Breking News

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

बेटी बचावचा संदेश देत सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला मुलीचा वाढदिवस तळोद्याच्या नगरसेविका अनिता परदेशी यांच्या उपक्रमाचे कौतूक

वाढदिवस साजरा करायचे म्हटले म्हजले डिजिटल फलक, पाट्र्या देणे आदी आवाजवी खर्च केला जातो.
यात आपण आपला, आपल्या नेत्याचा किंवा नात्यातील मुलगा असो वा वडील तो किती धुमधडाक्यात साजरा केला याचे दर्शन घडविण्यावर भर दिला जातो. मात्र या सर्वाला अपवाद ठरत तळोदा पालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका अनिता परदेशी व त्यांचे पती संदीप परदेशी यांनी त्यांच्या चिमुकल्या मुलीचा वाढदिवस स्वच्छता कर्मचारी यांच्या सोबत साजरा करीत महिलांना साडी-चोळी व पुरुषांना बेटी बचाव बेटी पढाओ, स्वच्छ तळोदा-सुंदर तळोदा असा जनजागृती संदेश लिहलेले टी-शर्टचे वाटप करुन एक सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. परदेशी कुटुंबियांच्या या उपक्रमाचे संपूर्ण शहरातून कौतूक करण्यात येत आहे.. वाढदिवस म्हटला की आवाजाची खर्च आलाच, राजकीय पुढारी वाढदिवसाला लाखोची उधळण करताना दिसतात. मात्र, दिवसभर स्वत:चा आरोग्याची चिंता न करता, पोटाची खळगी भरण्यासाठी कचरा संकलन करणे, गटारीत उतरून मैला काढणे या सोबतच शहरात स्वछता कशी नांदेल यासाठी स्वछता कर्मचारी आपले जीवाचे रान करत कर्तव्य बजावतात. एवढे करूनही या कर्मचाऱ्यांची दखल घेतली जात नाही. स्वच्छतेच्या कामाकडे गलिच्छ कामे म्हणून पाहिले जाते. मात्र, तळोदा येथील काँग्रेसच्या नगरसेविका अनिता परदेशी व त्यांचे पती संदीप परदेशी यांनी मुलीच्या वाढदिवसाला सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले. परदेशी दाम्पत्याला दोन कन्या आहेत. वाढदिवसाला पैशांची उधळण करण्यापेक्षा स्वछता कर्मचारी व त्यांच्या मुलांसोबत लहान मुलगी चेतनाचा वाढदिवस साजरा केला. पालिका आवारात हरिशचंद्र जोशी यांनी विधिवत पद्धतीने शांती पठण केले. यावेळी ५० महिला व पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या टी-शर्टवर बेटी बचाव, बेटी पढावो... स्वच्छ तळोदा सुंदर तळोदा असे संदेश लिहले होते. तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी पालिका प्रतोद संजय माळी, गटनेते गौरव वाणी, नगरसेवक सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, जितेंद्र माळी, माजी नगरसेवक सतीवान पाडवी, काँग्रेसचे शहादा-तळोदा समन्वयक योगेश मराठे, संदीप परदेशी, भाऊदादा पाडवी आदी उपस्थित होते..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा