Breking News

शनिवार, १७ सप्टेंबर, २०११

तुझ्या-माझ्या मधे हे किती योजने अंतर.

तुझ्या-माझ्या मधे हे किती योजने अंतर..
तू मला अन मी तुला असे समांतर !
जन्मांतरीची साथ ही आपुली…
तरी नाते अधीर - अधांतर !

दाटलेले शब्द ओठी, पोचवू कसे तुला?
आसुसली माझी मिठी, पाठवू कशी तुला?
हुंकार तुझे ऐकुनी होतसे जिवाची लाही....
लाचार मी असा, बस इथून तुजला पाही !

ऋतू आला, गेला ऋतू... आतूर तू
क्षितिजा पार मीलन हे जाण तू
सखे-लाडके जरा प्रतिक्षा, धीर जरा...
मेघदूता सवे ओली माया भिजवेल धरा............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा