तलोदा शहराच्या उत्तरेला खटाई माता नगर येथिल स्व:रमन सुर्यवंशी यांच्या शेतात खटाई मातेचे मंदिर आहे. नवरात्रोत्सवा निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. नवरात्रात नवसपूर्तीसाठी भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे.
तलोदा येथील बबनराव छगनराव माळी यांचे मोठे बंधु रमन छगन सुर्यवंशी यांच्या मालकी शेतात खटाई माता नगर येथे 300 वर्षापूर्वीचे अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील खटाई मातेचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम साध्या स्वरूपाचे आहे. अहिल्याबाईच्या काळापासून भाविक नवरात्रित नवस व मानता करता. नागरिकांची अशी भावना आहे की, नवरात्रीत मंदिरात येवून मातेजवळ नवस केल्याने मनातील इच्छा आकांशा पूर्ण होवून कार्यसिद्धि प्राप्त होते. पुणे नाशिक शिंदखेड़ा मालेगाव आदि परिसरातील वैष्णव समाजाची कुलदैवत असल्याने येथून मोठ्या प्रमाणात नागरिक चैत्र पोर्णिमेला मानता फेडण्यासाठी येत असतात. तसेच आसपासच्या परिसरासह
गुजरात राज्यातील भाविक देखील मोठ्या संखेने नवस मानण्यांसाठी येतात.
मंदिराचे तोंड पूर्वेस असुन मंदिर हे चार फुटाच्या उंचीवर चौरसावर बांधलेले आहे.मंदिराच्या मागील बाजूस एक लहान मंदिरात एका अखंड दगडात दोन मुर्त्या कोरलेल्या आहेत. त्यापैकी एक मूर्ती खटाई मातेची व दूसरी मूर्ती तीची बहिन आहे. मुर्त्या शेंदुरने फासलेल्या आहेत. मंदिराला पत्र्याचे मंडप करण्यात आले आहे, मंदिराच्या डाव्या बाजूला 4 फुटाचे तीन महादेवाचे लहान मंदिरे आहेत.
व समोर एक लहान मंदिर आहे, मंदिरात पादुका व लहान लहान शिवलिंग आहेत. मातेच्या मंदिराच्या उजव्यादिशेला भवानी माता व महिषासुर यांचे स्थान आहे. कार्तिकी एकादशिला बालाजी वाड़यात होणाऱ्या दशअवतार कार्यक्रमा नंतर गावात भवानी माता व महिषासुर यांचा मिरवणुक निघत असते . सदर मिरवणुकीचा आदल्या दिवशी खटाई मातेचे दर्शन घेवुनच गावात भव्य मिरवणूक निघत असल्याचा इतिहास आहे.. नवरात्रोत्सवा निमित्त दररोज सकाळी आणि सायंकाळी महाआरती करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांकडून नावरात्रित मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली जाते. तळोदा शहरातील जुनेजाणते नागरिक आजही कोणतेही नवीन कार्य करण्या अगोदर मातेचे दर्शन घेऊनच सुरू करतात. नवसाला पावणार्या खटाई मातेला नारळ वाहून नागरिक नवस करतात. नवरात्रोत्सवनिमित्त मंदिराच्या विश्वस्तांनी विशेष तयारी केली आहे.... मंदिराचा सांभाळ मंदिराचे पूर्वज दगुलाल रमन सुर्यवंशी, भास्कर रमन सुर्यवंशी, सुरेश रमन सुर्यवंशी आदि करीत आहे...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा