Breking News

रविवार, १८ सप्टेंबर, २०११

चेहरा

चेहरा

मानसाची ओळख सान्गतो चेहरा,
चेहर्याच्या शोधात ही असतो चेहरा,
चेहरा सान्गतो भाव मानसाचे,
हाव भावाची ओळख चेहरा ।

एक चेहरा, एक माणुस,
एक कहानी प्रत्येक चेहर्याची,
कधी चेहरा काही तरी सान्गतो,
कधी चेहरा वाचता ही येतो ।

चेहरा हसतो , रडतो ही चेहरा,
प्रत्येकाच्या भावना सान्गतो चेहरा,
चेहरा असतो व्यक्तीमत्वाचा नमुना,
प्रत्येक चेहर्यामागे अस्तित्वाच्या खुणा.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा