Breking News

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

पत्रकारितेचे शस्त्र समाजातील धगधगत्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी करा अनिल चव्हाण :

 तळोदा तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन सकारात्मक
 पत्रकारिताकडे कल द्या, आपल्या सकारात्मक वृतांमुळे समाजात ऊर्जा निर्माण होते. माती अन माणसाची बातमी केल्यास ती हृदयस्पर्शी ठरते. सोशल मिडीयाच्या वाढता प्रकोप पाहता बातमीदाराने जबाबदारी लक्षात घेऊन वास्तव पत्रकारिता करण्याचा दृष्टिकोन ठेवावा, असे मत धुळे येथील एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालयातील पत्रकारिता विभाग प्रमुख तथा पत्रकार अनिल चव्हाण यांनी व्यक्त केले. . तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन तळोदा महाविद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक
 म्हणून धुळे येथील एस.एस. व्ही.पी.एस महाविद्यालयातील पत्रकारिता विभाग प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार अनिल चव्हाण, इलेक्टॉनिक्स मिडीयाचे पत्रकार प्रशांत परदेशी होते. याप्रसंगी पत्रकार हिरालाल चौधरी, बळवंत बोरसे, निलेश पवार, भिकेश पाटील, धनराज माळी, जयप्रकाश डिगराळे, रमेशकुमार भाट, मंगेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अनिल चव्हाण म्हणाले की, पत्रकारिता हे शस्त्र असून त्याचा वापर समाजातील धगधगत्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी करा, असे सांगत पत्रकारांची भूमिका, बातमी म्हणजे काय?
लेख, वार्तापत्र, अग्रलेख म्हणजे काय? पत्रकारांची जबाबदारी आणि त्यातील बारकावे, इलेक्ट्रॉनिक मिडीया आणि प्रिंट मिडीया यातील बदलते प्रवाह यासह विविध पत्रकारितेचे बदलते संदर्भ व इतिहास अश्या विविध विषयाबाबत त्यांनी सखोल माहिती दिली. प्रशांत परदेशी म्हणाले की, सध्याची पत्रकारिता गतिमान झाली आहे. क्षणातच ई-पेपरच्या माध्यमातून वृत्त प्रत्येकापर्यंत पोहचत आहे. अफवा असलेले वृत्त तसेच खऱ्या-खोट्या बातम्यांची शहानिशा करणे हे आव्हान पत्रकारितेत निर्माण झाले आहे. यामुळे भविष्यात पत्रकारितावर देखील आचारसंहिता लादली जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. डिजिटल युगात संवादाची साधने वाढली असली तरी संवाद मात्र कमी झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यशाळेत शहादा, अक्कलकुवा ,नंदुरबार, दोंडाईचा, तळोदा, धडगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते. सुत्रसंचालन फुंदीलाल माळी यांनी केले. प्रास्ताविक सुनील सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष सुधाकर मराठे, सचिव सम्राट महाजन, उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी, कोष्याध्यक्ष चेतन इंगळे आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले..





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा