Breking News

सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

मनातील इच्छापूर्ती करणारी मनिषापूरी माता

मनिषापूरी माता भक्तांच्या मनातील इच्छापूर्ती करणारी देवी म्हणुन तळोद्यातील ऐतिहासिक मनिषापुरी मातेवर भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराची उभारणी ३०० वर्षापुर्वी जहागिरदार श्रीमंत नारायणराव भोजराज बारगळ यांनी केली. नारायणराव भोजराज बारगळ हे त्यावेळी राजस्थानातील उदयपुर संस्थानाचे सेनापती असताना त्यांनी मनातील इच्छा पूर्ण झाली तर मनिषापुरी मातेची स्थापना तळोदा गावात करीन असा नवस केला होता. नवसाप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण झाल्याने श्रीमंत नारायणरावानी मनुषापुरी देवीची स्थापना केली. देवी पार्वतीचे रूप असल्याने मंदिराशेजारी कालभैरव रूपी शिवाची स्थापना करण्यात आली आहे. अवघ्या पंचक्रोशितिल हे एकमेव कालभैरवनाथाचे मंदिर असल्याने येथे सुद्धा नेहमी भक्तांची गर्दी असते. तळोदयात पूर्वी वर्षभरात दोन यात्रा भरत असत, त्यापैकी चैत्र नवरात्रिला मनिषापुरी
मातेची व अक्षय्य तृतीयेला कालीका देवीची या मनिषा पुरिमातेची यात्रा त्याकाळी पंचक्रोशितिल सर्वात मोठी यात्रा होती. १९०० शतकाच्या सुरुवातीला तळोदा परिसरात प्लेगने थैमान घातले. त्यावेळी संसर्ग होवु नये म्हणुन ही यात्रा बंद करण्यात आली. मनिषापुरी मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे याठिकाणी एकाच जागी दोन मुर्त्या आहेत. त्यापैकी उजव्या बाजूला मनिषापुरी मातेची व डाव्या बाजुला सटवाई देवीची एकाच जागी सटवाई व मनिषापूरी देवी असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. तळोदयाचे जहागीरदार बारगळ हे 15 व्या शतकात सुलतानपुर- शहादा येथे संस्थानिक होते. त्यावेळेस त्यांच्या कुटुंबातील छटी (सटवाई) पूजण्यासाठी सुलतानपुर येथे सटवाई स्थापण्यात आली होती. ती सटवाई देवी कालांतराने 1921 साली तत्कालीन
जहागिरदार श्रीमंत कृष्णराव बारगळ यांनी तळोद्यातील मनिषापुरी माता मंदिरात आणून स्थापली. १९२१ साली सटवाई स्थापनेच्या वेळेस या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. नवरात्र काळात नवस फेडणारे व नारळ करणाऱ्या भक्तांची गर्दी असते.तसेच नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते..










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा