ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या पोलिसांपुढे ठरताय आव्हान 21 Nov 2018FrontpageImage ViewPrintMailClose Button AAA
बोरद तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. गावात पोलिस दुरक्षेत्र असून ३८ लहान-मोठे गावे जोडली आहेत. केवळ ४ पोलिस कर्मचाऱ्यांवर दुरक्षेत्राची जबाबदारी आहे. त्यापैकी अनेकदा काहींना काही कारणास्तव ते रजेवर राहत आहेत. पोलिस नियमित दुरक्षेत्रावर उपस्थित राहत नसल्याच्या फायदा चोरटे घेत आहेत. गावात दुकाने फोडणे, घरफोडी, व्यापारी लुटीच्या घटना, शेतातील मोटारी, केबल चोरी होणे, वाहने चोरी होणे आदीं घटनांमध्ये वाढ झाली आहे. वरिष्ठांना याबाबत कल्पना देऊनही पोलिस कर्मचारी हजर राहत नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. चोरांनी सध्या ग्रामीण भागाला लक्ष केले असून सातत्याने ग्रामीण भागात होत असलेल्या चोऱ्या पोलिसांपुढे आव्हान ठरत आहेत..
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद येथील लक्ष्मण पाटील यांच्या घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले तब्बल ८ लाख किंमतीचे २६ तोळे सोन्याचे दागिने व ७५ हजार रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. चोरीच्या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या पोलिसांपुढे आव्हान ठरल्या आहेत. .
तळोदा तालुक्यातील बोरद गावात कुंभार गल्लीत राहणाऱ्या लक्ष्मण यशवंत पाटील हे आपल्या पत्नीला सुरत येथे दवाखान्यात तपासणीसाठी घेऊन गेले होते.चोरट्यांनी संधी साधत दि.२० रोजी पहाटे २ ते ४ च्या सुमारास घराचा दरवाजाला लावलेले कुलूप टॉमीने तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले ११ तोळे सोन्याच्या बांगड्या, ५ तोळ्याचा राणी हार, अडीच तोळे वजनाच्याअंगठ्या, ३ तोळे बाजूबंद, अडीच तोळे वजनाची सोनसाखळी, २ तोळे कानातील दागिने, ३० भार चांदी असे दागिने व कापूस विक्रीतून आलेले ७५ हजार रुपये इतकी रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. सकाळी शेजारील महिला तुळसीला पाणी घालत असतांना लक्षात आल्याने घरमालकास माहिती दिली. सुरतहून परत आल्याने पोलिस स्टेशन गाठले. काल रात्री पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानने घरापासून तळोदा रस्त्यावर महादेव मंदिर पर्यंत रस्ता दाखविला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा