Breking News

रविवार, २५ डिसेंबर, २०११

Love Dairy


डायरी डायरी लिहिली .. माझी मीच वाचली..
नको ती आठवण.. पुन्हा डोळ्यात साचली..
नको ते मला अस तीचं रोज रोज दिसणं
भुतकाळाच ते माझ्या वर्तमानात असणं सारखं सारख दिसून..
ते मला असं खिजवणं भरत आलेल्या जखमेला
तिचं रोज ते खाजवणं फाडून टाकलं मग एकेक पान टरा टरा..
केराच्या टोपलीत फेकून दिलं भरा भरा..
आता नाही ना पुन्हा मला ती त्रास देणार..? आजच्या क्षणाना..
सरलेल्या क्षणांचा भास देणार? पण मनातले आठव.. त्याला कसे बरं पुसावे..
डोळे केलेत ना बंद.. तरी स्पष्ट सारे का दिसावे..
डायरी फाडली खरं मी पण मनातली पाने काही फाटत नाहीत.. 
दिवस.. वारच काय.. वेळ सुद्धा आठवतेय..
मनातली ही डायरी, मिटू म्हटलं तरी मिटत नाही..........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा