आठवण
तू बोलत नाही काही
अन् मी ही बोलत नाही
पण क्षण आठवांचे
गुणगुणतात काही
अबोल शब्दातही
प्रीतीचा एक अर्थ आहे
माझ्या मनाच्या स्वप्नासाठी
माझे प्रेम नि:स्वार्थ आहे...............
जीवन कसे पक्ष्यां सारखे असावे
कुठे ही उडावे आणि कसे ही जगावे
आणि मरताना देखिल कधी कुणावर
आपले ओजे न देता जावे
माझ्यासाठी प्रेम म्हणजे
मोठ्ठ कुतूहल आहे
पडले नाही तरी लागते
अशी एक चाहूल आहे
आठवणींच्या मागे धावलो
कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना,
परतायचं राहुन जातं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा