Breking News

मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

दुर्मिळ शँमेलिऑन

सातपुड्याच्या पर्वतरांगेत आजही आढळतो दुर्मिळ शँमेलिऑन
 दुर्मिळ असलेल्या शँमेलिऑन प्रजातीचा सरडा सातपुड्यात ठिक ठिकाणी आढळून आला आहे. निसर्गातील हां वैशिष्टपुर्ण सरडा सातपुड्यात लुत्पप्राय होत आहे.. सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यासह रांगांमधे औषधी वनस्पतीसह वन्यप्राणी व विविध प्रजातीचे पक्षुपक्षी आजही काही प्रमाणात आढळून येतात. त्यातीलच दुर्मिळ शँमेलिऑन सरडा तळोदा तालुक्यातील पायथ्याशी असलेल्या गाव परिसरात आढळून येत आहे. शँमेलिऑन हां एक वैशिष्टयपूर्ण रंग बदलणारा सरडा आहे. त्याच्या जगात 180 जाती आढळतात. या सरड़याचे वैशिष्ट्ये भक्ष्य पकडण्यासाठी लांबवर जाऊन भक्ष्य पकड़णारी जीभ व शरीराच्या दुपट्टीपेक्षा लांब असणारी शेपुट होय. १५ मि.मी. ते ६८.५ मि.मी. आकार असतो. दोन्ही डोळे स्वतंत्रपणे बघु शकतात. हे सरडे भारत,श्रीलंका, आफ्रिका,दक्षिण युरोप व दक्षिण आशियात आढळून येत असल्याची माहिती पक्षमित्राणी प्रा. अशोक वाघ ह्यांनी दिली आहे. रंग बदलण्याचे कारण एक तर स्वतःला लपविण्यासाठी तसेच वातावरणातील तापमानानुसारही रंग बदलण्याची प्रतिक्रिया होते. दुसऱ्याना घाबरविण्यासाठी व जेव्हा रागवतात तेव्हा भड़क रंग धारण करतात. यातील एका प्रजातीचा शँमेलिऑन हां पक्षी व सापांपासुन सरक्षणासाठी रंग बदलतो तर वाळवंटातील दुसऱ्या एका प्रजातिचा शँमेलिऑन सकाळी काळा, दुपारी, राखोड़ी, तर सायंकाळी वेगळाच रंग धारण करतो. हां सरडा ३६० अंशातुन पाहू शकतो, जगात बहुदा शँमेलिऑन असा हां एकमेव प्राणी असावा,हां सरडा आळ्या फुलपाखरे किटक गोगलगाय नाकतोडा पाने,माश्या खातात. प्रचंड जंगलतोड़ मानवी हस्तक्षेप व प्रदूषणामुळे निसर्गातील हां वैशिष्टपूर्ण सरडा लुत्प होत आहे....










मंगळवार, २३ डिसेंबर, २०१४

सातपुड्यात आढळले दुर्मिळ पक्षी....

सातपुड्याच्या पायथ्याशी आढळले गिधाड,गरुड़,करकोचा अन पानकावळा 
सातपुड्याच्या कुशीत अनेक वनौषधीच्या खजिना आजही आढळून येतो. निसर्गाशी समतोल राखत विविध वनौषधीसह दुर्मिळ पक्षी आजही सातपुड्यात वास्तव्य करुण आहेत. राणीपुर, तुलाजापुर, पाडळपुर व रोझवा आदी धरण व पानथळ ठिकाणी गिधाड़, गरुड़,करकोचा, पानकावळा,पानबदकासह विविध रंगी बेरंगी दुर्मिळ पक्षी सातपुड्यात आपल्या मधुर आवाजात निछंद आकाशात घिरटी घेतानाचे मनमोहक दृष्य नजरेचे पारणे फेडणारे ठरत आहे... निसर्ग साखळीतील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून असतो. यातील एखादा घटक कमी झाल्यास त्याचा संपूर्ण अन्नसाखळीवर
परिणाम होतो. त्यामुळे निसर्गाचा महत्त्वाचा घटक असलेले पक्षी नष्ट झाले तर.... ही कल्पनाच मानवजातीला चिंता व्यक्त करायला लावणारी ठरू शकते...केवळ दिसायला आकर्षक आणि मधुर शीळ घालणे एवढेच पक्ष्यांचे महत्त्व नसून, यातील गिधाड, गरुड, घारी, कावळे यांसह काही पाणपक्षी निसर्गाचे सफाई कामगार आहेत. तर घुबडासारखे काही पक्षी उंदीर, घुशी, कीटक यांसारख्या उपद्रवी प्राण्यांवर नियंत्रण ठेवतात. फुलझाडे, फळझाडांच्या संवर्धनातही त्यांची महत्त्वाची भूमिका दिसुन येते.आज सर्वत्र पक्षी कमी होत
असल्याची चिंता पर्यावरण प्रेमी व पक्षी तज्ञाना भेडसावत आहे मात्र सातपुड्याचा पायथ्याशी अद्यापही दुर्मिळ पक्षी आढळून येतात.दि- 21-डिसेंबर रोजी जगविख्यात दिवंगत पक्षीमित्र डॉ.सलीमअली ह्यांच्या जयंती निमित्त बॉम्बे नेचुरल हिस्टोरी सोसायटीच्या आदेशाने आशियाई पालपक्षी गणना कार्यक्रमांतर्गत तळोदा वनविभागामार्फत पक्षांची गणना कार्यक्रम हाती घेण्यात आला. पहाटेच्यावेळी तळोदा तालुक्यातील धरण व पानथड़ जागी पक्षीमित्र प्रा. अशोक वाघ, तलोदा वनक्षेत्रपाल अशोक पाटील वनरक्षक सदस्यासह पत्रकार कालीचरण सूर्यवंशी, सुधाकर मराठे आदिनी पाहणी केली
सातपुड्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन नसतानाही अद्यापही दुर्मिळ प्राणी व नष्टप्राय पक्ष्यांचे अस्तित्व् आढळून आले. त्यात प्रामुख्याने तालुक्यातील सातपुड्यांचा पायथ्याशी असणाऱ्या पाडळपुर या धरणाच्या पानथड़ जागेत गिधाड,गरुड़, करकोचा,पानकावळा खाऱ्याधोबी असे दुर्मिळ पक्षी आढळून आलेत. त्याचसोबत तुलाजापाड़ा परिसरात जंगलीबदक,पांणकोंबळा, टिट्वी, कारू,नीलकंठ,खिवडा, बगळा,घोड़पाल,मोहरी, तीतरी, सोमावल अमोणी धरण परिसरात सफ़ेद बगड़ा, पाकोळया,पाणकोंबड्या, रखंडया, किंगफ़िशर,  सिताफली बंधारा
परिसरात कोकिळा, कावळा, बदक, घार तर रोझवा डैम परिसरात वनचक्, पानबदक, पाडळपुरगावा नजिक असलेला राणीपुर पाझर तलाव परिसरात गरुड़,गिधाड, खाऱ्या धोबी, कारकोचा,जंगली कावळा,रवात्यासह विविध रंगछटा असलेले पक्षी आढळून आले. ह्या अगोदर सोजरीबार, गोऱ्यामाळ, ह्या दरया खोऱ्यात गिधाडचे अस्तित्व दिसुन आले आहे. मात्र गिधाड आता पाडळपुर भागात सुद्धा दृष्टिस पडल्याने या अतिदुर्मिळ पक्षाचे सातपुड्यातील अस्तित्वाला पुन्हा एकदा दुजोरा मिळाला आहे. तसेच ``गरुड़'' हां सुद्धा सहजा सहजी दृष्टिस् पड़त नसतो. मात्र योगायोगाने या पाडळपुर ह्या धरणात मृत पडलेला ``तरस''
 प्राणी खाण्यासाठी गिधाड व गरुड़ आले असताना क्षणाचाही विलंब न करता वनरक्षक कु.भावना जाधव यांनी त्यास आपल्या कॅमेरात कैद केले. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या निकषानुसार गिधाडाच्या चार जाती, फॉरेस्ट ऑउलेट, माळढोक, बेंगल फ्लोरिकन अश्या आहेत. ह्यापैकी एका जातीचे अस्तित्व मागील काही वर्षात वड़फडी परिसरात आढळून आल्याचे पक्षीमित्र प्रा.अशोक वाघ ह्यांनी सांगितले... सदर पक्षी परीक्षण बॉम्बे नेचुरल हिस्ट्री सोसायटी ह्यांच्या विनंतीने करण्यात आले. सदर पक्षी परीक्षण डॉ.श्रीवास्तव,उपवंसरक्षकआणि शास्त्री ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा वनक्षेत्रपाल अशोक पाटील, पक्षी मित्र प्रा.अशोक वाघ, राजविहिरचे वनपाल एस.आर.देसले, अमोणीचे वनरक्षक एस.एच.साळवे, खर्डीचे वनरक्षक एस.एल.वाघ, कोठारचे वनरक्षक आर.जे.शिरसाठ, रानीपुरचे वनरक्षक बी.एस.जाधव, राणीपुरचे वनपाल आर.बी.चांदणे वाहनचालक गुरव व पत्रकार बांधव यांनी केली.....









गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

गेम्समध्ये होते 'बेटिंग' :

गेम्समध्ये होते 'बेटिंग'  :
मोबाईल हा खर्‍या अर्थाने गरज असला
तरी त्याचा सदुपयोग होण्याबरोबरच दुरुपयोग होण्याचे प्रस्थ वाढले आहे. अँन्डरॉईड मोबाईलमध्ये इंटरनेटद्वारे डाऊनलोड केल्या जाणार्‍या अश्लील चित्रफितीपासून आता ऑनलाईन जुगार म्हणजे तीन पत्तीचा डाव रंगत असल्याचे दिसून येते. हीच बाब संवेदनशील पालकांना चिंतेत टाकणारी असून गाव- शहरातील तरुण मोठय़ा प्रमाणात 'मोबाईल कॅसिनो'कडे आकर्षित झाले आहेत. परिणामी पालकांनी मोठय़ा प्रेमाने लाडक्याला दिलेला मोबाईल त्याला जुगारी बनवित असल्याचे दुर्दैवी चित्र दिसू लागले आहे. बाजारात अद्ययावत तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेले मोबाईलमध्ये विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ऑनलाईनद्वारे मोबाईलमधून तीन पानी जुगार चांगलाच रंगलेला असतो. विशेषत: या जुगाराच्या जाळ्यात युवक मोठय़ प्रमाणात सापडत आहे. अँन्डरॉईड मोबाईलमध्ये प्लेस्टोअर अँप्लिकेशनद्वारे तीन पानी जुगार खेळला जात असल्याचे आढळून येत आहे. मोबाईलचा वापर संवादासाठी न होता इतरच कामांसाठी मोठय़ा प्रमाणात होत आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत मोबाईल गरजेची वस्तू बनली असली तरी ज्या उद्देशाने मोबाईलचा वापर होणे आवश्यक आहे तो उद्देश बाजूला सारून या सुविधेचा गैरवापरच मोठय़ा प्रमाणात होताना दिसत आहे. पूर्वी तीन पानी जुगार
खेळण्यासाठी विविध ठिकाणच्या अड्ड्यांवर जावे लागत असे. हा जुगार पत्त्यांच्या सहाय्याने खेळला जात होता. आता तो ऑनलाईन मोबाईलद्वारे तीन पानी जुगार खेळला जात आहे. याद्वारे कोणतीही आर्थिक उलाढाल होत नसली तरी इंटरनेटच्या रिचार्जसाठी वारेमाप खर्च केला जात आहे. टाईमपास म्हणून खेळला जाणारा हा खेळ आता खराखुरा तीनपत्ती जुगार म्हणून खेळण्यास तरुणाई प्रवृत्त होऊ लागली आहे. त्यामुळे या जुगारासाठी पोलिसांच्या सायबर क्राईम सेलला सक्रीय होण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे. तीन पत्ती जुगारच जवळपास ९0 टक्के युर्जसच्या हाती दिसणार्‍या अँन्ड्राईड सिस्टीमच्या मोबाईलवर सर्वाधिक खेळला जाणारा खेळ म्हणजे तीन पत्ती हा जुगाराचा खेळ आहे. सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत अनेक डाव या गेमच्या माध्यमातून खेळले जात असल्याचे वास्तव आहे. फेसबुकसारख्या सोशल साईटवरून मित्रांना ऑनलाईन बोलावून मध्यरात्रीपर्यंत खेळल्या जाणार्‍या या खेळात मुलांपासून युवतीपर्यंत अनेक जण आघाडीवर
असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. अँन्ड्रॉईड फोनवर अनेक मंडळी या मोफत गेमचा आनंद लुटत आहेत, मात्र धक्कादायक बाब म्हणजे प्रायव्हेट टेबलच्या माध्यमातून आपसात ठरवून तीन पत्ती हा प्रचलित जुगार प्रकार आता मोबाईल इंटरनेटच्या हातोहाती खेळला जात आहे. अशा जुगारावर कायद्याचे नियंत्रण आणणे अशक्यप्राय असल्याने रात्रंदिवस ऑनलाईन तीन पत्ती खेळ खेळणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे वेळेच्या अपव्ययासोबतच यात पैसे लागत असल्याने महाविद्यालयीन जुगारी बनू लागले आहेत. पॉकेटमनीचा गैरफायदा मुलांना खर्चासाठी दिला जाणारा पॉकेटमनी हा चांगल्या कामासाठी खर्च होणे अपेक्षित असताना या तीन पानी जुगारासाठी मुले हजारो रुपये खर्च करीत आहेत. शहरांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक मुले बाहेर राहतात. दर महिन्याला त्यांच्या पालकांकडून खर्चमनी येत असतो. मात्र याचा वापर आता गैरमार्गात खर्च केला जातो. मुलांना महागडा मोबाईल खरेदी करून देताना पालक याकडे लक्ष पुरवित नसल्याने रिचार्ज, टॉपअप सोबत मुले पॉकीटमनी जुगारावर उडवित असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०१४

अस्तंबा ऋषीची यात्रा

सातपुडयातील उंच डोंगर....
 दोन्ही बाजुला असलेल्या हजारो फुट खोल दरी....
नागमोडी खडतर रस्ता..
अन शिखरावर असलेले अस्तंबा ऋषीचे विश्राम स्थान...
 अस्तंबा ऋषीच्या दर्शनाची ओढ़ घेवुन घोषणा करीत भाविक हजारो फुट शिखर सहज चढतात. दिपावली पर्वावरील धनत्रयोदशीला अस्तंबा ऋषीची यात्रा भरते. ह्या यात्रेला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील हजारो तरुण पदयातत्रेने अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी शिखराकड़े रवाना होतात. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेचे भाविकांना आकर्षण असते. म्हणुनच या यात्रेला येणा-या भाविकांची संख्या वर्षानवर्ष वाढत आहे. समुद्र सपाटीपासुन ४ हजार फुट उंच शिखरावर अस्तंबा ऋषीचे देवस्थान आहे. भाविकांची अपार श्रधा असल्याने हाती भगवा झेंडा घेत `अस्तंबा ऋषी महराज की जय ' चा जयघोष करीत भाविक पदयात्रेने हजेरी लावतात. दिवाळीच्या पर्वावर धनत्रयोदशीला यात्रोत्सवाला प्रांरभ होत असते. शापस्थ अवस्थेत जखमांनी विव्हळणारा अश्वस्थामा आपल्या जखमांसाठी सातपुडयाचा द-याखो-यात तेल मागतो. आजही शिखरावर जाणा-या यात्रेकरूंणा तो भेटतो व वेळप्रसंगी रस्ताहीन झालेल्या यात्रेकरूंना मार्गदर्शन
करतो, अशी अस्तंबा ऋषीचे दंतकथा आहे. अश्वस्थामा यांचा महाभारतात उल्लेख असला तरी त्यांचे स्थान भारतात कुठेही आढळत नाही. मात्र अश्वस्थामा ( अस्तंबा ) उल्लेख सातपुडयाच्या कुशिमधे उंच शिखरावर असल्याचे दिसुन येते. दिवाळीच्या पर्वाला अस्तंबा ऋषीच्या यात्रेला प्रारंभ होतो. तळोदा येथुन एक दिवस अगोदरच कॉल्लेज रोडपासुन वाजत-गाजत मिरवणुकीने मंदिराचे दर्शन घेवुन यात्रेकरू अस्तंबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात. कोठार, देवनदी, असली, नकट्यादेव, जूना अस्तंभा, भिमकुंड्या या मार्गाने अस्तंबा ऋषी यात्रेला जातात. रानटी श्वापदांना दूर ठेवण्यासाठी ढोल, आगीसाठी टायर, दिवट्या, टेंभे,मशाली अशा दिर्घकाळ जळणार्या वस्तू या यात्रेत घेतल्या जातात. रात्रीचा प्रवास करुण अस्तंबा
ऋषीच्या शिखरावर जाऊन धनत्रयोदशीला पहाटेच्या सुमारास दर्शन घेवुन ध्वज लावतात. सुमारे तीन दिवस ही यात्रा पूर्ण केली जाते. एकवेळा, पाच वेळा, अकरा वेळा यात्रा करण्याचा नवस बोलला जातो. चिरंजीव अश्वथामा पुजण्यामागे केवळ एक श्रध्दा आहे. त्याच्यासारखे दिर्घायुष्य मिळावे यासाठीच कदाचित ही यात्रा असते असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यानंतर आदिवासी बांधव तळोदा येथे एकत्रित येवुन ढोल ताश्याचा गजरात भव्य मिरवणुक काढतात. त्यानंतर नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे येथील पावबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात. या पदयात्रेदरम्यान डफच्या तालावर ठेका घेत `अस्तंबा ऋषी की जय ', `पावबा ऋषी की जय' असा जयघोष करुण नृत्य करतात. त्यानंतर पदयात्रा पुर्ण करुन परतीच्या प्रवास करीत घरी परततात.