Breking News

About Yatharth लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
About Yatharth लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

यथार्थचा क्रिकेट प्रवास: एक छानसा अनुभव

   यथार्थचा व्यक्तिमत्व जितकं निरागस आहे, तितकाच तो खोडकरही आहे. घरात तो असला की वातावरण एकदम सक्रिय आणि खोड्या काढण्यात तर तो उस्ताद आहे. त्याची उत्साही आणि भयंकर स्टॅमिना असलेली भावना नेहमीच घरात चैतन्य निर्माण करते.

सुरुवातीला त्याला क्रिकेट खेळता येत नव्हते. बॅट रस्त्यावर आपटल्यामुळे त्याच्या बॅट्सचे फुटणे ही एक दुरुगतच बनली. त्याच्या मित्रांच्या खेळाची पाहणी करताना त्याला निराशा होऊ लागली होती. यथार्थची निराशा पाहून, वडील या नात्याने ते आवडायचे नाही. पण एक दिवस,  17 एप्रिल रोजी माझ्या जवळचा मित्र सारंग शेंडे याच्या मुलगा केतन शेंडे यास क्रिकेट खेळताना पाहिलं. केतनचा खेळ छान होतं आणि यथार्थला त्याच्या समवयीन मुलांबरोबर खेळायला संधी देण्याचं ठरवलं.

नंतर मी यथार्थ आणि केतन यांना स्पोर्ट्स दुकानात नेलं आणि दोघांना बॅट आणि बॉल घेऊन दिलं. त्यानंतर यथार्थने दररोज कष्ट घेतले आणि गल्ली क्रिकेट सुरू केलं. आता 15 दिवस झालेत आणि यथार्थ छान खेळायला लागला आहे. बॅटला चेंडू लागायला लागला आहे, तसेच त्याला बॅट घेऊन उभं राहाणं आणि बेसिक क्रिकेटचे नियम समजून खेळायला शिकला आहे.

हा अनुभव खूपच आनंददायक आहे, कारण यथार्थने आपली मेहनत आणि इच्छाशक्ती दाखवून एक नवीन गती पकडली आहे....

शनिवार, ८ मार्च, २०२५

के.आर पब्लिक स्कूलच्या शिशुकुंज विभागात "Best Student of the Month" पुरस्कार प्रदान

नंदुरबार : केअर पब्लिक स्कूलच्या शिशुकुंज विभागात "Best Student of the Month" प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याची निवड त्यांच्या अभ्यास, वर्तन, शिस्त आणि एकूणच सहभागाच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 
             या महिन्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यथार्थ मराठे याचा देखील समावेश होता. शाळेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन त्याला गौरवण्यात आले. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व वैयक्तिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळत आहे, असे शिक्षक आणि पालकांचे मत आहे..