२६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्यातील शहिद वीर पोलिस व जवानांना आदरांजली देण्यासाठी उनपदेव ते तळोदा सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शहादा येथे पोलिसांच्या वतीने वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली.. २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह सुमारे १९७ जण ठार झाले. तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलिस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. मात्र, या घटनेत १७ पोलिस व वीर जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. या शहिद वीर जवान व पोलिस यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करून त्यांच्या कार्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तळोदा
येथील भन्साली व्यापारी संकुलातील सर्व व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी सकाळी उनपदेव या तीर्थस्थळापासून ते तळोदा पर्यंत सायकल यात्रा काढली. वीर जवान अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. या सायकल यात्रेत डॉ.लक्ष्मीकांत गिरणार, जितेंद्र कलाल, तळोदा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर मराठे, प्रकाश मराठे, अमित कलाल, निखिल केदार, राकेश मराठे, मानसिंग गिरासे, रवि मराठे, प्रमोद चौधरी, हेमंत चौधरी, विक्रांत पाटील, महेंद्र लोहार, कल्पेश पाटील, बंटी कोळी, विक्की कोळी, गजेंद्र परदेशी, शुभम जोहरी, लक्ष्मण पाटील, पारस पाटील, लखन पाटील, संदीप गुरव आदिसह २५ जण सायकल यात्रेत सहभागी होते. रम्यान शहादा येथील तहसील कार्यालय परिसरात शहीद वीरांना कॅन्डल लावून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधीक्षक पुंडलिक सपकाळे, मनलेश जयस्वाल, गोपाळ गांगुर्डे, बजरंग ग्रुपचे सहकारी आदीसह शहादा शहरातील मान्यवर उपस्थित होते. बोरद, म्हसावद या ठिकाणी वीर जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप तळोदा येथे स्मारक चौकात करण्यात आला. या ठिकाणी पोलिस प्रशासनाकडून शिीदांना श्रध्दांजली अर्पण करीत सायकल यात्रेकरूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, नगराध्यक्ष अजय परदेशी, नगरसेवक हेमलाल मगरे, अनुप उदासी, सुनिल सुर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, अक्षय कलाल यांनी मनोगत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा