Breking News

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

मा.श्री भरत भाई माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लोकमान्य लोकनेता भरतभाई!
‘पहेलवानाचं गाव’ म्हणून एकेकाळी तळोदा शहराची पहेचान होती.

कुस्ती हा येथील शहरवासियांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे तळोद्याचा लोकांना ‘पकड’पासून ‘धोबीपछाड’पर्यंत सर्व डाव माहित होते. परंतु आता ती कुस्ती राहिली नाही. अन् तिचे ते वैभवही राहिले नाही. पहेलवान गेले अन् त्यांचे लंगोट रोहिले, अशी परिस्थिती आहे. शंभर जोर मारु शकत नाही ते आता तालिमींचे अध्यक्ष आहेत. असू द्या आपल्याला काय त्याचे. कुस्तीचक फड तळोद्यात होत नसले तरी त्याची जागा आता राजकीय आखाडे रंगु लागले आहेत. काटेदार मुकाबला ऐवजी रंगतदार निवडणुका होत आहेत. तळोद्याच्या राजकीय आखाड्यात उतरण्याचा मोह खुद्द माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांना सुध्दा आवरता आला नाही. तळोद्याच्या मातीचीच किमया अशी आहे. तळोद्याच्या राजकीय रिंगणात असंख्य रथीमहारथी आले अनं गेले. परंतु तळोदा शहर वासियांचे इमान एकाच व्यक्तीशी कायमचे बांधले गेले. ते म्हणजे लोकमान्य युवा नेतृत्व भरतभाई बबनराव माळी यांच्याशी. जनतेने नगरपालिकेच्या माध्यमातून तळोद्याच्या विकासाची ढाल व गदा भरतभाईंना मोठ्या विश्‍वासाने सोपविली. लोकांच्या विश्‍वासाला तडा न देता भरतभाई माळींनी तळोदा शहराचा जो विकास केला आहे त्याला तोड नाही. विकास अनं प्रगतीचा ध्यास असलेला असा नेता आमच्या पाहण्यात नाही. आज तळोदा शहराचे भाग्यविधाते, विकासपुरुष मा.श्री.भरतभाई माळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. भरतभाईंचे अभीष्टचिंतन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तळोद्यात त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी होईल.
यानिश्‍चित या शब्द शुभेच्छा! वयाच्या २४ व्या वर्षी ते तळोदापालिकेचे नगराध्यक्ष झाले. महाराष्ट्रातील सर्वाधिक तरुण नगराध्यक्षाचा मान भरतभाईंना मिळाला. सन १९९० सालापासून त्यांच्या राजकीय जिवनाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी मात्र मागे वळून पाहिले नाही. सार्वजनिक जिवनात असंख्य पदे भुषविली. लोकांची कामे केली. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तळोदा पिपल्स एज्युकेशन संस्थेचे संचालक, माळी समाज सुधारणा मंडळचे अध्यक्ष, तळोदा न.पा.चे प्रतोद आदी पदांच्या माध्यमातून भरतभाईंनी जनसेवा केली आहे. भरतभाईंचा राजकीय प्रवास मोठ्या संघर्षांनी भरलेला आहे. तळोदा पालिकेत वर्षानुवर्षे असलेली त्यांची सत्ता विरोधकांच्या नजरेत खुपत होती. भरतभाईंचे यश अनेकांना सलत होते. राजकीय पोटदुखी सुरु झाली. अशातच तळोदा पालिकेत सत्तांतराचा प्रयत्न झाला. सर्व विरोधकांची अभ्रद युती झाली. परंतु भरतभाई सर्वांना पुरुन उरले. पुन्हा गमावलेले स्वराज्य त्यांनी प्रयत्नाने मिळविले. या प्रयोगानंतर स्वराज्यावर घाला घालण्यासाठी आलेल्या शाहिस्तेखानची पुरती बोटे छाटली गेली.  भरतभाईंच्या या प्रसंगात शांत, संयमी,धिरोदत्त, लढावूवृत्तीचे दर्शन झाले. भरतभाई हे चाणाक्ष नेते असून त्यांच्यात राजकीय संधी ओळखण्याची मोठी खुबी आहे. तळोदा शहराच्या विकासासाठी कुठलीही तडजोड करायची नाही, अशी त्यांची वृत्ती आहे. वेळप्रसंगी स्व.पक्षीयांशी झगडावे लागले तरी ते मागे हटणार नाहीत, असा त्यांचा स्वभाव आहे. भरतभाईंकडे त्यांचे पिताश्री बबनराव पहेलवान यांचा समर्थ वारसा आहे. ते राज्यातील नामांकीत कुस्तीपटू होते. १९६५ साली तळोद्याचे नगराध्यक्ष होते. मातोश्री विमलताई माळीही नगरसेविका होत्या. पत्नी सौ.योजनाताई माळी ह्या विद्यमान नगराध्यक्षा आहेत. तसेच त्यांचे मोठे बंधू आप्पसाहेब लक्ष्मण माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा शहराचा सर्वांगिण विकास होतो आहे.

बंधू संजय माळी हे नगरसेवक असून त्यांची साथ भरतभाईंना नेहमी असते. तळोदा शहराच्या विकासासाठी भरतभाई नेहमीच झिजले. पालिकेच्या माध्यमातून शहर सुशोभिकरण केले. रस्त्यांवर भव्य हायमस्ट लावले. वार्डा-वार्डात रस्ते केले. ड्रेनेज लाईन, गटारी बांधल्या. शहराला विकास निधी मिळावा. यासाठी मंत्रालयातून निधी मंजूर करुन आणला. जलशुध्दीकरण प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेस पालकमंत्री ऍड.पद्माकर वळवी, केंद्रिय राज्यामंत्री माणिकराव गावित, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सहकार्याने भरतभाईंनी मंजुरी मिळवून घेतली. या योजनेमुळे शहराला २४ तास शुध्द पाणी मिळू शकेल. भरतभाई माळी हे अजब रसायन आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये रमणारा हा सर्वप्रिय नेता आहे. लोकांचे प्रश्‍न सोडविण्यात त्यांचा सारा दिवस जातो. भरतभाईंचे नेतृत्व आता तळोदा शहर, तालुका ते व्हाया नंदुरबार जिल्हा असे सर्वदूर झाले आहे. जिल्ह्यातील नामांकीत नेत्यांमध्ये त्यांचा समावेश मोठ्या गौरवाने होतो आहे. भरतभाई माळीयांचे नेतृत्व स्वःकर्तृत्वावर पुढे आले आहे. कोणीही गॉडफादर शिवाय ते राजकारणात यशस्वी झाले आहेत, ही मोठी गोष्ट आहे. लोकांच्या आशिर्वादाने स्वतःचा शिक्का निर्माण करणार्‍या लोकमान्य लोकनेते भरतभाई माळी यांना वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!                     
                                                                                                                                    
                                                                                           
                                                                               शब्दांकन- श्री.सुधाकर मराठे
                                                                                  उपशिक्षक
                                                                               न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज अक्कलकुवा             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा