Breking News

शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

मनातले कोणीतरी ओळखावे

न बोलता मनातले कोणीतरी ओळखावे,
 न सांगताही कोणीतरी प्रेम करावे.
 मनाला हवे तेच का सांगावे,
 न सांगताही कधीतरी प्रेम करावे.
 मनातल्या भावानांसोबत भरभरून जगावे,
 न सांगताही कधीतरी प्रेम करावे. प्रेम आपल्याही वाट्याला यावे,
 न सांगताही कोणीतरी प्रेम करावे. नेहमीच बह्यसौंदर्य का पाहावे,
 कधीतरी अंतरर्गातही झाकावे,
 न सांगताही केव्हातरी प्रेम करावे. नेहमी राग रुसवा आणि का भांडावे,
 न सांगताही कोणीतरी प्रेम करावे. तिने त्याला अन् त्याने तिला सहज ओळखावे,
 न सांगताही कोणीतरी प्रेम करावे. सांगता न येण्याएवढे कठीण का करावे,
 न सांगता बोलून सांगण्यायेवढे सोपे करावे. इतरांपेक्षा थोडे वेगळे,
न सांगताही प्रेम करावे. आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे.


गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

प्रेम भावना

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का?
 माझ्या मनाच्या कोपऱ्यात नयनांच्या माझ्या पापण्यात थोडा वेळ विसावशील का ?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
 तुझ्या एका नजरे साठी असतो सदा तुजपाठी मज भरकटलेल्या जीवन मार्गावर आणशील का?
 माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
 एकच ध्येय माझ्या जगण्याचे तुला माझी झालेली बघण्याचे करण्या मज इच्छापूर्ती तू पुढे येशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
 तुझ्यात असतो मी गंभीर करतेस मज तू अधीर शेवटचे मागणे ..
हाती हात देशील का? माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

गुरुवार, २२ जानेवारी, २०१५

वेड




तुझ्या बदमाश ओठांना थांबवू कशी ?
 रोखून पाहणाऱ्या नजरेला रोखू कशी ?
 एकाच नजरेत जीवघेणे वेड लावतोस मग माझ्या बहकणाऱ्या मनाला आवरू कशी?

वाण्याविहीर येथे दुर्मीळ कासव

तालुक्यातील वाण्याविहीर येथे शेतात दुर्मीळ कासव आढळून आल्याने पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत
आहे. पाठीवर नक्षत्राच्या आकाराचे नैसर्गिक आकृत्या असलेले हे कासव दुर्मीळ प्रजातीचे असल्याची माहिती जाणकारांकडून मिळाली आहे. कन्हैयालाल शिवदयाल परदेशी या शेतकर्‍याच्या शेतमळ्यात राहणार्‍या रमेश रामदास तडवी यांच्या घराच्या ओट्यावर हे कासव येऊन थांबल्याचे आढळून आले. कासवाच्या पाठीवर दुरून पाहिले असता नक्षत्राच्या आकाराच्या आकृत्या दिसतात. सोनेरी रंगाच्या पाठीवर 'सप्तर्षी' या नक्षत्राप्रमाणे चांदण्यांचे नक्षीकाम करून निसर्गाने या कासवाला वेगळीच ओळख दिली आहे. मात्र जवळ गेले असता एक एक आकृतीचा आकार हा कोळी या किटकासारखा दिसतो. सुमारे तीन किलो वजनाचे हे कासव पाहण्यासाठी अक्कलकुवा परिसरातील नागरिकांची गर्दी उसळली आहे. हे कासव परिसरात उत्सुकतेचा विषय बनले आहे.
■ वाण्याविहीर येथे मिळून आलेले कासव हे 'एशियन स्टार टॉरटॉईज' या प्रकारातील आहे. ही कासवे आठ इंचापेक्षा मोठी असतात. 'समोबेट्स' (Psammobates) प्रजातीच्या या कासवाच्या पाठीवर विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आकृत्या निसर्गत:च असतात. भारत, म्यानमार आणि श्रीलंका या तीन देशातील समुद्र किनारे आणि विविध जलस्रोतांमध्ये हे दुर्मीळ जीव आढळून येतात. साधारणत: १00 वर्षांच्या कालावधीनंतर या प्रकारातील कासव जन्माला येण्याची प्रक्रिया घडत असल्याची माहिती आहे. भारतात आढळणार्‍या 'समोबेट्स' कासवाच्या प्रजाती ह्या प्रामुख्याने वर्षा ऋतूवर जगत असल्याचे 'अमेरिक न वाईल्डलाईफ र्जनल' यात नमूद केले आहे.
वाण्याविहीर येथे आढळून आलेल्या कासवाच्या प्रामुख्याने तीन प्रजाती असल्याची माहिती समजते. हे कासव दुर्मीळ असून भारतात ते साधारणत: दक्षिणेकडील राज्यात सापडते. ज्या शेतकर्‍याला हे कासव सापडले ते कुठून आले याचा शोध घेतला पाहिजे. सातपुड्यात अशी कासवे असल्याचे अजूनतरी माहिती नाही. पण खरोखरच ते त्या भागात सापडले असेल तर तेथे केवळ एकच कासव नसेल. अनेक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेही संशोधन झाले पाहिजे. -प्रा.अशोक वाघ

सोमवार, १९ जानेवारी, २०१५

डॉ.शशिकांत वाणीना लाखमालेाच्या शुभेच्छा

सातपुड्याच्या राजकारणातील तळपता सूर्य डॉ.शशिकांत वाणी
 भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख दादासाहेब डॉ. शशिकांत वाणी यांचा आज वाढदिवस. तळोदा तालुक्यातील प्रतापूर या छोट्याशा गावातून राजकारणात पुढे आलेले डॉ. शशिकांत वाणी यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात झोकून घेतले. स्वयंसेवक म्हणून काम करताना सातपुड्यातील दर्‍याखोर्‍यातील माणसाला संघ विचाराशी जोडण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख दादासाहेब डॉ. शशिकांत वाणी यांचा आज वाढदिवस. तळोदा तालुक्यातील प्रतापूर या छोट्याशा गावातून राजकारणात पुढे आलेले डॉ. शशिकांत वाणी यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात झोकून घेतले. स्वयंसेवक म्हणून काम करताना सातपुड्यातील दर्‍याखोर्‍यातील माणसाला संघ विचाराशी जोडण्याचा प्रयत्न केला. 1982 मध्ये भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर पक्षातील त्यांची यशस्वी वाटचाल आजपर्यंत थांबलेली नाही.
तळोदा तालुकाध्यक्ष, भाजयुमोचे सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून दादांची संघटनात्मक भरारी सुरू राहीली. पक्षात काम करीत असताना सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा-अपेक्षांकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. सातपुड्यातील माणसाच्या गरजा काय आहेत, याचा अभ्यास केला.कै. दिलवरसिंग पाडवी पतसंस्थेची उभारणी केली. कै.दिलवरसिंगदादा पाडवी ग्राहक भांडार सुरू केले. तळोदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम करताना शेतकर्‍यांचे प्रश्न समजून घेतले. सातपुड्यातील गोरगरीब जनता शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी दादासाहेबांनी श्री साईनाथ शिक्षण संस्थेची उभारणी केली. संस्थेच्या माध्यमातून अनंतदिप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कोठार, ता. तळोदा, विद्यावर्धिनी निवासी माध्यमिक शाळा,जांभीपाणी ता. अक्कलकुवा तसेच भुषण आदिवासी 100 मुलांचे केंद्रीय वस्तीगृह सुरू केले. अयोध्या येथील रामजन्मभूमि आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी झाले त्यावेळी त्यांना उत्तरप्रदेशातील ङ्गैजाबादमध्ये 15 दिवसांचा तुरूंगवास झाला. सहा डिसेंबरच्या अयोध्या आंदोलनात सहभाग घेतला. राजकारणात असले तरी दादांनी समाजसेवेला अधिक प्राधान्य दिले. सातपुड्यातील माणसाला प्रेम दिले.
दु:खीतांचे अश्रु पुसले. हाच वसा पुढेही कायम ठेवला आहे.सतत नवनवीन प्रयोग करीत राहणे, आपल्या सहकार्यांना, शिक्षकांना प्रोत्साहन देत राहणे, यावर दादांचा भर असतो. प्रचंड जनसंपर्क, अतिशय समजूतदारपणा, कनवाळू मन, कोणतेही काम स्वत: लक्ष घालून करून घेणे, अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य तो मार्ग शोधणे आणि तेवढीच कडक शिस्त राबविणे हा दादांचा स्वभाव आहे. दादांच्या रूपाने आम्हाला लाभलेला हा वटवृक्ष अनेकांच्या दु:खावर मायेची ङ्गुंकर घालत आहे. सावली देण्याचे काम करीत आहे. त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुनिता वाणी या नगरसेविका असून वॉर्डातील समस्या सोडवित आहेत.सुपूत्र अभिषेक आणि आदित्य हे वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सुसंस्काराच्या वाटेवर वाटचाल करीत आहेत. आज डॉ.शशिकांत वाणीचा वाढदिवस. जनसामान्यांच्या या आमच्या लाडक्या व्यक्तीमत्वाला आमच्या लाखमालेाच्या शुभेच्छा.........


मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद
सन्मानीय व्यासपीठ आदरणीय गुरूजन व येथे जमलेल्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आज मी स्वामी विवेकानंदबद्दल जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचीतेने ऐकावे अशी मी नम्र विनंती करतो.
 इ.स. 1893 मधे अमेंरिकेत शिकागो येथे भरलेल्या, जागतीक सर्व धर्म परिषदमधे माझ्या प्रिय बंधु आणि बघिनीनो असे उदगार काढून विश्व बन्धुत्वाचे नाते प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद कोणाला बरे परिचित नाही. आपण त्याना स्वामी विवेकानंद ह्या नावाने ओळखत असलो तरी त्यांचे मूळ नाव नरेंद्र असे होते १२ जानेवारी १८६३ ह्या दिवशी त्यांचा जन्म झाला.त्यांचा वडिलांचे नाव विश्वनाथ बाबु व आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते, त्याचा स्वभाव उदार व दुःखीन विषयी कणव असणारा होता. आई भुवनेश्वरी देवी बुद्धिमान व वृतीने धार्मिक होत्या. अश्या मात पिताने नरेन्द्रांवर उत्तम संस्कार करुण त्यांचा वृत्ती घडविल्या. लहानपणी बाल नरेंद्र फार खोड़कर होते. त्याना विविध खेळाची आवड होती. त्यांचा वडिलांनी त्यांना थोर समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांच्या शाळेत घातले. तेथेही नरेन्द्रांवर उत्तम संस्कार घडले. १ में १८९७ रोजी त्यानी रामकृष्ण परिवाराची बैठक बोलावून जनतेच्या उद्घारासाठी सेवासेना उभारण्याचे आपले स्वप्न बोलून दाखवले, हां विचार सर्वांमधे पटला. व रामकृष्ण परमहंस मिशनची स्थापना झाली. निरनिराळया धर्माच्या अनुयामधे बंधुभाव उत्पन्न व्हावा ह्यासाठी रामकृष्ण परमहंसानी केलेल्या कार्याची धुरा ह्या मिशनने खांद्यावर
 घेतली अवघे ३९ वर्षाचे आयुष्य स्वामी स्वामी विवेकानंदाना लाभले. पण ह्या अल्पावधित त्यानी युगानुयुगाचे प्रचड कार्य केले. त्यानी पाश्चिमात्य देशात बहुतीक वादाचा भारतीय अध्यात्म वादाशी समन्वय साधन्याचा पर्यत्न केला. भारताच्या थोर संस्कृतिच्या व उदात्व मानवतावादी तत्वज्ञानाचा जगाला परिचय करुण देण्याचे महान कार्य करुण स्वामी विवेकानंदानी भारताच्या भावी पिढ्यांसाठी एक थोर आदर्श व वारसा ठेवला आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द् संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र.......

सोमवार, १२ जानेवारी, २०१५

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद 
आजच्या कंप्यूटर युगात मोबाइलमैन बनून गेलेल्या तरुण मिलो दूर संवाद साधतो, पण त्याला स्वतःच्या परिवारात सुसंवाद साधन्याच्या वेळ नाही. आजची युवा पिढी इतरांच्या तालावर नाचने पसंत करते. पण नाचत नाचत स्वताचीच ताल विसरत आहे. ह्या ताल विसरलेल्या बेताल सुरालातर म्हणावेच लागेल ``हात में कंगन कान में बाली मुह में लाली और सर है बिलकुल खाली" ह्या खाली मार्गाला जीवनाची खरी वाट नरेंद्रने दाखवली म्हणजेच स्वामी विवेकानंद दाखवली, तर आजच्या माझ्या विषय आहे स्वामी विवेकानंदजीचे विचार व आजची युवा पीढ़ी आता यांच्यात म्हणायचे झाले तर युवा पिढीत मी पण मोड़तो. आता म्हणाल तर युवा पिढ़ी काय? मग मी काय माहितच आहे हो पण स्वामीजींचे विचार व् आपले विचार ह्यांच्याशी सुसंगत घालण्यासाठी आपल्याला स्वामीजींचे विचार माहीत असणे आवश्यक आहे. मग युवांच्या बाबतीत म्हटले म्हणजे आली जयंती लावा फ़ोटो, घाला माळ मग बघताच हे पुढच्या वर्षी तरी पण वक्तुत्वाच्या हिशोबाने जे काही स्वामीजींचे दोन चार विचार पाठ करुण आलो आहे, ते तुम्ही शांत पणे ऐकावे अशी मी आपणास नम्र विनंती करतो. स्वामीजींच्या विचारांच्या बाबतीत पहिले म्हणावे लागेल की स्वामींसारखा हिरा जगी जन्मला नाही दुसरा त्यांचे गुन गान म्हणु किती वाणीत पडेल शब्द माझा अडून त्यांचा पहिला विचार मी मांडेल तो म्हणजे शिक्षणाबाबतीत
शिक्षण म्हणजे नौसर्गिक विकास होय. तर आजची युवा पीढ़ी ह्याच्याशी बिलकुल सहमत आहे. त्यांचा दुसरा विचार म्हणजे ते नास्तिक होते त्यांना देव कुठे आहे, हे कळतच नव्हते त्याना प्रश्न पड़े आजची युवा पिढी ह्याच्याशी अतिशय सहमत आहे. ते म्हणजे परमेश्वरावर विश्वास नाही पण त्यांच्या बाबतीत प्रदर्शन भलतेच् फावते ते असे की स्टेजवर जाययचे व म्हणायचे `हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे', हे तर आपणास माहितच आहे की ते नास्तिक होते पण त्याना जेव्हा राम कृष्ण परमहंस भेटले व् त्यानी सांगितले की भगवंत तुझ्या हृदयात आहे आणि आजची युवा पिढीच्या आणि आजच्या युवा मुला मुलींच्या हृद्यात् आधीच इतके विचार असतात की त्यात परमेश्वराची जागाच् कसली. स्वामीजीना शिकागो येथील धर्म परिषदेत त्यांना बंधू आणि बघीनिनो
हे वाक्य उचारुण समाजात विश्व बंधुत्व निर्माण करण्याचा पर्यत्न केला व आजची युवा पिढी जेव्हा समाज कार्यासाठी कधीतरी व्यासपिठावर जाते, तेव्हा तरुणांचे पहिलेच वाक्य असते मित्र आणि मैत्रीनिनो हयात किती विसंगतता आहे. आपले विचार सुसंगत तर आहेत. पण तेवढेच विसंगत ही जाणवते. त्यांनी सांगितले तुम्ही स्वालंबी व्हा, आपण परावलंबी आहोत. त्यानी सांगितले तुम्ही स्वाभिमानी बना मात्र आपण एक दोन गुणांमुळे पहाडायेवढा अभिमान बाळगतो. सगळे येतात व्यासपीठावर स्वामीनबद्दल म्हणतात त्यानी हे कार्य केले त्यानी ते सूत्र मांडली त्यानी सगळे केले पण मी म्हणतो ते आजच्या युवा पिढीने किती आत्मसात केले? त्यांच्या जीवनातील इतिहासाची पाने धाड़ धाड़ उतरवुंन लावण्यापेक्षा त्यांच्या प्रत्येक विचारावर विचार करुण त्यास आपल्या दैनंदिन जीवनात आणले पाहिजेत. हे मी माझ्या वकृत्त्वातुन सर्वाना सांगू इच्छीतो स्वामींच्या बाबतीत मी म्हणेल की मुक्या मनातून किती उधडावे शब्दांचे बुडबुड़े तुझे पवाडे गातील पुढती तोफाचे चवघड़े... जय हिंद जय महाराष्ट्र...

शनिवार, ३ जानेवारी, २०१५

आहिरानी भाषण सावित्रीबाई फुले.

सावित्रीबाई फुले
सन्मानीय व्यासपीठ व व्यासपीठावर विराजमानसर्व गुरुजन वर्ग आणि आठ सगळा उपस्थित मना भाऊ आणि बहिनी आज सावित्रीबाईनी जयंती शिक्षणनी देवी सावित्रीबाई फुले हाई मायना जन्म 3 जानेवारी 1831 ले सातारा जिल्हांम्हना न्यायगाव ह्या खेड़ामा व्हयना. सावित्रीबाईना बापन नाव खांडोजी पाटील तर मायन नाव लक्ष्मीबाई अस व्हत. सावित्रीबाईना माय बाप दोन्ही अडानी व्हतात.1840 साल म्हा सावित्रीबाईन ज्योतिराव फुले ह्यासना जोडे लगीन व्हयन.लगीनना वेळेस सावित्रीबाई 9 वर्षणी व्हती. सावित्रीबाईना माय बापकड़े जशी वागणूक व्हती तसच ज्योतीरावना मायबापकड़े व्हती. सावित्रीबाई कामसु,हुशार व बुद्धिमान व्हती. ज्योतीरावले शिकाडानी गोड़ी व्हती. सावित्रीबाईले पण ज्योतीरावन देखिसन शिकानी इच्छा व्हयनी म्हणुन ज्योतीराव स्वतः शिकाळेत सावित्रीबाईन लगीन व्हानंतर ती शिकनी. तवय इंग्रज सरकारंन राज्य व्हत. तवय भहलताच वईट रूढ़ी परंपरा समाज म्हा व्हतात. कोत्याच् जातना बाईसले नही शिकाळेत. त्यासले घरना बाहेर जावु देत नहीत. शिकाळ म्हणजे धर्म बुडीन, ज़ातले कलंक लागीन अस समज व्हती. तरीपंन सावित्रीबाईनी बठास्ना वाईटपना लीन त्या 4थी पास झायात. आणि भारतमा पहिली मास्तरिन बनाना मान पटकावा. 1 जानेवारी 18 शे 1948 ले पुना शहरमा 1 ली शाळा काढ़ी. त्या शाळामा बाई स्वतःच मास्तरिन बनिसन शिकाळाले जाये. तवय जास्त साडी संगे लईसन जाये. पहिला दिन शिकाळाले गई ते डोक फुटन, लोकेसनी दगड मारी फेकात, रूढ़ी वाला लोकेसले ते चाले नही. त्या इत्ररसले हलका समजेत शेन माती दगडे मुले सावित्रीबाईनी साडी खराब व्हई जाये. शाळामा जावा नंतर बाईले साडी बदलनी पड़े....जख्मी व्हय रक्त पड़े पण बाई काई घाबरनी नाई आणि मांगेबी सरकनी नहीं,बांईनी पोरीसले सिकाडनं चालूच ठेव. ह्या दोन्हीसन कार्य इतल महान व्हत की वीचारु नका जे काम ज्योतिराव करे तेच काम सावित्रीबाई करे पतिवर बाईंनी पुरी निष्ठा होती,1876 सालमा भारत माँ दुष्काळ पड़ना तवय अन्नना करता लोक भूका मरेत तवय सावित्रीबाइनी गोर गरीबसले अन्नछत्र उघाड़ व स्वतः भाकरी करिसन त्यासना आत्मा शांत करे. इतल महान कार्य काय त त्याले आज कोठेच तोड़ नही. सावित्रीबाईले लेकरु बाळ वह्यन नही.म्हणून तिने विधवा बाइना पोऱ्याले दत्तक लिनह. आणि त्याले माया ममता दिनी. विधवा बाइसले तवय लगींन करानी मनाई व्हती आइ पद्धत सावित्रीबाईनी बंद करी. त्याकाळमा बालहत्या मोठा प्रमाणमा व्हय बाईनी बालहत्या बंद करी. सुधारगृह काढ त्यामा लोकना पोरे स्वतः समायात. त्यासले माया ममता दिनी. अशी सावित्रीबाई शेकडो पोरेसनी माय बननी. सावित्रीबाई एकदम साधी राहे. सावित्रीबाई ज्योतिराववर प्रेम व्हत ज्योतिरावले लखवा वह्यना तवय सावित्रीबाईनी खुप सेवा करी. 28 नो ज्योतिरावनी जगना निरोप लीना. तरीभी सावित्रीबाई घाबरनी नही. ज्योतिरावले अग्नीदाग देवाना टाइमले खांदा लावाना ठिकाने वाद घाला पण सावित्रीबाई पक्की होती. तिन्ही भाऊ बंदकीसले सुनाई दीन टीटव मी धरसु आणि सत्यशोधक खांदया देतील. ज्योतिरावना मरा नंतरभी सावित्रीबाई आपन कार्य सुरूच ठेव. 1897 सालमा प्लेगनी लागन वह्यनी हजारो लोक तवय मरणात लोकेसना जिव वाचाळा करता डॉ. यशवंतले मोफत इलाज कराले सांग. इलाज करिसन चांगल कर असाच एक प्लेग व्हइल पोऱ्याले खांद्यावर धरिसन लई जाये. त्यामाच सावित्रीबाईले प्लेग वह्यना अशी अनाथासनी माय 10 मार्च 1897 सालमा कार्य करता करता अमर व्हईगई.स्वतःना जिवनी भी परवा करी नही. कोणताभी चांगला कामले त्या पाठिंबा देत स्वतः कार्य करिसन त्या महान वह्यनात त्यासनी समाज माँ सुधारना करयात कधी जातिभेद पाळा नहीं. अशी शेकडो अनाथासनी माता कार्याना जोरमा अजरामर शी म्हणून अनाथासनी माय सावित्रीबाई फुले हाइ मायले मना कोटी कोटी प्रणाम...... जय ज्योती जय क्रांती, जय हिंद जय खान्देश