सत्याची ढाल होती
नीष्ठेची तलवार
वीरतेचा भाला होता
हर हर महादेव नारा होता
सह्याद्रीची साथ होती
... जिजावुंचा आशिर्वाद
मरणाची भीती नव्हती
स्वराज्य हाच ध्यास
तोफांचा आवाज होता
घोड्यांच्या टापांचा नाद
कडेकपारीत फिरत होता
मर्द मराठ्यांचा वाघ
यौवनांच्या छातीत धडकी होती
आमच्या छातीत राम
पळता भुई कमी पडली ज्याच्या भीतीने
राजा शिवछत्रपती त्यांच नाव .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा