तळोदा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील कन्या व मोशन इ्स्टिटट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जळगांवची विद्यार्थिनी भाग्यश्री उल्हास मगरे हिची इंटरनॅशनल प्लेसमेंट होऊन दुबई येथील हॉस्पिटलमध्ये एच.आर.असिस्टंट मैनेजर पदावर नियुक्ती झाली आहे. .
भाग्यश्री हीचे बारावी पर्यंतचे शिक्षण तळोदा येथे झाले आहे. त्यानंतर जळगांव येथुन बी.ई.बायोटेक केल्यावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.टेकचे उच्चशिक्षण घेतले आहे. नॅशनल इ्स्टिटट्यूट ऑफ रिसर्च नागपूर येथे संशोधनाची संधी मिळाली असता तिच्या तेथील संशोधन प्रबंधला अमेरिकेतील इंटरनॅशनल सायन्स जर्नलने जगभर प्रसिद्धी देऊन गौरव केला असून सुवर्णपदक विजेती ठरली आहे. सध्या ती मोशन इ्स्टिटट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जळगांव येथे हेल्थकेअर मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. या निवड प्रक्रियेत पात्र होऊन संयुक्त अरब अमिरातीत दुबई स्थित प्रथितयश अश्या इंटरनॅशनल मॉडर्न हॉस्पिटल मध्ये एच.आर.असिस्टंट मॅनेजर म्हणून तिची नियुक्ती झाली आहे. तळोदा सारख्या एका लहानश्या गांवातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलीची इंटरनॅशनल प्लेसमेंट होऊन तिला परदेशात नोकरीची संधी मिळाल्याबद्दल मिम्स जळगांवचे संचालक नितीन पाटील, संचालिका शैलजा पाटील तसेच तळोदा शहरातील अनेकांनी कु.भाग्यश्रीचे कौतुक केले आहे. भाग्यश्री ही तळोदा येथील दै.'पुण्यनगरी' चे प्रतिनिधी व कन्या विद्यालयात कार्यरत उल्हास मगरे व सौ .नीलिमा मगरे यांची कन्या आहे. आजोबा माजी प्राचार्य स्व.एन.सी.मगरे यांची प्रेरणा व माझ्या प्रत्येक पावलाला माझ्या आजीने, आईवडिलांनी दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरला. त्यांनी मला कधीही इतरांच्या वाटेने जाण्याचा आग्रह केला नाही. माझी वाट मला निवडू दिली, अशी प्रतिक्रिया कु.भाग्यश्रीने दिली..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा