची प्राणज्योत मावळली.

ही बातमी मनाला चटका लावून गेली.

कालपर्यंत चिंतेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आमच्या घराकडे येणारी त्यांची पावलं आज कायमची थांबली. आईचे पाय पडण्यासाठी दारात उभ्या राहणाऱ्या त्या आता दिसणार नाहीत.

उद्या मंदिरात नेहमीप्रमाणे घंटानाद होईल. लोक दर्शनासाठी येतील. रस्त्यावरची वर्दळही नेहमीसारखी असेल. पण आमच्या घराकडे पाहताना मन मात्र नकळत विचारेल

"सावित्री आज्जी आज का आल्या नाहीत?"

त्यांच्या येण्याने घराच्या उंबरठ्याला एक वेगळीच आपुलकी होती. त्यांच्या हाकेने घर जिवंत व्हायचं. त्यांच्या दोन शब्दांनी मन हलकं व्हायचं आणि त्यांच्या नमस्काराने नात्यांचा अर्थ समजायचा.

माणूस जातो... पण त्याने दिलेले संस्कार आणि आठवणी कधीच जात नाहीत.

सावित्री आज्जींनी आम्हाला प्रेम दिलं, आपुलकी दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाती जपण्याचे संस्कार दिले.

४५ वर्षे त्यांनी हे नातं मनापासून जपलं. आता त्यांची प्राणज्योत मावळली असली तरी त्यांनी पेटवलेला संस्कारांचा दिवा आमच्या मनात कायम तेवत राहील.

चिंतेश्वर महादेवाच्या चरणी आज एकच प्रार्थना...

"महादेवा, आमच्या सावित्री आज्जींच्या आत्म्यास चिरशांती दे. त्यांच्या निष्पाप आणि प्रेमळ मनाला तुझ्या चरणी स्थान दे. त्यांनी आम्हाला दिलेलं प्रेम, आपुलकी आणि संस्कार कायम जपण्याची शक्ती आम्हाला दे."

सावित्री आज्जी,

तुमची ती हाक आता ऐकू येणार नाही...
आईचे पाय पडण्यासाठी तुमची पावलं आता दारात येणार नाहीत...
दोन मिनिटं बसून मनातलं सांगणारी तुमची ती भेट आता होणार नाही...

पण तुमच्या आठवणी?

त्या मात्र आयुष्यभर आमच्यासोबत राहतील.

तुम्ही दिलेले संस्कारच तुमची खरी ओळख आहेत.

🌹 सावित्री आज्जींना भावपूर्ण श्रद्धांजली!
🙏 ॐ शांती 🙏

000 111 222

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

वचननिष्ठेचा जिवंत आदर्श : आप्पासाहेब लक्ष्मणराव बबनराव माळी

              आमचे आधारवड आप्पा साहेब लक्ष्मणराव बबनराव माळी हे अत्यंत उदार, दिलदार, मातीशी जोडलेले रांगडे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या स्वभावातील माणुसकी, साधेपणा आणि प्रेमळपणा यामुळे ते प्रत्येकाच्या मनात आदराचे आणि आपुलकीचे स्थान मिळवून आहेत. त्यांची आध्यात्मिक वृत्ती म्हणजे देवावर अढळ श्रद्धा, मनःशांती, संयम, सेवा, नम्रता आणि जीवनाला दिशा देणारी सकारात्मक ऊर्जा आहे. ते नियमित देवपूजा करतात आणि देवावर त्यांची अढळ श्रद्धा आहे. देवावरचे त्यांचे निस्सीम प्रेम त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देत आले असल्याचे ते नेहमी म्हणतात. 
          नेतृत्वगुण असलेले आप्पा साहेब पी. ई. सोसायटीचे अध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करत आहेत. संस्था चालक म्हणून त्यांनी दिलेले योगदान खरोखरच मोलाचे आहे. त्यांच्या मेहनतीमुळे अनेक लोक घडले, अनेकांचे जीवन बदलले आणि संस्था अधिक सक्षम झाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला आज पुढे जाण्याची संधी मिळाली आहे.
           औपचारिक शिक्षणाच्या कागदी पदव्या कमी असल्या तरी जीवनातील अनुभव, व्यवहारज्ञान आणि शहाणपण यामुळे ते खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक आहेत. संयम, सातत्य, कुटुंबावरचे प्रेम आणि कुटुंबप्रमुख म्हणून निभावलेली जबाबदारी ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खास ओळख आहे.
         ते कुटुंबावर, समाजावर आणि तरुण पिढीवर मनापासून प्रेम करतात. कठीण परिस्थितीतही त्यांनी कधी हार मानली नाही. असंख्य संकटांना सामोरे जात त्यांनी नेहमीच योग्य मार्ग शोधला.
             माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी आधार दिला आणि तरुणांची साथ कधीही सोडली नाही. समाजाला चांगली दिशा देणारे आप्पा साहेब हे खरोखरच आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यासारखा मार्गदर्शक आणि आधार मिळणे हे आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. 
            खरे आप्पा ओळखायचे असतील तर आप्पा साहेबांचा सहवास आवश्यक आहे. सहवासात मिळते अनुभवाची शिदोरी, जी कित्येक पुस्तके वाचूनही सापडणार नाही. असंख्य माणसे वाचलेला माणूस, आमची आभाळमाया - कधीमधी चिडणारे, पण लगेच विसरून त्याहीपेक्षा अधिक प्रेम करणारे, साधे, भोळे, दिलदार आणि मनाचा राजा असलेले आप्पासाहेबाना वाढदिवसाच्या सप्तरंगी शुभेच्छा.

आप्पा साहेब, तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

दसऱ्याच्या दिवशी घेतलेला त्या एका निर्णयाने… उभे राहिले तळोदा येथील ऐतिहासिक राम मंदिर!

सुधाकर मराठे

         दसरा–विजय, धर्म आणि नीतिपथाचा उत्सव. रावणावर श्रीरामांनी मिळविलेला विजय असो वा मराठा सरदारांचे शस्त्रपूजन करून मोहिमा सुरू करण्याचे शौर्यपूर्ण क्षण असोत, दसरा हा अन्यायावरील न्यायाचा आणि दुष्टावर सज्जनांचा विजय दर्शविणारा पर्व आहे. अशा या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर घेतलेला निर्णय तळोद्याच्या पुरातन राम मंदिराच्या स्थापनेशी जोडला गेला आणि या मंदिराच्या इतिहासाला एक अद्वितीय धार्मिक–सांस्कृतिक अधोरेखित मिळाले.

         मराठा साम्राज्याचा इतिहास केवळ युद्धाचा नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक समन्वय यांचा संगमही आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे आजचे प्रसिद्ध तळोदा येथील राम मंदिर, ज्यामागे एक ऐतिहासिक आणि धार्मिक कथा दडलेली आहे.

       अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात नारायणराव बारगळ हे राजस्थानातील उदयपूरच्या महाराणा संग्रामसिंह यांच्या सैन्यात जहागिरदार होते. त्यांना बुढा परगणा ही जहागिरी दिली होती. ते युद्ध करत होते. चार–पाच दिवस झाले तरी युद्धात अपेक्षित यश मिळत नव्हते. संकटाच्या त्या काळात नारायणरावांनी आपल्या श्रद्धेचा आधार घेतला. त्यांनी श्रीरामचंद्राला साकडे घातले –

       जर आम्हाला आज सायंकाळ पावेतो या युद्धात विजय मिळाला, तर आम्ही तुम्हाला आमच्या घरी पंचायतसह आणून स्थापू.

      असे म्हणतात की यानंतर युद्धात मराठ्यांना यश लाभले. आपल्या नवसाप्रमाणे नारायणरावांनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासह महादेव, पार्वती भवानी माता आणि राधा–कृष्ण अशा विविध मूर्ती गढीवर आणल्या.

       मात्र, या मुर्त्या कुठे स्थापित कराव्यात, यावर गढीतील ब्राह्मण समुदायामध्ये मतभेद झाले. देवाचे पावित्र्य राखले जाईल का, यावर शंका उपस्थित झाली. कारण हा राजवाडा होता; कटकारस्थाने, राजकीय बैठका, लष्करी हालचाली या सर्वांचा साक्षीदार असलेल्या गढीत देवतांची स्थापना योग्य नाही, असे काहींचे मत होते.

       तेव्हा खुद्द नारायणराव पुढे सरसावले. त्यांनी ठाम शब्दांत सांगितले –

मी हे कबूल केले आहे आणि माझी श्रद्धा यात आहे.

      तरीही सर्वांचा एकमताने निर्णय व्हावा म्हणून गावच्या चावडीशेजारी असलेल्या बारगळ हवेलीत मूर्ती स्थापण्याचा पर्याय मान्य झाला.

     दसऱ्याच्या दिवशीच राम पंचायत मूर्ती स्थापनेचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विजयादशमी हा दिवसच विजयाचा आणि नवा संकल्प करण्याचा मानला जातो. रामायणातील परंपरेनुसार याच दिवशी श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून धर्माची पुनर्स्थापना केली होती. मराठा साम्राज्यातही दसरा हा शौर्याचा आणि शस्त्रपूजेचा दिवस होता. त्यामुळे नारायणरावांनी आपल्या नवसपूर्तीचा अंतिम निर्णय या दिवशी घेणे ही श्रद्धा, परंपरा आणि मराठा शौर्याचा अद्भुत संगम ठरला.

         या मंदिराची स्थापना ही फक्त धार्मिक नव्हे, तर सामाजिक सहमती आणि श्रद्धेचा विजय मानली जाते. विशेष म्हणजे, ज्या काळात हे घडत होते त्या काळात देशात पानिपतचे तिसरे युद्ध (1761) घडले होते. त्या युद्धात मराठा सेनापती भोईटे होते. त्यांच्या मालकीची हवेली – आज जी जिल्हा परिषद शाळा (भोई बिल्डिंगसमोर) म्हणून ओळखली जाते – त्या काळी तबेला म्हणून वापरात होती.
         या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की धार्मिक श्रद्धा आणि राजकीय–लष्करी कर्तव्य यांचा समन्वय मराठा परंपरेत खोलवर रुजलेला होता. दसऱ्याच्या दिवशी झालेला हा निर्णय विजयाची आठवण करून देतो आणि मराठा शौर्याची परंपरा जिवंत ठेवतो.
       आजही हे राम मंदिर त्या श्रद्धेचा जिवंत पुरावा आहे आणि मराठा इतिहासाच्या अध्यायात एक महत्त्वाची नोंद म्हणून उभे राहिले आहे. दसऱ्याचा तो ऐतिहासिक क्षण या मंदिराच्या स्थापनेतून पिढ्यान्‌पिढ्या स्मरणात राहिला आहे....

प्रतिक्रिया : 
     शहरातील बारगडांच्या हवेलीत राम मूर्तीसह अन्य मूर्तीच्या स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय जहागिरदारांचा होता. सध्या रामाची हवेली जीर्ण झालेली आहे. लवकरच पुनर्निर्माण केला जाणार आहे. ..
अमरजित बारगळ
जहागिरदार तळोदा

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

हलाखीतून हिरोपर्यंत – जगणं अग्निहोत्री यांची यशोगाथा

सुधाकर मराठे 
         जगण्यात संघर्ष असतोच, पण काही माणसं त्याच संघर्षाला आपल्या आयुष्याचं शस्त्र बनवून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे जगन अग्निहोत्री यांची.
          लहानपणापासूनच संकटांनी वेढलेलं आयुष्य. वडील अगदी लहान वयातच सोडून गेले. चार भावांच्या कुटुंबाची जबाबदारी आईच्या खांद्यावर आणि पुढे पुढे  स्वतः यांच्यावर येऊन पडली. शिक्षण घेणं शक्यच नव्हतं, कारण घर चालवायचं होतं. त्यामुळे 'हाताला येईल ते काम' हेच आयुष्याचं तत्त्व बनलं.

        सुरुवात झाली ती अगदी सामान्य कामांपासून. काही काळ त्यांनी तळोदा अक्कलकुवा जाणारी जीप गाड्यांवर किन्नरी करत जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न केला. नंतर पेट्रोल पंपावर काम केलं. काम काहीही असो, प्रामाणिकपणा आणि मेहनत हेच त्यांच्या प्रत्येक कामाचं वैशिष्ट्य राहिलं.

       'जाणता राजा' पतपेढीत त्यांनी कलेक्शन एजंट म्हणून काम सुरू केलं. पैशांची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या प्रामाणिक स्वभावाची लोकांना जाणीव होऊ लागली. याच काळात त्यांनी रिक्षा चालवून मुलांना शाळेत ने-आण करण्याचं काम केलं.

      आपली स्वतःची रिक्षा असावी ही इच्छा होती. म्हणून एकदा ते एका पतसंस्थेत कर्जासाठी गेले. पण तिथे त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रामाणिकपण, मनातलं स्वच्छेपण पाहून त्यांना रिक्षा कर्जाऐवजी एक अनपेक्षित संधी मिळाली – "तू इथेच कामाला लाग", असं त्या पतसंस्थेचे प्रमुख भाजप प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांनी सांगितलं.

      त्यानंतर जगन यांनी पतपेढीतच काम सुरू केलं आणि आपल्या सचोटीने, व्यवहारकुशलतेने आणि मेहनतीने तिथेही वेगळी छाप सोडली.

        परंतु एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. शेती ही त्यांची खरी ओढ होती. मात्र स्वतःची मालकी शेती नव्हती, त्यांनी भाडे तत्वावर शेती केली,  जमेल तशी शेतीत पाऊल टाकलं आणि जमिनीवर स्वतःच्या घामाच्या बळावर यश मिळवलं. कुठलीही शेती पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी शेतात रात्रंदिवस कष्ट करून आज यशस्वी शेतकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

        स्वभावाने जगन अग्निहोत्री हे मनमोकळे, कुठलाही छल कपट न करणारे, नातेसंबंध जपणारे आणि मित्रांच्या गराड्यात रमणारे व्यक्तिमत्व आहे. व्यवहारात सतत प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा ठेवून त्यांनी शहरात आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.

         आज त्यांचं नाव घेतल्यावर फक्त संघर्ष नाही, तर यश, प्रामाणिकपणा आणि जिद्द यांची जिवंत उदाहरणं आठवतात...

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

तळोदा परिसरासाठी वरदान ठरलेला महामंत्र सरस्वतीनंदन स्वामी महाराजां ५१ वर्षांची अखंड सप्ताह परंपरा

तळोदा परिसरासाठी वरदान ठरलेला महामंत्र

तळोदा : ०७ ऑगस्ट २०२५ 
       श्रद्धा, भक्ती आणि गुरुकृपेचा संगम घडवणारा एक ऐतिहासिक प्रसंग तब्बल ५१ वर्षांपूर्वी बडोदा येथील आश्रमात घडला, ज्याने तळोदा परिसराच्या अध्यात्मिक आणि पर्यावरणीय जीवनात आमूलाग्र बदल घडवला. या प्रसंगाच्या केंद्रस्थानी होते दिव्य अंतर्दृष्टी लाभलेले सरस्वतीनंदन स्वामी महाराज, ज्यांच्या मुखकमलातून प्रकट झालेला २३ अक्षरी महामंत्र आजही तळोदा परिसरासाठी एक आशिर्वादमंत्र ठरला आहे. या मंत्रावर आधारित अखंड सप्ताह परंपरा गेल्या पाच दशकांहून अधिक काळ तळोदा गावात सातत्याने जपली जात आहे.  
      १९७० च्या सुमारास तळोदा येथील वैद्यराज शंकरराव गोविंदराव मराठे आणि वडाळी येथील मदन बापूजी निकम हे दोघे सरस्वतीनंदन स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी बडोदा येथील आश्रमात गेले होते. त्यांनी महाराजांना नम्र विनंती केली – “तळोदा येथे सात दिवसांचा सप्ताह सुरू करायचा आहे, कृपया मार्गदर्शन द्या.” त्या वेळी मुलजी शंकर गुरु सरस्वतीनंदन उर्फ ‘मुलजी मामा’ देखील उपस्थित होते. महाराजांनी ही विनंती ऐकून काही काळ ध्यानधारणा केली आणि शेवटी त्यांनी श्रावण शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी सूर्योदयापासून सात दिवस अखंड नामजप करण्याची आज्ञा दिली. त्यांनी त्या वेळी जो मंत्र दिला, तो होता – “ॐ सोऽहम जय जय पूर्ण सत्य श्री गुरुदेव दया घन” – हे २१ अक्षरी मंत्र होते, ज्यात 'घन' हा शब्द एकदाच होता.
दोघे शिष्य महाराजांची आज्ञा घेऊन परत तळोद्याला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोहोचले. परंतु आश्रमात ध्यानस्थ अवस्थेत असलेल्या स्वामी महाराजांना अंतःप्रेरणा झाली की मंत्रामध्ये आवश्यक बदल शिल्लक आहे. त्यांनी तातडीने मुलजी मामा यांना सांगितले – “ते दोघे स्टेशनवर आहेत, ट्रेनला उशीर आहे, त्यांना परत बोलवा.” आणि खरेच, ते दोघे तिथेच होते. आश्रमातून पाठवलेल्या माणसाने त्यांना शोधून पुन्हा आश्रमात आणले. त्यानंतर महाराजांनी स्पष्ट निर्देश दिले की, “हा मंत्र २३ अक्षरी असावा, आणि ‘घन’ शब्द पुनः घ्यावा.”

त्याच साक्षीला, पुन्हा उच्चरित झाला २३ अक्षरी महामंत्र –
!! ॐ सोऽहम जय जय पूर्ण सत्य श्री गुरुदेव दया घन घन !!

स्वामी महाराजांनी या मंत्राचा अर्थही समजावून सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “हे सत्य गुरुदेव, आपण पूर्णब्रह्म, सर्वज्ञ, अंतर्ज्ञानी आहात. आपण सुख, समृद्धी, आरोग्य, शांती आणि अध्यात्मिक उन्नती प्रदान करणारे आहात. ‘सोऽहम’ म्हणजे ‘मी तोच आहे’ – म्हणजे परमात्मा सर्वत्र आहे, प्रत्येक प्राणिमात्रात आहे. ‘दयाघन घन’ म्हणजे आपण दयेचा, करुणेचा सतत वर्षाव करणारे आहात.”
गुरुआज्ञेनुसार शंकरराव मराठे आणि मदन निकम यांनी तळोदा येथे सप्ताह सुरू केला. सप्ताहाची खास वैशिष्ट्ये म्हणजे सात दिवस २४ तास अखंड महामंत्राचा जप, सामूहिक सहभाग, आणि संपूर्ण गावातील धार्मिक उत्सवाचे वातावरण. विशेष म्हणजे, हा सप्ताह गेल्या ५१ वर्षांपासून सलग सुरू आहे, कोणतीही खंडितता न होता. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात मोठ्या भक्तिभावाने सप्ताह साजरा केला जातो. सप्ताहाच्या समारोपाला ढोल-ताशा, लेझीम, तालीम पथक, भजनी मंडळ आणि पालखी सोहळा अशा पारंपरिक वेशात महाराजांच्या प्रतिमेसह संपूर्ण गावात शोभायात्रा काढली जाते. महामंत्राच्या गजरात गावभर प्रदक्षिणा केली जाते.
या आध्यात्मिक पर्वानंतर संपूर्ण गावासाठी एक पवित्र भंडारा आयोजित केला जातो. यात डाळ-भात, चण्याची भाजी आणि गूळ-लापशी यांचा समावेश असतो. हा भंडारा अत्यंत पवित्रतेने, शुभ्र वस्त्र झाकून, स्वयंपाक खोलीत महाराजांच्या प्रतिमेजवळ ठेवून भक्तांना वाटला जातो. संपूर्ण गाव भोजन घेतल्यानंतर जो प्रसाद उरे, तो तापी नदीत विसर्जित केला जातो – हा एक प्रकारचा निसर्गाशी असलेला दयाळू संवाद आहे, ज्यामध्ये जलचर प्राण्यांनाही प्रसादाचा लाभ मिळावा अशी भावना असते.
या अखंड सप्ताहाच्या काळात अनेक भक्तांनी स्वप्नात, ध्यानात किंवा प्रत्यक्ष अनुभूतीच्या रूपात गुरु महाराजांचे दर्शन घेतल्याचे अनुभव कथन केले आहेत. ही अनुभूती म्हणजे महाराजांच्या कृपेची जिवंत साक्षी आहे. त्यांच्या उपस्थितीची जाणीव आजही अनेकांना दरवर्षी होत असते.

या महामंत्राचा प्रभाव परिसरात प्रकर्षाने दिसून येतो. सुसम पर्जन्य, चांगली शेती, पर्यावरणीय समतोल, आरोग्यदायी वातावरण आणि सामाजिक सलोखा – हे सगळे परिणाम या जपाच्या सामूहिक ऊर्जेने घडत असल्याचा दृढ विश्वास गावकऱ्यांमध्ये आहे. अति-वृष्टी वा दुष्काळ यांसारख्या टोकाच्या हवामान बदलांपासून परिसर सुरक्षित राहिलेला आहे.

आजच्या धावपळीच्या युगात, गावातील ही आध्यात्मिक परंपरा अधिकच महत्त्वाची वाटते. केवळ धार्मिकतेपुरती मर्यादित न राहता, ही चळवळ सामाजिक एकजूट, पर्यावरण रक्षण आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार करणारी आहे. हा इतिहास केवळ गतकाळाचे स्मरण नसून, वर्तमानात जपावयाची आणि भविष्यात टिकवावी अशी एक विलक्षण श्रद्धा-अभियान आहे.

गेल्या पाच दशकांपासून जपला जात असलेला हा मंत्र म्हणजे तळोदा गावाच्या सामूहिक सद्भावनेचा, गुरुकृपेवरील विश्वासाचा आणि अध्यात्माच्या उन्नतीचा जीता जागता पुरावा आहे.

!! ॐ सोऽहम जय जय पूर्ण सत्य श्री गुरुदेव दया घन घन !!

सोमवार, १० जून, २०२४

आमचे घर : आठवणींचा ठेवा, कष्टांचा वारसा आणि जीवनप्रवासाचा साक्षीदार

                  हे खरं तर आम्ही आमच्या मामाचे घर म्हणतो; पण आम्हाला मामा नव्हते. हे घर आमच्या आजी स्व. नबाबाई संपत मराठे यांचे होते. त्यामुळे या घराशी आमच्या कुटुंबाचे अतूट नाते जोडले गेले. आमची आई आशाबाई शांताराम मराठे ही स्व.संपत मराठे व स्व.नाबाबाई मराठे यांची नवसाची एकुलती एक मुलगी होती. आमचे आजोबा स्व. संपत मराठे यांचे निधन झाले तेव्हा त्या काळात संपर्काची साधने कमी होती. मुलीला ही दुःखद बातमी वेळेवर मिळाली नाही. तब्बल दहा दिवसांनी तिला ही गोष्ट कळली. त्या प्रसंगामुळे आजीने आपल्या मुलीला, म्हणजेच आमच्या आईला, कायम आपल्या जवळ ठेवण्याचा निर्णय घेतला.  
      आमचे मूळ गाव पारोळा तालुक्यातील देवगाव. तेथे आमची वडिलोपार्जित शेती होती. त्या काळी ग्रामीण भागात उद्योगधंदे किंवा रोजगाराच्या संधी फारशा नव्हत्या. शेतीवरच आमचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने माझे वडील शांताराम वेडू मराठे आणि आई सौ. आशाबाई मराठे यांनी तळोदा येथे येऊन संसाराची नवी सुरुवात केली..
           याठिकाणी सुरुवातीचे दिवस अत्यंत कष्टाचे होते. वडिलांनी लॉरीवर भाजीपाल्या विक्री करून पाहिली, त्यानंतर ते गल्लोगल्ली फिरून बर्फाचा गोला विकू लागले. मी लहान असताना त्यांच्या लॉरीवर बसून "गोला वाले, भाजी वाले!" अशी आरोळी मारत फिरलो आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टाची जाण आहे. सकाळी गोला किंवा भाजलेल्या आणि सायंकाळी बाफलेल्या शेंगा विकणे, ती आठवण आजही मनात ताजी आहे.
           फक्त वडीलच नव्हे तर आईनेही संसार उभा करण्यासाठी खूप मेहनत घेतली. वडिलांना मदत करणेसोबतच बाजारात मठ आणि पापडी विकणे अशा अनेक कामांमध्ये तिने सहभाग घेतला. आमची आजी देखील जिल्हा परिषद शाळेवर गोळ्या बिस्कीट विक्री करत होती त्यांच्या सर्वांच्या कष्टामुळेच आमचा संसार हळूहळू मार्गी लागला.      
          या सर्व काळात आमची आजी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिच्यामुळे आम्हाला राहण्यासाठी हे जुने घर मिळाले. हे घर फक्त विटा आणि मातीचे बांधकाम नव्हते; ते आमच्या आयुष्याचा आधार होते. या घरात आणखी एक वाटा होता तो म्हणजे आमचे आजोबा आजीचे लहान बंधू स्व.ओंकार शंकर मराठे यांचा त्यांनी ही मरणापूर्वीच आपण ही जागा माझ्याकडून घ्या असे म्हणून प्रेम व्यक्त केले.
         या घरात आमच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. चार भावंडे, आई-वडील आणि आजी अशा मोठ्या कुटुंबाचा आनंद, गप्पा, हशा, सण-उत्सव आणि लहानसहान भांडणे या सर्वांचे हे घर साक्षीदार आहे. आमच्या बालपणातील प्रत्येक क्षण या घराच्या भिंतींमध्ये आजही जिवंत आहे.
            विशेष म्हणजे आमच्या चारही भावंडांचे विवाह याच घरातून झाले. त्यामुळे या घराचे आमच्या आयुष्यातील स्थान आणखी मोठे आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली, घरे बदलली; पण या घराशी जोडलेल्या आठवणी मात्र आजही तितक्याच जिवंत आहेत.
        आज जेव्हा या जुन्या घराकडे पाहतो, तेव्हा आजीचे प्रेम, आई-वडिलांचे अथक कष्ट आणि आमच्या बालपणातील सुंदर क्षण डोळ्यांसमोर उभे राहतात. म्हणूनच हे घर आमच्यासाठी केवळ एक वास्तू नसून आमच्या कुटुंबाच्या संघर्ष, प्रेम, त्याग आणि जिव्हाळ्याचे जिवंत स्मारक आहे. हे घर आमच्या आठवणींचा अमूल्य ठेवा आहे. 
          कालांतराने आई-वडिलांच्या अथक परिश्रमातून या जुन्या कवलारू घराचे रूपांतर पत्र्याच्या घरात झाले. संसाराची घडी हळूहळू स्थिरावत गेली आणि घरालाही नवे रूप मिळाले. पुढे मला देखील या घरासाठी काहीतरी करण्याची संधी मिळत आहे. मी या घराचे रूपांतर दुमजली, टुमदार आणि सुबक अशा घरात करण्याचा निर्णय घेतला आहे. घराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. नवीन बांधकाम, नवीन सुविधा आणि नवीन स्वरूप प्राप्त होणार आहे.
       मात्र घराचे रूप बदलणार असले तरी त्याच्या जुन्या आठवणी मात्र ताज्याच राहतील यात शंका नाही, त्या मातीच्या भिंती, कौलारू छप्पर, अंगणातील खेळ, आई-वडिलांचे कष्ट, आजीचे प्रेम, भावंडांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आणि घरभर घुमणारा हशा आजही मनात जिवंत आहे. नवीन घर उभे राहील, काळ पुढे जाईल, पण जुन्या घराने दिलेली ऊब, आपुलकी आणि संघर्षातून उभ्या राहिलेल्या आयुष्याच्या आठवणी कधीही विसरता येणार नाहीत.
       आज या घराकडे पाहताना अभिमान वाटतो की आई-वडिलांनी कष्टाने सुरू केलेला प्रवास पुढे नेण्याचे भाग्य मला लाभले. परंतु या सुंदर घराच्या पायात जुन्या घराच्या आठवणींचीच मजबूत वीट रचलेली आहे. म्हणूनच हे घर आमच्यासाठी केवळ निवारा नसून, आमच्या कुटुंबाच्या संघर्ष, जिद्द, प्रेम आणि एकोप्याची जिवंत कहाणी आहे.... 

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

शैक्षणिक क्षेत्राचा दीपस्तंभ शेठ के.डी. हायस्कूल

तळोदा शहराच्या पिढ्यान् पिढ्या येथे शिकून मोठ्या झाल्या. शहरातील कदाचित एकही घर नसावे ज्या घरात शेठ के.डी . हायस्कूलमध्ये शिकलेला माजी विद्यार्थी नसेल . शाळेचे माजी विद्यार्थी देश - विदेशात आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. अशा शेठ के . डी. हायस्कूलमध्ये आजपावेतो २४ हजार ६०२ विद्यार्थी शिकून बाहेर पडले आहेत. जे आज आपापल्या क्षेत्रात नाव कमवीत आहेत. मात्र शाळेप्रति कृतज्ञता बाळगून आहेत. त्यामुळे आजही अनेक माजी विद्यार्थी मेळावे भरविले जातात. त्यातून इतिहासाला उजाळा दिला जातो. तर भविष्याची वाटचाल अजून भक्कमपणे करण्याची हिंमत त्यातून मिळते. हातोडा रस्त्यावर शेठ के.डी. हायस्कूलची भव्य इमारत आहे. या इमारतीत व तेथील मैदानाने अनेक सोहळे व कार्यक्रम पाहिले आहेत. त्यात शाळेने शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच उपक्रम मोठ्या हिरिरीने पार करत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. तोच वारसा अमृतमहोत्सवी वर्षानंतरही सुरू असल्याचा अभिमान आजही शाळेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाच्या मनात आहे.

           शाळेचे व्यवस्थापन पालिकेकडे असताना पालिका संचलित शाळाप्रमुख म्हणून एस .के.काळकर, एस. जी. भावे, व्ही.एम. घुले, एस. एस. फाळके, व्ही . एच . खर्शीकर , डी. एम . वाणी अशा दिग्गज प्रशासकांनी शाळेचे कामकाज सांभाळले होते, तर १९४४ मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाल्यानंतर शाळेचे पहिले मुख्याध्यापक म्हणून गोरख हुलाजी महाजन, त्यानंतर एस . के. घाटे, नागेश रंगनाथ लिमये, तुकाराम सोनजी पटेल, शंकर बापू शिंपी , कृ.वि. कानुगो, कांतिलाल बुलाखी वाणी, गजानन विनायक जोशी, विष्णुदत्त नथू तिवारी, काशीनाथ नारायण गुजराथी, वासुदेव जगन्नाथ साळी, दादाभाई हांडुजी धोदरे, धना ओंकार भोई, अमृतलाल विठ्ठलदास वाणी, उखा गणपत पिपरे, लाला हरिभाऊ पाटील, सदाशिव गिरधरसा चित्ते, अशोक मयाराम चव्हाण , विजयकुमार जंगलू राणे, विजयकुमार धुडकू ठाकरे, पुंडलिक राघो खुनेपिंप्रे, दिलीप भानुदास गिरणार अशा दिग्गज शिक्षकांनी येथील मुख्याध्यापकपद सांभाळले होते.आता सध्या जितेंद्र लक्ष्मणराव सूर्यवंशी समर्थपणे मुख्याध्यापकपदाची धुरा सांभाळत आहेत. 
             येथील शिक्षकदेखील नवरत्नांची खाण शोभावी अशा परंपरेतील असतात. अनेक क्षेत्रांतील गाढे अभ्यासक असलेले शिक्षक शाळेला लाभले होते. तोच वारसा आजही शिक्षक चालवत आहेत. त्यामुळे शिक्षकांचा आदर्श वारसा लाभलेल्या या शाळेत आज ३७ शिक्षक व १४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ , ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धती यानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. समाजातील वंचित व गरजू घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहाबरोबरच नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचे शिक्षण दिले जात आहे. व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. तालुक्यात केवळ येथेच राष्ट्रीय छात्रसेना अर्थात एनसीसीचे युनिट आहे . संस्कृत विषयाचे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक आहे. त्यामुळे मुख्याध्यापक जितेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शाळेची शैक्षणिक घोडदौड  आजही आश्वासकपणे सुरू आहे. त्यामुळे तळोदा परिसरात शेठ के .डी. हायस्कूल म्हटले की दीपस्तंभ दिसावा अशी अवस्था होते. परिसरात आजही शेठ के.डी. हायस्कूल खराखुरा शिक्षणाचा ब्रॅन्ड शोभून दिसते एवढे मात्र निश्चित...

            स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या शेठ के . डी हायस्कूलची वाटचाल ८१ वर्षांची झाली आहे . परिसरातील शिक्षणाची गरज लक्षात घेता शेठ खुशालभाई दुल्लभदास वाणी कुटुंबाने आपली शेतजमीन शाळेसाठी दिल्याने त्यांचे नाव शाळेला देण्यात आले होते . त्यामुळे १९४० मध्ये शेठ खुशालभाई दुल्लभदास हायस्कूल नावाने सुरू झालेल्या शाळेचे व्यवस्थापन सुरवातीला पालिकेकडे होते. त्यानंतर २१ ऑगस्ट १९४४ ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाल्यानंतर शाळेचे व्यवस्थापन संस्थेकडे आले. शाळेचे तळोदा परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातील योगदान भव्य आहे. शेठ के.डी . हायस्कूलची वाटचाल आजही परिसरात दीपस्तंभासारखी सुरू आहे.
 जितेंद्र सूर्यवंशी, मुख्याध्यापक, तळोदा 

गुरुवार, २७ जुलै, २०१७

धरणामुळे 272 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार

मागील 15 वर्षांपासून रखडलेल्या धनपूर धरणाचे काम पूर्ण झाल्याने सातत्याने लढा देणाऱ्या संघर्ष समितीला खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. या धरणामुळे 272 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. बोरद सह परिसरातील खेड्या पाड्यासह 20 ते 25 गावातील शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होणार आहे. परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होणार असून शेतकऱ्यांचा पाण्याच्या प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
                               1 जुले 1998 रोजी नंदुरबार जिल्हा निर्मीतीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाठबंधारे मंत्री एकनाथ खडसे आदीं उपस्थित असताना कै. पी.के.अण्णा पाटील यांनी धनपूर धरणाचा प्रस्ताव सादर करून या विषयाला चालना दिली. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे नंदुरबार जिल्हा दौरावर असताना भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते लखनजी भतवाल यांच्या साखर कारखान्याच्या विशेष भेटी दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष राजेंद्र राजपूत, प्रवीणसिंग राजपूत, डॉ.शशिकांत वाणी, अजय परदेशी, विजय राणा, संजय चौधरी आदींनी धनपूर धरणाचा आहवाल यावेळी सादर केला. तर निझरी नदीवर धरण व्हावे यासाठी 2003 साली कॉ.जयसिंग माळी, यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय धनपूर संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या समितीत पुरुषोत्तम नारायण पाटील, उदेसिंग पाडवी, विजय चतुरसिंग राणा, कांतीलाल नारायण पाटील, राजेंद्र राजपूत प्रवीणसिंग भटेसिंग राजपूत, उद्धव पाटील, जर्मनसिग वळवी, कै. लालसिंग वळवी, विजय मराठे, ब्रिजलाल चव्हाण, असे 11 सदस्य या संघर्ष समिती स्थापन केली. प्रथम या संघर्ष समितीने 3 सप्टेंबर 2003 साली मोड येथे रस्ता रोको करून आंदोलन केले. त्यानंतर 26 जानेवारी 2005 रोजी आमलाड येथे अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गवार 5 हजार शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यावेळी प्रांताधिकारी रिचा बागला यांच्या मध्यस्थीने तत्कालीन पालक मंत्री शिवणकर यांची भेट घेऊन चर्चा करून आंदोलन स्थगित करण्यात आले. या बैठकीनंतरच धरणाला खरी चालना मिळाली. मात्र या धरणाचा क्षेत्रात वनविभागाची पाडळपूर, धनपूर, सावरपाडा, राणीपुर, खर्डी पेठे, आदी परिसरातील जमीन जात असल्याने तेवढी जमीन वनविभागाला शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात शासकीय दरात धनपूर धरणाचा मोबदल्यात देण्यात आली. व यामुळे धनपूर धरणाचा कायमचा मोठा अडसर असलेला प्रश्न सुटला. हे धरण पूर्ण होण्यासाठी माजी खासदार माणिकराव गावित, माजी पालकमंत्री ऍड.पद्माकर वळवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार स्वरूपसिंग नाईक, यांनी
शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला, तर विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांनी 2016 साली अर्थ समितीचे अध्यक्ष आमदार आशिष देशमुख यांच्या सबोट जाऊन धनपूर धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. व त्याच वेळी विशेष निधीतून 9 कोटी रुपी या धरणाच्या कामासाठी पदरी पाडून घेतले. व धनपूर धरणाचा प्रश्न मार्गी लागला.... त्यामुळे हे धरण पूर्ण झाले. व जून 2017 पासुन या धरणाच्या पाणी साठवण केली जात आहे. हे धनपूर धरण पूर्ण झाल्याने बोरद परिसरातील मोड, मोहिदा, कडमसारा, धनपूर, सिलिंगपूर, पाडळपुर, खर्डी, लाखपूर, फॉ. न्युबन, छोटा धनपूर, राणीपुर आदी गावातील 272 हॅकटर जमीन ओलिता खाली येणार आहे. या परिसरातील शेती बागायती होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. व शेतकऱ्यांचे राहणीमान उंचवूंन सुखी समाधानी होणार आहेत. हा परिसर पूर्णपणे आदिवासी परिसर असून सातपुड्यावर राहणारा आहे. आदिवासी बंधूं आहेत. त्यांच्या परिसरातील बदल झाल्यावर मुलांच्या क्षिकणाकडे कल झुकणार आहे. यासाठी धनपूर धरण हे या परिसरातील आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश होता तो कायमचा सुटला आहे. या धरणाची लांबी 422 मीटर असुन उंची 20.18 मीटर तर 160 मी. खोली आहे. पाण्याची पातळी वाढण्यानंतर कमी अधिक प्रमाणात धरणाचे पाणी, निझरी नदीत सोडण्यात येणार आहे. या धरणामुळे परिसरातील बोरवेल मध्ये, पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेहमीचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. हा परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. 15 वर्षानंतर या धरणाचे काम पूर्ण स्वरूपाने परिसरातील शेतकऱ्यांची स्वप्न पूर्ती झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाचे लोकप्रतिनिधीचे, व विशेषतः धनपूर धरण संघर्ष समितीचे आभार मानले आहेत. या धरणाला तत्कालीन मुख्यमंत्री ना.मनोहरराव जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, यांच्या शासनाने मंजुरी दिली. या धरणाच्या तत्कालीन पाठबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांच्या विशेष प्रयत्नाने या धरणाला चालना मिळाली आहे. हे धरण धनपूर येथे व्हावे यासाठी कै. पी.के अण्णा पाटील यांनी कृती आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला होता. तेव्हापासून धरणाच्या कामाला सुरुवात झाली होती. विशेषतः यावर्षीच शेतकऱ्यांना या धरणाचा फायदा जाणवू लागला आहे. परीसरातील खालावलेली पाण्याची पातळी या धरणामुळे वर आली आहे.











मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

बडे दिलवाला भरत भामरे

भरत भामरे मामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माणसाचे आयुष्य हा फार कुतूहलाचा विषय आहे. विशेषत: मानवी मनाचा अंतच लागत नाही.
माणूस अनुभवातून, संस्कारातून घडत जातो हे खरे! परंतु माणसांची प्रचंड विविधता सातत्याने अनुभवास येत असते. कधी नैराश्य तर कधी उत्साह! हा आशा-निराशेचा खेळ माणसाच्या जीवनात निरंतर चालू असतो. अशाच अनुभवांवर आधारित तळोदा येथील जेष्ठ पत्रकार भरत भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत सदर लेख प्रसिद्ध करीत आहोत.                                                                                 प्रभू रामचंद्रांनी लंकेत जाण्यासाठी सेतू बांधला त्यावेळी त्यांना अनेकांनी मदत केली. वानरसेना तर त्यांच्याबरोबर कायमच होती. त्याचप्रमाणे एका छोट्याशा खारीनेसुद्धा आपला वाटा उचलला होता. आजही आपण कित्येक वेळा "खारीचा वाटा' हा शब्दप्रयोग वापरतो. प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे चांगल्या कामात हातभार लावला तरच हा यशाचा रथ पुढे जाणार आहे. तळोदा येथील गरीब कुटुंबात जन्मलेले भरत भामरे, आई वडील भाऊ भावंडे असा मोठा परिवार, वडील स्वातंत्र सेनानी असल्याने घरातले वातावरण शिस्त प्रिय, वयाच्या 10 व्या वर्षी वडील पारंगत झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी भरत भामरे यांच्या खांद्यावर आली. आयुष्याचे कळू गोड घोट घेत आयुष्य जगण्यास सुरुवात केली. मलक वाडा परिसरात वडीलाने सुरु केलेले विश्वकर्मा इंजिनिअरिंग वर्कशॉप यावर भरत भामरे यांनी आपला उदरनिर्वाह सुरु केला. मात्र आधुनिकतेकडे वळत असलेल्या
तळोदेकरानी ऑइल इंजिनकडे पाठ फिरवत इलेक्ट्रिक वस्तूचा मागे धाव घेतली. यांच्या परिणामी भामरेचा व्यवसायात निराशा येऊ लागली, पुढे काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला, स्वतः वर असलेला विश्वास कुटुंबाची जबाबदारी मनात काहीतरी करण्याचे धाडस या सर्वाचा विचार करत भरत भामरे यांनी तेथेच गजानन प्रिंटिंग प्रेस नावाचा छोटासा छापखाना सुरु केला. अफाट अध्यातमिक वाचन, समाज कारण करण्याची मनात असलेली तीव्र इच्छा, वारसा हक्काने मिळालेले अनुभवच्या जोरावर भरत भामरे यांनी तळोदा समाचार नावाचे साप्ताहिक सुरु केले. त्याकाळी साप्ताहिक काढणे तारेवरची कसरत होती. एकेकक अक्षराचे खिडे जोडून बातम्या लेख तयार केले जात होते. तसेच बातमीत फोटो लावण्याकरिता धुळे येथून लाकडी ठोकडयावर फोटोची प्लेट आणून पेपरात फोटो छापला जात असे, सातपुडा परिसरात त्याकाळी वाचन संस्कृती एवढी रुजलेली नव्हती, म्हणून गाव परिसरात पेपर मोफत वाटावे लागत होते. त्या परिस्थितीत गावाचा चेहरा मोहरा बदलणाच्या काम साप्ताहिक तळोदा समाचारने केले आहे. पेपराच्या माध्यमातून अनेक बरे वाईट प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. पत्रकार क्षेत्रात मनात कुठलाच तिढा न ठेवता साप्ताहिक तळोदा समाचारच्या माध्यमातून अनेक नवीन पत्रकार त्यांनी घडवले आहेत. त्यातच अनेक सहकार्य करणाऱ्या मित्रांची जोड त्यांना लाभत गेली. मित्र जोडण्याच्या केलेने त्यांनी राजकीय, सामाजिक आर्थिक क्षेत्रातील अनेक मित्र त्यांनी जोडले. या मैत्रीच्या जोरावर त्यांनी कमिशन तत्वावर प्लॉट, घरे, खरेदी विक्रीचा व्यवसायाला सुरुवात केली.सत्य परेशान होंगा मगर पराजित नही या तत्वावर चालणारे भरत भामरे यांनी या व्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन केला. व्यवहारात पारदर्शकता व आपली फसगत होणार नाही असा प्रचंड विश्वास परिसराच्या जनतेत असल्याने प्लॉटिंग व्यवसायात भामरे यांनी आपले पाय मजबूत रित्या रोवले. या व्यवसायात उंची गाठत आजही मनातला पत्रकार संपुष्टात न आणता, आजही ते दै.तापिकाठ व साप्ताहिक तळोदा समाचार मधून पत्रकारिता करीत आहेत. तसेच या पूर्वी त्यांनी शांतता कमिटीचे सदस्य, मोहल्ला कमिटीचे सदस्य, काँग्रेस सेवा दलाचे संघटक, युवा काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख, जेष्ठ काँग्रेस कमिटीचे क्रियाशीस सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदावर त्यांनी कामे पाहिले. आहे सध्या ते तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व मार्गदर्शक असून त्यांच्या संघात आजही मोलाचे स्थान आहे. त्यांचे वेळोवेळी संघाला उपयोगी असे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. मनात कपट नसलेला, अतिशय नि:स्वार्थी, निर्लोभी आणि सदैव दुसऱ्यांना मदत करन्याची प्रवृत्ती असलेल्या, पैस्याचा मोह नसलेला धर्मनिरपेक्ष शब्दाला शोभेल असा निस्वारर्थी मनाचा भरत भामरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा........



सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

पाववडा विकुन कुटुंबाचा उदरनिर्वाह

 तलोदा येथील राजकोरबाई वानखेडे हे पाववडा विकुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.
 वानखेडे ह्यांच्या पाव वडा खाण्याकरीता लांब लांबून खव्य्ये येत असुन पाववडा खरेदीकरीता तासंतास रांगा लावून उभे राहावे लागत आहे.. पाववडा खाण्याकरीता येत आहेत. सिंधखेड़ा तालुक्यातील बेटावद मूळ गाव असलेली राजकोरबाई वानखेड़े यांच्या तलोदा येथील वानखेडे परिवारात विवाह झाला, एक मुलगा व एक मुलगी गुना गोविंदाने संसाराचे गाडे हाकत होते. मुलीच्या लग्नानंतर पाच महिन्यात सन 2001 साली पतीचे अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर आपल्या एकुलता एक मुलाच्या सांभाळ कसा करायचा याची काळजी उरासी बाळगत स्वतःच उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. तलोदा शहरात मुख्य चौकात हातगाडीवर पाववडे विक्रीचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायावर जीवनाचा चरितार्थ चालेल की नाही अशी भीती असताना कठीण परिस्थितीतूनही मार्ग निघतोच ह्या विचाराने हातगाडीवर पाववडा विकन्यास सुरुवात केली. सुरुवातीला अनेक समस्याचा सामना करत पहाटे लवकर उठून घरची कामे आवरून दुपारी 3 वाजता वडापावची गाडी लावत आहे. ह्या कामात त्यांचा मुलगा ललित वानखेड़ा मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. गावात आलेला पाहुना असो अथवा नौकरी वर्ग दररोज सायंकाळी ह्या पाववड्याच्या गाडीवर रांगा लावतात, वानखेडे ताईच्या पाववडा हे तलोद्यातील ओळख झाली आहे. सुरुवातीला 2 रु किमतीच्या पाववडा वाढत्या माहागाईमुळे जरी 7 रु येवून ठेपला असला तरी ग्राहकांची व खवैयाची संखेत कमी झाली नाही. गरम गरम पाववडा खाण्याकरीता लांब लांबुन खव्य्ये येत आहेत. दिवसभरातुन साधारणत 700 पेक्षा अधिक वड़े विकले जात असुन 200 पेक्षा अधिक पाववडे पार्सल जात आहेत. ह्यातून चांगला रोजगार प्राप्त होत असल्याचे राजकोर वानखेडे सांगतात. पाववडा विकुन मुलाचे लग्न केले. स्वतः काभाळ कष्ट करुण समाजात एक आगळी वेगळी ओळख निर्माण झांली आहे. पाववड्याला ठीक ठिकानाहुन मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अगदी गरीब पासुन ते श्रीमंत नागरीक पाववडाची चव चाखल्या शिवाय राहत नाही...
बाहेर गावाहुन आलेला पाहुना असो अथवा माहेरी आलेली लेख वानखेडे ताईचा पाववडा खाल्याशिवाय राहत नाहीं, गरम गरम पाववडा मिळावा ह्याकरीता रांगा लावाव्या लागतात.
वडापावच्या गाडीमुळे समाजात मान उंचावली आहे. मनावर धरले की स्त्री शक्ती काहीही करू शकते याचे एक उदाहरण कष्टातूनही आनंद मिळतो.काभाळ कष्ट स्वत:सह कुटुंबाचा चरितार्थ चालवित आहे. हयात माझा मुलगा ललित ह्याचे मोठे सहकार्य लाभत आहे... राजकोर वानखेडे..


शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५

प्रा.पी.पी.भोगे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील व क्रिडा क्षेत्रातील एक अष्टपैलू परिचीत व्यक्तिमत्व म्हणजे माजी क्रिडा संचालक
प्रा.पी.पी.भोगे सर. प्रा.पी.पी.भोगे मुळचे धुळे जिल्ह्यातील त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यामुळे सामाजिक दृष्टया मागासलेल्या समाजात जन्माला येवून देखील घरातील वातावरण उच्च विचारांचे, उच्च श्रेणीचे यामुळेच सराना उच्च शिक्षणाची संधी मिळाली. त्यांनी आपले उच्च शिक्षण धुळे, औरंगाबाद व मुंबई येथे पूर्ण केले अध्यापक शिक्षण मंडळाचे संस्था मा.प्राचार्य. गो.हु. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली १९७४ पासुन आपल्या सेवा कारकिर्दीला सुरुवात केली. विद्यार्थी हेरण्याचा गुण अंगी असलेले प्रा.भोगे यांनी आपल्या सेवा कार्याला सुरुवात केलेल्या वर्षापासूनच आंतर महाविद्यालयीन स्पर्धा व राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपले विद्यार्थी चमकवले. भोगे सरांच्या काळात 200 पेक्षा अधिक विद्यार्थी विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली यशस्वी कारकीर्द नोंदवून आलेले आहेत. तसेच माध्यमिक विद्यालयात ज्यु. कॉलेज व सीनियर कॉलेज, पोलीस व विविध क्रिडा प्रकारांमधे महाविद्यालयाची विशेष छाप उमटवली आहे. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे नंदुरबार जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धेचे जेतेपद सतत 18 वर्ष आपल्याकडे कायम ठेवले. मुलांप्रमाणेच मुलींना देखील क्रीडास्पर्धामधे भाग घेण्यास प्रेरित करुण त्यांच्यामधे खेडाळुवृत्ती निर्माण केली व विविध खेळाच्या माध्यमातून त्यांच्यावर मेहनत घेत त्यांना राज्य स्तरापर्यन्त पोहचवले. प्रा. भोगे सरांची सेवा कारकीर्द सदैव उच्च राहिली. महाविद्यालयात रुजु झाल्यानंतर ज्या महाविद्यालयाचे ते क्रिडा संचालक राहिले. त्याच महाविद्यालयाच्या सुसज्य व सर्व सोयीयुक्त जिमखाना आहे. त्यांच्या उभारणीमधे सरांचा महत्वाचा वाटा आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बोर्ड़ ऑफ़ स्टडी,स्टूडन्ट कॉंन्सिल इत्यादि महत्वाच्या समीतीवर त्यांनी आपली विशेष मोहर उमटवली आहे.२००३ ते २००८ पर्यन्त ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहिले. नंदुरबार जिल्हा स्पोर्ट कमेटीचे सेक्रेटरी म्हणुन त्यांनी कार्य पाहिले. याच कालावधीत त्यांच्याकडे महाविद्यालयाचे प्राचार्य पद व संस्थेचे सेक्रेतारि पद आले. त्यांनी आपल्या व्यवस्थापन कौशल्याच्या आधारे प्राचार्य पदाचा कालावधी यशस्वीपणे पूर्ण केला व महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली कडून महाविद्यालयासाठी 44 लाखाँचा निधी प्राप्त मिळवला. आयुष्यभर महाविद्यालयात सायकलीने प्रवास करुण विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला. एक प्रेमळ व निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणुन प्रा. भोगे क्रिडा क्षेत्रात व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरावर प्रसिद्द आहेत. कुठल्याही व्यक्तीशी व विद्यार्थ्यांशी संबंध आल्यानंतर त्यांची आपुलकीने चौकशी करणे त्याना निस्वार्थ हेतुने मदत व मार्गदशन करणे यामुळे त्यांना असंख्य मित्रपरिवाराचा गोतावळा आहे. शैक्षणिक जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आपल्या कुटुंबियांकडेही विशेष लक्ष दिले. म्हणूनच त्यांचे दोन्ही लहान बंधू पुणे येथे एम्.एस. व एम्.डी. म्हणुन वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या मुलाबाळावरही चांगले संस्कार करुण त्यांनी आपल्या कुटुंबियांमधे चरित्र संपन्न, पिढी घडवली. अश्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या 10 ऑक्टोंबर रोजी जन्म दिवसा निमित्त ढेर साऱ्या  शुभेच्छा............

सोमवार, १९ जानेवारी, २०१५

डॉ.शशिकांत वाणीना लाखमालेाच्या शुभेच्छा

सातपुड्याच्या राजकारणातील तळपता सूर्य डॉ.शशिकांत वाणी
 भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख दादासाहेब डॉ. शशिकांत वाणी यांचा आज वाढदिवस. तळोदा तालुक्यातील प्रतापूर या छोट्याशा गावातून राजकारणात पुढे आलेले डॉ. शशिकांत वाणी यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात झोकून घेतले. स्वयंसेवक म्हणून काम करताना सातपुड्यातील दर्‍याखोर्‍यातील माणसाला संघ विचाराशी जोडण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख दादासाहेब डॉ. शशिकांत वाणी यांचा आज वाढदिवस. तळोदा तालुक्यातील प्रतापूर या छोट्याशा गावातून राजकारणात पुढे आलेले डॉ. शशिकांत वाणी यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात झोकून घेतले. स्वयंसेवक म्हणून काम करताना सातपुड्यातील दर्‍याखोर्‍यातील माणसाला संघ विचाराशी जोडण्याचा प्रयत्न केला. 1982 मध्ये भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर पक्षातील त्यांची यशस्वी वाटचाल आजपर्यंत थांबलेली नाही.
तळोदा तालुकाध्यक्ष, भाजयुमोचे सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून दादांची संघटनात्मक भरारी सुरू राहीली. पक्षात काम करीत असताना सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा-अपेक्षांकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. सातपुड्यातील माणसाच्या गरजा काय आहेत, याचा अभ्यास केला.कै. दिलवरसिंग पाडवी पतसंस्थेची उभारणी केली. कै.दिलवरसिंगदादा पाडवी ग्राहक भांडार सुरू केले. तळोदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम करताना शेतकर्‍यांचे प्रश्न समजून घेतले. सातपुड्यातील गोरगरीब जनता शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी दादासाहेबांनी श्री साईनाथ शिक्षण संस्थेची उभारणी केली. संस्थेच्या माध्यमातून अनंतदिप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कोठार, ता. तळोदा, विद्यावर्धिनी निवासी माध्यमिक शाळा,जांभीपाणी ता. अक्कलकुवा तसेच भुषण आदिवासी 100 मुलांचे केंद्रीय वस्तीगृह सुरू केले. अयोध्या येथील रामजन्मभूमि आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी झाले त्यावेळी त्यांना उत्तरप्रदेशातील ङ्गैजाबादमध्ये 15 दिवसांचा तुरूंगवास झाला. सहा डिसेंबरच्या अयोध्या आंदोलनात सहभाग घेतला. राजकारणात असले तरी दादांनी समाजसेवेला अधिक प्राधान्य दिले. सातपुड्यातील माणसाला प्रेम दिले.
दु:खीतांचे अश्रु पुसले. हाच वसा पुढेही कायम ठेवला आहे.सतत नवनवीन प्रयोग करीत राहणे, आपल्या सहकार्यांना, शिक्षकांना प्रोत्साहन देत राहणे, यावर दादांचा भर असतो. प्रचंड जनसंपर्क, अतिशय समजूतदारपणा, कनवाळू मन, कोणतेही काम स्वत: लक्ष घालून करून घेणे, अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य तो मार्ग शोधणे आणि तेवढीच कडक शिस्त राबविणे हा दादांचा स्वभाव आहे. दादांच्या रूपाने आम्हाला लाभलेला हा वटवृक्ष अनेकांच्या दु:खावर मायेची ङ्गुंकर घालत आहे. सावली देण्याचे काम करीत आहे. त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुनिता वाणी या नगरसेविका असून वॉर्डातील समस्या सोडवित आहेत.सुपूत्र अभिषेक आणि आदित्य हे वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सुसंस्काराच्या वाटेवर वाटचाल करीत आहेत. आज डॉ.शशिकांत वाणीचा वाढदिवस. जनसामान्यांच्या या आमच्या लाडक्या व्यक्तीमत्वाला आमच्या लाखमालेाच्या शुभेच्छा.........


गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

गेम्समध्ये होते 'बेटिंग' :

गेम्समध्ये होते 'बेटिंग'  :
मोबाईल हा खर्‍या अर्थाने गरज असला
तरी त्याचा सदुपयोग होण्याबरोबरच दुरुपयोग होण्याचे प्रस्थ वाढले आहे. अँन्डरॉईड मोबाईलमध्ये इंटरनेटद्वारे डाऊनलोड केल्या जाणार्‍या अश्लील चित्रफितीपासून आता ऑनलाईन जुगार म्हणजे तीन पत्तीचा डाव रंगत असल्याचे दिसून येते. हीच बाब संवेदनशील पालकांना चिंतेत टाकणारी असून गाव- शहरातील तरुण मोठय़ा प्रमाणात 'मोबाईल कॅसिनो'कडे आकर्षित झाले आहेत. परिणामी पालकांनी मोठय़ा प्रेमाने लाडक्याला दिलेला मोबाईल त्याला जुगारी बनवित असल्याचे दुर्दैवी चित्र दिसू लागले आहे. बाजारात अद्ययावत तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेले मोबाईलमध्ये विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ऑनलाईनद्वारे मोबाईलमधून तीन पानी जुगार चांगलाच रंगलेला असतो. विशेषत: या जुगाराच्या जाळ्यात युवक मोठय़ प्रमाणात सापडत आहे. अँन्डरॉईड मोबाईलमध्ये प्लेस्टोअर अँप्लिकेशनद्वारे तीन पानी जुगार खेळला जात असल्याचे आढळून येत आहे. मोबाईलचा वापर संवादासाठी न होता इतरच कामांसाठी मोठय़ा प्रमाणात होत आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत मोबाईल गरजेची वस्तू बनली असली तरी ज्या उद्देशाने मोबाईलचा वापर होणे आवश्यक आहे तो उद्देश बाजूला सारून या सुविधेचा गैरवापरच मोठय़ा प्रमाणात होताना दिसत आहे. पूर्वी तीन पानी जुगार
खेळण्यासाठी विविध ठिकाणच्या अड्ड्यांवर जावे लागत असे. हा जुगार पत्त्यांच्या सहाय्याने खेळला जात होता. आता तो ऑनलाईन मोबाईलद्वारे तीन पानी जुगार खेळला जात आहे. याद्वारे कोणतीही आर्थिक उलाढाल होत नसली तरी इंटरनेटच्या रिचार्जसाठी वारेमाप खर्च केला जात आहे. टाईमपास म्हणून खेळला जाणारा हा खेळ आता खराखुरा तीनपत्ती जुगार म्हणून खेळण्यास तरुणाई प्रवृत्त होऊ लागली आहे. त्यामुळे या जुगारासाठी पोलिसांच्या सायबर क्राईम सेलला सक्रीय होण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे. तीन पत्ती जुगारच जवळपास ९0 टक्के युर्जसच्या हाती दिसणार्‍या अँन्ड्राईड सिस्टीमच्या मोबाईलवर सर्वाधिक खेळला जाणारा खेळ म्हणजे तीन पत्ती हा जुगाराचा खेळ आहे. सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत अनेक डाव या गेमच्या माध्यमातून खेळले जात असल्याचे वास्तव आहे. फेसबुकसारख्या सोशल साईटवरून मित्रांना ऑनलाईन बोलावून मध्यरात्रीपर्यंत खेळल्या जाणार्‍या या खेळात मुलांपासून युवतीपर्यंत अनेक जण आघाडीवर
असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. अँन्ड्रॉईड फोनवर अनेक मंडळी या मोफत गेमचा आनंद लुटत आहेत, मात्र धक्कादायक बाब म्हणजे प्रायव्हेट टेबलच्या माध्यमातून आपसात ठरवून तीन पत्ती हा प्रचलित जुगार प्रकार आता मोबाईल इंटरनेटच्या हातोहाती खेळला जात आहे. अशा जुगारावर कायद्याचे नियंत्रण आणणे अशक्यप्राय असल्याने रात्रंदिवस ऑनलाईन तीन पत्ती खेळ खेळणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे वेळेच्या अपव्ययासोबतच यात पैसे लागत असल्याने महाविद्यालयीन जुगारी बनू लागले आहेत. पॉकेटमनीचा गैरफायदा मुलांना खर्चासाठी दिला जाणारा पॉकेटमनी हा चांगल्या कामासाठी खर्च होणे अपेक्षित असताना या तीन पानी जुगारासाठी मुले हजारो रुपये खर्च करीत आहेत. शहरांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक मुले बाहेर राहतात. दर महिन्याला त्यांच्या पालकांकडून खर्चमनी येत असतो. मात्र याचा वापर आता गैरमार्गात खर्च केला जातो. मुलांना महागडा मोबाईल खरेदी करून देताना पालक याकडे लक्ष पुरवित नसल्याने रिचार्ज, टॉपअप सोबत मुले पॉकीटमनी जुगारावर उडवित असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

सोमवार, २ डिसेंबर, २०१३

साहेब अजून किती बळी हवेत??


(नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या सातपुड्याच्या डोंगर दऱ्यावरील झाडांची संख्या लाकूडतोडीच्या वाढत्या प्रमानामुळे कमी होऊ लागली आहे. सातपुडा बोडका होत असतानाच उपलब्ध अवस्थेत नसलेले पाणवठे यामुळे जंगलातील हिंस्त्र प्राणी गाववसत्यांकडे येऊ लागले आहेत. दिवसाआड नागरिकांना बिबट्या, अस्वल,तरस अश्या हिंसक प्राण्यांचे दर्शन घडत असल्याने त्यांच्यात प्रचंड प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंस्त्र प्राण्यांच्या दहशतीने अनेकांनी रोजगारावर पाणी सोडून पोटाची खडगी भरण्यासाठी गुजरात राज्यात स्थलांतर केले आहे. हिंस्त्र प्राण्यांचा हल्ल्यात हल्ल्याचा बळींची संख्या दिवसेगणित वाढत असताना मात्र वनविभाग अगदी आरामात झोपलेल्या अवस्थेत आहे. घटनेनंतर कार्यवाही करण्यापेक्षा हिंस्त्र प्राणी गावाकडे येऊ नये, त्यांना जंगलातच सुरक्षितता वाटावी, अशा उपाययोजनाकडे वांविभागाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे उपाययोजनांसाठी वनविभाग अजून किती बळींची वाट पाहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे....)

नंदुरबार तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी वसला आहे. जिल्ह्यात तोरणमाळ, डाब यासारखी पर्यटनस्थळे याच सातपुडाच्या डोंगर दऱ्यात आहेत. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या सातपुडा आजही मोठ्या प्रमाणात वनौषधीसह वनप्राण्यांचे अस्तित्व आढळुन येते. मात्र गेल्या काही वर्षांपासून वनविभागाच्या आशीर्वादाने म्हणा किंवा दुर्लकक्षाने मोठ्या प्रमाणात होणारी लाकुडतोड यामुळे सातपुडा बोडका होऊ लागला आहे. याचाच परिणाम म्हणून सातपुडायाच्या जंगलात वास्तव्यास असलेले हिंस्त्र प्राणी बिबट्या, अस्वल, तरस हे गावाकडे सरकतानाच्या घटना घडू लागल्या आहेत. वनप्राण्यांचा सुरक्षतेसाठी आवश्यक त्या प्रमाणात जंगल व याचबरोबर त्या जंगलात ठिकठिकाणी पाणवठे असणे गरजेचे आहे. मात्र काही वर्षांपासून होणारे कमी पर्जन्यमान यामुळे पाणवठे कोरडे पडले आहेत. तर जंगलही कमी झाल्याने हिंसक प्राण्यांना भक्ष शोधण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागत आहे. दिवसाआड तळोदा व शहादा तालुक्यात शेतकरी, शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने त्यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
                          सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा, अक्कलकुवा, व शहादा तालुक्यात वारंवार बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. सुमारे दोन वर्षापूर्वी तळोदा तालुक्यातील रांझणी शिवारात स्वयंपाकासाठी सरपण घेण्यासाठी गेलेल्या पढरकीबाई पाडवी (वय 45)या महिलेवर अस्वलाने हल्ला चढविल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने नंदुरबार जिल्ह्या रुग्नालयात दाखलही केले. मात्र उपचार घेतानाच त्यांच्या मृत्यु झाला. तर 24 जुन 2015 रोजी आमलाड शिवारात वडिलांसोबत गाई चारण्यासाठी गेलेल्या गोपाळ राजू भरवाड (वय 14) या बालकाला बिबट्याने उचलून त्याला सायंकाळी त्याचा मृत्यूदेह खेळाच्या शेतात आढळला. दरम्यानच्या काळात तळोदा तालुक्यातील मेंढपाळसह मजुरांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले बिबट्याने चढवले आहेत. यात गाई, बकऱ्या व घोडे, बिबट्याने फस्ट केल्याच्या घटना ताज्या आहेत. तळोदा तालुक्यातील खरवड, मोड, न्यूबन, जुवानी, छोटा धनपुर, लाखापुर, रांझणी, प्रतापपुर, कोठार आदी परिसरात वेळोवेळी बिबट्या दर्शन देत आहे. नागरिकांकडून प्रत्येकवेळी तक्रार केली जाते. मात्र वनविभाग पाहिजे त्या प्रमाणात मनावर घेत नाही. बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक त्या कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड अशी भीती कायम आहे.              
नोव्हेंबर 2015 च्या पहिल्या आठवड्यात धडगाव तालुक्यात बिबट्याने दोन बालकांचा बळी घेतला होता. यात शेलदा गावात एका 11 वर्षीय बालीकेच्या बळी गेला. या बालिकेच्या हाडांचा सांगाडा आढळून आला. याबाबत वनविभाग मात्र अभिनज्ञ होता. ही घटना १४ नोव्हेंबर रोजीची होती. तर १७ नोव्हेंबर रोजी तिनसमाळ येथे नातलगांकडे आलेल्या एक नऊ वर्षीय बालक आपल्या बहिणीसह पाणी घेण्यासाठी गेला असता त्या दोघावर बिबट्याने हल्ला केला. यात बहीण पळ काढण्यात यशस्वी झाला. मात्र या बिबट्याच्या हल्ल्यात त्या बालकाला आपला जीव गमवावा लागला. याबाबत लोकप्रतिनिधीनी जिल्हाधिकारीकडे तक्रार केल्याने जिल्हाधिकाऱ्यानी वनविभागाच्या अधिकाऱ्याची कानउघडणी केल्याने अधिकाऱ्यानी घटनास्थळाकडे धाव घेतली. दोघा मयत बालकांचे शवविच्छेदन करण्यात आले होते. तर जखमी बलिकेवर धडगाव येथे उपचार करण्यात आले होते. तत्पूर्वी सुमारे दोन वर्षापूर्वी शहादा तालुक्यातील म्हसावद- पिप्री रस्त्यावरील कोकणवाडा शिवारात एका विहिरीत बिबट्या पडला होता. विहिरीत तीन दिवस मुक्कामानंतर वनविभागाने धुळे येथुन तज्ञ मागवून बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देत सहीसलामत बाहेर काढले होते. तर काही महिन्यापूर्वी परिवर्धे शिवारात उसाच्या शेतात बिबट्याची चार पिल्ले आढळून आली होती. वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर मादीचा शोधासाठी त्या लहान-लहान पिलांना शेतातच ठेवण्यात आले होते. मात्र चार दिवसानंतर या पिलांची प्रकृती खराब होऊ लागल्याने वनविभागाने
घाबरून या पिल्लाना बोरीवली येथील वन्यजीव संरक्षण पार्क येथे हलविले होते. मात्र या ठिकाणी एक-एक करीत चारही पिलांचा मृत्यु झाला असल्याची माहिती मिळाली आहे. शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथे बिबट्याने दर्शन दिल्याने वनविभागाने ह्याठिकानी पिंजरा लावला होता. मात्र विशेष अशी खबरदारी घेतल्याने नदीत लपून बसलेल्या बिबट्याने वनविभागाच्याच कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविल्याने यात दोन जण जखमी झाले होते. तसेच वर्षभरापुर्वी नवापूर तालुक्यातुन दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर चरणमाळ घाटात बिबट्याने हल्ला चढविला होता. मात्र यावेळी मोठ्या आत्मविश्वासाने महिलेने बिबट्याचे जबडे घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर जमलेल्या लोकांनी आरडा ओरड केल्याने बिबट्याने पळ काढला होता. या महिलेच्या हिमतीमुळे दाम्पत्यास प्राण वाचले होते. जिल्ह्यात हिंस्त्र प्राण्यांच्या घटनेत अनेकदा मनुष्यहानी व पाळीव प्राण्यांची हानी झाली आहे. मात्र वनविभाग आवश्यक त्या प्रमाणात उपाययोजना आखत नसल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. जंगलातून हिंस्त्र प्राणी गावाकडे येऊ नयेत. यासाठी वनविभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र वनविभा आवश्यक ती खबरदारी घेत नसल्याने अजून किती बळींची वाट पाहणार? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

"सचिन-क्रिकेटचा राजा...

२४ एप्रिल ला झाला एकाचा जन्म..
वातावरणही जणू सारे झाले होते दंग...

मुलाच्या त्या आगमनाने
घर सारे खिलले होते...
जणू सारे देवही त्याच्याच आगमनाची
वाट ते पाहत होते...

होता त्याचा जन्म फक्त
एका गोष्टीसाठी...
क्रिकेटला आपण सर्वस्व द्यायचे..
ठरवुनी मनी ते ध्येय आपले तो गाठी...


"सचिन" असे म्हणतो आपण..
आहे तो क्रिकेटचा राजा...
धारधार खेळाने आपुल्या...
वाजवतो तो सर्वांचा बेण्ड बाजा...

नाही भीती त्याला ...
समोर असलेल्या बॉलरची...
करुनी चौकाराची आतषबाजी..
पाहतो पकड आपण त्याच्या खेळाची...

नवोदितानाही खेळात प्रेरणा तो देई..
पाहताना खेळ त्या राजाचा..
मन हि आपले हरपुनी जाई...

आहेत सारे विक्रम खेळातले..
या राजाच्या नावावरती...
धावांचा हि डोंगर पाहता..
भल्या भल्यांचे डोळे फिरती...

क्रिकेटचा बादशहा तू
असाच धावांचा पाउस पडत राहा..
नाही फिकीर वयाची आपल्याला..
राजा तू असाच बहारत राहा...असाच तू बहारत राहा...

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२

मोबाईलचे विश्व

मोबाईलचे विश्व

मोबाईलने सर्व जगच बदलून टाकल आहे अस नाही का वाटत आपल्याला? मला तरी वाटत बुआ. असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पूर्वीचे मोबाईल तरी बरे होते. फोन आला म्हणजे प्रत्येक मोबाईलवर एकच रिंग वाजायची. ट्रिंगग ग ग ग ग ग………अशी. मग मोबाईल क्रांती झाली. हि पण एक गम्मतच आहे बघा. हळू हळू जास् जसे जग प्रगती करत आहे तास तसे शब्दांचे अर्थ हि बदलत चालले आहे. पूर्वी क्रांती शब्द कानावर पडला की अंगातील रक्त सळसळायच. क्रांती म्हणजे एखादे युध्द डोळ्यासमोर उभ राहायचं. जसे १८५७ ची क्रांती. मध्यंतरीच्या काळात क्रांतीचा अर्थ थोडा सौम्य झाला. जसे एखाद्या सरकारी धोरणाला विरोध करायचा मोर्चा काढायचा म्हणजे क्रांती झाली असे वाटायला लागायचे. आणि आता त्याचा अर्थ पुर्णच बदलून गेलाय. प्रथम टी.व्ही. च्या क्षेत्रात क्रांती झाली. मग संगणक क्रांती झाली. मग मोबाईल आले. हळू हळू मोबाईल क्षेत्रात क्रांती झाली. असो. विषय जरा भरकटलाय. क्षमा असावी.

तर आपण मोबाईलच्या क्रांती बद्दल बोलत होतो. तो पूर्वीचा ट्रिंगग ग ग ग ग ग…….चा आवाज झपाट्याने मागे पडला आणि ट्यून सुरु झाल्या आणि मग नवी क्रांती झाली आणि फिल्मी गाणे वाजायला लागले. जो पर्यंत ट्रिंगग ग ग ग ग ग……. होत तो पर्यंत काही वाटत नव्हत. पण जेव्हा ट्यून व गाणे वाजायला लागले तेव्हा मात्र गम्मत व्हायला सुरुवात झाली.

ती कशी असे विचारताय? ऐका तर मग.

एकदा एक मनुष्य एका मयतीत गेला होता. स्मशानात अंतिम क्रिया कर्म सुरु होते. तितक्यात ‘ व्हाय दिस कोलावरी दी’ ह्या गाण्याचे सूर ऐकू आले. एका मोबाईलची रिंग टोन होती ती. सर्वी मंडळी त्या आवाजाकडे बघू लागली. दु:खाचे वातावरण अचानक बदलले. पण ती जागा आनंदाची नव्हती म्हणून सर्व गप्प राहिले. कोणी तरी म्हणाल ‘अरे आपण कोठे आलो आहोत याचे तरी भान ठेवत चला जरा.’

झाल आता दुसऱ्याने विषय पुढे रेटून न्यायचे ठरवले आणि म्हणाला,’अहो बिचारा इतक्या दुखात होता की मोबाईल स्वीच ऑफ करायचा विसरला.’

तिसरा कोठे थांबणार होता. तो म्हणाला, ‘ते ठीक आहे हो, पण कमीत कमीत साईलेंट मोड वर तरी ठेवावा मोबाईल.’

चौथा इसम मोबाईल वरील रिंग वाजली होती तो होता. तो मनात म्हणाला , अरे बाप रे. ही चर्चा आपण कोठे आहोत याचे भान न ठेवता पुढे सुरुच आहे. शेवटी त्याने पुढाकार घेतला आणि म्हणाला, ‘ मी सर्वांची माफी मागतो आणि या पुढे माझ्या मोबाईलवर फक्त ट्रिंगग ग ग ग ग ग……. हीच रिंग टोन राहील याची काळजी घेईल. कृपा करून चर्चा थांबवा.’ तेव्हा सर्व गप्पा बसले. तर मंडळी असे आहे हे आधुनिक मोबाईलचे जग.....



गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

लहान मुले

लहान मुले किती निरागस असतात
त्याचा एक अनुभव :

४ वर्षाचा मुलगा (जय).. एकदा सुट्टी मध्ये तो त्याच्या आजी आजोबांकडे राहायला गेला होता.. त्या दिवशी शिवजयंती होती.. ठीक ठिकाणी मंडप बांधून शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केले होते... महाराजांचे पोवाडे सुरु होते... चांगली वातावरण निर्मिती झाली असल्यामुळे माझ्या आई ने जय ला शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या.. (तेवढाच त्याच्या मस्तीखोर स्वभावाला control करण्याचा प्रयत्न ..:) जय ने सुद्धा मन लावून गोष्टी ऐकल्या. मग प्रश्न-उत्तर सेशन सुरु झाले..

जय : आजी शिवाजी महाराज खूप चांगले होते ना?
आजी : होय जय.. खूप चांगले होते.
जय : आज त्यांचा 'Happy Birthday' ना?
आजी : होय .
जय : आता ते कुठे आहेत?
आजी : स्वर्गात देव बाप्पा कडे गेले.
जय : ते देव बाप्पा कडे का गेले?
आजी : (थोडा अवघड प्रश्न.. पण आज काल ची मुले खूप हुशार असतात असा विचार करून..) अरे, खूप मोठे झाले ना कि माणूस मरण पावतो आणि मग देव बाप्पा त्याला स्वर्गात आपल्या कडे बोलावून घेतो.
जय : ( थोडा वेळ विचार करून) आजी तू पण खूप मोठी आहेस ना.. मग तू पण आता काही दिवसांनी मरशील... ?
आजी : (काय बोलावे हे न कळून ) ..............................
जय : मेल्यावर तू खूप खुश होशील नाही?
आजी : (प्रश्नार्थी चेहरा) खुश का बरे????
जय : अग, मेल्यावर तू पण स्वर्गात जशील ना आणि तिथ तुला शिवाजी महाराज भेटतील.. मग त्यांना भेटून तू खूप खुश होशील ना......

या उत्तरानंतर आजीला कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करता आली नाही हे सांगायला नको.