Breking News

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

चिमण्याने केलेले प्रेमही खोटे नाही


एका ठिकाणी चिमणी व चिमण्याचे एक जोडपे होते. चिमन्याचे नाव सुधास तरी चिमणीचे नाव परी होते. दोघांचे एक मेकांवरती जीवापार प्रेम होते. चिमणा हां चिमणी वरती जिव ओतायचा तर चिमणीही त्याच्यावर अतोनात प्रेम करत होती. कधी एक मेकांकडे पाहुन हसत होती तर कधी रडत होती. गतकाळ ते नेहमी आठवत होते. जीवन त्याच आनंदाने जगत होते. कधीतरी एखादे वादळ उठत होते. एकमेकाना त्यांचे भेटने काही काळ बंद होत होते. तरी संकटातुन मार्ग काढत त्यांचे एकमेकांचे भेटने सुरूच होते.
असे करता करता वर्षो उलटली. अचानक प्रेमात वादळ आले परी चिमणीचे लग्न ठरले. त्यामुळे ते जोडपे विभक्त झाले. उरलं आयुष्य जगण्यास राहुन गेले. तरीही धेर्याने ते संकटाना तोंड देत गेले. त्यातच पुन्हा विरहाचा पावसाळयाला सुरुवात झाली. ज्या झुडपांवर त्यानी घरटे बांधन्याची स्वप्न पाहिली होती. दुर्देवाने ते झुडपेच वाहुन गेले. पुन्हा भेटण्याची आस मनातच राहुन गेली. सुधास व परी आता विभक्त झाली. सुधास आजही तिची त्याच जोमाने वाट पाहत आहे. मात्र परी चिमणी आता दुस-याचे घर ठाटते आहे. काय मग ह्यालाच जीवन म्हणावे ? असा प्रश्न मनात घेवुन आस लावुन आजही तो तिची वाट पाहत आहे. तर परी त्याला कधी विसरु ह्याचा ध्यास धरत आहे.मात्र तीला त्याला विसरण येवढ सोप नाही कारण चिमण्याने केलेले प्रेमही खोटे नाही. चिमण्याने केलेले प्रेमही खोटे नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा