Breking News

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६

तळोदा महाविद्यालयाचा संजय वळवी याला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक..

तळोदा महाविद्यालयाचा संजय वळवी याला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक....
सुविधा द्या आम्ही आम्ही काहीतरी करून दाखवू अशी आर्त हाक अनेक वर्ष नंदुरबार जिल्हातील खेळाडू देत आहेत, त्याचाच प्रत्यय किसन तडवी ने दाखवून दिले मात्र किसन तडवी पाठोपाठ अक्कलकुवा तालुक्यातील सोजरीबर येथील मूळ रहिवासी असलेल्या व आश्रम शाळेत शिकणारा विद्यार्थी संजय वळवी याने नुकत्याच रांची येथे झालेल्या वनवासी आश्रम अंतर्गत पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं असून अक्कलकुवा तालुक्या सह पाठोपाठ नंदुरबार जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पुन्हा एकदा नेले आहे. तळोदा महाविद्यालयाच्या विद्यार्थी संजय सुंडा वळवी याने रांची झारखंड येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 5000 मिटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले आहे. 10 एप्रिल 1995 रोजी सल्लीबार ता.अक्कलकुवा येथे जन्मलेला संजय हा वेलिमता आश्रम शाळेचा माजी विद्यार्थी असून इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यन्तचे शिक्षण त्याने वेली माता आश्रम शाळेत पूर्ण केले. संजय सध्या तळोदे येथील महाविद्यालयात एस.वाय.च्या वर्गात शिकत असून नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम तर्फे रांची येथील राष्ट्रीय स्पर्धेत 5000 मीटर धावण्यात सुवर्ण पदक मिळवून आपल्या विभागाला गौरव प्राप्त करून दिला आहे. या स्पर्धेत भारतातील नेपाळसह 29 राज्यातील स्पर्धक सामील झाले होते. या आधी केरळ येथे झालेल्या ऑल इण्डिया क्रॉस कंट्री स्पर्धेत 120 वा तर 2015 मध्ये झालेल्या याच स्पर्धेत संजय हा अखिल भारतीय स्तरावर 56 वा आला होता. वनवासी कल्याण आश्रम तर्फे झालेल्या स्पर्धेत मात्र सुवर्ण पदकाची कमाई त्याच्या मेहनतीला मिळलेल फळ होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा