आई.......
आई.......
माउली तुला कोटी कोटी प्रणाम
करुणे ची मूर्त तू
मायची ठेव आहे
वात्सल्य स्वरूपास तुझ्या
कोटी कोटी प्रणाम
माझी पहिली गुरु
माझी मैत्रीण आई
माझ्या जीवनाच्या ज्योतीला कोटी कोटी प्रणाम
मी जळताना तप्त उन्हात माझी शीतल छाया
त्या वृक्ष स्वरूप आईला कोटी कोटी प्रणाम
तुळस जशी असते दारी
तशीच आईची महती घरी
घराला घरपण देणाऱ्या आईला
कोटी कोटी प्रणाम
पहाटेचा गजर तू सगळ्यांची फिकीर तू
पहाटेचा गजर तू सगळ्यांची फिकीर तू
प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या आईला
कोटी कोटी प्रणाम
कितीही दुख कितीही वेदना
तरी झळकल्या नाही तुझ्या मुखावर यातना
त्या सहनशील आई ला
कोटी कोटी प्रणाम
वर्णाव किती तुझ्या प्रतिमेला
वर्णाव किती तुझ्या प्रतिमेला
अस्तित्व माझा तुझ्या मुळे आला
ऋणी
मी जन्म जन्माची
हे ईश्वर मूर्त
आई तुला कोटी कोटी प्रणाम.....
आई तुला कोटी कोटी प्रणाम.....
आई तुझ्या वाचू कसे जगेन मी
श्वासांत श्वास नाही कसे उरेल मी
आई तुझ्या मायेच्या पदरात
माझ्या अश्रूंचा विसावा
दुखांच्या खाचा किती हि
तुझ्या कुशीचा होता ठेवा
आधार माझा तू
आता निराधार मी
आई
तुझ्या वाचू कसे जगेन मी
ओसाड जीवनाला
प्रेमाचा झरा होता
निष्प्राण देहात या
तू प्राण ओतला
तू जन्म दाती नाही
पण जीवन तुझ्या मुळे हा
ऋणी आहे
तुझा मी
आई तुझ्या वाचून कसे जगेन
मी
ती निश्वास पडला देह
अजून दृषित घुमत आहे
वेदना मनाची तू साद देत आहे
एक न परत आई
कुशीत निजायचे मला
तुझ्या हाताने परत
कवड भाराचे मला
दुखानाचा मना वर
ओझा फार झाला
तुझ्या पदरात अश्रूचा
सडा घालायचं मला
का देवाने प्राण माझा हिरावून नेला
नाही
जगू शकत मी आई
श्वासांत श्वास न उरला..
ब्रह्मांड शोधले तरी
कुणी गवसले नाही
आई मूर्त स्वरूप दुजा कोणी नाही
ममता वात्सल्य प्रेमाची सरिता
माय तू माझ्या जीवनाची गाथा.........
आई तुझ्या वाचून मी जीवन जगेन का